Site icon Housing News

म्हाडा कोकण मंडळातर्फे FCFS योजनेतील सदनिका विक्रीसाठी ‘बूक माय होम’ द्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ

How to participate in the Cidco lottery 2024 Janmashtami scheme?
 कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील १३ हजार ३९५ सदनिकांच्या विक्रीसाठी https://bookmyhome.mhada.gov.in/ या नवीन संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आला.
          यावेळी कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर म्हणाल्या की, IHLMS 2.0 मध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांच्या सोडतीतील समाविष्ट अर्जदारांना उपलब्ध सदनिकांपैकी कुठली सदनिका मिळेल याबाबत निश्चिती नव्हती. मात्र, ‘बुक माय होम’ संकेतस्थळामुळे अर्जदारास आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याची मुभा मिळणार आहे. ‘बुक माय होम’ मुळे अर्जदारांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळाला असून ज्याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरे अर्जदार संकेतस्थळावर पाहू शकतात, त्यांच्या पात्रता व पसंतीनुसार विशिष्ट सदनिकेची निवड करू शकणार आहेत. योजना व घरांच्या सविस्तर माहितीनुसार अधिक उचित निर्णय अर्जदाराला घेण्याची संधी मिळणार आहे.
       ‘बुक माय होम’ या संकेतस्थळावर कोकण मंडळाच्या विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील विक्री न झालेल्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण करतेवेळी आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, स्वयंघोषणापत्र आदी बाबी ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करावयाच्या आहेत. IHLMS 2.0 प्रमाणे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या कागदपत्रांची कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ऑनलाईन पडताळणी होणार आहे. सदर पडताळणीनंतर अर्जदाराचा प्रोफाइल तयार होणार आहे. अर्जदाराचा प्रोफाइल तयार झाल्यानंतर अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील मंडळनिहाय उपलब्ध सदनिकांची माहिती फ्लॅट नंबरसह मिळणार आहे. अर्जदारास या सदनिकांमधून मजला व सदनिका आपल्या पसंतीनुसार निवडता येणार असल्याचे श्रीमती गायकर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या सदनिकांव्यतिरिक्त इतर सदनिकांसाठी पात्रतेच्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. तसेच उत्पन्न गटाचे कुठलेही निकष ठेवण्यात आलेले नाहीत. सदर सदनिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या संवर्गांसाठी सदनिका आरक्षण ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्रीमती गायकर यांनी दिली.
हमारे लेख से संबंधित कोई सवाल या प्रतिक्रिया है? हम आपकी बात सुनना चाहेंगे। हमारे प्रधान संपादक झूमर घोष को jhumur.ghosh1@housing.com पर लिखें
Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)
Exit mobile version