औरंगाबादला ‘दारांचे शहर’ असेही म्हटले जाते. हे भारतामधील एक अतिशय लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. महराष्ट्रात वसलेल्या या शहराचा इतिहास, वास्तूकला आणि नयनरम्य निसर्ग दरवर्षी हजारो पर्यटकांना खुणावणारे आहेत. औरंगाबादमध्ये अनेक आकर्षण केंद्र असून ती अजिबात चुकवू नयेत. या पर्यटन ठिकाणांमध्ये अजिंठा व एलोरा गुंफा, पाणचक्की, बीबी का मकबरा, सहेलियों की बारी आणि अनेक स्थळांचा समावेश आहे. इथे दिलेल्या 20 सर्वोच्च पर्यटन स्थळांना औरंगाबादच्या पुढील सहलीत नक्की भेट द्या!
औरंगाबादला कसे पोहोचाल?
ट्रेन मार्ग: रेल्वेने पोहोचायचे झाल्यास औरंगाबाद जंक्शन शहराजवळ आहे. शहराला दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद रेल्वे मार्गाने जोडण्यात आले आहेत. या शहरांशिवाय, निझामाबाद, नागपूर, शिर्डी, विषाखापट्टणम, नांदेड, परळी, नाशिक, अमृतसर, कर्नुल, पुणे, अंबाला, काकिनाडा, रेनीगुंटा, मदुराई, ग्वाल्हेर, वडोदरा, भोपाळ, नरसापूर, रामेश्वरम, तिरूपती, ओखा आणि राजकोटहून ट्रेन येतात.
हवाईमार्ग: शहररपासून जवळपास 10 किमी अंतरावर पूर्वेकडे औरंगाबाद विमानतळ असून मुंबई, दिल्ली, जयपूर आणि उदयपूर येथून हवाई पर्याय उपलब्ध आहेत. दिल्ली, हैदराबाद, मुंबई, उदयपूर, पुणे, जयपूर आणि नागपूर शिवाय औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळावरून दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि उदयपूरला चांगल्याप्रकारे जोडण्यात आले आहे.
रस्ते मार्ग: औरंगाबाद हे शहर रस्ते आणि महामार्गाच्या चांगल्या संपर्कजाळ्याने अन्य शहरांना जोडण्यात आले आहे. इथून सतत राज्य आणि खासगी परिवहन पर्याय उपलब्ध असल्याने शेजारील शहरांत सहज प्रवास करता येतो.
औरंगाबादमधील या सर्वोत्तम 20 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या
1) अजिंठा आणि एलोरा लेणी
स्रोत: पिंटरेस्ट
अजिंठा आणि एलोरा लेण्या ही औरंगाबादमधील दोन सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन ठिकाणं आहेत. मुख्य शहरातून या पर्यटन स्थळांना बस किंवा टॅक्सीने भेट देता येते. अजिंठा लेण्या ३० कातळांमध्ये कोरलेल्या असून बौद्धकालीन वास्तूशिल्पाचा नमुना मानला जातो. या लेण्या इ.स. पूर्व २ऱ्या शतकांत घडविण्यात आल्या. तर एलोरा लेण्या कातळांत कोरलेल्या असून ३४ हिंदू, बौद्ध तसेच जैन देवलयांचा संगम आहे. यांची घडण इ. स. पूर्व ६व्या शतकांत करण्यात आली.
अजिंठा लेणीसाठी माणशी रू. १० तर एलोरा लेणीकरिता माणशी रू. २५ आकार पडतो. तिकीटांची खरेदी लेण्यांच्या प्रवेशद्वारापाशी करता येते. औरंगाबाद रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा उपलब्ध आहेत. एलोरा लेण्यांपर्यंत पोहोचण्याकरिता साधारण ४५ मिनिटांचा कालावधी लागतो, तर एलोरा लेणी दीड तासांवर आहे. मुंबई ते औरंगाबाद प्रवासाला केवळ सहा ते सात तास लागतात.
हे देखील पहा: महाराष्ट्रात भेट देण्याजोगी १५ सर्वोत्तम पर्यटन ठिकाणे
2) बीबी का मकबरा
स्रोत: पिंटरेस्ट
औरंगाबादला भेट देणाऱ्याने बीबी का मकबरा नक्की पाहावा. मुख्य शहरापासून हे ठिकाण सुमारे ५ किमी अंतरावर आहे आणि तिथे बस किंवा टॅक्सीने जाता येते. सम्राट औरंगजेबची पत्नी दिलरस बानू बेगम हिच्या स्मरणार्थ १६६० मध्ये हा मकबरा बांधण्यात आला. ही वास्तू हुबेहूब ताज महालसारखी दिसते. बीबी का मकबरा हा भारतातील सर्वोत्तम मुघल वास्तूकलेचा नमुना मानला जातो. तो मुख्य शहरापासून जवळपास ३ किमीवर आहे.
बीबी का मकबरा नियमित सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत खुला असतो. भारतीयांसाठी, प्रवेश शुल्क रू १० असून परदेशी पर्यटकांकरिता रू. २५० आकारण्यात येतात.
3) दौलताबाद किल्ला
स्रोत: पिंटरेस्ट
देवगिरी किल्ला हा देवगिरी फोर्ट या नावाने ओळखला जातो. समुद्र सपाटीपासून जवळपास २०० मीटर अंतरावर असलेला हा किल्ला २०० मीटर उंच शंखाकृती पर्वतावर स्थित आहे. या किल्ल्याचे मूळ बांधकाम १२ व्या शतकात झाले होते आणि हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.
दौलताबाद शहर हे औरंगाबादपासून १५ किमी अंतरावर असून रस्ते मार्गाने सर्व मुख्य शहरांना चांगल्याप्रकारे जोडण्यात आले आहे. चिखलठाणा हे औरंगाबादकडे जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ असून ते १२ किमी अंतरावर आहे. याठिकाणी पर्यटक नियमितपणे सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० यावेळेत भेट देऊ शकतात. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी रू १० ते रू. १०० दरम्यान खर्च येतो.
4) घृष्णेश्वर देवालय
स्रोत: पिंटरेस्ट
एलोरा लेण्यांपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर हे प्राचीन देवालय वसलेले आहे. हिंदू मान्यतेनुसार हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून औरंगाबादमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. घृष्णेश्वर देवालय हे पृथ्वीवरील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. देवालयाच्या परिसरात असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने आत्मा आणि मनाची शुद्धी होते, अशी समजूत आहे.
रस्ते मार्गे औरंगाबाद (रेल्वेस्थानक) आणि घृष्णेश्वर देवालयात २४ किमी अंतर असून रेल्वेमार्गावरील अंतर २९.१ किमीचे आहे.
5) पितळखोरा लेणी
स्रोत: पिंटरेस्ट
हा भारतामधील बौद्धकालीन वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना मानला जातो. पितळखोरा लेण्यांची स्थापना इ. स. पूर्व २ ऱ्या शतकात झाली होती. लेण्यांचे बांधकाम बेसॉल्ट दगडात करण्यात आले, हा भाग हवामानाच्या दृष्टीने अतिसंवेदनक्षम मानला जातो. काळाच्या ओघात या लेण्यांचे बरेच नुकसान झाले आहे.
हा परिसर एलोरा लेण्यांपासून ४० किमी तर औरंगाबादपासून ८० किमी अंतरावर वसलेला आहे. दोन्ही ठिकणांहून लेणी जवळ आहेत. इथे चढणावरील पायऱ्या असून तिथून धबधब्याला जाता येतं.
6) सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालय
स्रोत: पिंटरेस्ट
आठवड्याच्या शेवटी आणि संध्याकाळी इथल्या सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालयात मोठी गर्दी असते. हे ठिकाण औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून केवळ ३ किमी अंतरावर आहे. इथल्या प्राणिसंग्रहालयात वन्यजीव आणि सरपटणारे प्राणी आहेत. ज्यामध्ये मगरी, तरस, वाघ, सिंह, साप, कोल्हे आणि तत्सम प्राण्यांचा समावेश आहे.
इथे असलेल्या बाग आणि प्राणिसंग्रहालयासाठी प्रवेश शुल्क आकरण्यात येते: गार्डनकरिता रू २० आणि प्राणिसंग्रहालयासाठी रू. ५० आकरण्यात येतात.
7) शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय
स्रोत: पिंटरेस्ट
सर्वाधिक शक्तिमान मराठा सत्ताधीश छत्रपती शिवाजी महाराजांची विविध छायाचित्रं आणि दिमाखदार नमुनाचित्रं शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळतात. इथे एकूण सहा प्रदर्शन दालने असून त्यात शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि इतर युद्धसाहित्य पाहायला मिळतात.
एकूण ३२ मिनिटांत १७.५ किमीचा पल्ला गाठता येतो. इथे प्रौढ व्यक्तिंसाठी रू. १०० प्रवेश शुल्क असून लहानग्यांकरिता रू. ३० मोजावे लागतात, कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रवेश देण्यात येतो.
8) गोगा बाबा टेकडी
स्रोत: विकीमीडिया
इथल्या नयनरम्य परिसरामुळे गोगा बाबा टेकडी भटकंती करणाऱ्या जोडप्यांमध्ये विशेष पसंतीची जागा आहे. इथून संपूर्ण शहराचा थक्क करणारा नजारा डोळ्यांत साठवता येतो. ही शिखरावर असलेली टेकडी ट्रेककरिताही उत्तम आहे. गोगा बाबा टेकडीवर लहानसे समाधीस्थळ देखील आहे, ज्यामुळे या थंड हवेच्या प्रदेशात वातावरणनिर्मितीत भर पडते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्तेमार्गे १४ मिनिटांत ४.४ किमीचे अंतर गाठता येते.
9) सूनहरी महल
स्रोत: पिंटरेस्ट
या महालात दोन मजले असून हा आलीशान भारतीय वास्तूशिल्पाचा अस्सल नमुना मानला जातो. या ठिकाणाला भेट न दिल्यास औरंगाबादची सफर अपूर्ण मानली जाते. इथे प्रवेशद्वाराजवळ सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेले बगीचे आणि ताटवे आहेत. औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून हे पर्यटन स्थळ अवघ्या ६ किमीवर आहे.
औरंगाबादमधील सूनहरी महल येथे संध्याकाळी ७:०० ते ११:०० या वेळेत अनेक कार्यक्रम होतात. इथे भारतीयांना रू. १० तर परदेशी प्रवाशांकरिता रू. १०० आकरण्यात येतात.
10) गुल मंडी
स्रोत: पिंटरेस्ट
ही जागा हिमरू शाली आणि सुंदर साड्यांसाठी प्रसिद्ध आहे, गुलमंडी ही औरंगाबादमधील सुप्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. इथल्या कपड्यांवरील आकर्षक डिझाईन आणि कपड्यांचे मटेरियल विशेष लोकप्रिय आहे. औरंगाबादची बाजारपेठ फार मोठी असून खरेदीची आवड असणाऱ्यांच्या पसंतीची आहे.
बाजारपेठेचं हे ठिकाण शहागंज, औरंगाबाद येथे असून सकाळी ७ ते संध्याकाळी १० दरम्यान खुले असते.
11) बनी बेगम गार्डन
स्त्रोत: विकीमीडिया
बनी बेगम गार्डन हे औरंगाबादमधील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र मानले जाते. हे गार्डन सम्राट औरंगजेबचा मुलगा, राजकुमार आजम शहा याने १६९५ मध्ये बांधले. त्याची आई बनी बेगम हिच्या नावावरून गार्डनचे नामकरण करण्यात आले. हा बगीचा मुघल वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना असून इथे कारंजे, फुलांचे ताटवे आणि वृक्षराजी आहे. या बगीच्यात असलेल्या राजकुमार आजम शहाच्या समाधीस्थळाला देखील भेट देता येते.
12) पाणचक्की
स्रोत: पिंटरेस्ट
पाणचक्की हे औरंगाबादची भटकंती करायला आलेल्या पर्यटकांचे आवडीचं ठिकाण आहे. ही पाणचक्की १६९५ मध्ये सूफी संतांच्या स्मरणार्थ उभारण्यात आली. तिचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून तिच्यात जलप्रवाह अविरत सुरूच आहे. औरंगाबाद ते पाचगणी हा शिर्डीहून कॅबने पूर्ण करता येईल असा जलद मार्ग आहे, बसने पाचगणी गाठायला ७ तास २१ मिनिटे लागतात.
पाणचक्की प्रवेशासाठी भारतीय पर्यटकांना माणशी रू ५ मोजावे लागतात, तर परदेशी पाहुण्यांना प्रती व्यक्ति रू. १०० आकार पडतो. पाच वर्षे वयोगटाखालील बालकांना इथे मोफत प्रवेश देण्यात येतो. ही पाणचक्की सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत खुली असते.
13) खुलताबाद
स्रोत: पिंटरेस्ट
खुलताबाद हे ठिकाण संतभूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथे १४ व्या शतकातील काही सूफी संतांनी भेट दिल्याचे दाखले आढळतात. या प्राचीन पवित्र शहरात अनेक महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे आहेत. जसे की, औरंगजेब याची कबर, झरी झार बक्ष दरगाह तसेच शेख बुरहान उद्दीन गरीब चिश्ती व शेख-उद-दिन शिराझी यांची समाधी स्थळं.
औरंगाबादपासून जवळच वसलेल्या छोटेखानी खुलताबादपासून अजिंठा आणि एलोरा अवघ्या ३ किमी अंतरावर आहे.
14) सलीम अली जलाशय
स्रोत: पिंटरेस्ट
पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमी या जलाशयाची विशेष मजा घेतात. हे ठिकाण स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असून औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे. इथले पक्षी अभयारण्य व्यवस्थित राखण्यात आले असून ते आकर्षक जलाशयाला जोडलेले आहे.
औरंगाबाद रस्ता, डॉ आंबेडकर मार्ग, मुंबई-कोलकाता महामार्ग, स्टेशन रोड आणि मौलाना आझाद संशोधन केंद्र मार्गाद्वारे सलीम अली जलाशय परिसरात आठ मिनिटांत (२.६ किलोमीटर) पोहोचता येते.
15) भद्र मारुती
स्रोत: पिंटरेस्ट
भारतातील केवळ तीन देवलयांत हनुमान हा निद्रावस्थेत आढळतो, खुलताबाद येथील हनुमान याच आसनात पहायला मिळतो. पौराणिक कथांनुसार भद्रावती हा खुलताबादचा शासक असून प्राचीन काळी भद्रावती नावाने ओळखला जाई.
तुम्ही मुख्य शहर औरंगाबादपासून बस किंवा टॅक्सीने इथे पोहोचू शकता. त्याचप्रमाणे २१ तास ३ मिनिटांत रेल्वे याठिकाणी पोहोचता येते. रू. १,१००- रू. ३,४०० किंमतीत नवी दिल्लीपासून भद्रा मारुती देवालयात पोहोचता येते.
16) हिमारू कारखाना
स्रोत: पिंटरेस्ट
अभिनव हातमागाच्या अस्सल अनुभवासाठी तसेच हस्तकला खरेदीकरिता औरंगाबादच्या हिमारू कारखान्याला भेट द्या. हा कारखाना जवळपास १५० वर्षे जुना आहे आणि अजूनही पारंपरिक विणकाम पद्धतींचा प्रचारक आहे.
औरंगपुरा मार्गावरून हिमारू कारखाना सहा मिनिटांच्या अंतरावर (१.४ किमी) आहे.
17) पीर इस्माईल दरगाह
स्रोत: पिंटरेस्ट
ही वास्तू पीर इस्माईलला समर्पित आहे, ते मुघल शासक औरंगजेबचे मार्गदर्शक होते. या ठिकाणी भेट दिल्यास तुम्हाला प्राचीन मुघल युगात परतल्याचा भास होईल. इथले शाही प्रवेशद्वार गुंतगुंतीच्या शैलीत बांधलेले आहे, वास्तूच्या कमनीचा मार्ग, प्रवेशद्वार आणि घुमट अतिशय भव्य आहे.
पीर इस्माईल दरगाह महाराष्ट्रात औरंगाबाद येथे वसला आहे.
18) अर्क किल्ला
स्रोत: पिंटरेस्ट
या वास्तूचे अतिशय प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे इथे मुघल प्रशासक औरंगजेबचे सिंहासन दालन आहे. त्यात वादकांकरिता नादारखणी, दरबार हॉल आणि जुम्मा मशीद ही लोकप्रिय ठिकाणे आहेत. या औरंगाबादमधील अतिशय प्रसिद्ध जागा असून त्यांचे बांधकाम औरंगजेबच्या आदेशानुसार करण्यात आले होते.
चिखलठाणा विमानतळ औरंगाबादपासून १० किमीवर वसले आहे. इथे येण्यासाठी मुंबई, जयपूर, उदयपूर आणि दिल्ली विमानतळावरून अतिशय सुलभ सुविधा आहेत. अजिंठा लेणी गाठण्यासाठी विमानाने औरंगाबादला येऊन तिथून कॅब भाड्याने घेऊन किंवा बसने पोहोचणे शक्य आहे.
19) जायकवाडी धरण
स्रोत: विकीपेडीया
हा महाराष्ट्रातील सर्वात भव्य जलसिंचन प्रकल्प असून दुष्काळग्रस्त मराठवाडा प्रदेशाला पाणी पुरवठा करतो. औरंगाबादचे मुख्य आकर्षण स्थळ म्हणजे जायकवाडी पक्षी अभयारण्य, हे गोदावरी नदीनजीक असलेल्या धरणालगत असलेल्या भागात वसलेले आहे.
आठवड्यात कधीही पर्यटक याठिकाणी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत भेट देऊ शकतात. जायकवाडी धरणासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकरण्यात येत नाही. जायकवाडी धरणापासून औरंगाबादचे अंतर ६० किमी आहे.
20) औरंगाबाद लेणी
स्रोत: पिंटरेस्ट
बौद्धकालीन १२ मंदिरे नरम बेसॉल्ट दगडांत ६ व्या आणि ८ व्या शतकात कोरण्यात आली. डोंगरमाथ्यावरून शहराचे मनोहारी आणि निसर्गरम्य दर्शन घडते. वारसाप्रेमींच्या दृष्टीने ही सुयोग्य वास्तू असून शहरातील प्रमुख स्थळ आहे.
औरंगाबाद रेल्वे स्थानकातून वाहतुकीची सुविधा आहे. एलोरा आणि अजिंठा दरम्यानचा प्रवास केवळ ४५ मिनिटांचा आहे, तर एलोरा दीड तासांवर आहे. मुंबई ते औरंगाबाद प्रवास अवघ्या सहा ते सात तासांत पूर्ण करता येतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
औरंगाबाद कशासाठी प्रसिद्ध आहे?
औरंगाबादच्या प्राचीन लेण्या, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे हे एक लोकप्रिय पर्यटन ठिकाण झाले आहे.
एलोरापासून औरंगाबाद गाठण्यासाठीचा सर्वात सुलभ मार्ग कोणता?
औरंगाबाद ते एलोरा हे अंतर पार करण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेता येईल किंवा राज्य परिवहन बसचा पर्याय उपलब्ध आहे. झटपट एलोरा गाठण्याकरिता जळगाव स्थानकातून ट्रेन घेता येईल.
अजिंठा आणि एलोरा लेण्या पाहण्यासाठी किती वेळ लागतो?
अजिंठा आणि एलोरा लेण्या एका दिवसात पाहून होतात. अजिंठा येथील ३० दगडी स्मारके आणि एलोराच्या ३४ लेण्या पाहायला बराच वेळ लागतो.
औरंगाबादला भेट देण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती?
ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वाधिक आल्हाददायी आणि हिरवागार असतो, त्यामुळे हा कालावधी सर्वात योग्य आहे.
औरंगाबादला जाऊन पाहता येतील अशी काही सर्वोत्तम ठिकाणे कोणती आहेत?
औरंगाबादमध्ये काही सर्वोत्तम पर्यटन स्थळे आहेत, ज्यामध्ये अजिंठा आणि एलोरा लेण्या, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर देवालय आणि पितळखोरा लेण्या तसेच सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालयाचा समावेश करता येईल.
मी औरंगाबादमध्ये वेळ कसा काढू?
इथल्या वास्तू पहा, खाद्यपदार्थांची चव घ्या, किल्ल्यांचे सौंदर्य टिपा आणि प्रदेशाच्या इतिहासात हरवून जा.