गृह खरेदीदार किंवा भाडेकरू यांना घर विकत घेताना अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. नवीन शहरात बस्तान हलवत असाल किंवा राहत्या शहरात पत्ता बदलायचा असल्यास, नवीन गॅस जोडणी (new gas connection) किंवा चालू कनेक्शन एका गॅस एजन्सी (gas agency)कडून अन्य एजन्सीकडे हस्तांतरीत करायचे झाल्यास प्रक्रिया समजून घेणे आवश्यक ठरते. अशास्थितीत इंडेन गॅस नवीन जोडणी (Indane gas new connection)चा पर्याय तुमच्याकरिता खुला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून इंडेनचे कामकाज चालत असून ही जगातील सर्वात मोठ्या एलपीजी गॅस कंपन्यांपैकी एक मानली जाते. एक ग्राहक म्हणून तुम्हाला नवीन गॅस जोडणी किंमत (new gas connection price) आणि नोंदणी प्रक्रिया (booking procedure) विषयक माहिती असली पाहिजे.
एलपीजी संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन नवीन गॅस कनेक्शन (new gas connection) घेण्याची सोय भारत सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता, किंमत आणि जवळपासचा गॅस वितरक शोधण्याचीही सोय ऑनलाईन उपलब्ध आहे.
हे एक सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे.
इंडेन गॅस नवीन कनेक्शन किंमत (Indane gas new connection price)
शहर | किंमत रुपयांमध्ये प्रती 14.2 किग्रॅ. सिलेंडर |
दिल्ली | 834.50 |
मुंबई | 834.50 |
कोलकाता | 861 |
चेन्नई | 850.50 |
एलपीजी सिलिंडरच्या विना-अनुदानित किमती
शहर | प्रति 14.2 किलो सिलेंडरची किंमत (रुपये मध्ये) |
दिल्ली | Rs 903 |
मुंबई | Rs 903 |
कोलकाता | Rs 929 |
चेन्नई | Rs 918 |
30 ऑगस्ट 2023 पासून लागू
शहर | प्रति 19.2 किलो सिलेंडरची किंमत (रुपये मध्ये) |
दिल्ली | Rs 1731 |
मुंबई | Rs 1839.5 |
कोलकाता | Rs 1684 |
चेन्नई | Rs 1898 |
*संबंधित राज्य/जिल्हा प्राधिकरणांनी जारी केलेल्या अधिसूचनांनुसार किंमती; 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू
नवीन एलपीजी सिलेंडर (new LPG cylinder) बुक करण्याची किंमत ही स्थानानुसार बदलेल. महानगरांमधील विना-अनुदानित इंडेन गॅसच्या किंमती वर देण्यात आल्या आहेत.
जर तुम्हाला इंडेन गॅसचे नवीन कनेक्शन (Indane gas new connection) घ्यायचे असेल तर 14.2 किग्रॅ. एलपीजी सिलेंडरची किंमत ही रु.1,450 इतकी आहे. ही परत करण्यायोग्य रक्कम असून ती ईशान्येकडील राज्ये वगळता इतर सर्व राज्यांमध्ये लागू आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये ही किंमत रु. 1,150 आहे. नवीन गॅस कनेक्शन (new gas connection) अनामत रक्कम ही 5 किग्रॅ. सिलेंडरसाठी रु. 800 आणि 19 किग्रॅ. सिलेंडरसाठी रु. 1,700 आहे. तुम्हाला गॅस स्टोव्ह देखील पाहिजे असल्यास इंडेन गॅस नवीन कनेक्शनसाठी ऑनलाईन (indane gas new connection online) पैसे भरू शकता.
इंडेन गॅस कनेक्शनच्या रेग्युलेटरची किंमत रु. 150 आहे. ही परत करण्यायोग्य रक्कम आहे आणि पासबुकची किंमत रु. 25 आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे कागदपत्रांचे शुल्क निरनिराळे असते.
भारत सरकार घरगुती एलपीजी सिलेंडर्सवर अनुदान देऊ करते आणि या किंमती बदलत असतात.
ऑटो एलपीजीसाठी इंडेन गॅसची किंमत
शहर | ऑटो गॅस किंमत |
दिल्ली | Rs 57.64 |
कोलकाता | Rs 53.31 |
मुंबई | Rs 57.84 |
चेन्नई | Rs 57.38 |
*1 जून 2023 पासून लागू. सर्व शुल्क जीएसटीसह आहेत
इंडेन गॅस नवीन कनेक्शन: ऑनलाईन नवीन कनेक्शन कसे घ्यावे?
सर्वात आधी, एलपीजी सिलेंडर्सचा पुरवठा करणारी सर्वात जवळील गॅस एजन्सी ऑनलाईन शोधावी. वितरकाच्या कार्यालयाच्या ठिकाणाची चौकशी करण्यासाठी आपण एजन्सीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकता.
ऑनलाईन इंडेन गॅस कनेक्शनसाठी (indane gas new connection online) अर्ज करण्याकरीता, ग्राहकाने एलपीजी पुरवठादारांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि नवीन कनेक्शनच्या नोंदणीसाठी असलेली प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनी नोंदणी करणे, ऑनलाईन केवायसी अर्ज आणि संबंधित तपशील भरून सुरुवातीची रक्कम भरणे गरजेचे आहे. नोंदणी झाल्यावर, गॅस एजन्सी एक पावती जारी करेल. या पावतीवर नोंदणीकरणाची तारीख आणि नोंदणी क्रमांक नमूद असेल. बुकिंग क्रमांक प्राप्त झाला की, ग्राहकाने ही पावती दाखवून रेग्युलेटर किंवा सिलेंडरसाठी अनामत रक्कम भरावी.
मे 1, 2015 रोजी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने डिजिटल इंडिया पुढाकाराअंतर्गत, ऑनलाईन पैसे भरून एलपीजी कनेक्शन देण्याची आणि सहज (एसएएचएजे- ई- एसव्ही) जारी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सहज हे ई-सदस्यता व्हाऊचर असून त्यात ग्राहकांच्या ताब्यात असलेल्या प्रेशर रेग्युलेटर्स आणि सिलेंडर्सचे तपशील असतात.
तामिळनाडूमधील नवीन वीज कनेक्शनसाठी TNEB online application वाचा.
भारतातील स्वयंपाकाच्या गॅसचे प्रकार
घरगुती पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) कनेक्शन
घरगुती पीएनजी कनेक्शनमध्ये, पाईपलाईन नेटवर्कच्या माध्यमातून स्रोतापासून घरापर्यंत नैसर्गिक गॅसचा पुरवठा केला जातो. हा नैसर्गिक गॅस मुख्यत्वे करून मिथेन असतो आणि त्यात काही टक्के इतर उच्च हायड्रोकार्बन्स असतात. हा सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असल्याचे मानले जाते. तसेच, त्याची साठवणूक करण्यातही ग्राहकाला कोणतीही अडचण येत नाही.
एलपीजी (लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस) कनेक्शन (LPG Connection)
लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) म्हणजे प्रोपेन आणि बुटेन हे दोन द्रव स्वरूपातील नैसर्गिक वायू किंवा या दोन्हीचे मिश्रण. भारतातील घरगुती इंधनासाठी सामान्यपणे यांचा वापर केला जातो आणि सिलेंडरच्या माध्यमातून घरापर्यंत या द्रव स्वरूपातील वायूचा पुरवठा केला जातो. भारतात, सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील पुरवठादारांकडून एलपीजी कनेक्शन्स खरेदी केले जातात.
सार्वजनिक क्षेत्रातील पुरवठादारांकडून तुम्हाला ठराविक सिलेंडर्स अनुदानित किंमतीवर देण्यात येतात. हे पुरवठादार आहेत-
- इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे इंडेन गॅस (Indane gas)
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे एचपी गॅस (HP gas)
- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे भारत गॅस (Bharat gas)
खासगी क्षेत्रातील प्रसिद्ध एलपीजी पुरवठादार:
- सुपर गॅस
- ईस्ट गॅस
- ज्योती गॅस
- टोटलगॅझ
बहुतांश खासगी किंवा सार्वजनिक गॅस एजन्सीज या 14.2 किग्रॅ. आणि 5 किग्रॅ. क्षमतेच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा करतात. तरीही, गॅस कनेक्शन्सच्या आकारात वेगवेगळ्या ऑपरेटरनुसार फरक पडू शकतो.
इंडेन नवीन गॅस कनेक्शन (New Indane gas connection): जवळपासचा इंडेन गॅस वितरक कसा शोधावा?
ग्राहक इंडेन गॅस ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधून जवळपासच्या गॅस वितरकाचे तपशील घेऊ शकतात.
त्यांना online portal of Indane वर जाऊन पुढील टप्प्यांनुसारही माहिती मिळू शकते.
टप्पा 1: इंडेनच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन होमपेजवरील ‘Locate us’ (लोकेट अस) वर क्लिक करा.
टप्पा 2: दुसरे पान उघडेल. ‘our network’ (अवर नेटवर्क) खाली असलेला ‘इंडेन वितरक’ (Indane distributor) हा पर्याय निवडा. ठिकाण/पिन कोड/स्थान इ. माहिती भरा. (Show) ‘शो’ वर क्लिक करा.
स्क्रीनवर जवळपासच्या वितरकाचा पत्ता आणि संपर्क तपशील दिसतील.
इंडेन गॅस नवीन कनेक्शन: ऑनलाईन नोंदणीसाठीचे टप्पे
टप्पा 1: अधिकृत LPG website ला भेट द्या.
टप्पा 2: तुमची एलपीजी आयडी जाणून घेण्यासाठी दिलेल्या पर्यायावर क्लिक करा. कंपनीचे नाव निवडा. https://cx.indianoil.in/webcenter/portal/LPG/pages_findyourlpgid हे पान उघडेल.
टप्पा 3: नवीन कनेक्शन नोंदणीसाठी ‘Register for New Connection’ (रजिस्टर फॉर न्यू कनेक्शन) वर क्लिक करा. सहज (एसएएचएजे) ऑनलाईन नवीन कनेक्शन https://cx.indianoil.in/webcenter/portal/LPG/pages_lpgservicenewconnection हे पान उघडेल. ‘Register for a online New Connection’वर क्लिक करा.
टप्पा 4: ‘Register Now’ वर क्लिक करून नोंदणी करा.
टप्पा 5: नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी इ. तपशील भरा. ‘Proceed’ वर क्लिक करून पुढे जा.
टप्पा 6: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा. ‘Verify’’ वर क्लिक करून पडताळणी करा. नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायला सांगितले जाईल.
टप्पा 7: यानंतर तुमचे युजरनाव आणि पासवर्ड भरून तुम्ही लॉग इन करू शकता.
टप्पा 8: मुख्य पानावर, इंडेन गॅस नवीन कनेक्शनसाठी ‘Submit KYC’ वर क्लिक करा. नाव, लिंग, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व, संबंधित तपशील, पत्ता आणि संपर्क तपशील इ. वैयक्तिक माहिती भरून अर्ज पूर्ण करा. दिलेल्या यादीतून वितरक निवडा.
‘Select the products’मधून सामान्य किंवा विना-अनुदानित योजना आणि सिलेंडर क्षमता इ. योजना तपशील निवडा. ‘Submit’वर क्लिक करा. नंतर, अर्जाच्या पानावरील ‘Save and Continue’ वर क्लिक करा.
टप्पा 9: ओळखपत्राचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा इ. आवश्यक कागदपत्रे सादर करा. मागण्यात आलेले इतर संबंधित तपशील भरून अर्ज पूर्ण करा. डिक्लरेशन (घोषणा) मान्य करून अर्ज सबमिट करा.
हा अर्ज वितरकाकडे पाठवण्यात येईल. तुम्ही लॉग इन करून इंडेन गॅस नवीन कनेक्शन अर्ज स्थिती तपासून बघू शकता. अर्ज मंजूर झाला की, ओळखपत्र पुरावा आणि फोटो इ. संबंधित कागदपत्रे घेऊन वितरकाकडे जाऊन नमूद करण्यात आलेली रक्कम भरा. सर्वात नवीन इंडेन गॅस नवीन कनेक्शनची किंमत (New Indane gas connection price) माहिती असणे गरजेचे आहे.
ऑफलाईन नवीन गॅस कनेक्शन (new offline gas connection) कसे घ्यावे?
- इंडेन गॅस नवीन कनेक्शनकरीता अर्ज करण्यासाठी, तुमच्या घराजवळील इंडेन गॅस एजन्सीच्या कार्यालयाला भेट द्या.
- नवीन ग्राहक म्हणून स्वत:ची नोंदणी करण्यासाठी अर्ज घेऊन तो पूर्ण भरा.
- तुमच्या ओळखपत्राच्या पुराव्याच्या, पत्त्याच्या पुरावाच्या प्रती आणि फोटोग्राफ्स इ. संबंधित कागदपत्रे सादर करा.
- नोंदणी झाल्यावर, एजन्सीकडून तुम्हाला नोंदणीची तारीख आणि नोंदणी क्रमांक नमूद केलेली पावती देण्यात येईल.
- बुकिंग क्रमांक प्राप्त झाला की, पावती दाखवून लागू असणारी इंडेन गॅस नवीन कनेक्शन रक्कम भरा.
गॅस स्टोव्हची तपासणी करण्यासाठी वितरक तुमच्या घरी भेट देऊ शकतात. पुष्टी झाली की, गॅस कनेक्शन जारी करण्यात येईल.
नवीन इंडेन गॅस कनेक्शन: कागदपत्रे
गॅस कनेक्शनसाठी अर्ज करताना पुढील कागदपत्रांची गरज भासते:
ओळखपत्र पुरावा (खालीलपैकी कोणताही):
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- मतदार ओळखपत्र
- वाहन चालविण्याचा परवाना
- केंद्रीय किंवा राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेले ओळखपत्र
- फोटो असलेले बँक पासबुक
पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक):
- आधार कार्ड
- भाडेपट्टी करार
- मतदार ओळखपत्र
- घर नोंदणी कागदपत्रे
- घर वाटप किंवा ताबा पत्र
- वाहन चालविण्याचा परवाना
- अलीकडील तीन महिन्याचे टेलिफोन, पाणी किंवा वीज देयक
- रेशनकार्ड
- पासपोर्ट
- राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकन केलेले स्व-घोषणापत्र
- बँक किंवा क्रेडिड कार्ड स्टेटमेन्ट
- एलआयसी विमा
केवायसी फॉर्म
घरामध्ये एलपीजी किंवा पीएनजी कनेक्शन नसल्याचे नमूद करणारे शपथ-पत्र (अॅफिडेव्हिट)
नवीन गॅस कनेक्शन घेतल्यावर मिळालेली कागदपत्रे
जर तुम्ही पहिल्यांदाच घरगुती इंडेन गॅस नवीन कनेक्शनसाठी अर्ज केला असेल तर, तुम्हाला जोडणीचा एक भाग म्हणून एक एलपीजी सिलेंडर आणि एक रेग्युलेटर तसेच रबर ट्यूब मिळेल.
अनामत रक्कम भरल्यावर, ग्राहकाला एक पासबुक (याला घरगुती ग्राहक गॅस कार्ड किंवा ब्लू बुक असेही म्हणतात) मिळेल. कनेक्शन आणि तर सेवांसंबंधीची माहिती वितरकाच्या कर्मचाऱ्यांमार्फत यात भरली जाईल. सदस्यत्व वाउचर (एसव्ही) किंवा कनेक्शन प्रमाणपत्रदेखील जारी करण्यात येईल. ग्राहकांनी ही कागदपत्रे सांभाळून ठेवली पाहिजेत.
नवीन गॅस कनेक्शनसाठी कोण अर्ज करू शकते?
- 18 वर्षांवरील व्यक्ती आवश्यक कागदपत्रे सादर करून गॅस कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात.
- नवीन कनेक्शनसाठी अर्ज करण्याच्या वेळी अर्जदाराकडे एलपीजी कनेक्शन असता कामा नये.
गॅस कनेक्शन इंडेन रिफील बुकिंग प्रक्रिया
नवीन एलपीजी सिलेंडर वापरानुसार काही आठवडे किंवा एक महिना चालतो. ग्राहक कॉम्प्युटर्स, मोबाईल अॅप्लिकेशन किंवा एसएमएस, व्हॉट्सअॅप सुविधेचा उपयोग करून किंवा फोन करूनही नवीन एलपीजी सिलेंडर्स आणि रिफिल्स बुक करू शकतात.
व्हॉट्सअॅप: एलपीजी रिफिल्स बुक करण्यासाठी ग्राहक व्हॉट्सअॅपवर ‘आरईएफआयएलएल’ (रिफील- REFILL) टाईप करून 7588888824 वर पाठवू शकतात. ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरूनच हा मेसेज पाठवणे गरजेचे आहे. बुकिंग स्थिती जाणून घेण्यासाठी एसटीएटीयुएस# (स्टेटस- STATUS#) आणि ऑर्डर क्रमांक याच क्रमांकावर पाठवावा.
फोन: इंडियन ऑईल गॅस बुकिंग क्रमांकावर फोन करता येतो. 7718955555 या इंडेन गॅस बुकिंग क्रमांकावर फोन करून एसटीडी कोडसह इंडेन वितरकाचा फोन क्रमांक आणि ग्राहक क्रमांकाची माहिती द्या. एलपीजी गॅस सिलेंडर रिफीलची पुष्टी झाल्यावर, ग्राहकाला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एलपीजी सिलेंडर बुकिंग कन्फर्मेशनचा एसएमएस प्राप्त होईल.
एसएमएस: एसएमएस सुविधेमार्फत रिफीलसाठी, 7588888824 या क्रमांकावर ‘आरईएफआयएलएल’ (REFILL –रिफील) एसएमएस पाठवा.
मोबाईल अॅप:
- तुमच्या स्मार्टफोन मधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन इंडियनऑईल वन अॅप शोधा.
- अप्लिकेशनवरील ‘इन्स्टॉल’ बटणावर क्लिक करा. तुम्ही इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही अॅप डाउनलोड करू शकता. होमपेजवरील फ्री मोबाईल अॅप लिंकवर क्लिक करा.
- पुढील पानवरील ‘इन्स्टॉल’ पर्यायावर क्लिक करा. इन्स्टॉलेशन झाल्यावर, वापरकर्ते त्यांच्या युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करू शकतात.
तुमची नवीन अकाउंटसाठी नोंदणी करू शकता आणि तुमची माहिती भरून लॉग इन करू शकता. होमपेजवरील ‘ऑर्डर सिलेंडर’ वर क्लिक करून तपशिलाची पुष्टी करा. नंतर, ‘ऑर्डर नाऊ’ वर क्लिक करा. तुम्हाला बुकिंग रेफरन्स क्रमांक मिळेल आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला कन्फर्मेशनचा एसएमएस येईल.
इंडेन गॅस नवीन कनेक्शन कसे हस्तांतरित करावे?
इंडेन गॅस नवीन कनेक्शनची हस्तांतरण प्रक्रिया ही तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातील एलपीजी पुरवठादारांसाठी समान आहे.
शहरातल्या शहरात कनेक्शन हस्तांतरित करण्याचे टप्पे
- वर्तमानातील वितरकाकडून जारी करण्यात आलेला सदस्यता वाउचर (एसव्ही) सादर केल्यावर मिळणारा अधिकृत कोड म्हणजेच ई-कस्टमर ट्रान्स्फर अॅडव्हाईस (ई-सीटीए) मिळवा. हा कोड जारी केल्याच्या तारखेपासून तीन महिने वैध असतो.
- याच गॅस एजन्सीच्या नव्या वितरकाला हे वाउचर दिल्यावर तो ग्राहकाला सभासद करून घेईल.
वेगळ्या शहरात कनेक्शन हस्तांतरित करण्याचे टप्पे
- सध्याच्या शहरातील वितरक टर्मिनेशन वाउचर (टीव्ही) जारी करेल आणि सदस्यता वाउचर (एसव्ही) मध्ये नमूद करण्यात आलेली अनामत रक्कम परत करेल. जारी करण्यात आलेल्या तारखेपासून टीव्ही एक वर्षापर्यंत वैध असेल.
- सध्याची उपकरणे आणि सिलेंडर तसेच रेग्युलेटरही परत करा.
- नव्या वितरकाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही तुमचे चालू घरगुती गॅस ग्राहक कार्ड नव्या शहरातही वापरू शकता.
- पुन्हा जोडणीसाठी, टीव्हीमध्ये नमूद करण्यात आलेली अनामत रक्कम भरा आणि नवीन सदस्यता वाउचर (एसव्ही) घ्या.
- नोंदणी झाल्यावर आणि अनामत रक्कम भरल्यावर वितरकाकडून तुम्हाला एक नवीन एलपीजी सिलेंडर आणि प्रेशर रेग्युलेटर देण्यात येईल.
एका एजन्सीकडून दुसऱ्या एजन्सीकडे गॅस हस्तांतरित करणे
- गॅस कंपनीच्या संकेतस्थळावरून वितरकाची विस्तृत माहिती बघा आणि नव्या ठिकाणी असलेल्या गॅस एजन्सीचे तपशील शोधा.
- सध्याच्या गॅस वितरकाला हस्तांतरणाची विनंती करणारे पत्र लिहा. गॅस रेग्युलेटर आणि गॅस कनेक्शन वाउचर तसेच हस्तांतरण पत्र सादर करा. जर तुम्ही दुसऱ्या शहरात जाणार असलात तर तुमचा सध्याचा गॅस सिलेंडर आणि सुरक्षा रेग्युलेटर परत करा.
- सदस्यता वाउचर (एसव्ही) मध्ये नमूद केल्यानुसार तुम्हाला अनामत रक्कम परत करण्यात येईल.
- सध्याच्या गॅस वितरकाकडून गॅस हस्तांतरण वाउचर देण्यात येईल.
- इंडेन गॅस नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी नव्या गॅस एजन्सीकडे वैध पत्ता आणि ओळखपत्र पुरावा सादर करा.
- आवश्यक हस्तांतरण शुल्क भरा. वेगवेगळ्या एजन्सीचे शुल्क वेगवेगळे असू शकते.
- कागदपत्रे सादर केल्यावर, नवीन गॅस एजन्सी हस्तांतरणाची पुष्टी करेल. ती सध्याचा पत्ता असणारे नवीन गॅस कनेक्शन वाउचर जारी करेल.
- तुमची सिलेंडर बुक करू शकता आणि काही दिवसातच तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल.
एलपीजी अनुदान स्थिती कशी तपासून बघावी?
भारत सरकारतर्फे एलपीजी सिलेंडरवर अनुदान देण्यात येते. यामुळे नागरिकांना कमी किमतीत इंडेन गॅस कनेक्शन मिळते. खाली दिलेल्या प्रक्रीयेचा अवलंब करून अधिकृत एलपीजी संकेतस्थळावरून नागरिक ऑनलाईन सुविधेचा वापर करून एलपीजी अनुदान स्थिती तपासू शकतात.
- official LPG website या संकेतस्थळाला भेट द्या.
- गिव्ह अप एलपीजी सब्सिडी ऑनलाईन ही लिंक निवडा.
- एलपीजी कंपनीचे नाव निवडा.
- एक नवे पान उघडेल. या ठिकाणी, एलपीजी आयडी, बँक तपशील आणि आयएफएससी कोड इ. संबंधित माहिती भरा. कॅप्चा कोड भरा. नंतर, ‘कंटिन्यू’ वर क्लिक करा.
- तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड घालून साईन इन करा.
- व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला एलपीजी देयकांचा संपूर्ण तपशील दिसेल. एलपीजी अनुदान स्थिती तपासा.
सामान्य इंडेन गॅस बुकिंग क्रमांक काय आहे?
भारतातील इंडेन एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठीचा सामान्य इंडेन गॅस बुकिंग क्रमांक आहे 7718955555. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून बुकिंग करणे गरजेचे आहे.
इंडियन ऑईल गॅस बुकिंग क्रमांक हा देशभरात 24 x 7 उपलब्ध आहे. जर ग्राहकाचा क्रमांक आधीपासूनच इंडेन गॅस रेकॉर्डमध्ये नमूद असेल तर आयव्हीआरएस 16 अंकी ग्राहक आयडी ओळखेल आणि ग्राहकाकडून पुष्टी झाल्यावर रिफील बुकिंग मान्य करण्यात येईल. जर, ऑनलाईन गॅस बुकिंग क्रमांक नोंदणीकृत नसल्यास, एलपीजी बुकिंग मंजूर करून घेण्यासाठी आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी ग्राहकाला 16 अंकी ग्राहक आयडी प्रविष्ट करावा लागेल.
इंडेन एलपीजे चलान/कॅश मेमो/ सदस्यता वाउचर (एसव्ही) वर ग्राहकाला 16 अंकी ग्राहक आयडी मिळू शकेल.
इंडेन गॅस बुकिंग क्रमांक हा राज्यात सर्वत्र उपलब्ध आहे. यात बिहार, गुजरात, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.
इंडेन गॅस एलपीजी सिलेंडरसाठी सुरक्षा टिपा
अधिकृत डीलर्सकडे उपलब्ध असलेल्या LPG रेग्युलेटर आणि सुरक्षा रबर ट्यूब्ससह BIS प्रमाणित उपकरणे खरेदी केल्याची खात्री करा. सिलिंडरवर इंडेन गॅस कंपनीचा शिक्का आहे का ते तपासा. सुरक्षा टोपी तुटू नये. एलपीजी गॅस सिलिंडर वापराच्या प्रात्यक्षिकासाठी प्रथमच वापरकर्त्यांनी व्यावसायिक मदत घेणे आवश्यक आहे. सिलेंडर वापरात नसताना, रेग्युलेटर नॉब बंद करा. यानंतर, स्टोव्ह नॉब बंद करा. रिकामे सिलिंडर हवेशीर ठिकाणी साठवले पाहिजेत आणि सेफ्टी कॅप नेहमी चालू असणे आवश्यक आहे.
इंडेन गॅस नवीन कनेक्शन: ताज्या बातम्या
देशातील एलपीजी वापर वाढावा यासाठी, आधार कार्ड किंवा पत्याचा पुरावा सादर न करता देखील कोणीही एलपीजी सिलेंडर खरेदी करू शकतो असे, आयओसीएलने नुकतेच जाहीर केले. ग्राहकांना जवळच्या वितरकाकडे जाऊन 5 किग्रॅ. इंडेन गॅस सिलेंडर विकत घेता येईल.
कंपनीने एलपीजी सिलेंडर्सच्या नव्या ब्रँडचा ही शुभारंभ केला. हा स्मार्ट एलपीजी सिलेंडर ‘इंडेन कम्पोझीट सिलेंडर्स’ नावाने ओळखले जातात. ग्राहकांनी किती गॅस वापरला आहे आणि किती गॅस सिलेंडरमध्ये शिल्लक राहिला आहे, हे यातून कळून येणार आहे.
एलपीजी सिलेंडर्सच्या होम डिलिव्हरीसाठी नवीन ओटीपी प्रणाली लागू
नोव्हेंबर 1, 2020 पासून ग्राहकांना त्यांच्या एलपीजी सिलेंडर्सच्या होम डिलिव्हरीसाठी वन-टाईम पासवर्ड द्यावा लागणार आहे.
तेल कंपन्यांनी नवी डिलिव्हरी ऑथेन्टिकेशन कोड (डीएसी) प्रणाली लागू केली असून, एलपीजी सिलेंडर्सच्या ग्राहकांना गॅस सिलेंडर बुकिंगच्या वेळी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी प्राप्त होईल आणि डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला हा ओटीपी त्यांना सांगावा लागेल. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर्सच्या चोरीचे प्रमाण कमी करण्याचा या प्रणालीचा उद्देश आहे. मोबाईल क्रमांक अपडेट केला नसल्यास, सिलेंडर डिलिव्हरी करणारी व्यक्ती रिअल टाईम बेसिसवर तो अपडेट करू शकते.
या प्रणालीची सुरुवात 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. जयपूर, राजस्थान येथे या पायलट योजनेची सुरुवात करण्यात करण्यात आली आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
आपण दोन कनेक्शन्स घेऊ शकतो का?
एका कुटुंबाला केवळ एकच एलपीजी किंवा कनेक्शन वापरण्याचा अधिकार आहे. म्हणून, इंडेन गॅस नवीन कनेक्शनसाठी अर्ज करण्यापूर्वी सध्याचे कनेक्शन परत करणे महत्त्वाचे आहे.
इंडेन गॅस नवीन कनेक्शन मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
इंडेन गॅस नवीन कनेक्शनसाठी अर्ज करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक आठवडा लागतो. नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज केल्यावर, एजन्सीकडून पुढील तीन ते चार दिवसांत सिलेंडर, रेग्युलेटर आणि रबर पाईपची डिलिव्हरी केली जाते.
मला महिन्याला 2 गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतात का?
हो, ग्राहक एका महिन्यात दोन लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलेंडर्स बुक करू शकतात.
एलपीजी अनुदान कोणाला मिळू शकते?
गरिबांना एलपीजी अनुदानित किमतीमध्ये मिळावा, यासाठी सरकारने उत्पन्नाची मर्यादा निश्चित केली आहे. सरकारच्या निर्देशानुसार, ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रु. 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा व्यक्ती एलपीजी अनुदानासाठी पात्र असणार नाहीत.
इंडेन गॅसची डिलिव्हरी मोफत आहे का?
प्रत्येक इंडेन गॅस डिलिव्हरीसाठी माफक शुल्क आकारण्यात येते. दिवस आणि वेळेनुसार हे शुल्क रु. 25 ते रु. 50 दरम्यान असते.
दुहेरी गॅस कनेक्शन म्हणजे काय?
इंडेनच्या कॉम्बो डबल बॉटल कनेक्शन अंतर्गत, ग्राहक १४.२ कि.ग्रॅ. इंडेन सिलेंडरसह इंडेन ५ कि.ग्रॅ. सिलेंडर घेऊ शकतात.
इंडेन गॅसमध्ये दुसऱ्या सिलिंडरसाठी अर्ज कसा करावा?
ग्राहक दुसऱ्या इंडेन गॅस सिलिंडरसाठी भाडे करार, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारख्या कागदपत्रांसह जवळच्या एलपीजी वितरकाकडे अर्ज सादर करून अर्ज करू शकतात. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहज पोर्टलला देखील भेट दिली जाऊ शकते.