गृह प्रवेश: तुमच्या नवीन घराच्या पूजेसाठी आणि घराच्या गृहशांती समारंभासाठी टिपा


जेव्हा एखाद्या मालमत्तेत गुंतवणूकीचा विचार केला जातो, तेव्हा घराचे मालक विशेषत: आत जाण्यापूर्वी शुभ दिवसांबद्दल आणि गृहप्रवेश करण्याबद्दल आग्रही असतात. आम्ही या समारंभाचे महत्त्व आणि महत्वाचे मुद्दे यांचे परीक्षण करतो

जेव्हा एखादी मालमत्ता खरेदी करणे किंवा नवीन घरात स्थलांतरित होण्याचा विचार येतो, तेव्हा भारतीय लोक सामान्यतः शुभ मुहूर्तांबद्दल आग्रही असतात. त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या शुभ दिवशी गृह प्रवेश सोहळा केल्याने त्यांना चांगले भाग्य मिळेल. सामान्यतः, गृह प्रवेश पूजा किंवा गृहप्रवेश समारंभासाठी शुभ तारखा ज्योतिषशास्त्रीय तक्त्यांवर आधारित पुजारी ठरवतात.

गृहप्रवेश म्हणजे काय?

गृहप्रवेश समारंभ, ज्याला गृहप्रवेश किंवा गृहशांती समारंभ देखील म्हणतात, हा एक हिंदू पूजा समारंभ आहे, जेव्हा एखादी व्यक्ती पर्यावरण शुद्ध करण्यासाठी आणि घराचे नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करण्यासाठी प्रथमच नवीन घरात प्रवेश करते.

कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाच्या पाठोपाठ जास्तीत जास्त लोक वापरासाठी घरे सक्रियपणे खरेदी करत असल्याने गृहप्रवेश समारंभ करणाऱ्यांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. तथापि, या रोगाची सक्रियता लक्षात घेऊन, बहुतेक लोक ऑनलाइन सोहळ्याची निवड करत आहेत. पाहुण्यांच्या ऑनलाइन उपस्थितीत पुजारी त्यांना कार्याचे मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे, लोक सुरक्षित राहून त्यांच्या धार्मिक श्रद्धांचे पालन करणे सुरू ठेवू शकतात. सध्या, श्रावण महिना चालू आहे (२३ जुलै, २०२१ ते २२ ऑगस्ट, २०२१), त्यानंतर भाद्रपद आणि अश्विन, जेथे पितृ पक्ष कालावधी (२० सप्टेंबर, २०२१ ते ६ ऑक्टोबर, २०२१) साजरा केला जातो, पुढील शुभ गृहप्रवेश समारंभाच्या तारखा नोव्हेंबर २०२१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये उपलब्ध आहेत.

जानेवारी २०२२ मध्ये गृहप्रवेशासाठी कोणताही शुभ दिवस नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये काही दिवस आहेत ज्या दिवशी गृहप्रवेश करता येईल. मार्च आणि एप्रिल २०२२ मध्ये गृह प्रवेशासाठी शुभ तारखा नाहीत.

जेव्हा प्रथमच नवीन घरात प्रवेश केला जातो तेव्हा गृहप्रवेश सोहळा पार पाडला जातो. वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ मुंबईतील जयश्री धामणी म्हणतात, “हे फक्त मालकासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी देखील महत्वाचे आहे. वास्तुनुसार सूर्य, पृथ्वी, पाणी, अग्नि आणि वारा आणि पाच घटकांनी घर बनलेले आहे, या घटकांचे योग्य संरेखन घरात आनंद, चांगले आरोग्य आणि समृद्धी आणते.

 

 

“एखाद्या शुभ काळात घरात प्रवेश करणे, जीवन सुखकर बनवते आणि नवीन घरात गेल्यानंतर कुटुंबासाठी किमान संघर्ष करावा लागेल असे समजले जाते. अशा मुहूर्तांसाठी अनुकूल दिवस म्हणजे वसंत पंचमी, अक्षय तृतीया, गुढी पाडवा, दसरा (ज्याला विजयादशमी असेही म्हणतात), तर उत्तरायण, होळी, अधिकमास आणि श्राद्ध पक्षासारखे दिवस टाळले पाहिजेत,” असेही धामणी म्हणतात.

दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक क्षण शुभ मानला जात असल्याने या दिवशी गृह प्रवेश करण्यासाठी शुभ काळाची आवश्यकता नसते, तसेच गृहप्रवेश करण्यापूर्वी नेहमी कलशपूजन केले जाते.

या विधीसाठी, तांब्याच्या ताटलीत नऊ प्रकारचे धान्य तसेच एक नाणे ठेवले जाते. ताटलीवर एक नारळ ठेवला जातो आणि त्याच्याबरोबर पुजारी मंत्रोच्चार करत घरात प्रवेश करतो. पुजारी कलश पूजा मंत्र, गणेश मंत्र आणि वास्तुपूजा मंत्र अशा विविध मंत्रांचा जप करतात.

हे देखील पहा: गृह प्रवेश मुहूर्त २०२१: वास्तुशांती सोहोळ्यासाठी सर्वोत्कृष्ट तारखा

 

तुमच्या नवीन घरासाठी गृह प्रवेश टिपा

एक शुभ दिवस निवडा

गृहप्रवेश नेहमी शुभ दिवशी करा. मूर्ती घराच्या पूर्वाभिमुखी ठेवाव्यात.

घर स्वच्छ करा

गृहप्रवेश पूजेपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा. जागा स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी, मिठाच्या पाण्याने जमीन पुसून घ्या. तुम्ही टी मीठ, लिंबाचा रस आणि व्हाईट व्हिनेगरच्या मिश्रणानेही धुवू शकता.

हवन (वनौषधी आणि लाकूड अग्नीत टाकणे), हे जागा शुद्ध करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी करावे असे म्हणतात.

घर सजवा

मुख्य दरवाजा सजवावा, कारण त्याला सिंहद्वार म्हणतात आणि ते वास्तुपुरुषाचे मुख आहे. आंब्याची पाने आणि ताज्या फुलांनी दरवाजा सजवा. त्याच्या दोन्ही टोकांना स्वस्तिक, गो-पद्म, कमळ किंवा इतर कोणतेही आध्यात्मिक चिन्ह असावे.

तांदळाच्या पिठाच्या किंवा आकर्षक रंगांनी बनवलेल्या रांगोळीने फरशी सजवा. मजल्यावरील रांगोळ्या देवी लक्ष्मीला आमंत्रित करतात असे मानले जाते.

घरात प्रवेश करताना लक्षात ठेवण्याचे नियम

घरात प्रवेश करताना नेहमी उजवा पाय प्रथम ठेवा. गृह प्रवेश पूजेसाठी योग्य कपडे घाला. शुभ रंगाचे कपडे परिधान करा आणि काळा रंग टाळा.

शक्य असल्यास, फक्त जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत गृह शांती सोहळा करा, कारण जास्त लोकांना आमंत्रित केल्याने नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, ज्यामुळे रहिवाशांच्या कल्याणास बाधा येऊ शकते. तसेच, कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला रोग अजूनही सुरू असताना, प्रत्येकाच्या कल्याणासाठी आणि सुरक्षिततेसाठी, फक्त जवळचे कुटुंब उपस्थित असण्याचा सल्ला दिला जातो.

गृहप्रवेश पूजेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला काही ना काही भेट द्यायलाच हवी; कोणीही रिकाम्या हाताने घराबाहेर पडू नये. एखाद्याच्या बजेटनुसार ते लहान चांदीचे नाणे, देवाची मूर्ती, मिठाईचे खोके किंवा ताजी जिवंत रोपे असे काहीही असू शकते.

हे देखील पहा: गृह शांती समारंभासाठी भेटवस्तू

वास्तुपूजा

 • वास्तुपूजा केल्याशिवाय गृहप्रवेश पूजा पूर्ण होत नाही, घराचे छत झाकले जाते आणि दरवाजे शटर लावले जातात. तसेच, पुरोहितांना मेजवानी द्यावी.
 • जर तुम्ही भाड्याच्या घरात जात असाल, तर २०२१ मध्ये नवीन भाड्याच्या घरासाठी आदर्श असलेल्या गृह प्रवेश पूजा तारखा तपासण्याचे लक्षात ठेवा आणि वर सांगितल्याप्रमाणे गृह प्रवेश पूजा विधिचे अनुसरण करा.

 

गृहशांती समारंभ टिपा: गृह प्रवेश करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये

नवीन घर राहण्यास तयार असेल त्यावेळेस कुटुंबाने गृह प्रवेश केला पाहिजे. “घर पूर्ण तयार केले पाहिजे, तेथे नव्याने रंगकाम करून घेतले पाहिजे आणि छप्पर सुद्धा तयार असले पाहिजे (जर ते स्वतंत्र घर असेल तर). दरवाजे, खिडक्या आणि इतर फिटिंग्जसुद्धा पूर्ण असाव्यात,” असे वास्तु प्लसचे वास्तू सल्लागार श्री. नितीन परमार म्हणतात.

“वास्तुपुरुष आणि इतर देवतांची पूजा केली जावी. घराचा मुख्य दरवाजा जो घरामध्ये समृद्धी आणि सकारात्मक उर्जा आणतो त्याच्या उंबरठ्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पाय अशा शुभ चिन्हांनी सुशोभित करावे. ताज्या आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी बनलेले तोरण (या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘तोरणा’ म्हणजेच पवित्र प्रवेशद्वार), घराच्या दारावर लावावे. गृह शांतीच्या दिवशी  घरातील मंदिर ईशान्य भागात निश्चित केले जावे,” असा परमार सल्ला देतात.

गृहप्रवेश हे भारतामध्ये बोलल्या जाणार्‍या वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. याला तेलुगूमध्ये गृहप्रवेशम किंवा गृहप्रवेसम् आणि बंगालीमध्ये ग्रीहोप्रोबेश म्हणतात. गृह प्रवेश समारंभ घर मालकाच्या मर्जीने साधा किंवा विस्तृत असू शकते. जागा शुद्ध करण्यासाठी, नकारात्मक शक्तीं नष्ट करण्यासाठी सहसा हवन आयोजित केले जाते. गणेश पूजा, नवग्रह शांती, म्हणजे साधारणपणे नऊ ग्रहांची उपासना आणि वास्तू पूजा, केली जाते. या दिवशी आमंत्रित केलेल्या याजक आणि कुटुंबीयांना, मित्रांना भोजन द्यावे. एकदा गृह शांतीचा कार्यक्रम संपला की मालक नवीन घरात राहायला जाऊ शकतात. तसेच वास्तु तज्ञ सल्ला देतात की गृहप्रवेश पूजेनंतर, पुढील किमान ४० दिवस, कुटुंबातील एक सदस्य पूर्ण वेळ त्या घरात उपस्थित असावा आणि घराला कुलूप लावून ते रिकामे ठेवू नये.

 

पुरोहिताविना गृहप्रवेश पूजा कशी करावी?

नवीन घरासाठी हिंदू विधींमध्ये नमूद केल्याप्रमाणे, वैदिक शास्त्रानुसार गृहप्रवेश पूजा सोहळा विस्तृत पद्धतीने केला जातो. म्हणून, परंपरांबद्दल चांगले ज्ञान असलेल्या पुजाऱ्याचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

तथापि, अशी परिस्थिती असू शकते जेव्हा पुजारी शोधणे शक्य नसते. तुमच्या नवीन घरासाठी हिंदू पूजा विधी तुम्ही स्वतः करू शकता.

 • प्रथम, भारतीय घराच्या गृहशांती समारंभाच्या पूजेची शुभ तारीख शोधण्यासाठी हिंदू कॅलेंडरचा संदर्भ घ्या.
 • तुम्हाला गृह प्रवेश पूजा समुच्चय सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे. गृहप्रवेश पूजा सूचीमध्ये नमूद केलेल्या या वस्तूंची व्यवस्था करा.
 • आपले घर स्वच्छ करा आणि प्रवेशद्वार रांगोळी आणि फुलांनी सजवा.
 • नवीन घरासाठी हिंदू पूजा विधीनुसार, पहिल्या दिवशी, आपल्या हातात गणपतीची मूर्ती किंवा फोटो घेऊन नवीन घरात प्रवेश करा. घराच्या ईशान्य कोपर्‍यात देव ठेवा. मूर्तीसमोर दोन दिवे लावावेत. देवाला मिठाई, फुले, फळे असा प्रसाद अर्पण करा. मूर्तीजवळ तांब्याच्या भांड्यात गंगाजल किंवा नदीच्या पाण्याने भरलेला कलश ठेवा. लक्षात ठेवा कलश एक नारळ आणि चार आंब्याच्या पानांनी झाकून ठेवा.
 • नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची माळ लावा.
 • गृहप्रवेश पूजा सोहळ्याची पुढची पायरी म्हणून, स्वयंपाकघरातील चुलीमध्ये आग लावा. नवीन भांड्यात दूध उकळवा आणि त्यात तांदूळ आणि साखर घाला. ते पाहुण्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटून घ्या.
 • कापूराचा दिवा लावा आणि मंगल आरती म्हणा. गृह प्रवेश पूजा विधिचा भाग म्हणून तुम्ही घंटा वाजवू शकता किंवा शंख वाजवू शकता.
 • आता नारळ फोडून पाहुण्यांना प्रसाद म्हणून अर्पण करा. आंब्याच्या पानांचा वापर करून कलशातील पाणी घरभर शिंपडा.
 • आपण घरात राहण्याची खात्री करा आणि गृहप्रवेश पूजेनंतर किमान तीन दिवस घराबाहेर पडणार नाही याची खात्री करा.

हे देखील पहा: घरात मंदिराच्या दिशेसाठी वास्तु टिपा

 

तुम्ही मुहूर्ताशिवाय गृहप्रवेश करू शकता का?

जरी लोक केवळ एका शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश करण्यास प्राधान्य देत असले, तरी तुमचा अशा गोष्टींवर विश्वास नसल्यास, तुमची उपलब्धता आणि वेळापत्रकानुसार पुढे जाणे ठीक आहे. तथापि, आपण गृहशांती पाठ करण्याचे सुनिश्चित करा, जे घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि सभोवतालच्या नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा दूर करण्यासाठी आहे. तुम्ही पूजा केल्यानंतर दान करणे आणि गरजूंना पैसे आणि अन्न दान करणे देखील निवडू शकता. त्यानंतर, हा आनंद आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत हा साजरा करू शकता.

 

गृहप्रवेश पूजा: पूजेपूर्वी करायच्या गोष्टी

शुभ तारीख निवडा

सणासुदीचा काळ अनेक शुभ तारखा आणत आहे, ज्या गृह प्रवेशासाठी योग्य आहेत, तुम्ही गृह शांतीसाठीच्या सर्वोत्तम तारखा येथे बघू शकता. गृह प्रवेशासाठी दसरा आणि दिवाळी खूप भाग्यवान समजली जाते आणि तुम्ही एखाद्या पुजाऱ्याशी सल्लामसलत करून पूजा करू शकता.

बांधकाम आणि शेवटची कामे पूर्ण करा

बांधकाम चालू असल्यास आपल्या नवीन घरात जाण्याचे टाळा. जेव्हा घर पूर्णपणे तयार असेल तेव्हाच आपल्या नवीन घरात करा. असे नवीन घर जे प्रत्येक अर्थाने परिपूर्ण झाले आहे, त्यातील गृहे प्रवेश आयुष्य एका नवीन टप्प्यात प्रवेश करतोय असा अर्थ दर्शवितो. म्हणूनच, लाकडाचे काम, फिटिंग्ज, रंगकाम इत्यादी कामे पूर्ण झाल्याचे निश्चित करा.

घर वास्तु-अनुरूप असल्याची खात्री करा

आपले घर पूर्णपणे वास्तु-अनुरूप आहे याची खात्री करा, जसे विशेषत: पूजा कक्ष आणि मुख्य प्रवेशद्वार.

 

गृह प्रवेश पूजा: पूजेच्या दिवशी करावयाच्या गोष्टी

प्रवेशद्वार सजवा

गृहेप्रवेश पूजेच्या दिवशी ताजे झेंडूची फुले व आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण लावून आपण समोरचे मुख्य प्रवेशद्वार सजवलेले आहे हे सुनिश्चित करा. मुख्य दरवाजावर आपण समृद्धी आणि भाग्य दर्शवणारे स्वस्तिक चिन्ह किंवा देवी लक्ष्मीचे पाय देखील लावू शकता.

संपूर्ण घर स्वच्छ करा

घरासाठी तुम्ही पहिली गोष्ट खरेदी करा ती म्हणजे झाडू, ज्यामुळे समारंभापूर्वी केरकचरा साफ होईल आणि तुमची ताजी नवीन सुरुवात होईल. पूजा करण्यापूर्वी, घर आपले स्वागत करीत आहे असे दिसण्यासाठी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ ठेवले याची खात्री करा. यामुळे आपल्या नवीन घरात सकारात्मकता आणि चांगली उर्जा आमंत्रित करेल. पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातील प्रत्येक कोपरा साफ करा.

घर पवित्र करा

संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. आपल्या घराच्या न वापरलेल्या कोपऱ्यात गंगाजल वेगळ्या कलशात ठेवा, त्याच्या वर आंब्याची कच्ची पाने ठेवा. सर्वत्र पाणी शिंपडण्यासाठी या पानांचा वापर करा. गंगाजल एक शुद्ध ऊर्जा आहे जी घरातून नकारात्मक तरंग काढून टाकते असे मानले जाते.

रांगोळी बनवा

रांगोळ्या ह्या सणांच्या उत्सवासारख्या आहेत आणि त्या संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करतात असे मानले जाते. गृह प्रवेश पूजा करण्यापूर्वी, प्रवेशद्वाराजवळ तांदळाचे पीठ आणि बाजारात उपलब्ध असलेल्या रांगोळीच्या रंगांचा वापर करा. घरात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या मार्गावर त्या असणार  नाही नाही याची खात्री करा.

गृहप्रवेश फुलांची सजावट

मुख्य दरवाजा आणि पूजा क्षेत्राव्यतिरिक्त गृहप्रवेश पूजेसाठी संपूर्ण घर सजवा. ताज्या फुलांनी घर आमंत्रित करणारे आणि प्रसन्न दिसते. ओव्हरहेड हँगिंग, कमानी, कोपरे आणि टेबलांसाठी सेंटरपीससाठी ताजी फुले वापरा. काही कमळ आणि रंगीबेरंगी धाग्यांसह झेंडू, ट्यूब गुलाब आणि शेवंती इत्यादी वापरून पारंपारिक-थीम असलेल्या तार आणि मालाच्या सजावटसाठी तुम्ही जाऊ शकता. फुलांपासून बनवलेले फुलांचे गोळे आणि हँगिंग्ज घराच्या विविध ठिकाणांना आकर्षक करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. जर एखाद्याला पाश्चिमात्य शैली आवडत असेल तर, मोती हँगिंग किंवा रंगीबेरंगी ड्रेपसह लिलीयम, ऑर्किड, गुलाब आणि कार्नेशन इत्यादी फुलांची निवड करा.

गृहप्रवेश पूजेसाठी घर उजळवा

गृहप्रवेशाच्या दिवशी संपूर्ण घर आणि विशेषतः मुख्य प्रवेशद्वार चांगले प्रकाशमान झाले आहे याची खात्री करा. घराच्या कोणत्याही भागात अंधार नसावा. घर उजळवण्यासाठी दिवे, एलईडी दिवे किंवा दिव्यांचे तोरण निवडा. असे मानले जाते की मातीचा दिवा लावल्याने सौभाग्य आणि सकारात्मक उर्जेला आमंत्रण मिळते.

गृहप्रवेश दिवशी पाहुण्यांसाठी जेवणाची योजना करा

गृहप्रवेशाच्या दिवशी आपल्या पाहुण्यांना, जेवण देण्यासाठी मेनूची आगाऊ योजना करा. पूजा एका शुभ दिवशी केली जात असल्याने शाकाहारी जेवणाची व्यवस्था करणे चांगले. आधी पुजारी आणि नंतर पाहुण्यांना अन्न अर्पण करा. हलवा किंवा खीर सारखा प्रसाद गृहप्रवेशाच्या दिवशी बनवला जातो.

पाहुण्यांसाठी योग्य आसन व्यवस्था करा

गृहप्रवेश समारंभात सहसा लोकांना पूजेसाठी जमिनीवर बसावे लागते. धूरी किंवा गादी जमिनीवर ठेवा किंवा पाहुण्यांमध्ये बसण्यास असमर्थ असलेल्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करा.

हे देखील पहा: गृहशांती समारंभाच्या आमंत्रण संदेश कल्पना निवडण्यासाठी

 

गृह प्रवेश पूजा सामुग्री यादी: पूजेसाठी आवश्यक गोष्टी

नारळ देशी तूप सुगंधी वस्तू (हवन सामग्री) आंब्याच्या झाडाच्या  सुक्या डहाळ्या
सुपारी (अरेका नट) मध धान्य (बार्ली) हळद
लवंगा गूळ काळे तीळ गंगा जल
हिरवी वेलची पूर्ण तांदूळ मातीचा मोठा दिवा लाकडाचा चौरंग (कमी उंचीचा)
खायची पानं पंच मेवा (सुका मेव्याच्या ५ प्रकारचे मिश्रण) पितळी कलश पीठ
रोली किंवा कुंकू (कुमकुम) पाच प्रकारच्या मिठाया कापूस आंब्याची किंवा अशोकाची पाने
रक्षासूत्र ५  प्रकारची हंगामी फळे पिवळे कापड उदबत्ती
उपनयन किंवा जानवं फुले व फुलांच्या माळा लाल कापड दही
दूध (न उकळलेले) धूप कापूर

गृहप्रवेश पूजेपूर्वी, वर सांगितल्याप्रमाणे सामुग्री यादी तयार करून पूजेचे सर्व साहित्य तयार असल्याची खात्री करा.

 

गृह प्रवेशाची पूजा कशी करावी

सकारात्मक उर्जेला आनंदी करण्यासाठी व तीचे स्वागत करण्यासाठी नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी गृह प्रवेश पूजा केली जाते. श्लोक आणि मंत्र जाप करण्यासाठी तुम्ही पुजाऱ्याला आमंत्रित करू शकता.

गृह प्रवेश पूजा घरातील द्रुष्ट शक्ती नष्ट करतात.

गृहप्रवेश पूजा विधी आणि लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आणि काय करू नये याबद्दल येथे मार्गदर्शन आहे.

ली पायरी: एक कोहळा फोडून घराच्या प्रवेशद्वाच्या उंबरठ्यावर ठेवा. घरातील स्त्रीनेही एक नारळ फोडून तो देखील उंबरठ्यावर ठेवला पाहिजे कारण हे अडथळे दूर करणे दर्शवते.

२ री पायरी: कलश पूजन करा. नऊ प्रकारचे धान्य आणि एक नाणे एका पात्रात भरून त्यावर कलश ठेवून कलशात पाणी भरले जाते. नारळाभोवती लाल कपडा बांधून कलशात ठेवलेले असते, तसेच कलशाच्या आतल्या बाजूला आंब्याची पाने लावली जातात.

३ री पायरी: हे भांडे घराच्या आत घेऊन अग्नी समारंभ जागेजवळ किंवा हवनाजवळ ठेवावे.

४ थी पायरी: पृथ्वीवरील खोदकाम, झाडे तोडणे आणि दगड फोडणे तीन पापांना दूर करण्यासाठी गृहशांती सोहळ्यात हवन केले जाते. सर्वशक्तिमान देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी व वाईट प्रभाव दूर करण्यासाठी हवन केले जाते. पुजारी पवित्र मंत्रांचा जप करताना त्यात सहभागी होण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी हवनकुंडाजवळ बसले पाहिजे. गृहप्रवेशाच्या हवन दरम्यान वापरल्या जाणाऱ्या सुगंधी आणि औषधी वनस्पती आणि कापूर हे घर शुद्ध करते, नकारात्मक स्पंदने काढून टाकते आणि चांगल्या उर्जेसह नवीन शुभ सुरुवात करते.

५ वी पायरी: दिव्य संरक्षणासाठी आध्यात्मिक उर्जा आकर्षित व्हावी म्हणून समया आणि दिवे लावावेत. गृहप्रवेशाच्या दिवशी गणपती पूजा किंवा सत्यनारायण पूजा देखील करता येते. हे वास्तुशांती हवनानंतर आयोजित केले जाऊ शकते. गणपती सर्व अडथळे दूर करणारा आहे. त्यामुळे, गृहप्रवेशाच्या दिवशी त्याचे आशीर्वाद घेतले जातात. सत्यनारायण (भगवान विष्णूचे रूप) पूजा सर्वात सोप्या विधींपैकी एक आहे आणि असे मानले जाते की ती चांगले नशीब, आरोग्य आणि समृद्धी आणते.

वास्तुशास्त्रानुसार, तोंडातून हवा फुंकून पूजेचा दिवा कधीही विझवू नये.

गृहप्रवेशाच्या दिवशी गणपती पूजन किंवा सत्यनारायण पूजा देखील करता येते. हे वास्तुशांती हवनानंतर आयोजित केले जाऊ शकतात. भगवान गणेश सर्व अडथळे दूर करणारा आहे. त्यामुळे गृहप्रवेशाच्या दिवशी त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. सत्यनारायण (भगवान विष्णूचे स्वरूप) पूजा ही सर्वात सोपी विधी आहे आणि ती नशीब, आरोग्य आणि समृद्धी आणते असे मानले जाते.

हे देखील पहा: २०२१ मध्ये घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी शुभ दिवस

 

भाड्याच्या घरासाठी गृह प्रवेश

जर आपण भाड्याने घेतलेल्या निवासस्थानामध्ये जात असाल तर आपण जिथे आपल्याला पुजारी आवश्यक नसतील अशी साधी गृह प्रवेश पूजा करू शकता.

 • घर स्वच्छ करा आणि त्यास फुले व शुभचिन्हानी सजवा, तसेच ‘इष्ट’ देवताची प्रतिमा किंवा मूर्ती लावा.
 • तुम्ही १०८ वेळा मंत्र म्हणून (जसे गायत्री मंत्र किंवा नवग्रह मंत्र) एक लहान हवन देखील करू शकता. आपल्याला कुठलेही मंत्र माहित नसल्यास तुमच्या एखाद्या उपकरणावर रेकॉर्ड केलेला मंत्र देखील लावू शकता. मंत्र नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि आनंद आणि विपुलता आणतात. मंत्रांमुळे घरात शांतीची आभाही निर्माण होते.
 • दिवे लावून घर उजळवा आणि मिठाई, फळे गरजूंना दान करा.

भाड्याने घेतलेल्या घरासाठी गृह प्रवेश सोहळा आयोजित करण्याबद्दल लोक बर्‍याचदा संभ्रमात पडतात. भाड्याने घेतलेल्या घरासाठी गृह प्रवेश पूजा करणे चांगले आहे कारण हा शुभ सोहळा आहे. तज्ञांनी असे नमूद केले आहे की, गृहप्रवेश समारंभ, अगदी भाड्याच्या घरातही, कोणत्याही नकारात्मक उर्जापासून दूर राहण्यास आणि घरात शांतता आणि समृद्ध जीवनासाठी सकारात्मकता आणण्यास मदत करेल. वर सांगितल्याप्रमाणे आपण घराची उर्जा सक्रिय व कायम ठेवण्यासाठी मोठ्या पुजेऐवजी हवन किंवा यज्ञ आयोजित करू शकता.

 

समारंभानंतर गृहप्रवेश पूजा अर्पणांची विल्हेवाट कशी लावायची?

पूर्वी लोक पूजेसाठी वापरण्यात येणारी फुले व पाने समुद्रात किंवा नदीत फेकत असत परंतु जलप्रदूषणाच्या वाढीमुळे ते जलकुंभात टाकू नये. गृहप्रवेश पूजेसाठी वापरलेली फुले. दालचिनी किंवा वाळलेल्या मोसंबीच्या सालीने फुले वाळवून वाळलेल्या फुलांची पॉटपॉरी बनवा. गृहप्रवेश पूजेची फुले, केळीची पाने, पान इत्यादींचा वापर घरी सेंद्रिय कंपोस्ट तयार करण्यासाठी करता येतो. अनेक शहरांमध्ये, समुद्रकिनारे आणि नद्यांजवळ स्थानिक महानगरपालिकेद्वारे केवळ पूजा अर्पण करण्यासाठी विशेष कचराकुंड्या बसवल्या जातात. हवनाचे उरलेले लाकडी तुकडे, औषधी वनस्पती, राख इत्यादी बागेत पुरू शकतात.

 

गृह प्रवेशाबद्दल सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

शिफ्टिंग झाल्यानंतर आपण गृह प्रवेश पूजा करू शकतो का?

नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी व जागा शुद्ध करण्यासाठी, स्थलांतर करण्यापूर्वी गृह प्रवेश पूजा करावी.

गृह प्रवेश सोहोळ्यापुर्वी आपण नवीन घरात झोपायला जाऊ शकतो का ?

होय, अधिकृत पूजेच्या आधी घराचे मालक नवीन घरात झोपू शकतात.

वास्तू शांती समयी दुध का उकळवले जाते?

दुधाचे उकळणे हे घरातील विपुल प्रमाणातील समृद्धी आणि अन्नाचे प्रतीक आहे, जे नवीन घराला आशीर्वाद देईल.

गृह प्रवेशा आधी मी माझे फर्निचर हलवू शकतो का?

आपल्या नवीन घरात काहीही हलविण्यापूर्वी वास्तुपूजा केली पाहिजे.

गृह प्रवेश पूजा करण्यापूर्वी आपण घरासाठी लागणाऱ्या वस्तू आणू शकतो का?

वास्तू पूजा होईपर्यंत शिजवण्यासाठी लागणारे गॅस आणि स्टोव्हशिवाय काहीही आणू नका.

आम्ही नवीन घरात शुक्रवारी शिफ्ट होऊ शकतो का?

आपण स्थलांतर करण्यासाठी गृह प्रवेशाच्या मुहूर्तावर एक शुभ दिवस निवडू शकता.

नवीन घरात जाताना प्रथम काय करावे?

आपण नवीन घरात जाताच ताबडतोब कुलपे कार्यरत असल्याचे निश्चित करा, फ्यूज बॉक्स आणि पाण्याचे वाल्व्ह तपासा, त्यास पाळीव प्राणी / चाईल्ड-प्रूफ बनवून त्याची उपयुक्तता तयार ठेवा.

नवीन घरात गुडलक कशाने येते?

मीठ, मध, तांदूळ, मेणबत्त्या इत्यादी वस्तू घरातील विपुलता, भरभराट, आनंद, आदरातिथ्य आणि सौभाग्य दर्शवितात.

गृह प्रवेश पूजेसाठी, कोणती भांडी वापरण्यासाठी आदर्श आहेत?

वास्तुशास्त्रानुसार, पूजेसाठी पितळी भांड्यांचा वापर टाळा. तांब्याची किंवा चांदीची भांडी उत्तम. तेलाच्या दिव्यांसाठी, तुम्ही पितळ वापरू शकता.

वास्तुशांती पूजा का केली जाते?

वास्तू शांती पूजा, वास्तुपुरुष, जो जमीन आणि दिशेचा देव आहे व जो घराच्या प्रचलित वास्तु दोषांना दूर करती असे म्हटले जाते, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते.

सामान हलण्यापूर्वी मला माझे घर स्वच्छ करणे आवश्यक आहे काय?

होय, आपण सर्व सामान घेऊन जाण्यापूर्वी घराची प्रत्येक खोली स्वच्छ करणे नेहमीच चांगले.

नवग्रह शांती पूजा गृहप्रवेश दरम्यान का केली जाते?

नवग्रह म्हणजे नऊ ग्रह. असे मानले जाते की सर्व नऊ ग्रह घरावर प्रभाव टाकतात. तर, ही पूजा सर्व नऊ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी केली जाते.

 

सामान्य प्रश्न (FAQs)

संध्याकाळी गृहप्रवेश करता येईल का?

मुहूर्तावर असेल तर आपण संध्याकाळी देखील गृह प्रवेश करू शकता.

नवीन घरात आपण कलश कोठे ठेवू शकतो?

कलश घराच्या न वापरलेल्या कोपऱ्यात गंगाजल आणि आंब्याच्या पानांनी भरून ठेवावा.

एखादी गर्भवती महिला गृहप्रवेश करू शकते का?

होय, गर्भवती महिला गृह प्रवेश पूजा करू शकते, उपवास आणि इतर नियम तिच्यासाठी थोडे शिथील केले जातात.

गृहप्रवेश पूजेदरम्यान घंटा वाजवण्याचे काय महत्त्व आहे?

घंटाचा आवाज नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि जागा शुद्ध करण्यास मदत करतो.

गृहप्रवेश पूजेच्या वेळी प्रसादासाठी तुळशीची पाने का वापरली जातात?

तुळशीच्या पानांचा वापर देवाला नैवेद्य (प्रसाद) अर्पण करताना केला जातो, कारण असे म्हटले जाते की सर्व देवता तुळशीच्या वनस्पतीमध्ये राहतात. पूजा विधींमध्ये तुळशी (देवी लक्ष्मीचा अवतार) वापरल्याने कुटुंबाला आनंद, यश मिळते आणि कल्याण होते.

(सुरभी गुप्तांकडून आलेल्या माहितीसह)

Credit for header image: http://bit.ly/2dPgmYu

 

Was this article useful?
 • 😃 (3)
 • 😐 (0)
 • 😔 (0)

[fbcomments]

Comments 0