बेडरूम साठी वास्तुशास्त्रातील टिप्स


कधीकधी अगदी लहानशा गोष्टी आपले नशीबच पालटतात बेडरूम च्या रचना आणि सजावटीत छोटे छोटे बदल करून होकारार्थी ऊर्जा कशी मिळवता येते आणि पतीपत्नी एकमेकांच्या आणखी जवळ कसे येतात याचे वर्णन वास्तुशास्त्रात आहे

सुनयना मेहता,  मुंबईतल्या एक गृहिणी, त्यांची त्यांच्या पतीशी अनेकदा भांडणे होत असत. अशा भांडणांची कारणे खरे तर अगदी क्षुल्लक असत, परंतु कधीकधी त्यातून मोठे वाद होत असत. सुनीता यांनी यावर एक अजब उपाय काढला. त्यांनी घरातली बेडरूम ची रचना बदलली. बेड च्या स्टोरेज बॉक्स मध्ये पडलेला एक जुना डीव्हीडी प्लेअर आणि चिरा पडलेल्या, मोडक्या सीडींचा एक गट्ठा फेकून दिला. त्यांनतर लवकरच त्यांच्या घरात पुन्हा संसारसुख कसे नांदू लागले, हे सौ. मेहताच सांगतात.  सुनयना यांनी केलेली घराची साफसफाई ही काही निरुद्देश केलेली गोष्ट नव्हती. त्यांनी बेडरूमची नव्याने रचना करताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले होते. “भिंतीवर एक अश्रू ढाळणा-या स्त्रीचे चित्र होते ते तर मी फेकूनच दिले,” त्या सांगतात.

“वास्तुशास्त्र हे भारतीय परंपरेतील वैश्विक वास्तुरचना शास्त्र आहे. या शास्त्राचा आपल्या आयुष्यात संपत्ती, समाधान आणि सुसंगती येण्यासाठी फार मोठा उपयोग आहे. हे शास्त्र म्हणजे आयुष्य अधिक चांगले होण्यासाठी आवश्यक असलेला समतोल कसा साधायचा याचे मार्गदर्शन आहे,” असे मुंबई येथील वास्तू सल्लागार आणि वास्तुशास्त्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक डॉ. नितीन परमार सांगतात.  

आपल्या घरातील बेडरूम हे एक विश्रांती, आराम आणि नवा उत्साह मिळवण्याचे स्थान व्हावे यासाठी वास्तुशास्त्रात सांगितलेले मार्ग असे आहेत :

 

बेडरूम ची दिशा  कोणती असावी ?

“घराच्या नैऋत्येला असलेली बेडरूम मालकाला उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य मिळून त्याला दीर्घायुष्य लाभण्याच्या दृष्टीने आदर्श असते. बेडरूम ईशान्य किंवा आग्नेय दिशेला नसावी.  बेडरूम जर आग्नेय दिशेला असेल तर पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. ईशान्य दिशेला बेडरूम असेल तर ती वापरणा-यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच लहान मुलांची बेडरूम पूर्व दिशेला किंवा वायव्य दिशेला असणे सर्वात चांगले,” असेही डॉ. परमार म्हणतात.

 

पलंगाची जागा

वास्तुशास्त्रानुसार, तुमचा पलंग डोके पूर्वेला किंवा दक्षिणेला होईल असा ठेवला पाहिजे. पाहुण्यांच्या खोलीतील पलंग डोके पश्चिमेला होईल असा ठेवला तरी चालतो. पलंग हा लाकडी असावा हे सर्वात चांगले. लोखंडी किंवा इतर धातूचा पलंग असल्यास नकारात्मक तरंग निर्माण होतात.  पतिपत्नींमध्ये जवळीक निर्माण व्हावी यासाठी त्यांनी एकाच गादीवर झोपावे. दोन गाद्या जोडून त्यांवर झोपू नये.

आरशाचे स्थान

ड्रेसिंग टेबल ला जर आरसा जोडलेला असेल तर ते ठेवण्याची जागा ठरवताना काळजी घ्या  

झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसेल अशा रीतीने आरसा पलंगाच्या समोर ठेवणे नेहमी टाळावे  

 

उपकरणांना मज्जाव करा

बेडरूम मधील शांतता भांग पावेल अशा कोणत्याही वस्तूला या रूम  मध्ये थारा देऊ नये. त्यामुळे अर्थातच बेडरूम मध्ये टेलिव्हिजन नको हे ओघानेच आले. अगदी ठेवायचाच असेल तर तो पलंगापासून योग्य त्या अंतरावर ठेवावा .  त्याने पलंगासमोर ठेवलेल्या आरशाचे काम करता कामा नये.

“बेडरूम मध्ये कॉम्प्युटर ठेवणे टाळा. जर आवश्यक असेलच तर तो काही अंतरावर आणि मध्ये आडोसा करून ठेवा.  कॉम्प्युटर आणि मोबाइल फोन यांचा इलेक्ट्रॉनिक दाब बराच जास्त असतो आणि कॉम्प्युटर, टेलिव्हिजन आणि मोबाइल फोन  यांच्यातून प्रसारित होणा-या लहरी घातक तरंगांचे उत्सर्जन करतात,” अशी धोक्याची सूचना डॉ. परमार यांनी दिली आहे.

 

बेडरूम ला रंग कोणता द्याल?

रंगांनी आपल्या जीवनाला झळाळी येते आणि रंग आपला मूड , आपले आरोग्य आणि आपला आनंद यांवरही प्रभाव टाकतात . ऑफ व्हाइट , बेबी पिंक किंवा क्रीम या रंगछटा बेडरूम साठी आदर्श असतात. बेडरूम मध्ये भडक रंगांचा वापर करू नये. बेड रम व्यवस्थित लावलेली असावी आणि तिथे  पसारा आणि अडगळ नसावी, असे वस्तू आणि फेंग शुई तज्ञ् डॉ. स्नेहल देशपांडे सांगतात.  

 

बाहेर फेकून द्या

अनेक वर्षे वापरात नसलेल्या, जुन्या मोडक्यातोडक्या वस्तू – उदा. बंद पडलेले घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू , मोडक्यातोडक्या मूर्ती किंवा कलाकृती आपल्या बेडरूम मध्ये ठेवू नका. अशा वस्तूंच्या अडगळीमुळे ऊर्जेचा प्रवाह अडतो आणि विसंवाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते, असे त्या म्हणतात. “बेडरूम मध्ये कारंजे, मासे ठेवायची पेटी, युद्धाच्या प्रसंगांची किंवा  एकटी बाई दाखवणारी चित्रे लावू नयेत.”

 

सुगंधांचे उपचार

वास आणि सुगंध यांच्यात आपला मूड आणि उत्साह वाढवण्याची मोठी शक्ती असते. यासाठीच, तुमची खोली नेहमी ताज्या सुवासाने भरलेली असेल याची खबरदारी घ्या. यासाठी सुगंधी मेणबत्त्या, सुगंध पसरवणारे उपकरण किंवा विविध सुगंधी वनस्पती आपल्या बेडरूम मध्ये नेहमी ठेवा. ताज्या मोग-याचा किंवा लव्हेंडर चा सुगंध अवश्य वापर.  देशपांडे यांचा हा सल्ला जोडप्याना अमलात आणण्यासारखा वाटेल – बेडरूम च्या नैऋत्य कोप-यात दोन हृदयांचे गुलाबी क्वार्ट्झ ठेवा. ते तुमच्या जीवनाला समाधानाची ताकद देतील.

 

आणखी काही ‘टिप्स

 • गोल किंवा अंडाकृती बेड वर झोपणे टाळा  
 • बेड ला नेहमी डोके टेकण्याची सोय असावी. झोपले असताना डोक्यालगतची खिडकी कधीही उघडी ठेवू नका.  
 • बेड च्या वर छताचा आकार गोल नसावा  
 • तुळई च्या खाली कधीही झोपू नका
 • पुर्वजांचे फोटो बेडरूम मध्ये लावणे टाळा  
 • बेडरूम मध्ये देव्हारा कधीही ठेवू नका  
 • तुटलेले किंवा मोडतोड झालेल्या वस्तू काढून टाका  
 • तुम्ही जेव्हा झोपलेले असाल किंवा वापरत नसाल तेव्हा अटॅच्ड स्नानगृहाचे दार बंद ठेवा  
 • आठवड्यात एकदा तरी समुद्राचे मीठ घातलेल्या पाण्याने बेडरूम ची फारशी पुसा. यामुळे खोलीतील नकारात्मक ऊर्जा निघून जाते

 

Was this article useful?
 • 😃 (1)
 • 😐 (0)
 • 😔 (0)

Comments

comments