चटई क्षेत्रफळ क्षेत्र, बिल्टअप क्षेत्र आणि सुपरबिल्टअप क्षेत्र म्हणजे काय?

तुम्ही मान्य करा, वेगवेगळे एजंट्स आणि बिल्डर्स/विकासक जेव्हा या संज्ञा वापरात असतात तेव्हा आपण त्यांच्याकडे असहायपणे बघत असतो

घर विकत घेताना चटई क्षेत्रफळ क्षेत्र (कार्पेट एरिया),  बिल्टअप क्षेत्र आणि सुपर बिल्टअप क्षेत्र या संज्ञा समोर आल्या कि आपण त्या समजण्याचे टाळतो किंवा त्याने थोडाफार गोंधळ उडतो. प्रत्येक रहिवासी संकुलामध्ये तीन प्रकारे क्षेत्र/जागा/स्क्वेअर फुटेज गणले जाते. कदाचित या तीनही पद्धती वेगवेगळ्या वाटत नाही, परंतु चटई क्षेत्रफळ क्षेत्र आणि बिल्टअप क्षेत्र यामध्ये खरंतर मोठा फरक आहे.

या प्रत्येक संज्ञा नक्की काय आहेत हे माहीत नसणं म्हणजे विकासकाला संधी दिल्यासारखे आहे. हे काही एखादे रॉकेट सायन्स नाही. थोडेसे त्याबद्दल वाचन केले तरी तुम्हाला बरीच माहिती समजू शकते. रिअल इस्टेट संबधी मूलभूत माहिती पुढे देत आहोत.

 

चटई क्षेत्रफळ क्षेत्र

चटई क्षेत्रफळ म्हणजे गालिचा(चटई) टाकल्यावर जेवढी जागा झाकली जाणारी जागा किंवा अपार्टमेंटच्या भिंतींची जाडी सोडून उरलेली जागा

लॉबी, उद्वाहक (लिफ्ट), खेळण्यासाठीची जागा इत्यादी सामाईक जागा चटई क्षेत्रफळ क्षेत्रात येत नाही. घरातील तुम्हाला वापरावयासाठी मिळणारी जमीन म्हणजे चटई क्षेत्रफळ. म्हणून जेव्हा तुम्ही घर शोधायला लागता, चटई क्षेत्रफळ लक्षात ठेवा आणि नंतर निर्णय घ्या कारण तुम्हाला नक्की किती जागा वापरायला मिळणार आहे हे समजेल. चटई क्षेत्रफळ लक्षात ठेवल्याने स्वयंपाक घर, बेडरूम,  लिव्हिंग रूम, इत्यादी यामध्ये नेमक्या किती जागेचा वापर करायचा आहे ते समजेल. आताशा बरेच बिल्डर्स चटई क्षेत्रफळ क्षेत्राचा उल्लेखही करत नाही, त्याऐवजी बिल्टअप किंवा सुपर बिल्टअप जागेवर आधारित किंमत समोर ठेवतात. बिल्टअप जागेच्या साधारण ७० टक्के जागा हि चटई क्षेत्रफळ असते.

Real Estate Basics Part 1 – Carpet Area, Built-Up Area & Super Built-Up Area

बिल्टउप क्षेत्र (जागा)

बिल्टउप क्षेत्र हे चटई क्षेत्रफळ आणि भिंतींची जागा मिळून बनते. भिंतीची जागा म्हणजे तिचा पृष्ठभाग नसून तिची जाडी असते. भिंतींनी एकूण जागेच्या २० टक्के जागा व्यापलेली असते, जागेच्या एकूण क्षेत्रफळावरचा दृष्टिकोन त्यामुळे बदलतो. बिल्टअप क्षेत्रात अजूनही जागा येतात, जशा कपडे वाळत घालण्याची जागा (ड्राय एरिया), कुंड्या ठेवण्याची जागा (फ्लॉवर बेड) इत्यादी, ज्यामुळे बिल्टअप क्षेत्राची १० टक्के जागा व्यापतात. या सर्वांचा विचार करता तुम्हाला वापरासाठी बिल्टअप जागेच्या ७० टक्केच जागा मिळते. जर बिल्टअप क्षेत्र १२०० स्क्वेअर फूट आहे म्हणजे ३० टक्के (३६० स्क्वेअर फूट) एवढी जागा वगळून   उरलेली ८४० स्क्वेअर फूट एवढीच जागा वापरायाला मिळणार आहे.

सुपर बिल्टअप क्षेत्र (जागा)

सुपर बिल्टअप क्षेत्र म्हणजे बिल्टअप क्षेत्र आणि कॉरिडॉर, लिफ्ट लॉबी, इत्यादी सामायिक जागा या दोघांचे होणारे एकूण क्षेत्र. काही बाबतीत बिल्डर पोहोण्याचा तलाव, क्लब हाऊस, बगीचा या  इतर सुविधा सुद्धा यामध्ये जोडतात. विकासक /बिल्डर सुपर बिल्टअप क्षेत्राच्या आधारावर तुम्हाला शुल्क आकारात असतो, म्हणूनच याला ‘सेलेबल’ जागा म्हणतात. आता एक केस बघूया, यात जागेचा दर २००० रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे आणि सुपरबिल्टअप  क्षेत्र १२०० स्क्वेअर फूट आहे, यामध्ये मूलभूत किंमत (बेस कोस्ट) २४ लाख येते.

Real Estate Basics Part 1 – Carpet Area, Built-Up Area & Super Built-Up Area

जेव्हा एकाच मजल्यावर एकापेक्षा जास्त फ्लॅट असेल तर सुपर बिल्टअप क्षेत्र वेगळ्या प्रकारे मोजले जाते.

आता अजून एक उदाहरण पाहू,

अपार्टमेंट १ चे क्षेत्र १००० स्क्वेअर फूट आहे

अपार्टमेंट २ चे क्षेत्र २०० स्क्वेअर फूट आहे

दोघांचे सामायिक क्षेत्र १५०० स्क्वेअर फूट आहे, ज्यामध्ये अपार्टमेंट १ चा वाटा ५०० स्क्वेअर फूट व अपार्टमेंट २ चा वाटा १००० स्क्वेअर फूट आहे.

याप्रमाणे अपार्टमेंट १ चे सुपर बिल्टअप क्षेत्र १५०० स्क्वेअर फूट आणि अपार्टमेंट २ चे ३००० स्क्वेअर फूट असेल. या उदाहरणामधील सुपर बिल्टअप क्षेत्र हे अपार्टमेंटच्या क्षेत्राच्या गुणोत्तरात विभागलेले आहे. ( १:२ प्रमाणात).

तुम्हाला चटई क्षेत्रफळ क्षेत्र व बिल्टअप क्षेत्र यामधील मूलभूत फरक माहीत नसल्याने बिल्डर्स आणि विकासक सुपर बिल्टअप क्षेत्र किंवा सेलेबल एरिया यांच्या आधारावर मालमेच्या किमती ठरवत असतात. सुपर बिल्टअप क्षेत्रापेक्षा वास्तविक वापरायचे क्षेत्र हे फारच कमी असते. काही बिल्डर्स चटई क्षेत्राच्या आधारावर मालमतेच्या किमती ठरवत असतात, हे खरेतर फार दुर्मिळ आहे. ९० टक्के विकासक सुपर बिल्टअप क्षेत्राच्या आधारावर मालमत्तेच्या किमती ठरवतात. जितक्या जास्त सोयी-सुविधा तितके सुपर बिल्टअप क्षेत्र जास्त असते.

बांधकाम विश्व हे समाजाने तसे अवघड आहे आणि तुम्ही त्याचे नियम आणि व्यवहार बदलू शकत नाही, परंतू तुम्हाला या क्षेत्रातील विविध गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. जसे स्क्वेअर फुटाची गणना करणे, हे खरे तर महत्वाचे पण अतिशय साधे काम आहे.

Real Estate Basics Part 1 – Carpet Area, Built-Up Area & Super Built-Up Area

आम्ही आशा करतो यामुळे फ्लोअर एरिया कसा मोजला जातो तसेच त्याची गणना/मोजणी कशी केली जाते याबाबतचा तुमचा गोंधळ दूर होण्यास मदत झाली असेल, ज्यामुळे तुम्हांना निर्णय घेण्यास सहजता येईल. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली विचारू शकता.

रिअल इस्टेट पार्ट २, जिथे आम्ही ओएसआर, एफएसआय, लोडींग आणि बांधकामाच्या स्टेज विषयी सांगत आहोत.
उद्याचे  घर तुमची वाट पाहात आहे.

Comments

comments