मन्नत – शाहरुख खानच्या बंगल्याचे निरीक्षण आणि मूल्यांकन


‘भारतातील जनता आपल्या देशातील विविध क्षेत्रात चमकणाऱ्या ताऱ्यांवर अतिशय प्रेम करते. आणि म्हणूनच, आपले  बॉलीवूड सुपरस्टार आणि त्यांची जीवनशैली हा एक चर्चेचा विषय राहिला आहे. हाउसिंग डॉट कॉम वर, आम्ही या सुपरस्टार्सचे जीवनही आपल्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करत असतो ! मग भारताचा सर्वात प्रिय सुपरस्टार असल्यास काय होईल? किंग खानच्या अस्ताव्यस्त पसरलेली सहा मजली हवेली हाउसिंग डॉट कॉमवर विक्रीसाठी अाली तर काय होईल असा एक विचार आम्ही केला. याचे उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

 

राजाचा राजवाडा

rp_mannat1-617x400.jpg

Source: http://bit.ly/262YNtN

बॉलीवुडचा राजा – शाहरुख खान याची 6 मजली उंच, बांद्रा पश्चिमेतील बॅन्डस्टँड येथील सुंदर समुद्र किनारी असलेली ही वारसा इमारत एक पर्यटन स्थळही आहे. दररोज बॉलीवूडच्या बादाशहाचे अनेक प्रशंसक त्यांच्या आवडत्या बॉलीवूड स्टारची एक  झलक पाहण्यासाठी या बंगल्याला भेट देतात . शाहरुखच्या घराच्या आतील सजावट भव्य आहे आणि समोरच्या बाजूला सुंदर बाग आहे.

“निओ क्लासिकल” घटक अंतर्भूत असले तरी घराचे आतील भाग अतिशय आधुनिक आणि आकर्षक आहेत.  जगभरातील क्युरियो आणि विविध कलेच्या वस्तूंनी हे सुशोभित केले आहेत. घराच्या मागच्या बाजूला एक विस्तारित द्वितीय विंग आहे, जिथे पटकथेच्या चर्चेसाठी बैठकीची जागा, एक भव्य स्वयंपाकघर, शाहरुख खानचे कार्यालय, स्टुडिओ ,एक  सुसज्ज जीम आणि  एक सुंदर लाऊंज आहे.

हे बहुमजली  घर, एलिव्हेटर्स  प्रणालीद्वारे जोडल्या गेले आहे, एम.एफ. हुसैन चे चित्र, प्राचीन वस्तु आणि अन्य कला वस्तू असलेल्या दोन लिविंग रूम्स आहेत. यातील दोन मजल्यात खान कुटुंबीय राहतात. घरात एका संपूर्ण मजल्यावर मुलांसाठी खेळायला जागा, एक लायब्ररी, एक खाजगी बार आणि मनोरंजन केंद्र आहे.

 

मन्नतचे बाजार मूल्य

Mannat – A Peek into King Khan’s Home, and its Valuation

Source: http://bit.ly/1nCWVzr

मूळतः व्हिला व्हिएना नावाने ओळखली जाणारी समुद्रासमोर असलेली 2,446 स्के.मीटर पसरलेली प्रॉपर्टी   2001 मध्ये शाहरुख खानने भाडेपट्ट्याने घेतली होती. शाहरुख खानने त्यासाठी 13.32 कोटी रु. दिले आणि  त्याला “मन्नत” असे नाव दिले. तेव्हापासून तो वर्षाला 2,325 रुपये इतके कमी भाडे भरत होता, परंतु जेंव्हा महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि उपनगरात जमीन भाडेपट्टीत भाडेवाढ केली, पूर्ण जागेची मालकी हवी असल्यास, दरवर्षी 19 लाख रुपयांचा भाडे किंवा एक वेळचा परवाना शुल्क 8.3 कोटी (प्लॉटच्या रेडी रेकनर व्हॅल्यूचा पाचवा हिस्सा) अशी भाडेवाढ केली तेंव्हापासून त्याचे भाडे वाढले आहे.

या तथ्यावरून, जर या रेडी रेकनरचा आधार घेऊन किंमत ठरवली तर या जमिनीची अधिकृत किंमत  41.5 कोटी असेल. आता, बॉलीवुडच्या किंगच्या इन्कमचा विचार केला असता, आपण म्हणाल की ही किंग खासाठी फार मोठी रक्कम नाही.  म्हणून आम्ही पुढे मन्नतच्या चालू बाजार मूल्याची गणना केली, आणि आम्हाला धक्का बसला.

मन्नतची किंमत काढण्यासाठी आम्ही त्याच परिसरात निवासी जागेची सरासरी किंमत शोधली. श्री खान यांच्या मालमत्ते इतकी मोठी मालमत्ता बाजारपेठ विक्रीसाठी उपलब्ध नसली तरी आम्ही निवासी अपार्टमेंटची किंमत आधार म्हणून शोधून काढली.

बॅण्डस्टँड वांद्रे (पश्चिम) जेथे मन्नत स्थित आहे, तेथे सरासरी चौरस फुटाची किंमत 43,000 रुपये आहे. जेव्हा आपण ही  मूळ किंमत मानता तेव्हा 26,328.52 चौ.फू. प्लॉटची किंमत अंदाजे 113.21 कोटी रु. होते. आता हा एका प्रसिद्ध व्यक्तीचा बंगला आहे. लक्षात ठेवा, हे केवळ अंदाजे मूल्य आहे. त्याची वारसा स्थिती आणि परिसरात त्याचे स्थान काही ठराविक प्रमाणात अतिरिक्त मूल्य जोडते, काही स्त्रोतांनुसार त्यात जवळपास 15 टक्के वाढ होते. आता, त्यात 6 मजल्याचे उंच उभारलेले घर, घराच्या समोर भव्य लॉन आहे आणि मोठ्या फ्रेंच खिडक्या आहेत ज्यातून समुद्राचे एक विलक्षण दृश्य बघावयास मिळते. हे सगळे जोडुन आपल्याला एक मौल्यवान महाल मिळवण्यासाठी अंदाजे  200 कोटी एवढी अवाढव्य रक्कम मोजावी लागेल.

Mannat – A Peek into King Khan’s Home, and its Valuation

गंमत! – भारतीय घराचे सरासरी आकारमान किती आहे? नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या मते, ग्रामीण भागातील 494 चौ.फू., किंवा 103 चौरस फूट प्रति व्यक्ती आणि 504 चौ.फु. शहरी भागात किंवा 117 चौरस फूट प्रति व्यक्ती. म्हणजे एकट्या मन्नतमध्ये 225 लोक राहू शकतात !

*The edited picture used as the header image for this blog post was sourced from  bqzzhere: http://bit.ly/1YnHVr8

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments