बांधकाम क्षेत्र स्टार्ट अप परिसंस्थेला मोठी दालने खुली करेल: पीयूष गोयल

भारतीय बांधकाम क्षेत्र भारताच्या विकासगाथेचे एक महत्त्वाचे इंजिन राहिले असून, ते मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करत आहे आणि गेल्या काही वर्षात या क्षेत्राने सरकारच्या सक्रिय पाठबळाच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर लवचिकतेचे दर्शन घडवले आहे, असे केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. ते आज भारतीय बांधकाम क्षेत्र विकासक संस्थांच्या महासंघाच्या राष्ट्रीय अलंकरण सोहळ्यामध्ये बोलत होते. बांधकाम क्षेत्र हे एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र असून लोकांना उत्तम जीवनमान सुनिश्चित करण्याचे ते काम करेल, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले. पुढील दोन तीन वर्षात भारत बांधकाम क्षेत्रातील तिसरी मोठी बाजारपेठ बनण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी निर्माण झालेल्या प्रचंड मागणीचा विचार करता या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे आणि हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल आणि स्टार्ट अप परिसंस्थेसाठी नवी दालने खुली करेल, असे त्यांनी सांगितले. 2023 च्या अर्थसंकल्पातही केंद्र सरकारने 10 लाख कोटी रुपयांच्या थेट गुंतवणुकीसह पायाभूत सुविधा क्षेत्रावर विशेषत्वाने भर दिला आहे, याकडे त्यांनी निर्देश केला. यामुळे एक प्रमुख जागतिक महासत्ता बनण्यासाठी भारताचा उदय होत आहे … READ FULL STORY