अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध

निविदा वेळापत्रकानुसार तांत्रिक बोली निविदा २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजता उघडण्यात येणार आहे.

दि. ०९ ऑक्टोबर, २०२४:- अभ्युदय नगर (काळाचौकी) म्हाडा वसाहतीच्या समहू पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास (Construction & Development) या तत्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. अभ्युदय नगर, काळाचौकी वसाहतीत १,३३,५९३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर सद्यस्थितीत ४८ इमारती असून   २०८ चौरस फूट आकारमानाच्या ३४१० सदनिका आहेत. सुमारे १५ हजार रहिवाशांना या पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या इमारतींच्या विकासाची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपविण्यात आली आहे. त्यानंतर मंडळातर्फे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास प्रक्रिया सी अँड डी प्रारूपानुसार  करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पाचा तिढा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सुटला.

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढतांना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार या पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ किमान ६३५ चौरस फूट असावे, भविष्याच्या दृष्टीने प्रत्येक सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावी, अशा अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सदनिकाधारकाला पाच लाख रुपये कोर्पस फंड एकदाच देण्याची अट निविदेत आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रति सदनिकाधारक वीस हजार रुपये प्रति माह भाडे विकासकाने देण्याचीही अट देखील या निविदेत टाकण्यात आली आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांनी गेल्याच महिन्यात अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण येथील रहिवाशांसमोर करुन प्रकल्पाविषयी माहिती दिली होती.

निविदा वेळापत्रकानुसार तांत्रिक बोली निविदा २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजता उघडण्यात येणार आहे.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?
  • महाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केलामहाराष्ट्राने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम प्रस्तावित केले; अभिप्रायासाठी मसुदा सामायिक केला
  • मुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडियामुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडिया
  • नवी मुंबईतील टॉप 16 निवासी क्षेत्रेनवी मुंबईतील टॉप 16 निवासी क्षेत्रे
  • बीएमसीने पहिली घरांची लॉटरी जाहीर केली; ईडब्ल्यूएस, एलआयजी श्रेणीतील 426 मुंबईतील फ्लॅट्स देणारबीएमसीने पहिली घरांची लॉटरी जाहीर केली; ईडब्ल्यूएस, एलआयजी श्रेणीतील 426 मुंबईतील फ्लॅट्स देणार
  • म्हाडाची 20% समावेशक गृहनिर्माण योजना काय आहे?म्हाडाची 20% समावेशक गृहनिर्माण योजना काय आहे?