संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना बायोमेट्रिक सर्वेक्षणाकरिता शेवटची संधी

संक्रमण शिबिरांतील रहिवाशांसाठी अंतिम इशारा — बायोमेट्रिक सर्वेक्षण न केल्यास घुसखोर घोषित होण्याची शक्यता, म्हाडाची शेवटची संधी
मुंबई, २० जून २०२५: मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत, मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व संक्रमण शिबिरांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरू / रहिवाश्यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की या उर्वरित भाडेकरू / रहिवाश्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेऊन मंडळातर्फे सुरू असलेल्या मोहिमेत सहकारी करावे.
मंडळाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरू / रहिवाश्यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू करण्यात आले आहे. संक्रमण शिबिरांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरू / रहिवाश्यांचा अधिकृत नोंदीसाठी मंडळातर्फे राबविण्यात येत असलेले बायोमेट्रिक सर्वेक्षण आवश्यक असून, प्रत्येक भाडेकरू / रहिवाश्यांनी यामध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे.
 मंडळाच्या असे निदर्शनास आले आहे की संक्रमण शिबिरांतील काही भाडेकरू/रहिवाशी बोयोमेट्रिक सर्वेक्षणास प्रतिसाद दिलेला नाही, करिता मंडळामार्फत संबंधितांना शेवटची संधी देण्यात येत आहे. तसेच जे भाडेकरू / रहिवासी या आवाहनानंतरही बायोमेट्रिक सर्वेक्षणास प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नाही, किंवा संक्रमण शिबिरात वास्तव्यास असण्यास त्यांना स्वारस्य नाही, असे गृहीत धरले जाईल. अशा रहिवाश्यांना अधिकृत घुसखोर असे घोषित करण्यात येईल व त्यांच्यावर म्हाडा अधिनियम, १९७६ च्या कलम ९५ (अ) (३) नुसार तात्काळ निष्कासनाची प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे सर्व रहिवाश्यांनी याची गंभीर नोंद घ्यावी व तातडीने बायोमेट्रिक सर्वे करून घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा.
Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • वास्तुनुसार बेडची दिशा: बेडरूम डिझाइनसाठी टिप्सवास्तुनुसार बेडची दिशा: बेडरूम डिझाइनसाठी टिप्स
  • गृहकर्जावर GST किती आहे?गृहकर्जावर GST किती आहे?
  • ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल सर्व काहीठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल सर्व काही
  • अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?
  • महाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केलामहाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केला
  • मुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडियामुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडिया