आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला PM नरेंद्र मोदी 29 मे रोजी दाखवणार हिरवा झेंडा

आसाममधील गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील नवीन जलपाईगुडी हे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस साडेपाच तासात कापणार, सध्याची सर्वात जलद रेल्वेगाडी याच प्रवासासाठी घेते साडेसहा तास

May 29, 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला 29 मे रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

अद्ययावत आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या या गाडीमुळे या भागातील लोकांना वेगवान  आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. ही रेल्वे गाडी गुवाहाटीला पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी स्थानकाला जोडणार असून त्यामुळे सध्या या दोन स्थानकांमध्ये धावणाऱ्या सगळ्यात वेगवान गाडीच्या तुलनेत या गाडीने प्रवास करताना एक तास वाचणार आहे. वंदे भारत हे अंतर साडेपाच तासात कापणार असून आत्ताच्या वेगवान  गाडीला तेच अंतर पार करायला साडेसहा तास लागतात.

नव्याने विद्युतीकरण झालेल्या 182 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त परिवहनाला मदत होणार असून गाड्या अधिक वेगाने धावतील आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. या मार्गामुळे मेघालयात प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावणाऱ्या गाड्या सुरू करता येणार आहेत.

आसाममध्ये लंबडिंग येथे नव्याने बांधलेल्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट डेमू- मेनलाईन इलेक्ट्रिक युनिट मेमू- शेडचेही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. ही नवीन सुविधा या प्रदेशात डीईएमयू डब्यांसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे अधिक सुकरपणे काम होईल.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • म्हाडा कोकण लॉटरी 2025: नोंदणी, अर्ज, कागदपत्रेम्हाडा कोकण लॉटरी 2025: नोंदणी, अर्ज, कागदपत्रे
  • म्हाडा कोकण मंडळातर्फे ५ हजार २८५ सदनिका व ७७ भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीरम्हाडा कोकण मंडळातर्फे ५ हजार २८५ सदनिका व ७७ भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर
  • शत्रू मालमत्ता म्हणजे काय?शत्रू मालमत्ता म्हणजे काय?
  • आर्थिक वर्ष 25-26 मध्ये महाराष्ट्रात वीज शुल्क किती असेल?आर्थिक वर्ष 25-26 मध्ये महाराष्ट्रात वीज शुल्क किती असेल?
  • शक्तीपीठ एक्सप्रेसवे: नागपूर-गोवा एक्सप्रेसवे बद्दल सर्व काहीशक्तीपीठ एक्सप्रेसवे: नागपूर-गोवा एक्सप्रेसवे बद्दल सर्व काही
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: उद्घाटन तारीख, स्थिती, खर्चनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: उद्घाटन तारीख, स्थिती, खर्च