सीबीडीटीने 2023-24 मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म केले अधिसूचित

हे फॉर्म 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील आणि पुढील मूल्यांकन वर्षाच्या सुरुवातीलाच विवरणपत्र भरता यावे यासाठी आधीच अधिसूचित केले आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी)  मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी 10.02.2023 आणि 14.02.2023 च्या अधिसूचना क्रमांक 4 आणि 5 द्वारे प्राप्तिकर  विवरणपत्र फॉर्म (ITR फॉर्म) अधिसूचित केले आहेत. हे फॉर्म 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील आणि पुढील  मूल्यांकन वर्षाच्या सुरुवातीलाच विवरणपत्र भरता यावे यासाठी आधीच अधिसूचित केले आहेत.

करदात्यांच्या सुविधेसाठी आणि अर्ज  दाखल करणे सुलभ व्हावे यासाठी गेल्या वर्षीच्या आयटीआर फॉर्मच्या तुलनेत यंदाच्या आयटीआर फॉर्ममध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत. प्राप्तिकर कायदा, 1961 मधील  सुधारणांमुळे आवश्यक असलेले किरकोळ  बदल केले  आहेत.

आयटीआर फॉर्म 1 (सहज) आणि आयटीआर  फॉर्म 4 (सुगम) हे अतिशय सोपे फॉर्म आहेत जे बहुतांश लहान आणि मध्यम करदात्यांना भारत येतील. सहज हा फॉर्म कुठल्याही निवासी व्यक्तीला भरता  येईल ज्याचे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत  आणि ज्याला वेतन, मालकीचे घर, इतर स्रोत (व्याज इ.) आणि 5 हजार रुपयांपर्यंत शेती उत्पन्न आहे.  सुगम हा फॉर्म व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे  आणि फर्म (मर्यादित दायित्व भागीदारी  व्यतिरिक्त) रहिवासी म्हणून दाखल करता येईल ज्यांचे एकूण उत्पन्न  50 लाख रुपयांपर्यंत आहे आणि व्यापार आणि व्यवसायांतून मिळणारे उत्पन्न  कलम 44AD, 44ADA किंवा 44AE अंतर्गत अनुमानित आधारावर गणले जाते.

व्यापार किंवा व्यवसायातून उत्पन्न नसलेल्या (आणि सहज दाखल करण्यास पात्र नाहीत) व्यक्ती आणि  हिंदू अविभक्त कुटुंबे  )आयटीआर  फॉर्म 2 भरू शकतात तर ज्यांचे व्यापार किंवा व्यवसायातून उत्पन्न आहे ते आयटीआर  फॉर्म 3 दाखल करू शकतात. व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे आणि कंपन्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती म्हणजे भागीदारी कंपनी , मर्यादित दायित्व भागीदारी  असलेली कंपनी इ. आयटीआर फॉर्म 5 दाखल करू शकतात. कलम 11 अंतर्गत सवलतीचा  दावा करणार्‍या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्या आयटीआर फॉर्म 6 दाखल करू शकतात. ट्रस्ट, राजकीय पक्ष, धर्मादाय संस्था इ. जे कायद्यांतर्गत सवलतीसाठी दावा करतात ते आयटीआर फॉर्म 7 दाखल करू शकतात.

आयटीआर  दाखल करण्याची  प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी, या वर्षी सर्व आयटीआर  फॉर्म वेळेआधीच अधिसूचित केले असून  गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटीआर  फॉर्म भरण्याच्या पद्धतीत कोणतेही बदल केले गेले नाहीत. अधिसूचित आयटीआर फॉर्म विभागाच्या  www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध असतील.

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • पीएम किसान लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे पहावे?पीएम किसान लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे पहावे?
  • लोणावळ्यात भेट देण्यासाठी 17 सर्वोत्तम पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या इतर गोष्टीलोणावळ्यात भेट देण्यासाठी 17 सर्वोत्तम पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या इतर गोष्टी
  • गावात रस्त्याच्या कडेला जमीन खरेदी करणे योग्य आहे का?
  • फरीदाबाद जेवार एक्सप्रेसवे प्रकल्प मार्ग आणि नवीनतम अद्यतने
  • तुमच्या भिंतींना आकारमान आणि पोत जोडण्यासाठी 5 टिपा
  • तुमच्या भावनिक आरोग्यावर घरातील वातावरणाचा प्रभाव