अभिनेत्री जेनिफर विंगेट: माझे गोव्यातील “विकेंड होम” घर मला नवीन टवटवी देते


अभिनेत्री जेनिफर विंगेट, हिने गोव्यात एक विकेंड होम विकत घेतले आहे, तिच्या मते हा तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णयांपैकी एक आहे

“बऱ्याच वर्षांपासून मला गोव्यामध्ये एक घर खरेदी करायचे होते. जेव्हा पण मी माझ्या कुटुंबियांसह किंवा मित्रांसोबत तिथे गेले, मी माझ्या मुक्कामाचा आनंद घेतला. मला तिथले नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि अन्न फार आवडते. गोव्यामध्ये मी तणावमुक्त होते. ‘विकेंड होम’ घेण्यासाठी ही एक आदर्श जागा आहे”  असे अभिनेत्री जेनिफर विंगेट म्हणाल्या.

विंगेट दोन वर्षांपासून घराच्या शोधात होती आणि शेवटी उत्तर गोव्याच्या रिस मगोस मध्ये तिला घर आवडले. तिचे घर समुद्रकिनाऱ्यापासून  केवळ 15 मिनिट दूर आहे.

Actress Jennifer Winget: My weekend home in Goa rejuvenates meActress Jennifer Winget: My weekend home in Goa rejuvenates me

” माझ्या एजंटने मला ही नवीन प्रॉपर्टी दाखवली आणि ती मला लगेच आवडली. या जागेत मला काहीतरी सकारात्मक जाणवले. हे एक आधुनिकतेचे आणि पारंपारिकतेचे मिश्रण असलेले मोहक घर आहे आणि येथे एक लहान बाग देखील आहे. मी माझ्या आई-बाबांना फोन केला आणि आठवड्याभरातच हा करार केला. माझ्या आयुष्यातील हा सर्वात चांगला निर्णय आहे. माझे एक स्वप्न पूर्ण झाले,” असे अभिनेत्रीने सांगितले. जेनिफर सध्या “बेहद” या टेलिव्हिजन शोमध्ये भूमिका करते आहे आणि तिने “सरस्वती चंद्र, कार्तिका,कुमकुम, कसौटी जिंदगी की, क्या होगा निम्मो का” या टेलिव्हिजन शोमध्ये तसेच फिर से’ या चित्रपटातही काम केले आहे.

 

माझे घर: माझे खाजगी आश्रयस्थान

“जेव्हा मी घर शोधत होते तेव्हा माझ्या दोन अटी होत्या की जागा शांत असावी आणि परिसरदेखील निवांत असावा. माझे दोन बेडरूम, हॉलचे घर स्वतंत्र व्हिलाच्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचा भाग आहे. इथे10 वेगवेगळी घरे आहेत आणि प्रायव्हसी देखील मिळते  “विंगेट स्पष्ट करते.

Actress Jennifer Winget My weekend home in Goa rejuvenates me

ग्राऊंड-प्लस-वन असलेल्या ह्या घराचा बाह्य भाग ,पोर्च आणि एक लहान बाग ह्या सगळ्यामुळे इथे मोरोक्को आणि ग्रीक संस्कृतीचा आभास होतो. बाहेरच्या बाजूला विटेचे कंपाऊंड असल्यामुळे खेड्यात आल्यासारखे वाटते. पांढऱ्या बंगल्याला लाकडी गेट असून रंगीबेरंगी मोझॅक फ्लोअरिंग आहे आणि परिसर हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे.

विंगेटने फर्निचर मुंबईहून तयार करून गोव्याला आणले. इंटिरियरमध्ये पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे यामुळे निळसर रंगाचे  सोफे आणि खुर्च्या अधिकच खुलून दिसतात. उघड्या किचनमुळे जागा मोठी वाटते.

Actress Jennifer Winget My weekend home in Goa rejuvenates me

प्रत्येक खोलीतील बेड पांढऱ्या व हिरव्या रंगाचे आहेत आणि छत पांढरेशुभ्र आहे. फारश्या तपकिरी-पिवळ्या आहेत. भिंतीना प्रामुख्याने पंधरा रंग असून पडदेही पांढरेच आहेत. त्याविरुद्ध रंग असलेले लाकडी-हिरवे कपाट नैसर्गिक आकर्षण आणतात.

Actress Jennifer Winget My weekend home in Goa rejuvenates me

“पांढरा एक पारंपरिक पण अत्याधुनिक रंग आहे. हिरवट निळा रंगाची जोड दिल्याने वातावरण उत्साही बनते. मी माझ्या मॉरीशसच्या सहलीहून काही फुलदाण्या विकत आणल्या, त्या माझ्या घराची शोभा अजून वाढवतात. मी माझ्या घरात अजिबात पसारा ठेवणार नाही, जेणेकरुन माझा कुत्रा सहजपणे वावरू शकेल, “विंगेट म्हणते.

 

गोवा: स्वतःला उर्जित करण्यासाठी एक आदर्श ठिकाण

ती म्हणते की, मान्सूनच्या हंगामात मला गोवा सर्वात जास्त आवडतो, कारण इथे सर्व काही हिरव्या रंगाचे असते आणि ओल्या मातीच्या सुगंधासह हवा उत्साहवर्धक असते. मला गोव्यामध्ये वळण असलेल्या रस्त्यांवर आणि झाडांमधून गाडी चालवायला आणि माझ्या पाळीव कुत्रा ब्रीझरसोबत समुद्रकिनाऱ्यावर खेळणे आवडते असे ती सांगते. “मी माझ्या सुट्टीसाठी कोणत्याच उपक्रमांची योजना आखत नाही. विश्रांती आणि स्वतःला टवटवीत करण्याला मी प्राधान्य देते. गनपावडर या बोहेमियन प्रकारचे रेस्टॉरंटमध्ये किनारपट्टीचे जेवण आणि “आनंद” मधील अगदी ग्रामीण खाद्यपदार्थाचा आनंद न घेता माझा गोव्यातील प्रवास कधीच पूर्ण होत नाही.

Actress Jennifer Winget My weekend home in Goa rejuvenates me

“मी महिन्यातून किमान एकदा तरी गोव्यात माझ्या घरी येण्याचा प्रयत्न करते आणि नुकतीच मी बागकामाची सुरुवात केली आहे. माझ्या घराच्या खिडक्यांपैकी एक खिडकी पोर्चमध्ये उघडते आणि एक खोली बागेत उघडते.  सकाळी, मी पोर्चमध्ये बसून सूर्याचा आनंद घेते. माझे घर प्रसन्न आणि शांत आहे, “एक स्मित हास्यासह विंगेट निरोप घेते.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments