गोपाळकाल्याच्या शुभ मुहूर्तावर सिडको गृहकुलांतील उपलब्ध 902 घरकुलांच्या गृहनिर्माण योजनेचा करण्यात आला प्रारंभ

900 हून अधिक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार साकार

सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमी/गोपाळकाल्याच्या शुभ मुहूर्तावर सोमवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सिडकोच्या नवी मुंबईतील गृहकुलांतील एकूण 902 घरकुलांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. एकूण 902 घरकुलांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील 213 असून सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती व वास्तुसुव्हा-सेलिब्रेशन गृहकुलांतील 689 घरकुले सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

सिडकोतर्फे सातत्याने सर्वसामान्य उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. या वर्षीच्या गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर उपलब्ध 902 घरकुलांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील उपलब्ध 213 घरकुलांपैकी 38 घरकुले ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि 175 घरकुले ही अनुसूचित प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुसुव्हा-सेलिब्रेशन गृहकुलांतील उपलब्ध 689 घरकुलांपैकी 42 घरकुले ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, 359 घरकुले अल्प उत्पन्न गटांसाठी, 128 घरकुले मध्यम उत्पन्न गटांसाठी आणि 160 घरकुले ही उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत.

योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 27 ऑगस्ट 2024 पासून प्रारंभ होणार असून योजनेसाठी संगणकीय सोडत 10 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी तसेच योजनेच्या सविस्तर माहितीसाठी https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना विविध पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. या गृहकुलांना रेल्वे, रस्ते, मेट्रो द्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोचे अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प या गृहकुलांपासून नजीकच्या अंतरावर आहेत. यामुळे नागरिकांना एक परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Was this article useful?
  • ? (1)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?
  • महाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केलामहाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केला
  • मुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडियामुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडिया
  • नवी मुंबईतील टॉप 16 निवासी क्षेत्रेनवी मुंबईतील टॉप 16 निवासी क्षेत्रे
  • बीएमसीने पहिली घरांची लॉटरी जाहीर केली; ईडब्ल्यूएस, एलआयजी श्रेणीतील 426 मुंबईतील फ्लॅट्स देणारबीएमसीने पहिली घरांची लॉटरी जाहीर केली; ईडब्ल्यूएस, एलआयजी श्रेणीतील 426 मुंबईतील फ्लॅट्स देणार
  • म्हाडाची 20% समावेशक गृहनिर्माण योजना काय आहे?म्हाडाची 20% समावेशक गृहनिर्माण योजना काय आहे?