April मध्ये आधार प्रमाणीकरणाने गाठला 1.96 अब्ज व्यवहारांचा टप्पा

April 2023 मध्ये 250 दशलक्ष पेक्षा जास्त ई-केवायसी व्यवहारांची नोंद

May 23, 2023: आधार कार्ड धारकांनी एप्रिल 2023 मध्ये 1.96 अब्ज प्रमाणीकरण व्यवहार केले आहेत. एप्रिल 2022 च्या तुलनेत यामध्ये 19.3 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली असून, ती  डिजिटल अर्थव्यवस्थेची वाढ आणि भारतातील आधार कार्डचा वापर दर्शवते. यापैकी बहुतांश प्रमाणीकरण व्यवहार बोटांच्या ठशां द्वारे, तर त्या पाठोपाठ लोकसंख्या शास्त्र आणि ओटीपी वर आधारित होते. सुलभ सेवा वितरणासाठी फेस ऑथेंटिकेशनचा (चेहरा ओळख) देखील सर्व क्षेत्रांमध्ये चांगला वापर होत आहे.

आधार सक्षम पेमेंट प्रणाली (AePS), अल्प उत्पन्न गटांचा आर्थिक समावेश सुलभ करत आहे. एप्रिल 2023 मध्ये, AePS आणि मायक्रो ATM च्या नेटवर्कद्वारे, शेवटच्या टोकापर्यंत 200.6 दशलक्ष पेक्षा जास्त बँकिंग व्यवहार करता आले.

ग्राहकांना पारदर्शक आणि सुधारित अनुभव प्रदान करून आणि व्यवसाय सुलभतेला मदत करून, बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवा क्षेत्रात आधार ई-केवायसी सेवा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.  केवळ एप्रिल महिन्यात 250.5 दशलक्ष पेक्षा जास्त ई-केवायसी  व्यवहार करण्यात आले.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणनामहाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणना
  • क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलकक्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलक
  • KDMC मालमत्ता कर: कसे भरायचे आणि इतर KDMC सेवा जाणून घ्याKDMC मालमत्ता कर: कसे भरायचे आणि इतर KDMC सेवा जाणून घ्या
  • सिडकोने भाडेपट्ट्यावरील भूखंडांचे फ्रीहोल्ड भूखंडांमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केलीसिडकोने भाडेपट्ट्यावरील भूखंडांचे फ्रीहोल्ड भूखंडांमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली
  • म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर १५ कोटी अधिकृत दस्तऐवज नागरिकांसाठी उपलब्धम्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर १५ कोटी अधिकृत दस्तऐवज नागरिकांसाठी उपलब्ध
  • म्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलावासाठी नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मुदतवाढम्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलावासाठी नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ