मुंबईच्या भावी सरकारी गृहनिर्माण योजनांचे नियोजन म्हाडा करणार: मुख्यमंत्री


महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरातील सर्व भावी सरकारी गृहनिर्माण योजनांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाला नियोजन प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 11 मे, 2018 रोजी, मुंबई आणि आसपासच्या महानगर विभागातील सर्व सरकारी गृह योजनांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाला  (म्हाडा) नियोजन प्राधिकरण घोषित केले.  मुख्यमंत्र्यांनी परवडणाऱ्या घरांसाठी विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी फडणवीसांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला  (एसआरए) एक समर्पित पोलिसांची टीम देण्याचे निर्देश दिले

फडणवीस यांनी शहरी व महसूल सचिवांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याचा आदेश दिला. ही समिती प्रलंबित प्रस्तावांचे पुनरावलोकन करेल तसेच गुणवत्ता नियंत्रण तपासेल. अधिका-यांनी सांगितले की नवीन घरांची निर्मिती, एसआरएसाठी नव्या तरतुदी , विकास नियंत्रण नियमावली, म्हाडा पुनर्विकास, प्रधानमंत्री आवास योजना आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीत नवीन घरांची निर्मिती या विषयांवर बैठकीत चर्चा  झाली.

अधिकारी हे सुद्धा म्हणाले की एसआरए अंतर्गत 29225 चाळींचे पुनर्वसन मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल. फडणवीस यांनी निर्देश दिला की पर्यावरण विषयक क्लिअरन्सेस राईट टू सर्व्हिसेस अॅक्ट अंतर्गत आणले जातील. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि गृहनिर्माण विभागाचे अधिकारी, एसआरए आणि म्हाडाचे अधिकारी  मिटिंगला उपस्थित होते असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातुन कळविण्यात आले.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments