पीएफ शिल्लक तपासा: ईपीएफ शिल्लक तपासणीकरिता क्रमवार मार्गदर्शिका

तुमची पीएफ शिल्लक तपासण्यास मदत म्हणून ही मार्गदर्शिका तयार करण्यात आले आहे पीएफ शिल्लक तपासणी

ईपीएफओ ने पीएफ वर आर्थिक वर्ष २०२३ साठी ८.१५% व्याज निश्चित केले कर्मचाऱ्यांचे निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था पेन्शन फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) ने २८ मार्च २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०२२-२३ (एफवाय२३) साठी भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर ८.१५%. वार्षिक व्याजाची शिफारस केली दिल्लीत कामगार आणि रोजगार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३३ वी बैठक झाली.

तुमच्या वेतनातून ईपीएफ योगदान म्हणून वजा होत असणारी रक्कम कालांतराने एकरक्कमी जमा होते. पीएफ शिल्लक तपासणी (PF balance check)च्या मदतीने आपल्या ईपीएफ (Employees’ Provident Fund account – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते) खात्यात नेमकी किती रक्कम जमा झाली याची माहिती जाणून घेणे शक्य आहे. पीएफ शिल्लक तपासणी ऑनलाइन तसेच ऑफलाइन करता येते. ईपीएफ शिल्लक ऑफलाइन तपासण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ (EPFO) ला एसएमएस किंवा मिस्ड कॉल करता येईल. ईपीएफ शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी अधिकृत ईपीएफओ पोर्टलला भेट द्यावी किंवा स्वत:च्या मोबाईलवर उमंग अॅप डाऊनलोड करावे. त्याकरिता स्वत:चा युएएन क्रमांक (UAN number) ठाऊक आणि पीएफ सदस्य आयडी (PF member ID) ठाऊक असावा, जेणेकरून आपली पीएफ शिल्लक तपासता येते.

या मार्गदर्शिकेत ईपीएफ पासबुक विषयी सर्व काही जाणून घ्या.

 

ईपीएफओ साइटवर पीएफ शिल्लक तपासा

ईपीएफ वेबसाइटवर स्वत:चा पीएफ शिल्लक तपास करण्यासाठी तुमचा युएएन (UAN) क्रमांक सक्रिय असणे अनिवार्य आहे. (आपले  युएएन लॉगइन  कसे सक्रिय करावे हे जाणून घेण्यासाठी आमची मार्गदर्शिका वाचा) स्वत:चा युएएन ईपीएफओ वेबसाइटवर वापरून ईपीएफ शिल्लक तपासण्याची क्रमवार प्रक्रिया खाली सूचीबद्ध केली आहे.

क्रम 1: अधिकृत ईपीएफओ (EPFO) पोर्टलवर, ‘Our services’ (अव्हर सर्विसेस) टॅबवर जा. आता ड्रॉप-डाउन मेन्यूमधून ‘For employees’ (फॉर एम्प्लॉयीज) पर्याय निवडा.

 

PF balance check

 

क्रम 2: पुढील पानावर, ‘Member passbook’ (मेंबर पासबुक) पर्यायवर क्लिक करा.

 

EPF balance check

 

क्रम 3: नवीन पानावर, ‘Login’ (लॉगइन) करण्यापूर्वी तुमचा युएएन क्रमांक, तुमचा पासवर्ड आणि कॅप्चा प्रश्नाचे उत्तर भरावे लागेल.

 

PF balance check: A step-wise guide for EPF balance check

 

क्रम 4: एकदा तुम्ही लॉगइन केले ईपीएफ होम पेज (EPF Home page) तुमची ओळख  – नाव, युएएन क्रमांक आणि पॅन क्रमांक दाखवेल.

 

PF balance check: A step-wise guide for EPF balance check

 

क्रम 5: आता member ID (मेंबर आयडी) निवडा. तुमच्याकडे वेगवेगळ्या मालकांची पीएफ खाती असल्यास, अनेक मेंबर आयडी असू शकतात. ज्या खात्याकरिता पीएफ शिल्लक तपासायची आहे त्या मेंबर आयडीची निवड करा.

 

PF balance check: A step-wise guide for EPF balance check

 

क्रम 6: आता खालील पर्यायांसह पीएफ शिल्लक तपासता येईल: व्ह्यू पासबुक (नवीन: वार्षिक) किंवा व्ह्यू पासबुक (जुने: संपूर्ण). तुमच्यासाठी व्हयू क्लेम स्टेट्स पर्यायही असू शकतो. अपेक्षित पर्याय निवडा.

 

PF balance check: A step-wise guide for EPF balance check

 

क्रम 7: आता पीएफ शिल्लक पाहता येईल. ही फाईल पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करू शकता.

 

PF balance check: A step-wise guide for EPF balance check

 

हे देखील पहा: ईपीएफ पासबुक कसे डाऊनलोड करावे

 

मोबाईल क्रमांकावर ईपीएफ शिल्लक तपास

स्वत:चा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरुन दोन पद्धतीने पीएफ शिल्लक तपास करणे शक्य आहे:

 

एसएमएसमार्फत पीएफ शिल्लक तपास

एसएमएसवर पीएफ शिल्लक तपासण्यासाठी ७७३८२९९८९९ क्रमांकावर एसएमएस पाठवा. टेक्स्टमध्ये ‘EPFOHO UAN ENG‘ लिहा. शेवटची तीन अक्षरे ज्या भाषेत एसएमएस पाहिजे आहे, ती आपल्या पसंतीची भाषा दर्शवतात. तुम्हाला इंग्रजीशिवाय इतर भाषेची निवड करायची असल्यास, ज्या भाषेत एसएमएस पाहिजे, त्या भाषेच्या तीन इंग्रजी आद्याक्षरांची निवड करा.

संदर्भासाठी खाली भाषेचा तक्ता दिला आहे:

EPFO इंग्रजी शिल्लक तपासा EPFOHO UAN ENG
EPFO हिंदी शिल्लक तपासा EPFOHO UAN HIN
EPFO पंजाबी शिल्लक तपासा EPFOHO UAN PUN
EPFO मराठी शिल्लक तपासा EPFOHO UAN MAR
EPFO गुजराती शिल्लक तपासा EPFOHO UAN GUJ
EPFO कन्नड शिल्लक तपासा EPFOHO UAN KAN
EPFO तेलुगू शिल्लक तपासा EPFOHO UAN TEL
EPFO तमीळ शिल्लक तपासा EPFOHO UAN TAM
EPFO बंगाली शिल्लक तपासा EPFOHO UAN BEN
EPFO मल्याळम शिल्लक तपासा EPFOHO UAN MAL

 

टोलफ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन पीएफ शिल्लक तपास

तुम्ही 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊन पीएफ शिल्लक तपासू शकता. या पीएफ शिल्लक तपासणी क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा वापर करा.

हे देखील पहागृहखरेदीला अर्थसाह्य म्हणून भविष्य निर्वाह निधी (provident fund)चा वापर कसा करावा

 

अॅपच्या माध्यमातून पीएफ शिल्लक तपास

तुम्ही दोन मोबाईल अॅप्लिकेशनमार्फत पीएफ शिल्लक तपासणी करू शकता:

ईपीएफओचे एमसेवा अॅप

एकदा तुम्ही स्वत:च्या मोबाईलवर एम-सेवा अॅप इन्स्टॉल केले की ‘Member’ (मेंबर) वर जा आणि ईपीएफ शिल्लक तपासणीकरिता ‘Balance/Passbook’ (बॅलन्स/पासबुक) वर जा.

उमंग अॅप

एकदा का आपल्या मोबाईलवर उमंग अॅप इन्स्टॉल केले की ‘Employee Centric Services’ (एम्प्लॉयी सेंट्रीक सर्विसेस) अंतर्गत EPFO पर्यायावर जा. इथून तुम्हाला पीएफ शिल्लक तपासता येते.

 

पीएफ शिल्लक तपास वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

UAN (युएएन) म्हणजे काय?

तुमचे UAN किंवा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर हा अभिनव ओळख क्रमांक असतो. तुमचे युएएन म्हणजे १२ आकडी ओळख क्रमांक असून त्यावर भविष्य निर्वाह निधीविषयी चौकशी करू शकता.

पीएफ मेंबर आयडी म्हणजे काय?

तुम्ही संघटीत क्षेत्रात एखाद्या नवीन कंपनीत दाखल होता, त्यावेळी पीएफ खाते उघडले जाते आणि तुम्हाला मेंबर आयडी मिळते. याचा अर्थ तुम्ही जितक्या मालकांसमवेत काम केले तितके पीएफ मेंबर आयडी तुमच्याकडे असू शकतात. दुसरीकडे, तुमचा युएएन म्हणजे ओळख क्रमांकाचे कवच आहे, ज्याच्याशी तुमच्या सर्व पीएफ मेंबर आयडी जोडलेल्या असतात.

मला मिस्ड कॉल देऊन माझे ईपीएफ खाते तपासता येईल का?

होय, आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ वर मिस्ड कॉल देता येईल. पीएफ शिल्लक चौकशीसाठी तुमचा युएएन आणि पीएफ मेंबर आयडी सोबत ठेवा.

मी एसएमएसमार्फत ईपीएफ खाते शिल्लक तपासू शकेन का?

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने ७७३८२९९८९९ या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवून ईपीएफ खात्यातील शिल्लक एसएमएममार्फत जाणून घेता येईल. ही विनंती पाठवण्याआधी ईपीएफओ पोर्टलवर केव्हायसी पूर्ण केल्याची खातरजमा करावी.

 

Was this article useful?
  • ? (1)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • माझे घर, माझा अधिकार: महाराष्ट्राने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलेमाझे घर, माझा अधिकार: महाराष्ट्राने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले
  • कोकण मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सदनिका सोडत-२०२४कोकण मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सदनिका सोडत-२०२४
  • म्हाडातर्फे मुंबई शहर बेटावरील ९६ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीरम्हाडातर्फे मुंबई शहर बेटावरील ९६ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर
  • घरामध्ये ७ घोड्यांच्या पेंटिंगची दिशा आणि त्याच्या स्थानासाठी वास्तुशास्त्र टिपाघरामध्ये ७ घोड्यांच्या पेंटिंगची दिशा आणि त्याच्या स्थानासाठी वास्तुशास्त्र टिपा
  • २०२५ मध्ये महाराष्ट्रात सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नियम२०२५ मध्ये महाराष्ट्रात सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नियम
  • भारतातील मालमत्ता हक्क आणि वारसा कायदेभारतातील मालमत्ता हक्क आणि वारसा कायदे