म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात – गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे
मुंबई, दि. २८ ऑगस्ट, २०२४ : म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी ३७० सदनिकांच्या विक्री किंमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे यांनी आज दिली. आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ व पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या ‘श्री आणि श्रीमती निवासी’ या शुभंकर चिन्हाचे (Mascot) अनावरण गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे … READ FULL STORY










