वास्तुशास्त्राच्या मुख्य दरवाजा संबंधी टिपा


वास्तूचा मुख्य दरवाजा सौंदर्य शास्त्रानुसार कितीही सुंदर असला तरी सकारात्मक ऊर्जा वास्तूत यावी यासाठी तो योग्य दिशेला असावा असे वास्तुशास्त्र सांगते. 

वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा फक्त प्रवेशाचे साधन नसून त्या वास्तूत ऊर्जा आणण्याचेही काम करतो. मुंबई येथील वास्तू सल्लागार नितीन परमार सांगतात, ” वास्तूचा मुख्य दरवाजा फक्त बाह्य जगातून वास्तूमध्ये येण्यासाठी नसून वास्तूत आनंद, उल्हास आणि उज्ज्वल भाग्य येण्यासाठी तो एका संक्रमकाची भूमिका पार पाडत असतो. आरोग्य, संपत्ती व कुटुंबातील सुसंवाद यासाठी वैश्विक ऊर्जा महत्वाची असते, त्या उर्जेला वास्तूत येऊ देणे वा बाहेर ठेवणे यात मुख्य दरवाजाची भूमिका महत्वाची ठरते, तसेच वास्तू विषयी अनुकूल वा प्रतिकूल मतावर आपली छापही सोडत असतो.

मुख्य दरवाजाच्या दिशा 

मुख्य दरवाजा हा उत्तर, ईशान्य, पूर्व, किव्वा पश्चिमेला असेल तर शुभ समाजाला जातो.  दक्षिण, नैऋत्य, वायव्य , आग्नेय दिशेला असणारे दरवाजे टाळावे. दक्षिणेस वा नैऋत्येस दरवाजा असेल तर जस्त धातूचे पिरॅमिड आणि हेलिक्स वापरून दोष टाळता येतात. वायव्य दिशेस असलेल्या दरवाजाला पितळेचे पिरॅमिड आणि हेलिक्स वापरून दोष टाळता येतात, तसेच आग्नेय दिशेस असणाऱ्या दरवाजासाठी तांब्याचे हेलिक्स वापरावे असे परमार सुचवितात.

घराचा मुख्य दरवाजा हा घरातील इतर दरवाज्यांपेक्षा आकाराने मोठा व काट्याच्या दिशेने उघडणारा असावा. मुख्य दरवाजास तीन दरवाजे असू नये तसेच ते समांतर नसावे, हा घरातील आनंद नष्ट करणारा वास्तूतील मोठा दोष समाजला जातो.

वाचा : वास्तुशास्त्रानुसार घराची निवड 

मुख्य दरवाजाची वापरावयाचे साहित्य: 

 • लाकडापासून बनविलेला मुख्य दरवाजा हा  शुभ समाजाला जातो.
 • दक्षिण मुखी  दरवाजा: लाकूड व धातू यांचा वापर करून बनविलेला असावा.
 • पश्चिममुखी दरवाजा : धातूपासून बनविलेला असावा.
 • उत्तर मुखी दरवाजा : चंदेरी (silver) रंगाचा भरपूर वापर करून बनविलेला दरवाजा असावा.
 • पूर्वाभिमुख दरवाजा : लाकसडी दरवाजाला धातूच्या मोजक्या अलंकाराने सजविलेला असावा.

मुख्य दरवाजाची सजावट : 

स्वच्छ आणि नीटनेटकी वास्तू, खरेतर अशा वास्तूचा मुख्य दरवाजा सकारात्मक उर्जेला आकर्षित करतात. मुंबईच्या होलिस्टिक हिलिंगचे कजाल रोहिरा यांच्यानुसार कचरादानी, तुटलेल्या खुर्च्या  किंवा स्टूल कधीच मुख्य दरवाजाजवळ ठेऊ नये, मुख्य दरवाजाभोवतालची जागा पुरेसा उजेड असलेली असावी. दरवाज्याच्या समोर आरसा कधीही लावू नये, त्यामुळे घरात येणारी ऊर्जा पुन्हा बाहेर टाकली जाते.

दिल्लीच्या गृहिणी तान्या सिन्हा यांनी पूर्वाभिमुख दरवाजा असलेली वास्तू मिळविण्यासाठी त्याअगोदर अनेक वास्तू  वास्तुशास्त्रानुसार दरवाजा नव्हता म्हणून नाकारल्या होत्या. त्या सांगतात, “सोनेरी रंगात असलेला मुख्य दरवाजा कलात्मकरीत्या कलाकुसर केलेला आहे, स्वस्तिक कोरलेल्या या दरवाजावर सोनेरी रंगात नावाची पाटी आणि एक आकर्षक पिवळा दिवा लावलेला आहे, हा दरवाजा तुमचे मनापासून स्वागत करतो.

मुख्य दरवाजाला संगमरवर किव्वा लाकडाचा उंबरठा असावा. उंबरठा हा नकारात्मक उर्जेला थोपवून फक्त सकारात्मक ऊर्जा घरात येऊ देतो असे मानतात. ओम, स्वस्तिक, क्रॉस अशा दैवी प्रतिकांनी दरवाजा सजवावा, त्यासमोर रांगोळी काढावी. हे शुभ लक्षण असते व त्यामुळे चांगले भाग्य आणते.

वास्तुशास्त्राप्रमाणे मुख्य दरवाजा संबधी काय करावे/करू नये 

 • वास्तू प्रवेशाची जागी भरपूर प्रकाश असावा, लाल रंगाचा वापर टाळावा. मुख्य दरवाजा संध्याकाळी प्रकाशित असेल याची खबरदारी घ्यावी.
 • मुख्य दरवाजासमोर आरसा ठेऊ नये.
 • जागा असेल तर छोटी झुडुपे/वेलींनी दरवाजा सुशोभित करावा.
 • ९० अंशात कुठल्याही अडथळ्याविना उघडणारा असावा
 • बिजागिऱ्याना नेहमी तेलपाणी करावे, दरवाजाला असणारे धातू घासून पुसून स्वच्छ ठेवावे, तुटलेले वा तडकलेले लाकूड काढून टाकावे, खिळे हरविलेले नसावे, वाजवीपेक्षा जास्त खिळे काढून टाकावे
 • दरवाजावर नावाची पाटी लावावी, दरवाजा उत्तरेला व पश्चिमेला असेल तर धातूची पाटी वापरावी. दक्षिण व पूर्वाभिमुख दरवाजा साठी लाकडाची नावाची पाटी वापरावी.
Was this article useful?
 • 😃 (1)
 • 😐 (1)
 • 😔 (0)

Comments

comments