म्हाडा कोकण मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११७ भूखंड विक्रीसाठी ०५ फेब्रुवारीला संगणकीय सोडत

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली निघणार सोडत

मुंबई, दि. ०४ फेब्रुवारी, २०२५ :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११७  भूखंड विक्रीकरिता ०५ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली आहे.

 

कोकण मंडळाच्या २१४७  सदनिका व ११७ भूखंड विक्रीकरिता सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला.

 

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live) बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. तसेच वेबकास्टिंगद्वा  https://youtube.com/live/GyDu-FXxuHw?feature=share या लिंकवरूनही सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना ईमेल व एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.


मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन अशा IHLMS . या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी सुलभ ठरल्यामुळे नागरिकांचा सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

हमारे लेख से संबंधित कोई सवाल या प्रतिक्रिया है? हम आपकी बात सुनना चाहेंगे। हमारे प्रधान संपादक झूमर घोष को jhumur.ghosh1@housing.com पर लिखें

Was this article useful?
  • ? (1)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • गौतम अदानीच्या घराबद्दल सर्व काहीगौतम अदानीच्या घराबद्दल सर्व काही
  • मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबद्दल तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहेमुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबद्दल तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे
  • महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26: प्रमुख तथ्येमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26: प्रमुख तथ्ये
  • मुंबई मेट्रो लाईन ३ चा नकाशा, अ‍ॅक्वा लाईन मार्ग, स्थानकेमुंबई मेट्रो लाईन ३ चा नकाशा, अ‍ॅक्वा लाईन मार्ग, स्थानके
  • वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशावास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशा
  • पुणे २०२५ च्या मालमत्ता करावर ४०% सूट कशी मिळवायची?पुणे २०२५ च्या मालमत्ता करावर ४०% सूट कशी मिळवायची?