‘म्हाडा’ कोकण मंडळातर्फे तिसर्‍या जनता दरबार दिनात १० तक्रारींचे निवारण

म्हाडा कोकण मंडळाचा तिसरा जनता दरबार यशस्वी – नागरिकांच्या १० तक्रारींवर तत्काळ सुनावणी व निवारण

मुंबई, दि. 19 जून, २०२५ :- जनसामान्यांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या तिसर्‍या जनता दरबार दिनात एकूण १० तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात येऊन सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले.

वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या लोकाभिमुख उपक्रमात, श्रीमती गायकर यांनी अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निवारण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ‘नागरिकांच्या तक्रारींचे निवारण’ या महत्त्वपूर्ण घटकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी दिले. या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करत कोकण मंडळाने आज तिसरा जनता जनता दरबार दिन घेत शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचा प्रत्यय दिला.

लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद यांना अधोरेखित करणारी ही अभिनव संकल्पना पुढे नेण्याचा निर्धार कोकण मंडळाने केला आहे. आज झालेल्या जनता दरबार दिनात, देखभाल शुल्क समायोजित करणे, विक्री किंमत भरण्यास उशीर झाल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम परत करण्यात यावी, सोसायटी लवकर स्थापन करण्यास परवानगी देण्याबाबत सहकार उपनिबंधकांनी कार्यवाही करावी, म्हाडा वसाहतीतील समस्या सोडविणे आदींबाबत अर्ज प्राप्त झाले.
श्रीमती गायकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा.

 

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणनामहाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणना
  • क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलकक्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलक
  • KDMC मालमत्ता कर: कसे भरायचे आणि इतर KDMC सेवा जाणून घ्याKDMC मालमत्ता कर: कसे भरायचे आणि इतर KDMC सेवा जाणून घ्या
  • सिडकोने भाडेपट्ट्यावरील भूखंडांचे फ्रीहोल्ड भूखंडांमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केलीसिडकोने भाडेपट्ट्यावरील भूखंडांचे फ्रीहोल्ड भूखंडांमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली
  • म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर १५ कोटी अधिकृत दस्तऐवज नागरिकांसाठी उपलब्धम्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर १५ कोटी अधिकृत दस्तऐवज नागरिकांसाठी उपलब्ध
  • म्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलावासाठी नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मुदतवाढम्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलावासाठी नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ