गुढीपाडवा का साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व

गुढीचा अर्थ आहे विजयाची पताका.

चैत्रमासच्या शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणतात. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. यावर्षी २२ मार्च  २०२३   या दिवशी हिंदू नवीन वर्ष सुरू होत आहे. गुढीचा अर्थ आहे विजयाची पताका.  असं म्हटलं जातं या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. या दिवसापासून नवीन संवत्सर सुरू होतो आणि म्हणूनच या तिथीला नवसंवत्सर म्हणतात. या दिवसापासून चैत्र नवरात्रीचा आरंभ होत असतो.

चैत्र असा महिना आहे ज्यावेळेस झाडे वेली हे बहरतात, शुक्ल प्रतिपदा या दिवशी चंद्राची प्रथम कला दिसत असते आणि वनस्पतीच्या आयुष्यातला जो मुख्य आधार असतो, सोमरस, हा चंद्रामुळेच मिळत असतो आणि म्हणूनच याला झाडे फुले वेलींचा तसेच औषधांचा राजाही म्हटले गेले आहे आणि या दिवशी नवीन वर्षाचा आरंभ सुरू होतो. तसेच या दिवसाला वर्षारंभ मानला जातो. बऱ्याच लोकांची मान्यता आहे की या दिवशी भगवान श्रीरामाने बालीला मारून त्याच्या अत्याचारी शासनापासून दक्षिणेतल्या प्रजेला मुक्ती दिली. बालीच्या त्रासापासून मुक्त झालेल्या प्रजेने मग घरोघरी हा उत्सव साजरा करण्यासाठी ध्वज म्हणजेच गुढी उभारली. आजही घराच्या अंगणामध्ये गुढी उभारून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे आणि म्हणूनच या दिवसाला गुढीपाडवा असं नाव दिले गेले आहे.

महाराष्ट्रामध्ये या दिवशी पुरणपोळी किंवा गोड पोळी बनवली जाते आणि ही पोळी बनवताना गोड, मीठ त्यानंतर कडुलिंबाची पान, चिंच किंवा कैरी हे एकत्र केले जाते. गूळ गोडपणासाठी, त्यानंतर कडुलिंबाची पान हे कडूपणा नष्ट करण्यासाठी तसेच चिंच किंवा कैरी हे आयुष्यामध्ये जे काही आंबट असे जे काही क्षण-प्रसंग आहेत त्याचे प्रतीक समजले जाते.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • आपले घर कसे बेबी प्रूफ करावे?
  • लेन्सकार्टचे पीयूष बन्सल, धानुका कुटुंबातील सदस्य गुडगावमध्ये फ्लॅट खरेदी करतात
  • मुंबईत मे 2024 मध्ये 11,800 मालमत्तांची नोंद: अहवाल
  • सनटेक रियल्टीचा महसूल FY24 मध्ये 56% वाढून रु. 565 कोटी झाला
  • नोएडा मेट्रोला एक्वा लाइन विस्तारासाठी मंजुरी मिळाली
  • विकसकांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करण्यासाठी WiredScore भारतात लाँच केले आहे