Site icon Housing News

म्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलावासाठी नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

Konkan Mhada Board holds camp for beneficiaries to complete PMAY registration
मुंबई, दि. २३ जुलै, २०२५ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी व २८ कार्यालयीन गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दि. ०५ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव https://eauction.mhada.gov.in  या संकेतस्थळावर होणार आहे. ई-लिलावाचा एकत्रित निकाल लिलावाची बोली (बिडिंग) संपल्यावर दोन कार्यालयीन दिवसानंतर जाहीर करण्यात येईल.
पुणे मंडळातील अनिवासी व कार्यालयीन गाळे ई-लिलावामार्फत विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे यासाठी दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ई-लिलावाकरिता आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.
 सदर लिलावात पुणे येथील पिंपरी वाघेरे येथे २० अनिवासी गाळे, २२ कार्यालयीन गाळे, पिंपरी पुणे येथील संत तुकाराम नगर येथील ०९ अनिवासी गाळे, म्हाळुंगे पुणे येथे ०५ अनिवासी गाळे, सांगली येथे १० अनिवासी गाळे, मिरज येथे ०१ अनिवासी गाळा,  सोलापूर येथे ०६ कार्यालयीन गाळे, शिरूर पुणे येथे ०८ अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सदर लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण, अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा. अर्जदारास छपाई बाबतच्या कोणत्याही चुकीचा फायदा घेता येणार नाही, असे आवाहन पुणे मंडळातर्फे करण्यात आले आहे.

जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)
Exit mobile version