बांधकाम क्षेत्र स्टार्ट अप परिसंस्थेला मोठी दालने खुली करेल: पीयूष गोयल

भारतीय बांधकाम क्षेत्र विकासक संस्था महासंघाच्या राष्ट्रीय अलंकरण सोहळ्यामध्ये पीयूष गोयल यांचे मार्गदर्शन

भारतीय बांधकाम क्षेत्र भारताच्या विकासगाथेचे एक महत्त्वाचे इंजिन राहिले असून, ते मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करत आहे आणि गेल्या काही वर्षात या क्षेत्राने सरकारच्या सक्रिय पाठबळाच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर लवचिकतेचे दर्शन घडवले आहे, असे केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. ते आज भारतीय बांधकाम क्षेत्र विकासक संस्थांच्या महासंघाच्या राष्ट्रीय अलंकरण सोहळ्यामध्ये बोलत होते.

बांधकाम क्षेत्र हे एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र असून लोकांना उत्तम जीवनमान सुनिश्चित करण्याचे ते काम करेल, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले. पुढील दोन तीन वर्षात भारत बांधकाम क्षेत्रातील तिसरी मोठी बाजारपेठ बनण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी निर्माण झालेल्या प्रचंड मागणीचा विचार करता या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे आणि हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल आणि स्टार्ट अप परिसंस्थेसाठी नवी दालने खुली करेल, असे त्यांनी सांगितले.

2023 च्या अर्थसंकल्पातही केंद्र सरकारने 10 लाख कोटी रुपयांच्या थेट गुंतवणुकीसह पायाभूत सुविधा क्षेत्रावर विशेषत्वाने भर दिला आहे, याकडे त्यांनी निर्देश केला. यामुळे एक प्रमुख जागतिक महासत्ता बनण्यासाठी भारताचा उदय होत आहे आणि त्यासाठी तो स्वतःला सज्ज करत आहे असा जगाला संदेश मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

बांधकाम नियामक प्राधिकरण रेराने या क्षेत्राचे औपचारिक क्षेत्रामध्ये रुपांतर करण्याची भूमिका बजावली आहे आणि यामध्ये पारदर्शकता आणि अधिक चांगल्या शासन पद्धती आणल्या आहेत. बांधकाम क्षेत्राला अधिक प्रतिरोधक्षम बनवण्यासाठी आणि काम करणे सुलभ करण्यासाठी जीएसटीचे सुलभीकरण करण्यात आले आहे, असे त्यांनी या क्षेत्राला पाठबळ देण्याच्या सरकारच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले.

गृहनिर्माण क्षेत्रातील तक्रारींचे प्रभावी आणि गतिमान निरसन करण्यामुळे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे आणि प्रामाणिक व्यवसायांचा सन्मान होईल, प्रेरणा दिली जाईल आणि प्रोत्साहन मिळेल हा अतिशय सुस्पष्ट संदेश यामुळे दिला गेला आहे, असे त्यांनी नमूद केले.

देशातील वृद्धीला मदत करण्यासाठी आणि वृद्धी या संकल्पनेच्या अर्थाचा सुशासन, बांधकाम क्षेत्राचे पुनरुत्थान, शून्य कार्बन पद्धतींचा  सुयोग्य वापर, महिला सक्षमीकरण, गृह खरेदीदार आणि संबंधितांसाठी पारदर्शकता  आणि समग्र आणि शाश्वत गृहनिर्माण विकास अशा प्रकारे विस्तार करण्यासाठी त्यांनी क्रेडाईला श्रेय दिले.

बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या उद्योजकांनी या क्षेत्राला शाश्वत विकासाला चालना देणारा आघाडीचा घटक बनवण्यासाठी या क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या उद्देशाने युवा गुणवत्तेला प्रोत्साहन द्यावे अशी विनंती गोयल यांनी केली.

जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा    दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.

यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • कोची मेट्रो फेज 2 साठी 1,141 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले
  • तुम्ही विक्रेत्याशिवाय दुरूस्ती डीड अंमलात आणू शकता का?
  • भूखंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे
  • भारतातील पायाभूत गुंतवणूक पुढील 5 वर्षांत 15.3% वाढेल: अहवाल
  • 2024 मध्ये अयोध्येत मुद्रांक शुल्क
  • आर्थिक जागरूकता वाढवण्यासाठी MOFSL ने IIM मुंबईसोबत भागीदारी केली आहे