म्हाडातर्फे बृहतसूचीवरील पात्र अर्जदारांकडून आकारण्यात येणारे ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क माफ- गृहनिर्माण मंत्री श्तुल सावे

म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील १५८ पात्र अर्जदारांना देकारपत्र प्रदान

July 31, 2024 : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील संगणकीय सोडतीद्वारे गाळे वाटप झालेल्या  स्वीकृती कळविलेल्या १५८ पात्र अर्जदारांना आज राज्याचे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते देकारपत्र प्रदान करण्यात आले. दरम्यान, म्हाडातर्फे या पात्र विजेत्या अर्जदारांकडून प्रत्येकी आकारण्यात येणारे ७०५०० रुपये नाहरकत प्रमाणपत्र शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणाही श्री. सावे यांनी यावेळी केली.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी श्री. सावे म्हणाले की, बृहतसूचीवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील २६५ पात्र भाडेकरूरहिवाशी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी सदर प्रक्रिया अधिक पारदर्शक गतिमान करण्यासाठी मंडळातर्फे पहिल्यांदा २८ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी ४४४ सदनिका उपलब्ध होत्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या सकारात्मकतेमुळे हा ऐतिहासिक धाडसी निर्णय आम्हाला घेता आला. या निर्णयामुळे बृहतसूचीवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू/रहिवाशी यांना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी सदनिकांचे वितरण संगणकीय सोडतीद्वारे करण्यात आले. मात्र, या सोडतीतील विजेत्या अर्जदारांच्या कागदपत्रांची फेरपडताळणीची मागणी करण्यात आली. या मागणीनुसार म्हाडातर्फे फेरपडताळणी करण्यात येऊन २६५ पैकी २१२ अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यापैकी स्वीकृती कळविलेल्या १५८ पात्र अर्जदारांना आज देकारपत्र देण्यात आले. उर्वरित ५३ अर्जदारांची पडताळणी सुरू आहे. उर्वरित ५४ अर्जदारांनी स्वीकृती पत्र देण्याचे आवाहनही श्री. सावे यांनी अर्जदारांना केले. श्री. सावे म्हणाले की, या ऐतिहासिक फेरबदलामुळे बृहतसूचीवरील सदनिका वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान झाली असून सदनिका वितरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता आली आहे. तसेच भाडेकरू/रहिवासी यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. वर्षानुवर्षे संक्रमण गाळ्यात राहणार्या भाडेकरू/रहिवासी यांना मुंबईच्या हृदयस्थानी आपले हक्काचे घर मिळाले असून यात समाधान असल्याचे श्री. सावे म्हणाले. ‘म्हाडाने गेल्या वर्षभरात पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोंकण मंडळातर्फे संगणकीय सोडती काढून सुमारे वीस हजार सदनिका सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई मंडळाची २००० सदनिकांची संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येईल, असेही श्री. सावे यांनी सांगितलेप्रत्येकाला घर मिळावे हा शासनाचा हेतु आहे. त्यादृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), धनगर घरकुल योजना याद्वारे शासन घरे उपलब्ध करून देत आहे, असे श्री. सावे यांनी सांगितले.           

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल म्हणाले की, गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांच्या निर्देशानुसार, मार्गदर्शनाखाली जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू / रहिवाशी यांना बृहतसूचीवरून सदनिका वितरण करण्यासाठीची नियमावली निश्चित करण्यात आली. त्यासंदर्भातील परिपत्रक दि. २२ डिसेंबर, २०२३ रोजी जारी करण्यात आले. बृहतसूचीवरून भाडेकरू / रहिवाशी यांना सदनिका वितरणाच्या धोरणाचा भाग म्हणून यापूर्वीचे प्राधिकरणाचे ठराव, परिपत्रके, आदेश रद्द, अधिक्रमित, सुधारित करून त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नियमावलीनुसार निवासी गाळा वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून निवासी गाळ्यांचे वितरण संगणकीय प्रणालीने करण्याचा निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जात असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.

अर्जदाराने देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत देकारपत्रातील नमूद अटी शर्तींची पूर्तता करून ताबा घेणे बंधनकारक असून तसे केल्यास कोणतीही पूर्वसूचना देता सदनिकेचे वितरण रद्द होणार असून बृहतसूचीवरील हक्क संपुष्टात येणार आहे.    

यावेळी मुंबई इमारत दुरूस्ती पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर, उपमुख्य अधिकारी श्री. अनिल वानखडे, मुंबई इमारत दुरूस्ती पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. उमेश वाघ, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी श्रीमती वंदना सूर्यवंशी, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव श्री. अजित कवडे, उपमुख्य अधिकारी श्री. लक्ष्मण मुंडे आदी उपस्थित होते.              

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • बेकायदेशीर नूतनीकरणापासून सावध रहा; घर दुरुस्तीसाठी बीएमसी मार्गदर्शक तत्त्वेबेकायदेशीर नूतनीकरणापासून सावध रहा; घर दुरुस्तीसाठी बीएमसी मार्गदर्शक तत्त्वे
  • दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्धदक्षिण मुंबईतील कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध
  • म्हाडाच्या पुनर्विकसित इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्तीसाठी विशेष अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढम्हाडाच्या पुनर्विकसित इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्तीसाठी विशेष अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ
  • म्हाडाचा १२ वा लोकशाही दिन ९ जून रोजीम्हाडाचा १२ वा लोकशाही दिन ९ जून रोजी
  • म्हाडा लॉटरी २०२५: नोंदणी, अर्ज, लॉटरीच्या तारखाम्हाडा लॉटरी २०२५: नोंदणी, अर्ज, लॉटरीच्या तारखा
  • समृद्धी महामार्ग: मार्ग नकाशा, टोल, खर्च आणि स्थितीसमृद्धी महामार्ग: मार्ग नकाशा, टोल, खर्च आणि स्थिती