सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ‘म्हाडा’कडे प्रत्यक्ष जमा रु. ११,३३४.५१ कोटी

सन २०२४-२५ मध्ये महसुली जमेपोटी रु. ५००० कोटी प्राप्त झालेले आहेत. यामध्ये चटई निर्देशांक (एफएसआय), गुंतवणुकीवरील व्याज, इमारत परवानगी शुल्क, भाडे व सेवा आकारापोटी मिळणाऱ्या रकमांचा समावेश आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (म्हाडा) सन २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष जमा रु. ८,११३.८८ कोटी होती. सन २०२४-२५ मध्ये प्रत्यक्ष जमा रु. ११,३३४.५१ कोटी एवढी झाली असून सन २०२३-२४ च्या तुलनेत सन २०२४-२५ मध्ये म्हाडाच्या जमा रकमेत रु. ३,२२०.६३ कोटींची वाढ म्हणजेच ३९.६९ टक्के वाढ झाली आहे.
सन २०२४-२५ मध्ये महसुली जमेपोटी रु. ५००० कोटी प्राप्त झालेले आहेत. यामध्ये चटई निर्देशांक (एफएसआय), गुंतवणुकीवरील व्याज, इमारत परवानगी शुल्क, भाडे व सेवा आकारापोटी मिळणाऱ्या रकमांचा समावेश आहे. भांडवली जमेपोटी रु. १७०० कोटी प्राप्त झालेले आहेत. यामध्ये म्हाडाच्या विविध मंडळांकडून सोडतीद्वारे घरांच्या विक्री, विक्री अभावी पडून असलेल्या गाळ्यांच्या विक्रीसाठी विशेष योजना राबवून त्यातून प्राप्त झालेल्या रकमांचा समावेश आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळास जिल्हा नियोजन कार्यालयाकडून रु. २२०० कोटी प्राप्त झालेले आहेत.
‘म्हाडा’ने विविध योजनांसाठी शासनाकडे अर्थसहाय्य म्हणून रु. २,३५० कोटी व आतापर्यंत म्हाडाने शासनास दिलेल्या कर्जाच्या प्रतिपूर्तीसाठी रु. १,०५० कोटी असे एकूण रु. ३,४०० कोटींची मागणी केली होती. यापैकी शासनाने ‘म्हाडा’ला अर्थसहाय्य म्हणून एकूण रु. रु. १७५८.६०  कोटी दिले आहेत.

 

जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा.
Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • 2025 मध्ये मेट्रो शहरे आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये एचआरए गणना2025 मध्ये मेट्रो शहरे आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये एचआरए गणना
  • म्हाडा नाशिक बोर्ड लॉटरी 2025 बद्दल सर्व काहीम्हाडा नाशिक बोर्ड लॉटरी 2025 बद्दल सर्व काही
  • परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी जीएसटी सुधारणा; नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागूपरवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी जीएसटी सुधारणा; नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू
  • महाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथेमहाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथे
  • महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणनामहाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणना
  • क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलकक्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलक