कोकण मंडळाच्या शिरढोण, खोणी येथील गृहप्रकल्पातील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात

म्हाडा कोकण मंडळाची मोठी सवलत — शिरढोण व खोणी येथील ६,२४८ घरांच्या किमती लाखभर रुपयांनी घटवून विक्रीसाठी उपलब्ध
मुंबई, दि. २० जून, २०२५ :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीस उपलब्ध असलेल्या मौजे शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) व मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील ०६ हजार २४८ सदनिकांची विक्री किंमत कमी करण्यात आली असल्याने हक्काचे घर घेऊ इच्छिणार्याव नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी केले आहे .
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांनी मौजे शिरढोण येथील सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली असून सदर मान्यतेनुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातील मौजे शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ५२३६ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये आकरण्यात येणार आहे, असे श्रीमती गायकर यांनी सांगितले.
तसेच मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील अत्यल्प उत्पन्न गटातील १०१२ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ०१ हजार ८०० रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख ११ हजार ७०० रुपये असणार आहे.
कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) मार्फत इच्छुक व पात्र अर्जदारांना या कमी झालेल्या दरांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा.
Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • आर्थिक वर्ष 25-26 मध्ये महाराष्ट्रात वीज शुल्क किती असेल?आर्थिक वर्ष 25-26 मध्ये महाराष्ट्रात वीज शुल्क किती असेल?
  • शक्तीपीठ एक्सप्रेसवे: नागपूर-गोवा एक्सप्रेसवे बद्दल सर्व काहीशक्तीपीठ एक्सप्रेसवे: नागपूर-गोवा एक्सप्रेसवे बद्दल सर्व काही
  • एनएमएमसी (NMMC) मालमत्ता कर भरणा: नवी मुंबई मालमत्ता कर बद्दल सर्व काहीएनएमएमसी (NMMC) मालमत्ता कर भरणा: नवी मुंबई मालमत्ता कर बद्दल सर्व काही
  • आर्थिक वर्ष 2025-26 साठी सुधारित महाराष्ट्र रेडी रेकनर दर काय आहेत?आर्थिक वर्ष 2025-26 साठी सुधारित महाराष्ट्र रेडी रेकनर दर काय आहेत?
  • 2025 मध्ये दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांचे मालमत्ता हक्क2025 मध्ये दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांचे मालमत्ता हक्क
  • सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील बिगर भोगवटा शुल्क बद्दलसहकारी गृहनिर्माण संस्थांमधील बिगर भोगवटा शुल्क बद्दल