पुणे भ्रमंती: शहराच्या 100 किमी परिघातील नयनरम्य सहलीची ठिकाणे

पुणेकरांनो, जर शहराच्या दगदगीतून फुरसत शोधताय, तर मग ही आहे पुण्यापासून 100 किमी अंतरावर असणाऱ्या सर्वोत्तम सात पिकनिक स्पॉट्सची यादी

पुण्यात राहून शहरापासून अलिप्त होण्याच्या विचारात असलात तर या मग आमच्या यादीतील या सात सर्वोत्तम ठिकाणांना नक्की भेट द्या. ही नयनरम्य ठिकाणे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अवघ्या 100 किमी परिघात आहेत. शहरापासून एक दिवस दूर राहण्यासाठी अगदी परफेक्ट! आयुष्यात एकसूरीपणा आल्याने ते रटाळ होऊन जाते याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे थोडी धमाल अनुभवा आणि आजच प्रेक्षणीय स्थळांना भेट द्या.  

 

पुण्यापासून जवळच, अगदी 100 किमी अंतरावरील 7 पिकनिक स्पॉट्स

 

सिंहगड 

एक दिवसाच्या सहलीसाठी हा उत्तम स्पॉट आहे. पुण्यापासून जवळ, 100 किमी परिघात असलेल्या मनोहारी ठिकाणांपैकी हे स्थळ पहिल्या क्रमांकाचे मानले जाते. प्रामुख्याने जर मुलांना ऐतिहासिक किल्ल्यांची सफर घडवायची असेल तर हे ठिकाण पाहणे अगदी ‘मस्ट’ आहे! 1617 साली सिंहगडाची लढाई झाल्यानंतर या किल्ल्याला सिंहगड नाव पडले. हा भव्य किल्ला तब्बल 2000 वर्ष जुना असून अनेक लढायांचा साक्षीदार आहे. 

आजच्या तारखेत हा इतिहासाची साक्ष देणारा एक नयनरम्य परिसर मानला जातो. भटकंती करणाऱ्यांमध्ये हे पुण्यातील लोकप्रिय ठिकाण आहे. त्यामुळे किल्ले मार्गावर वाहतुकीची कोंडी कायमच असते.  

पारंपरिक पद्धतीचे महाराष्ट्रीय जेवण म्हणजे चटणी आणि भाकरीसोबत मसाला ताक तुमचा आनंद दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही. इथल्या स्थानिकांनी अत्यंत मायेने तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद प्रवासाचा क्षीण दूर केल्याशिवाय राहत नाही. जर या भागात काही दिवस मुक्काम करण्याची इच्छा असल्यास सिंहगड गावात काही हॉटेल्स देखील आहेत. पावसाळ्यात इथले आल्हाददायक वातावरण अनुभवण्याची मजा काही औरच आहे.

 

Places to visit in Pune: Alluring picnic spots near Pune within 100 kms

स्रोत: Pinterest

हे देखील पहा: Raigad Fort : (रायगड किल्ला) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा महामेरू 

 

जेजुरी

जेजूरी हे श्री खंडोबाचे भव्य तीर्थक्षेत्र! हे दैवत भोळ्या भक्तांच्या मनोकामना सिद्धीस नेणारे म्हणून जनमानसांत प्रसिद्ध आहे. आपले ईप्सित सुफळ होण्यासाठी भक्तगण नवस बोलतात. भगवंतांच्या पायाशी लोटांगण घालण्यासाठी तब्बल 380 पायऱ्या चढून यावे लागते. देवालय गाठेपर्यंत भक्त तल्लीन होऊन ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा घोष करतात. हा पवित्र गरज अंतर्मन शुद्ध करतो.  

औरंगजेबाच्या कारकिर्दीपासून काही देवस्थानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे देऊळ 750 मीटर उंचीवर वसलेले असून इतक्या उंचीवरून अवतीभोवतीचा नितांत सुंदर दृश्य नजरेस पडतो. तुम्ही वयस्कर व्यक्तिंना सोबत घेऊन जात असल्यास पालखी भाड्यावर घेता येते. नववधू-वरांनी या देवळापासून पहिल्यांदा देवदर्शन घेण्याची रीत असल्याने जोडप्यांची संख्या देखील लक्षणीय असते. नवऱ्याने बायकोला उचलून किमान पाच पायऱ्या चढण्याची पद्धत आहे. 

 

Places to visit in Pune: Alluring picnic spots near Pune within 100 kms

स्रोत: Pinterest

 

मुळशी धरण 

भटकंती आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीच ठरावी! आपण शहरापासून 1000 किलोमीटर दूर आहोत ही जाणीव करून देणारी जागा. कारण तुमच्या सभोवताली डोंगररांगा दिसतात. हे धरण मुळा नदीवर बांधण्यात आले असून शेतक-यांना पाणी उपलब्ध करून देते आणि वीजनिर्मिती करते.   

कौटुंबिक सहलीसाठी आणि जोडप्यांना वनभोजनाचा आनंद घेण्याच्या दृष्टीने मुळशी तलावाचा भाग मनोहारी आहे. इथे कॅम्पही लावता येतो, पक्षी निरीक्षण करता येते आणि छायाचित्रणाची हौस फिटेल असा हा रम्य परिसर आहे. 

मान्सूनमध्ये सह्याद्री पर्वताचे घाट खुलून दिसतात, बहरलेल्या पुण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो.

 

Places to visit in Pune: Alluring picnic spots near Pune within 100 kms

स्रोत: Pinterest

हे देखील वाचा cost of living in Pune

 

राजगड

समृद्ध इतिहास आणि दुर्गभ्रमंतीसाठी हा राजेशाही किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या किल्ल्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. हातात वेळ असल्यास किल्ल्यावर रात्रभर मुक्काम करता येतो. गडावर भूक लागल्यास भाकरी, ठेचा आणि पिठले (झुणका) मिळतो. ज्यांना दुर्गभ्रमंती प्रिय आहे, त्यांच्यासाठी अनेक नयनरम्य जागा आहेत. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार सोप्या ते कठीण वाटा आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठा सम्राज्याची राजधानी म्हणून परिचित होता. 

 

Places to visit in Pune: Alluring picnic spots near Pune within 100 kms

स्रोत: Pinterest

 

लोहगड 

जर तुम्हाला किल्ला सर करणे कष्टाचे वाटत असेल, आणि एखादी धमाल मजा अनुभवण्याची इच्छा असल्यास लोहगडचा पर्याय उत्तम आहे. शतकानुशतके मराठा, मुघल, चालुक्य, राष्ट्रकूट आणि निजाम अशा अनेक राजवटींचा लोहगड साक्षीदार आहे. 

ढगांवर स्वार होण्याची मजा लुटायची असल्यास मान्सून सर्वोत्तम ठरतो. इथे पावसाळ्यात येण्याचा तोटा म्हणजे रस्ते सुरक्षित नाहीत. मात्र निसर्ग अनुभवायची इच्छा झाल्यास, मोहक सभोवताल पाहण्यासाठी हे ठिकाण ‘बेस्ट’! 

इथली सहल काहीशी वेळ लावणारी असू शकते. त्यामुळे इथल्या स्थानिकांच्या हाताची चव तर घेतलीच पाहिजे! इथे फिरताना घाम मोठ्या प्रमाणावर येत असल्याने सोबत भरपूर पाणी बाळगावे. 

 

Places to visit in Pune: Alluring picnic spots near Pune within 100 kms

स्रोत: Pinterest

हे देखील पहा : Kolaba Fort, Alibag: (कुलाबा किल्ला, अलिबाग) अरबी समुद्रातील ऐतिहासिक मापदंड

 

किल्ले शिवनेरी 

हा सुंदर किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून डोंगरावर मानवी वस्तीत वसला आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. 

सुंदर हिरव्यागार वनराईत हा भक्कम किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. किल्ल्याचा परिसर मोठा असून त्याला सात प्रवेशद्वारं आहेत. इथे आल्यावर ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ असे होऊन जाते.    

पुण्यापासून अवघ्या 100 किमी अंतरावर असलेल्या पिकनिक स्पॉट्सपैकी एक असलेल्या किल्ल्यासाठी दोन तास तर राखून ठेवलेच पाहिजेत. आकाशाचे देखणेपण डोळे भरून पाहायचे झाल्यास सूर्योदय किंवा सूर्यास्तादरम्यान नक्की भेट द्या.

 

Places to visit in Pune: Alluring picnic spots near Pune within 100 kms

स्रोत: Pinterest

 

लोणावळा

लोणावळ्यात पाहण्या-करण्यासारखे बरेच काही आहे. पायी भटकंती करून निसर्गाचा देखावा पाहण्याची हौस असो किंवा श्वास रोखून धरणारा धबधबा अथवा रोमांच उठवणारी बलून राईड, पुण्यापासून अगदी 100 किमी अंतरावरील पिकनिक स्पॉट्सपैकी हा एक सर्वाधिक पर्यटक पसंती असलेला पर्याय! 

काही किल्ल्यांच्या परिसरात शांत डोंगरात वसलेली गावं आहेत, जी प्रसिद्ध आहेत. एकदिवसाहून अधिक वेळ असल्यास ही सगळी प्रेक्षणीय ठिकाणे सर्वोत्तम आहेत. इथे रात्रभर कॅम्प करता येईल किंवा भुरळ घालणाऱ्या रानवाटांचा माग काढता येईल.

 

Places to visit in Pune: Alluring picnic spots near Pune within 100 kms

स्रोत: Pinterest

हे देखील वाचा famous monuments in India (भारतातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे)

Was this article useful?
  • 😃 (1)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • घरबांधणीसाठी 2024 मधील भूमिपूजनाच्या मुहूर्त तारखाघरबांधणीसाठी 2024 मधील भूमिपूजनाच्या मुहूर्त तारखा
  • फरीदाबादमधील मालमत्तेची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क
  • २०२4 मध्ये गृहप्रवेश मुहूर्त: सर्वोत्तम नक्षत्र, महिन्यानुसार तारखा२०२4 मध्ये गृहप्रवेश मुहूर्त: सर्वोत्तम नक्षत्र, महिन्यानुसार तारखा
  • 2050 पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येच्या 17% पर्यंत भारतात राहतील: अहवाल
  • FY25 मध्ये देशांतर्गत MCE उद्योग खंड वार्षिक 12-15% कमी होईल: अहवाल
  • Altum Credo ने सीरीज C इक्विटी फंडिंग फेरीत $40 दशलक्ष उभारले