म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या ११३३ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी १६ जुलै रोजी संगणकीय सोडत

गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.    

मुंबई, दि. १५ जुलै, २०२४ : म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या १,१३३  सदनिका उपलब्ध ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता १६ जुलै, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.    

छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी ११३३ सदनिका ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीसाठी एकूण ४७५४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह ३९८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४२५ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजना २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ७०८ सदनिका तसेच ३६१ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीतील सदनिका अत्यल्प, अल्प मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. तसेच भूखंड सर्व उत्पन्न गटातील अर्जदारांकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मंदार वैद्य यांनी दिली. सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System)द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे.  

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा याकरिता सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. https://www.vccme.in/chattrapati-sambhaji-nagar/  या लिंकवर अर्जदारांना वेबकास्टिंगच्या माध्यमातून म्हाडाचे https://www.facebook.com/mhadaofficial या अधिकृत फेसबूक पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.           

सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in  या वेबसाईटवर सोडतीच्या दिवशी सायंकाळी .०० वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच  विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणार्या् अर्जदारांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आलेल्या अडचणीमुळे मंडळाने अर्जदारांच्या आग्रहास्तव अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीस २६ मे, २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. सोडतीसाठी नोंदणीकृत अर्जदारांसाठी अर्ज दाखल करण्याकरिता, अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन पेमेंटद्वारे करण्याकरिता २६ मे, २०२४ रात्री ११.५९ पर्यंत मुदत देण्यात आली होती. बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा २७ मे , २०२४ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये करण्याची मुदत होती, अशी माहिती श्री. वैद्य यांनी दिली

Was this article useful?
  • ? (1)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • महाभूलेखावर महाराष्ट्र 8A उतारा कसा तपासायचा?महाभूलेखावर महाराष्ट्र 8A उतारा कसा तपासायचा?
  • 2025 मध्ये मेट्रो शहरे आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये एचआरए गणना2025 मध्ये मेट्रो शहरे आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये एचआरए गणना
  • म्हाडा नाशिक बोर्ड लॉटरी 2025 बद्दल सर्व काहीम्हाडा नाशिक बोर्ड लॉटरी 2025 बद्दल सर्व काही
  • परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी जीएसटी सुधारणा; नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागूपरवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी जीएसटी सुधारणा; नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू
  • महाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथेमहाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथे
  • महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणनामहाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणना