गृह प्रवेश 2018: आपले शुभ मुहूर्त मार्गदर्शक


नवीन घरात रहायला जातांना शुभ मुहुर्त बघणे आवश्यक आहे . 2018 मध्ये गृहप्रवेश समारंभ कसा सुरळीत पार पाडावा यासाठी मुहुर्तासोबत निम्नलिखीत काही सूचना विचारात घ्याव्या

गृहप्रवेश समारंभ एक मंगल क्षण असतो, एखादा खरेदीदार आपले घर मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या घरात प्रवेश करतो. गृह्प्रवेशादरम्यान कोणतीही चूक होऊ नये असा सर्वसाधारण समज आहे आणि म्हणून लोक गृहप्रवेश शुभदिनी आयोजित करतात आणि पूजा, हवन इ.सारखे धार्मिक विधी पंडितांच्या मदतीने करतात. गृहप्रवेश सुरळीत पार पाडण्यासाठी खाली पाच महत्वाचे मुद्दे दिले आहेत.

 

1. 2018 मधील गृहप्रवेशाच्या मुहूर्ताच्या तारखा

“अरिहंत वास्तु”चे वास्तु विशेषज्ञ नरेंद्र जैन सांगतात की गृह्प्रवेशाच्या तारखा तुम्ही वापरात असलेल्या पंचांगानुसार बदलू शकतात. सन 2018 मधील महत्त्वाच्या गृह्प्रवेशाच्या तारखांची यादी पुढीलप्रमाणे :

एप्रिल महिना: 19, 20 आणि 27

मे महिना: 2 व 11

जून महिना: 22, 25, 29 आणि 30

जुलै महिना: 5

नोव्हेंबर: 8 आणि 9

डिसेंबर महिना: काही तारखा उपलब्ध आहेत पण आपल्या ज्योतिषांशी सल्लामसलत करावी.

जुलै 2018 चा शेवट ते नोव्हेंबर 2018 ची सुरुवात हा कालावधी गृह्प्रवेशासाठी योग्य नाही. गृह्प्रवेशासाठी योग्य तारखा शोधणे महत्वाचे आहे. शुभदिनी मंगल काळात गृहप्रवेश करणे  आवश्यक आहे, असे जैन यांनी स्पष्ट केले.

 

2. वास्तुशास्त्राचे पालन

आपण आपल्या घरात प्रवेश करण्यापूर्वी, सर्व वास्तू दोषांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे, कारण  एकदा आपण घरात रहायला गेलो की बदल करणे कठीण होऊ शकते. A2ZVastu .com चे सीईओ  विकास सेठी म्हणतात, “आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करताना आपण वास्तु दोषांकडे दुर्लक्ष करू नये. जर काही दोष असतील आणि आपल्या घरात उर्जा संतुलन बिघडेल आणि आपल्या घरी प्रवेश केल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही.”

“गृह्प्रवेशापूर्वी आपण वास्तुमधील चुका सुधारणे सोपे आहे.”

 

3 . घराच्या मुख्य दरवाजासाठी टिप्स

ज्यादिवशी तुम्ही गृहप्रवेश करणार असाल त्यादिवशी, मुख्य दरवाज्यासमोर कोणतीही अडचण नसावी. असे म्हणतात की गृह्प्रवेशाच्या दिवशी घराच्या दरवाज्यासमोर कोणतीही अडचण असल्यास, घरातील शांतता भंग होते.

 

4. गृह्प्रवेशापूर्वी घर पूर्णपणे राहण्यासाठी तयार आहे याची खात्री करा

घर संपूर्णपणे राहण्यास तयार झाल्यानंतर गृहप्रवेश करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. अस्तव्यस्थ पसरलेल्या वस्तू, रंग न दिलेल्या भिंती किंवा अपूर्ण बांधकाम, घरी पूजा करताना समस्या निर्माण करू शकतात. शिवाय, गृहप्रवेशानंतर घर रिकामे ठेवू नये, कमीतकमी एका व्यक्तीने तेथे राहावे. म्हणून, गृहप्रवेश करण्याआधी, आपले घर पूर्णपणे तयार झाले आहे याची खात्री करा.

 

5. गृहप्रवेशासाठी घर सुशोभित करणे

जे घर सुसुशोभित आहे, ते सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करते आणि वातावरणातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. म्हणूनच, ज्या दिवशी आपल्याला गृहप्रवेश करावयाचा असेल त्या दिवशी आपले घर व्यवस्थित सुशोभित, योग्य प्रकाशित व सुगंधित हवेशीर आहे याची खात्री करा.

 

गृहप्रवेश समारंभ करताना विचारात घ्यावयाचे  इतर काही महत्वाचे मुद्दे –

गृह्प्रवेशाच्या कार्यक्रमात अतिथी आणि नातेवाईक यांची राहण्याची व बैठकीची सोय कशी करावयाची याचा आपण विचार केला पाहिजे. ठाणे येथे मुलांसाठी क्रीएटीव्ह क्लासेस चालविणाऱ्या  गृहिणी नेहा जैन म्हणतात,”आमच्या घराचा गृहप्रवेश करण्यासाठी, आम्ही फक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांसह पूजा व हवन करण्याचा निर्णय घेतला. आमच्या मित्र आणि नातेवाईकांना वेगळ्या वेळी आमंत्रित केले. यामुळे आम्हाला घराची फेर रचना करण्यास वेळ मिळाला आणि अतिथींना भेटण्यासाठी वेळ मिळाला. पूजा आणि आमंत्रितांना एकाचवेळी  वेळ देणे सोपे नाही.” गृह्प्रवेशाची प्रक्रिया व्यक्तिनुसार बदलते, त्यांच्या श्रद्धा आणि धर्मानुसार ती बदलते. तथापि, प्रत्येकासाठी हा एक महत्वाचा धार्मिक विधी आहे. आपण मित्र आणि नातेवाईकांना आमंत्रित करून सस्नेह भोजन घेऊ आपल्या आनंदात त्यांना सहभागी करतो. म्हणून पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. आवश्यक गोष्टींची एक यादी  तयार करा आणि या सर्व गृह्प्रवेशासाठी तयार ठेवा.

समारंभ पुढे ढकलू नका, कारण तुम्हाला 2018 मध्ये गृह्प्रवेशाची लगेच तारीख मिळणे कठिण आहे.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments