सिडको महामंडळाने या घरांच्या विक्रीसाठी कोणत्याही सेवा केंद्र अथवा एजन्सीची नेमणूक केलेली नाही

परंतु, काही सामाजिक माध्यमांद्वारे सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेबाबत जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सिडको महामंडळामार्फत नवी मुंबईतील सर्व सुविधांनी सुसज्ज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यात येत आहेत. परंतु, या घरांच्या विक्रीसाठीची गृहनिर्माण योजना अद्याप सिडकोमार्फत जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, काही सामाजिक माध्यमांद्वारे सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेबाबत जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सिडको महामंडळाने या घरांच्या विक्रीसाठी कोणत्याही सेवा केंद्र अथवा एजन्सीची नेमणूक केलेली नाही. याबाबत खाजगी व्यक्ती किंवा संस्था यांच्यामार्फत प्रसारित करण्यात येणाऱ्या खोट्या व चुकीच्या जाहिराती/योजना/बातम्या यांना बळी पडू नये, असे सिडकोतर्फे जनतेला आवाहन करण्यात येत आहे. अशा जाहिरातींना बळी पडून व्यवहार झाल्यास त्यासाठी सिडको जबाबदार राहणार नाही, याची कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

तसेच, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या अथवा माहिती संदर्भात आल्यास जनतेने कृपया सिडकोच्या दक्षता विभाग, ६ वा मजला, सिडको भवन यांच्याकडे लेखी तक्रार करावी. तसेच, सिडकोमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या योजनेबाबत अधिकची माहिती हवी असल्यास किंवा योजनेत अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी लोकांनी नागरिक सेवा केंद्र, ७ वा मजला, बेलापूर रेल्वे स्थानक, नवी मुंबई किंवा पणन (गृहनिर्माण) विभाग, ३ रा मजला, रायर्ड भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, ही सवनंती.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • महाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केलामहाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केला
  • मुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडियामुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडिया
  • नवी मुंबईतील टॉप 16 निवासी क्षेत्रेनवी मुंबईतील टॉप 16 निवासी क्षेत्रे
  • बीएमसीने पहिली घरांची लॉटरी जाहीर केली; ईडब्ल्यूएस, एलआयजी श्रेणीतील 426 मुंबईतील फ्लॅट्स देणारबीएमसीने पहिली घरांची लॉटरी जाहीर केली; ईडब्ल्यूएस, एलआयजी श्रेणीतील 426 मुंबईतील फ्लॅट्स देणार
  • म्हाडाची 20% समावेशक गृहनिर्माण योजना काय आहे?म्हाडाची 20% समावेशक गृहनिर्माण योजना काय आहे?
  • मुंबई म्हाडा बोर्ड लॉटरीसाठी अर्ज कसा करावा?मुंबई म्हाडा बोर्ड लॉटरीसाठी अर्ज कसा करावा?