म्हाडा पुणे लॉटरी २०२१: ऑनलाइन अर्ज, नोंदणीची तारीख आणि बातम्या; ऑनलाइन नोंदणी १६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होईल


महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर येथे सुमारे ४,२२२ सदनिकांची लॉटरी जाहीर केली.

Table of Contents

म्हाडा पुणे लॉटरी २०२१

म्हाडा पुणे लॉटरी २०२१ ऑनलाइन अर्ज नोंदणीचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर २०२१ रोजी मंत्रालय, मुंबई येथे दुपारी २.४५ वाजता आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. ऑनलाइन म्हाडाची लॉटरी नोंदणी २९ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार होती, परंतु तांत्रिक बिघाडामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

म्हाडा लॉटरी पुणे २०२१ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर येथे ४,२२२ फ्लॅट्सचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, दिवाळीचा सणाच्या उत्सवाला पुढे नेत आहे.

यातील २,८२३ सदनिका म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेत समाविष्ट आहेत आणि १,३९९ सदनिका २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत असून पुण्यात ७१९ आणि पिंपरी-चिंचवडमधील ५८९ सदनिका आहेत. लकी ड्रॉ ४ जानेवारी २०२२ रोजी काढण्यात येईल.

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: नोव्हेंबर २०२१ मध्ये दोन योजना जाहीर

पुणे म्हाडा लॉटरी २०२१ ने दोन योजना जाहीर केल्या आहेत ज्यात एकूण ४,२२२ सदनिका लोकांना दिल्या जातील. त्या योजनांची नावे आहेत

 • पुणे बोर्ड लॉटरी नोव्हेंबर-२०२१
 • पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह लॉटरी नोव्हेंबर-२०२१

दोन्ही योजनांसाठी महत्त्वाच्या तारखा खाली नमूद केल्या आहेत.

 

पुणे बोर्ड लॉटरी नोव्हेंबर-२०२१

तारीख कार्यक्रम
१५ नोव्हेंबर २०२१म्हाडाची लॉटरी नोंदणी सुरू
१६ नोव्हेंबर २०२१म्हाडाच्या लॉटरीची नोंदणी समाप्त
१६ नोव्हेंबर २०२१ऑनलाइन अर्ज भरणे सुरू
१७ डिसेंबर २०२१ऑनलाइन अर्ज भरणे समाप्त
१६ नोव्हेंबर २०२१ऑनलाइन पेमेंट सुरू
१८ डिसेंबर २०२१ऑनलाइन पेमेंट भरणे समाप्त
१६ नोव्हेंबर २०२१आरटीजीएस/एनईएफटी (RTGS/NEFT) हस्तांतरणाद्वारे पेमेंट सुरू
२० डिसेंबर २०२१आरटीजीएस/एनईएफटी (RTGS/NEFT) हस्तांतरणाद्वारे पेमेंट समाप्त
२८ डिसेंबर २०२१स्वीकृत अर्जांची मसुदा यादी
४ जानेवारी २०२२स्वीकृत अर्जांची यादी
७ जानेवारी २०२२विजेत्यांची यादी
१४ जानेवारी २०२२परतावा

 

पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह लॉटरी नोव्हेंबर-२०२१

तारीख कार्यक्रम
१६ नोव्हेंबर २०२१म्हाडाच्या लॉटरीची नोंदणी सुरू
१६ डिसेंबर २०२१म्हाडाच्या लॉटरीची नोंदणी समाप्त
१६ नोव्हेंबर २०२१ऑनलाइन अर्ज भरणे सुरू
१७ डिसेंबर २०२१ऑनलाइन अर्ज भरणे समाप्त
१६ नोव्हेंबर २०२१ऑनलाइन पेमेंट सुरू
१८ डिसेंबर २०२१ऑनलाइन पेमेंट समाप्त
१६ नोव्हेंबर २०२१आरटीजीएस/एनईएफटी (RTGS/NEFT) हस्तांतरणाद्वारे पेमेंट सुरू
२० डिसेंबर २०२१आरटीजीएस/एनईएफटी (RTGS/NEFT) हस्तांतरणाद्वारे पेमेंट समाप्त
२८ डिसेंबर २०२१स्वीकृत अर्जांची मसुदा यादी
४ जानेवारी २०२२स्वीकृत अर्जांची यादी
७ जानेवारी २०२२विजेत्यांची यादी
१४ जानेवारी २०२२परतावा

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: लॉटरीची जाहिरात

म्हाडा पुणे लॉटरी 2021 जाहिरात बघण्यासाठी, म्हाडा पुणे लॉटरी पृष्ठ https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ येथे जा आणि लॉटरी माहिती टॅबच्या अगदी खाली असलेल्या पुणे लॉटरीची जाहिरातवर क्लिक करा.

 

MHADA Pune Lottery 2021_ Online application form, registration date news_Online registration starts November 16,2021

 

जाहिरात तुमच्या संगणकावर डाउनलोड होईल आणि खालील चित्रासारखी दिसेल.

 

MHADA Pune Lottery 2021_ Online application form, registration date news_Online registration starts November 16,2021

 

म्हाडाच्या पुणे लॉटरी २०२१ अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूरसह परिसरात घरांचे वाटप केले जाईल.

म्हाडा पुणे लॉटरी २०२१ योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट (LIG, MIG) घर खरेदीदारांसाठी असेल.

 

                                   म्हाडा लॉटरी नोंदणी शुल्क
श्रेणीनोंदणी शुल्क *
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) कौटुंबिक उत्पन्न < २५,००० प्रति महिनारु ५,०००  + रु ५९० (अर्ज फॉर्म फी + जीएसटी)
अल्प उत्पन्न गट (LIG)कौटुंबिक उत्पन्न २५००० ते ५०००० रुपये प्रति महिना रु  १०,००० + रु  ५९०
मध्यम उत्पन्न गट (MIG)कौटुंबिक उत्पन्न ५०,००० ते ७५,००० रुपये प्रति महिना रु  १५,००० + रु  ५९०
उच्च उत्पन्न गट (HIG)कौटुंबिक उत्पन्न ७५,००० रुपयांच्या वर रु  २०,००० + रु  ५९०

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१ योजनेचे तपशील

म्हाडा पुणे लॉटरी २०२१ च्या मुख्यपृष्ठाच्या खालील उजव्या बाजूला असलेल्या ‘सर्व योजना पहा’ वर क्लिक करून तुम्ही म्हाडा पुणे लॉटरी २०२१ योजनेचे तपशील तपासू शकता.

 

MHADA Pune Lottery 2021_ Online application form, registration date news_Online registration starts November 16,2021

 

तुम्ही https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/registrationView.do येथे पोहोचाल.

खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे, डाव्या बाजूला, ड्रॉप-डाउन बॉक्समधून, स्कीम क्रमांक निवडा आणि तुम्ही उजव्या बाजूला संबंधित तपशील पाहू शकता. योजनेचा कोड, योजनेचे नाव, योजनेचा पत्ता, उत्पन्न गट, परवानगी असलेल्या श्रेणी, एकूण सदनिका, बांधलेले क्षेत्र/प्लॉट क्षेत्र, चटई क्षेत्र, मूळ किंमत आणि रेरा (RERA) नोंदणी क्रमांक हे काही तपशील आहेत जे पृष्ठामध्ये समाविष्ट आहेत. तुम्ही मालमत्तेच्या प्रतिमा, फ्लोअर प्लॅन, ठिकाण, गुगल मॅप, सुविधा आणि प्रॉपर्टी रेकनर देखील पाहू शकता.

 

MHADA Pune Lottery 2021_ Online application form, registration date news_Online registration starts November 16,2021

 

योजना कोड ४७३ पासून सुरू होतो आणि ५३३ वर संपतो. काही योजनांचे तपशील खाली नमूद केले आहेत. म्हाडा पुणे लॉटरी २०२१ च्या इतर सर्व योजनांसाठी कृपया वर नमूद केलेली लिंक तपासा.

 

योजना कोडयोजनेचे नाव एकूण घरे उत्पन्न गट मूळ किमत
४७३स.-नं-१६४-१+२-सांगली-पीएमएवाय

(S-NO-164-1+2-SANGALI-PMAY)

१५ईडब्लूएस (EWS)रु ७,१५,०००
४७४स.-नं-१६४-१+२-सांगली-एलआयजी

(S-NO-164-1+2-SANGALI-LIG)

एलआयजी (LIG)रु १५,१५,०००
४७६सद्गुरू-रेसिडेन्सी-येवलेवाडी२४एलआयजी (LIG)रु १४,५०,३०० – २२,५०,२००
४७७गगन-ईएलए-मोहम्मदवाडी

(GAGAN-ELA-MOHAMMADWADI)

२४एलआयजी (LIG)रु १४,९०,००० – १८,९३,७००
४७८अरविंद-ईएलएएन_कोथरूड

(ARVIND-ELAN-KOTHARUD)

१२एलआयजी (LIG)रु २०,०९,००० – २०,१०,०००
४८१गुडविल-ब्रीझा-फेज १- धानोरी

(GOODWILL-BREEZA-PHASE-I-DHANORI)

३२एलआयजी (LIG)रु १९,६६,००० – २४,१२,१००
४८६ग्रीन-कंट्री-फुरसुंगी

(GREEN-COUNTY-FURSUNGI)

१६एलआयजी (LIG)रु १९,२८,८००-२०,९८,४०१
५००व्ही-जे-ग्रांड-सेन्ट्रल-वाकड
(V-J-GRAND-CENTRAL-WAKAD)
१२एलआयजी (LIG)रु १६,४२,६००
५१४स.-नं-२१५-३-सांगली-एमआयजी

(S-NO-215-3-SANGALI-MIG)

१२एमआयजी (MIG)रु २४,१०,०००
५१५चाकण-महाळुंगे-इंगळे-फेज १-ईडब्ल्यूएस

(CHAKAN-MAHALUNGE INGALE PHASE-I-EWS)

१०२ईडब्लूएस (EWS)रु १३,७७,२८०
५१८चाकण-महाळुंगे-इंगळे-फेज १-एमआयजी २

(CHAKAN-MAHALUNGE INGALE PHASE-I-MIG-II)

१३एमआयजी (MIG)रु ३९,२६,०००
५२२स.-नं-३०९-पार्ट-पिंपरी-वाघिरे-एमआयजी

(S-NO-309-PART-PIMPRI-WAGHIRE-MIG)

२८०एमआयजी (MIG)रु ५५,६२,५००
५२३स.-नं-३०९-पार्ट-पिंपरी-वाघिरे-एचआयजी

(S-NO-309-PART-PIMPRI-WAGHIRE-HIG)

१५८एचआयजी (HIG)रु ७४,६८,४०९
५२४स.-नं-१२-पार्ट-अॅट-तळेगाव-दाभाडे-पीएमएवाय

(S-NO-12-PART-AT-TALEGAON-DABHADE-PMAY)

२२५ईडब्लूएस (EWS)रु ११,४८,०००
५२८स.-नं-१४५८-शिवाजी-नगर-सातरस्ता-सोलापूर

(S-NO-1458-SHIVAJI-NAGAR-SATH RASTA-SOLAPUR)

१०एलआयजी (LIG)रु २१,९४,६२६- ३३,९२,५५९
५२९स.-नं-१२४-एसपीए-१-जुले_सोलापूर

(S-NO-124-SPA-1-JULE-SOLAPUR)

६१एमआयजी (MIG)रु ३४,२४,०००-४३,५३,०००
५३०स.-नं-१२४-एसपीए-१-जुले_सोलापूर

(S-NO-124-SPA-1-JULE-SOLAPUR)

एचआयजी (HIG)रु ४३,५३,००० – ४९,३२,०००
५३१गट नं.१०८८-बार्शी-गाडेगाव-बार्शी

(GAT NO.1088-BARSHI-GADEGAON-BARSHI)

११ईडब्लूएस (EWS)रु ९,२५,०००
५३२PARANJAPE-ABHIRUCHI-PARISAR-DHAYARI७५एलआयजी (LIG)रु १,१९,३०००
५३३PYRAMID-ALLEY-YEWALEWADI१६एलआयजी (LIG)रु १३,६९,३००-१७,९९,४००

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: पीएचएडीबी PHADB बद्दल

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ (PHADB), म्हाडाचे प्रादेशिक विभाग, म्हाडा कायदा १९७६ च्या कलम १८ मधील तरतुदीनुसार ५ डिसेंबर १९७७ रोजी स्थापन करण्यात आले. पुणे येथिल पीएचएडीबी मुख्यालय पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या पाच जिल्हा क्षेत्रांवर प्रादेशिक अधिकार राखून आहे. या जिल्ह्यांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड या महानगरपालिका आणि ए, बी आणि सी श्रेणी अंतर्गत ४१ नगरपरिषदा आहेत.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) अखेर २ जुलै रोजी पुणे गृहनिर्माण योजना २०२१ ची सोडत थांबवली. सोडत २९ जून, २०२१ रोजी होणार होती पण शेवटच्या क्षणी तिला लांबवण्यात आले. म्हाडा हाऊसिंग योजना २०२१ लॉटरी नोंदणी १४ जून २०२१ रोजी झाली. यापूर्वी कोविड-१९ च्या निर्बंधामुळे या योजनेला एक महिन्याने वाढ देण्यात आली होती. पुण्यातील अल्प व मध्यम उत्पन्न असणाऱ्या खरेदीदारांना परवडणारी व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाने १४ एप्रिल, २०२१ रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात नवीन सोडत योजना जाहीर केल्या. सुमारे ३,००० सदनिका विक्रीसाठी शहर आणि उपनगरी भागात उपलब्ध होत्या.

प्राधिकरण लॉटरी सिस्टमद्वारे पात्र अर्जदारांना घरे वाटप करते. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना घराच्या मूळ किंमतीच्या १०% टक्के रकमेसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते.

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: महत्त्वाच्या तारखा (एप्रिल)

तारीख कार्यक्रम
१३ एप्रिल २०२१नोंदणी सुरू होते
१३ जून २०२१नोंदणीची अंतिम तारीख
१४ जून २०२१ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख
१६ जून २०२१ऑनलाईन व आरटीजीएस / एनईएफटी पेमेंटची शेवटची तारीख
२६ जून २०२१स्वीकारलेल्या अर्जांची कच्ची यादी
२८ जून २०२१स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी
२ जुलै २०२१लॉटरी ड्रॉ

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: विजेत्यांची यादी कशी तपासावी

अर्जदार पूर्वीच्या विजेत्यांची यादी म्हाडा पोर्टलवर तपासू शकतात. जिथे त्यांना पृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेल्या पुणे बोर्ड लॉटरी २०२१ पर्यायावरील ‘गो’ वर क्लिक करावे लागेल.

 

MHADA Pune Housing Scheme 2021 lottery draw held, 3,000 homes allotted

 

तुम्हाला https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ येथे निर्देशित केले जाईल. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पृष्ठ जिथे तुम्हाला लॉटरी निकाल टॅबवर क्लिक करावे लागेल.

 

MHADA Pune Housing Scheme 2021 lottery draw held, 3,000 homes allotted

 

तुम्हाला https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ येथे निर्देशित केले जाईल. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पृष्ठ जिथे तुम्हाला लॉटरी निकाल टॅबवर क्लिक करावे लागेल.

 

MHADA Pune Housing Scheme 2021 lottery draw held, 3,000 homes allotted

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: प्रतीक्षा यादी कशी तपासायची

वर नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, अर्जदार एका पृष्ठावर https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/P11/draw/P11.html पोहोचेल जेथे विजेता यादी आणि प्रतीक्षा यादी पर्यायांसह दिलेली आहे.

 

MHADA Pune Housing Scheme 2021 lottery draw held, 3,000 homes allotted

 

विजेत्यांच्या यादीत नाव शोधण्यात अक्षम असल्यास, निविदाकार प्रतीक्षा यादी तपासू शकतात. वाटपकर्त्यांद्वारे जमा केलेल्या मालमत्ता प्रतीक्षा यादीतील लोकांना दिले जातात. याला दोन ते तीन महिने लागू शकतात. विजेते यादी आणि प्रतीक्षा यादी, दोन्ही, मराठी आणि इंग्रजीमध्ये बघितली जाऊ शकते. वेबसाईटवर म्हाडा पुणे लॉटरी २०२१ लॉटरीसाठी ज्या अर्जदारांचे फॉर्म नाकारले गेले त्यांची यादी देखील प्रकाशित केली होती.

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: परतावा तपशील

लॉटरी निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत असफल अर्जदारांच्या परताव्याच्या रकमेवर म्हाडा प्रक्रिया करते. तसेच परताव्याची प्रक्रिया त्याच देय पद्धतीद्वारे केली जाते जी नोंदणीची रक्कम भरण्यासाठी वापरली जाते. सात कामकाजाच्या दिवसात पैसे परत न मिळाल्यास अर्जदार म्हाडा पुणे हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात आणि अर्ज आयडी सादर करून वास्तवीक स्थिती जाणून घेऊ शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ पुणे

म्हाडा पुणे लॉटरी सदनिकांचा तपशील – २ जुलै २०२१ रोजी लॉटरी सोडत

यावेळी प्राधिकरण वेगवेगळ्या प्रकारांतर्गत सदनिकांचे वाटप करीत आहे, जसे प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय), म्हाडाची स्वत:ची यादी, फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्ह सदनिका, ज्यात लॉटरी काढून दिल्या जाणार नाहीत आणि सर्व सर्वसमावेशक योजना अंतर्गत सर्व सुविधा संकुलाच्या आत प्रदान केल्या जाणार आहेत. सर्व श्रेण्या आणि प्रत्येकामधील सदनिकांची संख्या खाली दिलेली आहे.

पीएमएवाय
म्हाळुंगे (चाकण)२०९
म्हाडा
मोरगाव पिंपरी१८
पीएमसीच्या सर्व समावेशक योजना
लोहगाव४८
बाणेर१९
हडपसर९०
तालीजाई हिल्स३४
खरडी५५
वडगाव शेरी३०
येवलेवाडी२४
पीसीएमसीच्या सर्व समावेशक योजना
पिंपळे निलख३८
ताथवडे२७
किवळे३१
पुनवळे७९
मोशी२४
वाकड५९
रहाटणी२६
चिखली५८
मुळशी७५
दुधगाव२१
फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्ह
चाकण१,३९४

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१ (एप्रिल): उत्पन्न गट आणि खर्च

योजना उत्पन्न गट किमती
पीएमएवाय (PMAY)आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गट (EWS)१३ लाखाच्या पुढील
म्हाडानिम्न उत्पन्न गट (LIG)२९ लाखाच्या पुढील
म्हाडामध्य उत्पन्न गट (MIG)४३ लाखाच्या पुढील
पीएमसीच्या सर्व समावेशक योजनानिम्न उत्पन्न गट (LIG)१३ लाखाच्या पुढील
पीसीएमसीच्या सर्व समावेशक योजनानिम्न उत्पन्न गट (LIG)११ लाखाच्या पुढील
फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्हनिम्न उत्पन्न गट (LIG)११ लाखाच्या पुढील
फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्हमध्य उत्पन्न गट (MIG)३२ लाखाच्या पुढील
फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्हआर्थिकदृष्ट्या दुर्बळ गट (EWS)१३ लाखाच्या पुढील
फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्हउच्च उत्पन्न गट (HIG)४५ लाखाच्या पुढील

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: यासाठी लागणारी पात्रता

अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र असावे.

अर्जदाराकडे पॅनकार्ड असले पाहिजे.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न २५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत असेल तर तो/ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतो.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न ५०,००१ ते ७५,००० च्या दरम्यान असल्यास तो/ती मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतात.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न ७५,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तो/ती उच्च उत्पन्न गट (एचआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतात.

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: आवश्यक कागदपत्रे

 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • कॅन्सल चेक किंवा पासबुक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो (५० केबी पर्यंत)
 • मोबाइल नंबर (व्हॉट्सअ‍ॅपसाठी वापरलेला)
 • ई – मेल आयडी

हे देखील पहा: म्हाडा गृहनिर्माण योजना २०१८ चा निकाल जाहीर झाला

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: म्हाडा पुणे लॉटरीसाठी करण्याच्या पायऱ्या

१ली पायरी: म्हाडाची लॉटरी नोंदणी

म्हाडा पुणे प्लॅटफॉर्म या वेबसाईट ला भेट द्या, ‘रजिस्टर’ वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फोर्मसाठी निर्देश दिले जातील.

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

युजरनेम नाव निवडा, संकेतशब्द (पासवर्ड) निवडा आणि भविष्यातील गरजांसाठी जपून करा. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. आपला मोबाइल नंबर सत्यापित करा, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरला जाईल.

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

How to apply for the MHADA Pune housing scheme

 

आपल्याला दुसर्‍या फॉर्मवर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे आपल्याला आपले मासिक उत्पन्न, बँक खात्याचा तपशील आणि अर्जदाराचा फोटो नमूद करण्याची आवश्यकता आहे.

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

एकदा आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. प्रविष्ट केलेला सर्व तपशील सत्यापित करा आणि अर्ज सबमिट करा.

 

2री पायरी: लॉटरीसाठी अर्ज

म्हाडातर्फे फोटोची ओळख सत्यापित झाल्यानंतरच वापरकर्ते लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्यास सक्षम असतील.

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

इच्छित गृहनिर्माण योजना निवडा आणि उत्पन्न गट, योजनेचा कोड आणि आरक्षण श्रेणी यासारखा तपशील भरा.

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

सद्यस्थितीतील निवासस्थान व उत्पन्नाचा तपशील योग्य प्रकारे भरा. अर्ज सबमिट करा.

 

How to apply for the MHADA Pune housing scheme

 

३री पायरी: पैसे भरा

निवडलेल्या योजनेसाठी पैसे भरा. अर्जदारास अर्जाची कागदपत्रे छापून पोचपावती डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

अर्जदाराच्या अर्जावर छायाचित्र लावा आणि ते स्कॅन करुन जेपीईजी (JPEG) फॉरम्याट मध्ये जतन करा. पोचपावतीची स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करा. देयकासह पुढे जाण्यासाठी ‘पे ऑनलाईन’ बटणावर क्लिक करा.

 

म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करावा

 

‘प्रोसिड टू पेमेंट’ बटणावर क्लिक केल्यानंतर, रकमेच्या पेमेंटसाठी तुम्हाला पेमेंट गेटवेवर पुनर्निर्देशित केले जाईल.

 

How to apply for the MHADA Pune housing scheme

 

नियम व शर्ती स्वीकारण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा. एकदा आपण देय रक्कम दिली की प्रक्रिया पूर्ण होईल.

 

म्हाडा लॉटरी २०२१: हेल्पलाईन नंबर

अर्जदार म्हाडा पुणे येथे खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

हेल्पलाईन: ९८६९९८८०००, ०२२-२६५९२६९२, ०२२-२६५९२६९३

पैशांशी संबंधित प्रश्नांसाठी आपण कॅनरा बँक हेल्पलाइनवर कॉल करू शकता: १८००४२५००१८

 

सामान्य प्रश्न (FAQs)

म्हाडाची सदनिका भाड्याने देऊ शकतो का?

होय, आपण आपला म्हाडाची सदनिका भाड्याने देऊ शकता कारण प्राधिकरणाने भाड्यासाठी घातलेले लॉक-इन काढून टाकले आहे.

म्हाडा योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, ज्याला म्हाडा देखील म्हणतात, अशा गृहनिर्माण योजना राबविण्यात आल्या आहेत ज्या महाराष्ट्रातील रहिवाशांना राज्यात परवडणारी घरे खरेदी करण्याची संधी देतात.

 

Was this article useful?
 • 😃 (2)
 • 😐 (0)
 • 😔 (1)

Comments

comments