अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत आतापर्यंत 5. 20 कोटी लोकांनी केली नोंदणी

2022-23 या चालू आर्थिक वर्षातच या योजनेअंतर्गत 1.19 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे.

केंद्र सरकारच्या अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत (APY) 31 मार्च 2023 पर्यंत, 5.20 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षातच या योजनेअंतर्गत 1.19 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात, 99 लाख लोकांनी ही नोंदणी केली होती, त्या तुलनेत यंदा त्यात 20 टक्क्यांची वाढ दिसते आहे. आतापर्यंत, अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत, लोकांनी 27,200 कोटी रुपये जमा केले आहेत आणि योजनेच्या सुरुवातीपासून त्यातून, 8.69%  गुंतवणूक परतावा मिळाला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार करता, नऊ बँकांनी, या योजनेचे निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. तर बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक यांच्या प्रत्येक शाखेत, 100 पेक्षा अधिक एपीवाय खाती उघडण्यात आली आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या श्रेणीत, 32 बँकांनी नियोजित लक्ष्य पूर्ण केले आहे, तर झारखंड राज्य  ग्रामीण भाग, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, त्रिपुरा ग्रामीण बँक आणि बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक, या बँकांच्या प्रत्येक शाखेत प्रत्येकी 160 पेक्षा अधिक एपीवाय खाती उघडण्यात आली आहेत.  तसेच, तामिळनाड मर्केंटाइल बँक, धनलक्ष्मी बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक यांनी वित्त मंत्रालयाने दिलेले वार्षिक लक्ष्य साध्य केले आहे.

भविष्य निर्वाह निधी नियामक आणि विकास प्राधिकरण – पीएफआरडीए ने एसएलबीसी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांशी समन्वय साधत संपूर्ण भारतभर 47 अटल पेन्शन योजना जनसंपर्क कार्यक्रम आणि बैठका आयोजित केल्या होत्या. आधार कार्ड चा  वापर करुन डिजिटल ऑनबोर्डिंग सुविधेचा शुभारंभ, सुधारित एपीआय अॅपची सुरुवात, एपीवाय  च्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 17 पॉडकास्ट, एपीवाय विषयी मूलभूत माहिती मिळवण्यासाठी चॅटबॉट सुविधेचा शुभारंभ इत्यादीसारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • वास्तुनुसार बेडची दिशा: बेडरूम डिझाइनसाठी टिप्सवास्तुनुसार बेडची दिशा: बेडरूम डिझाइनसाठी टिप्स
  • गृहकर्जावर GST किती आहे?गृहकर्जावर GST किती आहे?
  • ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल सर्व काहीठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल सर्व काही
  • अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?
  • महाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केलामहाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केला
  • मुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडियामुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडिया