मेनटेनन्स चार्जेस: का आहे हा घर खरेदी करतांना महत्वाचा प्रश्न?


घर खरेदी करण्यापूर्वी, खरेदीदाराने भविष्यात प्रॉपर्टीवर लागू असणारे मेन्टेनन्स चार्जेस जाणून घेणे आवश्यक आहे, कारण कधी कधी ही खूप मोठी रक्कमही असू शकते

घर खरेदी करताना बहुतेक घर खरेदीदार मेंटेनन्स चार्जेस हा भविष्यातला मोठा खर्च लक्षात घेत नाहीत. “काही डेव्हलपर्स  जमीन ताब्यात घेतल्याबरोबर आणि संबंधित प्रोजेक्टला कोणतीही मंजुरी मिळण्या आधीच, प्रोजेक्टची घोषणा करतात. ते अतिशय आकर्षक दरांवर या प्रकल्पाची सुरूवात करतात आणि गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे भविष्यात मेंटेनन्स चार्जेस काय असतील याची त्यांना पूर्वकल्पना नसते,” कोल्डवेल बॅंकर इंडियाचे उपाध्यक्ष (संचालन आणि धोरण) मोना जलोटा यांनी स्पष्ट केले.

बिल्डरने सोयीसुविधांची अंमलबजावणी आणि बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्याची गुणवत्ता व अंतिम स्वरूप बघितल्यानंतरच प्रोजेक्टला लागणाऱ्या मेंटेनन्स चार्जेसचा विचार करता येतो. परिणामी, ग्राहकांना मासिक मेंटेनन्स चार्जेसचा द्यावा री रक्कम धक्कादायक ठरू शकते., असे सांगतांना त्या पुढे म्हणाल्या ” उदाहरणार्थ दक्षिण मुंबईतील काही इमारतींमध्ये, रु. 27 प्रति चौरस फूट  इतका जास्त मेंटेनन्स चार्जे आहे, त्यामुळे गुंतवणुकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या फायद्याचा विचार करताना या आकस्मिक खर्चाचा विचार करावा”. असा जलोटा यांनी सल्ला दिला

 

मेन्टेनन्स चार्जेसचे प्रकार  

खरेदीदाराने प्रॉपर्टी ताब्यात घेतली आहे  कि लगेच मेन्टेनन्स चार्जेस लागू केले जाते.

“प्रॉपर्टी जुनी किंवा नवी कशीही असली तरी तिला मेंटेन करणे, तिची देखभाल करणे आवश्यक असते”, असे मत आरई / मॅक्स इंडियाचे संस्थापक आणि चेअरमन सॅम चोप्रा यांनी व्यक्त केले. “मेंटेनन्स चार्जेसमध्ये कॉमन एरिया, लिफ्ट, टेरेस, पार्किंग एरिया, नवीन बांधकाम आणि इतर संरचनात्मक बदलांवरील सर्व शुल्क समाविष्ट करण्यासाठी खर्च, वॉटर चार्जेस , पार्किंग चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स, विमा यासारख्या सुविधांवरील खर्चाचा समावेश आहे. प्रिमियम शुल्क, सामान्य वीज शुल्क, नॉन-ऑक्यूपेन्सी  चार्जेस, सर्विस चार्जेस आणि इतर विविध चार्जेस असतात. हे प्रत्येक सोसायटीसाठी वेगवेगळे असू शकतात. फ्लॅटच्या आधारावर, किंवा प्रत्येक चौरस फूट क्षेत्राच्या आधारावर ही चार्जेस  आकारले जाऊ शकतात”. असे त्यांनी स्पष्ट केले.

 

मेन्टेनन्स चार्जेसचे प्रकार  ऍप्लिकेबिलिटी/ लागू होण्यासाठीचे नियम
इमारत दुरुस्ती व देखभाल खर्च प्रत्येक फ्लॅटच्या बांधकाम मूल्याच्या वार्षिक 0.75%
सर्व्हिस चार्जेस (घराची देखभाल, सुरक्षा, कॉमन भागातील वीज, उपकरण) प्रत्येक फ्लॅटला समान विभागणी
लिफ्टची दुरुस्ती व इमारत देखभाल यावर खर्च प्रत्येक फ्लॅटला समान विभागणी
सिंकिंग फंड प्रत्येक फ्लॅटच्या बांधकाम मूल्याच्या वार्षिक 0.25%
नॉन-ऑक्यूपेन्सी  चार्जेस फ्लॅट भाड्याने दिलेला असल्यास, सर्व्हिस चार्जेसच्या 10% वर कॅल्क्युलेट केले जातात.
पार्किंग चार्जेस प्रत्येक सदस्याच्या पार्किंगच्या संख्येनुसार
प्रॉपर्टी टॅक्स अँड वॉटर चार्जेस प्रत्येक फ्लॅटचा प्रत्यक्ष वापर, किंवा घरात येणाऱ्या इंटेलच्या संख्येवर

 

सोसायटी किंवा कल्याण संघटनेच्या अनुपस्थितीत मेन्टेनन्स चार्जेस

विशेषज्ञ सांगतात की सोसायटी किंवा कल्याण संघाच्या अनुपस्थितीत, डेव्हलपर सामान्यतः संपूर्ण देखभालीचा प्रभारी असतो आणि प्रॉपर्टी खरेदी करतेवेळी ही किंमत खरेदीदारांना स्पष्ट सांगणे ही त्याची जबाबदारी असते. प्रोजेक्ट पूर्ण होण्याआधी, डेव्हलपरने मेन्टेनन्स चार्जेस घेणे आणि नंतर ते सोसायटीकडे किंवा संघटनेकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments