बहुतेक कुटुंबे त्यांच्या घरातील राहण्याची जागा डिझाइन करून किंवा पुन्हा बदलवून घेण्यात बरीच ऊर्जा खर्च करतात आणि मेहनत घेत असतात. यामागील कारण म्हणजे ड्रॉईंग रूम आणि हॉल या जागा आपले पाहुणे बघतात आणि म्हणूनच ते प्रस्तूत करण्यायोग्य असावेत. तथापि, घराच्या मालकांना प्रत्येक खोलीला समान महत्त्व देणे गरजेचे आहे, कारण सकारात्मक उर्जा उत्सर्जित करण्यासाठी प्रत्येक जागेमध्ये बदल केले जाऊ शकतात. स्नानगृह आणि स्वच्छतागृहे या बर्याचदा दुर्लक्षित जागा असतात.
वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शौचालये आणि स्नानगृहे योग्य दिशेने न ठेवल्यास नकारात्मक उर्जेचे स्रोत बनू शकतात. वारंवार येणारी जागा काळजी न घेता सोडणे मूर्खपणाचे आहे. त्यामुळे घर बांधताना वास्तूनुसार बाथरूम आणि टॉयलेटची योग्य दिशा लक्षात घेतली पाहिजे. घराच्या मध्यभागी स्नानगृह बांधणे टाळावे. सकारात्मक ऊर्जेला चालना देण्यासाठी बाथरूम वास्तू मार्गदर्शक तत्त्वे जाणून घेणे आवश्यक आहे.
सतत वापरणाऱ्या जागेची काळजी न घेणे हे चुकीचे आहे. जी स्नानगृहे / स्वच्छतागृहे वास्तु-अनुरूप नसतात, त्यांच्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्या किंवा संपत्तीची हानी होऊ शकते किंवा आरोग्याचा त्रास, तणाव किंवा अगदी लहान अपघातदेखील होऊ शकतात. जर तुम्ही स्नानगृहातील वास्तू सुधारण्यासाठी, स्नानगृह बदलवून किंवा बांधून घेत असाल तर येथे काही टीपा देत आहेतः

स्नानगृह वास्तू: स्नानगृह वास्तु-सुसंगत का असावेत?
बहुतेक भारतीय घर मालक वास्तु-अनुरूप घरे पसंत करतात, यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होईल असा त्यांना विश्वास असतो . वास्तुशास्त्र मापदंडांचे पालन करण्यास विशेष रस नसलेले लोकसुद्धा वास्तु-अनुरूप आणि कोणत्याही दोषांपासून मुक्त घर दुय्यम बाजारात विक्री करणे सोपे जाते याबाबत सहमत आहेत. वास्तू शास्त्राकडे आपल्या घराच्या प्रत्येक खोलीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत – खोल्यांची दिशा, वापरले जाणारे रंग, दोष असल्यास सुधारण्याचे मार्ग, इत्यादी. या लेखात आम्ही आपल्या स्नानाच्या आणि धुण्याच्या जागा वास्तू अनुरूप कशा बनवाव्यात हे बघणार आहोत. वास्तू नियमांनुसार सर्वोत्कृष्ट स्नानगृह आणि शौचालयाची दिशा सांगणार आहोत.
वास्तूनुसार स्नानगृह आणि शौचालयाची दिशा
वास्तूनुसार बाथरूम आणि टॉयलेटची जागा तुमच्या घराच्या उत्तर किंवा वायव्य (उत्तर-पश्चिम) भागात असणे आवश्यक आहे. आंघोळीची जागा दक्षिण दिशेने किंवा अगदी आग्नेय (दक्षिण-पूर्व) किंवा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेने स्नानगृह बांधू नका, कारण त्यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार शौचालय जमिनीपेक्षा एक ते दोन फूट उंच बांधले जावे.
उत्तर दिशेला असलेल्या शौचालयासाठी वास्तु उपाय
उत्तर दिशेने बांधलेली स्वच्छतागृहे आरोग्याच्या समस्यांच्या दृष्टीने नकारात्मक परिणाम आणू शकतात. अशा रचनांसाठी एक वास्तु उपाय म्हणजे खड्डा उत्तर-पश्चिमेकडे हलवणे आणि भिंती काळ्या रंगात रंगवणे. उत्तर दिशेला तोंड करून धातूच्या फुलदाणीत पांढऱ्या रंगाची फुले ठेवल्याने नकारात्मक परिणाम दूर होण्यास मदत होऊ शकते. उत्तराभिमुख घरासाठी बाथरूमच्या वास्तू नियमांनुसार, दक्षिण-पश्चिम किंवा वायव्य-पश्चिमची पश्चिम ही बाथरूमची रचना करण्यासाठी योग्य ठिकाणे आहेत.
हे देखील पहा: उत्तराभिमुख घर वास्तु योजना
दक्षिण दिशेला असलेल्या शौचालयासाठी वास्तु उपाय
वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य दक्षिण दिशेला शौचालये बांधल्यास प्रसिद्धी कमी होऊ शकते. वास्तूनुसार दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या दरम्यान शौचालयाची स्थिती बदलणे हा या वास्तुदोषावरचा एक उपाय आहे.
वास्तूनुसार बाथरूम आणि टॉयलेटच्या जागेसाठी योग्य रंगसंगती निवडाल याची खात्री करा. जर दक्षिण दिशेतील बाथरूम झोन संतुलित असेल तर लाल, गुलाबी, नारिंगी, जांभळा आणि व्हायलेटच्या हलक्या शेड्स वापरा. झोन विस्तारित असल्यास न्युट्रल शेड्स वापरा.
नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला असलेल्या शौचालयासाठी वास्तु उपाय
जर शौचालय नैऋत्य दिशेने असेल तर आपण या उपायांचे अनुसरण करू शकता:
- नैऋत्येला असलेल्या शौचालयाच्या भिंतीच्या बाहेरील भागावर वास्तु पिरॅमिड ठेवा.
- शौचालयाचे दरवाजे नेहमी बंद ठेवा.
- दक्षिण-पश्चिम दिशेने असलेल्या शौचालयामध्ये धातूच्या वस्तू नसल्याचे निश्चित करा.
- उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेने एक्झॉस्ट पंखा ठेवा.
- बाथरुमच्या बाहेरील भिंतीवर तीन किंवा नऊ लीड हेलिकेस ठेवा. तुम्ही बाथरूमच्या दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर तीन लाकडी पिरॅमिड विभाजने देखील ठेवू शकता.
- वैकल्पिकरित्या, तुम्ही वास्तू मीठ पितळेच्या भांड्यात ठेवू शकता. ते दर आठवड्याला बदलले पाहिजे.
- या दिशेने शौचालय आणि बाथरूमसाठी वास्तूमध्ये शिफारस केलेल्या रंगांमध्ये पिवळा आणि बेज सारख्या हलक्या रंगांचा समावेश आहे.
आग्नेय दिशेला तोंड करून असलेल्या शौचालयांसाठी वास्तु उपाय
आगीची दिशा असलेल्या दक्षिणेकडे तोंड करून शौचालय बांधल्यास वास्तूनुसार नकारात्मक परिणाम होऊ शकतात. अशी स्वच्छतागृहे वापरायचे टाळणे हे चांगले. नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी, दक्षिण आणि पूर्व भिंतींच्या बाहेरच्या बाजूला वास्तु पिरामिड ठेवा. तुम्ही वास्तु मीठ तांब्याच्या भांड्यातही ठेवू शकता, जे दर आठवड्याला बदलले पाहिजे.
दक्षिण-पूर्व कोपऱ्यात असलेल्या शौचालयासाठी, फिकट रंग जसे की पिवळा, क्रीम किंवा न्युट्रल शेड्स वापरा.
ईशान्य दिशेला असलेल्या शौचालयासाठी वास्तु उपाय
घराच्या उत्तर किंवा ईशान्य भागात शौचालयाची रचना करणे हे वास्तू तत्त्वांच्या विरोधात कार्य करते आणि नकारात्मक उर्जा प्रवाहास कारणीभूत ठरते. घराच्या ईशान्य दिशेला ईशान्य यंत्र ठेवा. उत्तरेकडील शौचालयामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण शौचालयाच्या आत कापूर किंवा सुवासिक मेणबत्त्या जाळू शकता. शौचालयाचे दरवाजे नेहमी बंद राहिले पाहिजेत. मनी प्लांट किंवा स्पायडर प्लांट सारखी इनडोअर प्लांट्स तुम्ही ठेवू शकता जी नकारात्मकता शोषून घेतील. समुद्री मीठ देखील नकारात्मकता शोषून घेते आणि त्याची एक वाटी शौचालयात ठेवावी. दर आठवड्याला मीठ बदलत राहील याची खात्री करा. शेवटी, ईशान्येला ठेवलेले शौचालय नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ असल्याची खात्री करा. शेवटी, ईशान्येला ठेवलेले शौचालय नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ असल्याची खात्री करा.
पूर्व दिशेने असलेले शौचालयासाठी वास्तु उपाय
आपल्या घरामधील शौचालय / स्नानगृह पूर्व दिशेने नसल्याचे नेहमी निश्चित करा. या प्रकारची रचना आपल्या कुटुंबासाठी त्रास देऊ शकते, विशेषत: सर्वात मोठ्या मुलाला प्रभावित करते. आपण हे टाळू शकत नसल्यास अशा जागेच्या छतावर बांबू वापरुन पहा, हे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करेल.
पूर्व दिशेला शौचालय बांधणे कधीही टाळणे चांगले. तथापि, पूर्वेकडे स्नानगृह आणि शौचालय असलेल्या घरांसाठी, वास्तु उपायांमध्ये रंग बदलणे समाविष्ट असू शकते. तपकिरी आणि हिरव्या रंगाचे हलके मातकट रंग वापरा.
वास्तुनुसार टॉयलेट सीटची दिशा
टॉयलेट सीट अशा प्रकारे बांधली पाहिजे की ती वापरणाऱ्या व्यक्तीचे तोंड उत्तर किंवा दक्षिण दिशेला असेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. टॉयलेट सीटवर बसताना वास्तुनुसार दक्षिण किंवा उत्तर दिशेला तोंड करावे.
बाथरूम आणि टॉयलेट साधने आणि उपकरणासाठी वास्तू
- वास्तुनुसार बाथरूममधील आरसे बाथरूमच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावेत. चौरस आणि आयताकृती आरसे निवडा आणि त्यांना जमिनीपासून किमान चार किंवा पाच फूट उंच ठेवा.
- बाथरूममध्ये आरसा उंच स्थानावर ठेवला पाहिजे, ज्याने त्यात टॉयलेट सीट प्रतिबिंबित करणार नाही.
- इलेक्ट्रिक फिटिंग्ज, जसे की हेअर ड्रायर आणि गिझर, दक्षिण-पूर्व बाजूला ठेवता येतात.
- एक्झॉस्ट पंखा किंवा आपल्याकडे हवा खेळती राहण्यासाठी खिडकी असल्यास, पूर्वेकडील किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला असणे आवश्यक आहे.
- वॉशबेसिन स्नानगृहाच्या पूर्व, उत्तर किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व) भागात असावेत.
- बाथरूममध्ये संतुलित स्वरूप प्राप्त करण्यासाठी लाकडी बाथरूम फर्निचर आणि युटिलिटी बास्केट आणि मेटल लाइट फिक्स्चरची निवड करा.
- शॉवर देखील पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व भागात असावा.
- वॉशिंग मशीन आग्नेय (दक्षिण-पूर्व) आणि उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेने ठेवली पाहिजे.

हे देखील पहा: वास्तूनुसार आरशाची दिशा
बाथटबसाठी वास्तू
वास्तूनुसार, जकूझी / बाथ टब गोल किंवा चौकोनी आकाराचे असावेत. त्याला तीक्ष्ण कडा आणि कोन नसल्याची खात्री करा. आदर्शपणे, त्यांना उत्तर, पूर्व, पश्चिम किंवा उत्तर-पूर्व दिशेने ठेवणे चांगले आहे. बाथरुम मॅट्स पांढरे किंवा निळे असू शकतात आणि बाथटबच्या जवळ ठेवल्या पाहिजेत. काळा किंवा लाल असा गडद रंग टाळा. बाथ टबच्या उशा जकूझीच्या दक्षिण बाजूला ठेवाव्यात. ज्यांना सुगंधी मेणबत्त्यांसह स्पासारखे वातावरण तयार करायचे आहे त्यांनी त्याला बाथरूमच्या ईशान्य भागात ठेवावे.
स्नानगृहाच्या दारासाठी वास्तु
- स्नानगृहाचे दरवाजे उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेने असले पाहिजेत.
- लाकडी दरवाजा वापरा आणि धातूचे दरवाजे टाळा. स्नानगृहाच्या दारावर शोभेच्या देवी-देवतांच्या मूर्ती लावणे टाळा.
- स्नानगृहाचे दरवाजे नेहमीच बंद ठेवले पाहिजेत कारण तुमच्या वैयक्तिक नात्यात नकारात्मक ऊर्जा पसरते असे म्हटले जाते.

बाथरूमच्या खिडक्यांसाठी वास्तू
प्रत्येक स्नानगृहात एक खिडकी किंवा योग्य वायुवीजनाची तरतूद असावी. यामुळे नकारात्मक उर्जा बाहेर जाईल आणि खोलीत प्रकाशाच्या प्रवेशास मदत करेल. बाथरूममध्ये खिडक्या पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेने उघडल्या पाहिजेत. तसेच, खिडक्या बाहेर उघडल्या जात आहेत याची खात्री करा.
वास्तू अनुसार स्नानगृहातील रंग
स्नानगृहासाठी हलका खाकी (बेज) आणि राखाडी (क्रीम) सारखे हलके रंग निवडा. काळा आणि गडद निळा किंवा अगदी लाल रंगा सारखे रंग टाळा. तपकिरी आणि पांढरे रंगदेखील आपल्या स्नानगृहासाठी योग्य रंग आहेत. बरेच लोक अंघोळ करण्याच्या जागेसाठी गडद टाईल किंवा रंग निवडतात परंतु वास्तुनुसार याची शिफारस केली जात नाही. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातूनही फिकट रंग तुम्हाला घाण शोधण्यात आणि अशा भागात येण्यास प्रवृत्त करतात. शिवाय, आपल्या घराच्या शांत झोनपैकी एक म्हणून जागा राखण्यासाठी मातीच्या शेड्स चांगले कार्य करतात. गडद रंग केवळ नकारात्मक ऊर्जेलाच परवानगी देत नाहीत तर बाथरूमसारखी कॉम्पॅक्ट जागा देखील लहान आणि अधिक अरुंद दिसतात.

स्नानगृहाशी संलग्न भिंती
स्नानगृहाच्या वास्तु तत्वानुसार, आपला पलंग स्नानगृह किंवा शौचालय असलेल्या जागेच्या जवळ ठेवू नये. स्नानगृहाची भिंत आपल्या शयनकक्षाच्या किंवा स्वयंपाकघराच्या भिंतीशी किंवा आपल्यासाठी पवित्र असलेल्या पुजेच्या जागेबरोबर संलग्न असणार नाही याची खात्री करुन घ्या.
तथापि, आपल्याकडे कॉम्पॅक्ट घर असल्यास आणि भिंत सामायिकरण टाळण्याचा कोणताही मार्ग नसल्यास, आपण आपल्या पलंगाची स्थिती बदलू शकता जेणेकरून तो बाथरूमच्या भिंतीजवळ असणार नाही. नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी हा तुमचा सर्वोत्तम मार्ग असेल.

वास्तू अनुसार स्नानगृह ड्रेनेज
पाणी जाण्याची जागा आणि ड्रेनेज हे उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्वेस असले पाहिजेत आणि स्नानगृहाचा उतार त्याच दिशेने असावा.

बाथरूम फ्लोअरिंगसाठी वास्तू
बाथरूमसाठी वास्तू सांगते की बाथरूमची फ्लोअर बेडरूम आणि इतर खोल्यांच्या जमीनीएवढ्या उंचीवर नसावी. बाथरूमची फ्लोअर जमिनीच्या पातळीपासून किमान एक फूट उंच असावी. बाथरूमच्या फ्लोअरवर संगमरवर वापरण्याची शिफारस वास्तूमध्ये केलेली नाही, टाइल्स उत्तम आहेत पण काळ्या किंवा लाल रंगाच्या टाइल्स टाळा.
वास्तूनुसार बाथरूम आणि टॉयलेटसाठी फ्लोअरिंगचे योग्य रंग म्हणजे निळे, पांढरे किंवा पेस्टल शेड्ससारखे शांत रंग आहेत.
बाथरूम ओव्हरहेड पाण्याच्या टाकीसाठी वास्तू
ज्या शहरांमध्ये पाण्याची कमतरता आहे, तेथे बहुतेक घरांमध्ये या दिवसात ओव्हरहेड पाण्याची टाकी बसवली जाते, वास्तु तत्त्वानुसार नैऋत्य कोपरा सर्वात जड असावा म्हणून ओव्हरहेड टाकी नैऋत्य कोपऱ्यात ठेवा. टाकी किंचित दक्षिणेकडे किंवा नैऋत्येच्या पश्चिमेला, आणि अगदी पश्चिमेलाही ठेवता येते. यामुळे आर्थिक कल्याण होऊ शकते. टाकी कधीही ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवू नका, असे वास्तू सांगते.
संलग्न आणि स्वतंत्र बाथरूमसाठी वास्तु
वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानगृहे जोडली जाऊ नयेत. तथापि, जागेअभावी बहुतेक शहरी घरे ही या सुविधा घेऊ शकत नाहीत. म्हणून, संलग्न स्नानगृह लोकप्रिय आहेत आणि व्यापकपणे वापरले जातात.
खोलीची उत्तर-पश्चिम दिशा संलग्न शौचालये ठेवण्यासाठी योग्य आहे. संलग्न स्नानगृहांसाठी, शौचालयाच्या आत, पूर्व, पश्चिम किंवा उत्तर भिंतीवर एक लहान खिडकी बांधली जाऊ शकते. टॉयलेट सीट डिझाइन करण्यासाठी आणि वास्तूने शिफारस केलेल्या दिशेला तोंड करण्यासाठीचे वास्तू नियम लक्षात ठेवा.
याशिवाय, आधुनिक घरात संलग्न स्नानगृह बांधताना, बाथरूम आणि शौचालयाची जागा खोलीच्या जमिनीच्या पातळीपेक्षा जास्त असल्याची खात्री करा. वास्तूनुसार, संलग्न बाथरूम खोलीच्या जमिनीच्या पातळीवर नसावे.

स्नानगृह आणि शौचालयांसाठी आपल्या घरातील सर्वोत्तम स्थान

हे देखील पहा: लहान आणि मोठ्या घरांच्या स्नानगृहासाठी कल्पक रचना
वास्तू नियम: बाथरूममध्ये शौचालय कोठे ठेवावे?
शौचकूप किंवा पाणी-कपाटाची जागा
पूजेची खोली किंवा अग्नी स्थानाची जागा किंवा पलंगाच्या जागेच्या खाली अथवा वर नसावे. उत्तर-दक्षिण अक्षरेषेत समयोजित केले असले पाहिजे. कमोड पश्चिम, दक्षिण किंवा उत्तर-पश्चिम बाजूला ठेवावा.
शौचालयाची जागा: आपण ईशान्य कोपऱ्यात स्नानगृह बांधू शकतो का?
आपल्या घराच्या मध्यभागी किंवा ईशान्य किंवा नैऋत्य कोपऱ्यात शौचालय स्थापित करणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य ही अत्यंत महत्त्वाची दिशा आहे जी उपासनेची आज्ञा देते. अटॅच टॉयलेट असलेले बाथरूम हे विषाच्या बरोबरीचे असू शकते आणि म्हणून, येथे बांधले जाऊ शकत नाही. तसेच, हे लक्षात ठेवा की ते स्वयंपाकघर किंवा पूजा कक्षाजवळ ठेवू नये.
शौचालयाची जागा: आपण उत्तरेकडे शौचालय बनवू शकतो का?
नाही, घराच्या उत्तर भागात कधीही शौचालय बांधू नये. उत्तर दिशेला कुबेराची दिशा असल्याने वास्तुशास्त्राच्या तत्त्वांनुसार उत्तर दिशेला शौचालय बांधल्याने संपूर्ण घरावर परिणाम होऊ शकतो. घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.
निचरा (सेप्टिक) टाकीची जागा
शौचालयाच्या दक्षिण बाजूला निचरा (सेप्टिक) टाक्या नसाव्यात. त्याचे सर्वोत्तम स्थान घराच्या पश्चिमेस किंवा घराच्या वायव्य दिशेने आहे. टाकी इमारतीच्या जमिनीच्या पातळीपेक्षा उंच असणे आवश्यक आहे.
संलग्न शौचालयाची जागा
संलग्न शौचालय आग्नेय किंवा नैऋत्य बाजूला असू नये. हे दक्षिण बाजूला बांधले जाऊ शकते.
नळ आणि पाणी साठवणूक
नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) किंवा आग्नेय दिशेने (दक्षिण-पूर्व) नळ टाकू नका. तसेच या दिशेने पाणी साठवू नका. नळ ठेवण्यासाठी आणि पाणी साठवण्यासाठी पूर्व, उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशा योग्य आहेत.
हे देखील पहा: आपले स्नानगृह स्पा-सुरक्षित (स्पा सन्क्चुअरि) जागेत रुपांतर करा
जर आपण आपल्या घरात स्नानगृह आणि शौचालय जागेच्या नियमांचे पालन केले तर वास्तुशास्त्र केवळ आपल्या घरात सकारात्मक उर्जा मिळवण्याबद्दल नाही तर या नियमांचे पालन केल्याने सर्व वेळा आपले स्थान स्वच्छ आणि उपयुक्त ठेवण्यास मदत होईल असे आपल्याला समजून येईल.
वास्तू आणि शौचालय बांधकामाचा टप्पा
आपण बांधकाम सुरू करताच वास्तु घटक समाविष्ट करणे चांगले असते. एकदा घर ताब्यात घेण्याकरिता तयार झाल्यानंतर, सर्व पाइपलाइनसह योग्यरित्या व्यवस्था केलेली कपाट आणि वॉशबॅसिन, बाथटब इत्यादिची दिशा आधीच निश्चित केल्यावर बदल करणे अवघड आहे. यामुळे सेट इन केल्यावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो.

स्नानगृहे, शौचालये चुकीच्या ठिकाणी करण्याचा परिणाम
दिशा | परिणाम |
उत्तर | व्यवसायाच्या आणि संपत्तीच्या वाढीला अडथळा. येणाऱ्या संधीना अडथळा आणतो असे म्हटले जाते. |
ईशान्य (उत्तर-पूर्व) | कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. |
पूर्व | पाचक प्रणाली आणि यकृतावर परिणाम करणाऱ्या आरोग्यविषयक समस्या. कुटुंब सदस्य समाजातून वगळले देखील जाऊ शकतात. |
अग्नेय (दक्षिण पूर्व) | आर्थिक, विवाह किंवा प्रसूतीसमई समस्या उद्भवू शकतात. |
दक्षिण | कायदेशीर समस्या किंवा व्यवसायातील प्रतिष्ठा कमी होणे. |
नैऋत्य (दक्षिण पश्चिम) | नाते संबंध, आरोग्य किंवा नोकरी-धंद्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. |
पश्चिम | मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. स्वप्नांची आणि ध्येयाची पूर्ती न होणे. |
वायव्य (उत्तर पश्चिम) | मालमत्तेची विक्री करणे कठीण होऊ शकते. एखाद्यास आजूबाजूच्या लोकांकडून पाठिंबा मिळत नाही. |
हे देखील पहा: स्ट्रक्चरल बदल न करता घराचे वास्तु कसे सुधारता येईल?
वास्तुदोष उपाय : स्नानगृहातून नकारात्मक ऊर्जा कशी काढावी?
- वास्तू म्हणते की काच आणि मीठ हे दोन्ही राहूचे घटक आहेत. आपण आंघोळीसाठी आणि शौचालयाच्या ठिकाणी मिठाने भरलेला काचेचा पेला ठेवू शकता. याने वास्तूचे दोष दूर होतात असे म्हटले जाते.
- स्वत: ची काळजी आणि कायाकल्पासाठी तुमचे स्नानगृह स्वर्ग बनवा. शौचालयाच्या भांड्यात गवतीचहाच्या (लेमनग्रास) तेलाचे काही थेंब टाकून स्नानगृह आल्हाददायक करण्यासाठी अरोमाथेरपी वापरू शकता. लॅव्हेंडर, रोझमेरी किंवा सेज सारख्या अत्यावश्यक तेलाचा किंवा औषधी वनस्पतींच्या सुगंधाला बाथरूमच्या जागेत आरामदायक दरवळू द्या. परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावा
- बाथरूममध्ये साठवलेल्या गोष्टी एखाद्याच्या आरोग्यावर आणि आरोग्यावर परिणाम करतात. नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी, नियमितपणे बाथरूममध्ये साठवलेल्या गोष्टींकसे बघत जा, जसे की सौंदर्य प्रसाधने, प्रसाधनगृहे इ. कोणतीही गोष्ट जी कालबाह्य झाली आहे किंवा यापुढे आवश्यक नाही, ती टाकून द्यावी. जुने टूथब्रश आणि रिकाम्या लोशन किंवा परफ्यूमच्या बाटल्या ठेवू नका. बाथरूमला गोंधळमुक्त ठेवा.
- तुटलेले साबण डिस्पेंसर, टॉयलेट रोल धारक इत्यादी बदला. नियमितपणे टॉवेल स्वच्छ करा आणि जीर्ण झाले आहेत ते बदला.
- बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेरील बाजूस आरसा असणे, वास्तूच्या त्रुटी दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे. तथापि, त्यामध्ये शयनकक्षाचे किंवा प्रवेशद्वाराचे प्रतिबिंब येणार नाही याची खात्री करा.
- स्नानगृहातील साधने (फिटिंग्ज) साधे ठेवा. जरी चांदीचा, स्टेनलेस स्टीलचा आणि सिरॅमिकचा वापर साधनांसाठी अनुकूल असला, तरी सोने प्रतीकात्मक वापर करण्यासाठी निवडू नका, ते बाथरूमच्या सेटिंगला अनुकूल नाही.
- तद्वतच, शौचकूप (पाश्चात्य) आणि आंघोळीचे क्षेत्र विभाजित करण्याचा एक दरवाजा घ्या. जर ते शक्य नसेल तर शौचकूपाचे झाकण नेहमीच खाली ठेवा आणि दार बंद ठेवा. किंवा स्नान आणि शौचालय क्षेत्र वेगळे करण्यासाठी पडदा वापरा.
- बाथरूमच्या दारावर सजावटीच्या मूर्ती किंवा धार्मिक मूर्ती ठेवू नका.
- ऊर्जेच्या सुसंवादी प्रवाहासाठी, स्नानगृह स्वच्छ, गोंधळ-मुक्त आहे आणि डाग, ओलसरपणा किंवा बुरशी नसल्याचे सुनिश्चित करा.
- संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, विशेषत: आंघोळ करताना. हे एखाद्याला आराम करण्यास मदत करू शकते. म्हणून, बाथरूमच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात तुम्ही संगीत प्रणाली बसवू शकता, वास्तूनुसार, हा परिसर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी आहे.
वास्तू आणि बाथरुममधील पाण्याची गळती
वास्तुनुसार, नळ, जेट किंवा शॉवरमधून ते बंद झाल्यानंतरही पाणी टपकले, तर ते अशुभ मानले जाते, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पाण्याचा अपव्यय चांगला मानला जात नाही. गळते नळ त्वरित दुरुस्त केले पाहिजे, कारण यामुळे अनावश्यक खर्च आणि पैशाचे नुकसान होऊ शकते.
होम ऑफिसमध्ये बाथरूमसाठी वास्तू
कार्यालयातील वास्तूनुसार बाथरूमच्या योग्य स्थानाबद्दल येथे मार्गदर्शक आहे. वास्तूमध्ये टॉयलेटसाठी ऑफिसमध्ये वायव्य किंवा पश्चिमेला सर्वोत्तम स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार कार्यालयाच्या मध्यभागी (ब्रह्मस्थान) किंवा इमारतीच्या ईशान्य दिशेला शौचालय टाळावे. ईशान्य आणि नैऋत्य कोपरे काटेकोरपणे टाळावेत. जर शौचालय कोणत्याही केबिनला जोडलेले असेल तर ते त्या केबिनच्या ईशान्य दिशेला नसावे. बाथरूममध्ये, कमोड खोलीच्या पश्चिम किंवा वायव्य दिशेला असावा जेणेकरून त्यावर बसताना उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड असावे. शौचालय स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवा. नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आणि कार्यालयात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी दररोज ऑफिसचा फ्लोअर मीठ पाण्यात मिसळून पुसून काढा.
बाथरूमच्या दिव्यांसाठी वास्तू
वास्तूनुसार, बाथरूममधील दिव्यानी शांत वातावरण तयार केले पाहिजेत. ते गडद आणि धूसर नसावे आणि पुरेसा प्रकाश असावा. बाथरूममध्ये खिडक्या नसल्यास, नैसर्गिक सूर्यप्रकाशाचे अनुकरण करण्यासाठी आणि निरोगी ऊर्जा वाढविण्यासाठी ओव्हरहेड लाइटिंग फिक्स्चरमध्ये बल्ब वापरा. लहान बाथरूममध्ये, सामान्य प्रकाश व्यवस्था आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती छतावरील प्रकाश पुरेसा असावा. मोठ्या बाथरुमसाठी ज्यात आंघोळी आणि शौचालये आहेत, सर्व कोपऱ्यांमध्ये पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी ओव्हरहेड फिक्स्चर वापरा. बाथरूममध्ये सर्वात महत्वाची प्रकाशयोजना आरशाभोवती असते. या भागातील प्रकाश पसरलेला असावा आणि त्यात चमक किंवा सावली नसावी. शक्यतो वॉल स्कोनमध्ये एक लहान नाईट ल्याम्प जोडून बाथरूममधिल उर्जा सुधारू शकता.
हे देखील पहा: बाथरूमच्या फोल्ल्स सिलिंगसाठी डिझाइन कल्पना
स्नानगृहातील वनस्पतींसाठी वास्तू टिपा
बाथरूममध्ये हिरवळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊ शकते. शिवाय, हिरवीगार झाडे एखाद्याचा मूड सुधारतात. तसेच स्नानगृह ही स्वत: ची काळजी आणि कायाकल्प करण्याची जागा आहे आणि झाडे आरामदायी वातावरण तयार करण्यात मदत करतात. जर बाथरूममध्ये काही अतिरिक्त जागा असेल तर, सजावटीमध्ये हिरवे तरंग जोडा. बाथरूमसाठी मनी प्लांट हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण तो बाथरूमच्या उबदार आणि आर्द्र स्थितीचा सामना करू शकतो. बाथरूममध्ये स्नेक प्लांट, झेडझेड प्लांट, कोरफड आणि स्पायडर प्लांट देखील ठेवता येतात. उच्च आर्द्रता वाढणारी आणि ओलसर हवा सहन करू शकणारी झाडे निवडा. बाथरूममध्ये एक खिडकी असल्याची खात्री करा, ज्यामुळे नैसर्गिक प्रकाश मिळू शकतो किंवा अन्यथा बाथरूममध्ये आतील आणि बाहेरील प्लांट्स फिरते ठेवा, ज्यामुळे आठवड्यातून काही वेळा त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकेल.
स्नानगृह सजवण्यासाठी वास्तू टिप्स
बाथरूममध्ये कौटुंबिक फोटो, बुद्धांची मूर्ती, कासव किंवा हत्ती टाळा. एखादी व्यक्ती फुले, झाडे, कुरण इत्यादींचे फोटो टांगू शकते, धबधबे, नद्या किंवा मासे यांचे फोटो प्रदर्शित करू नका. टॉयलेटच्या भिंतीवर समृद्धीची चित्रे लटकवू नका. बाथरूममध्ये खूप मेणबत्त्या ठेवणे टाळा, कारण त्या अग्नि घटक आहे आणि स्नानगृहात त्याच्या उलट घटक आहे – पाणी. बाथरूममध्ये लाल आणि केशरी रंगाच्या सजावटीच्या वस्तू ठेवू नका. बाथरूममध्ये सजावटीसाठी समुद्रातील शंख शिंपले वापरता येतात. बाथरूममध्ये सजावटीचे दिवे वापरताना, अशाप्रकारे आरशाभोवती प्रकाश असावा की आरशावर त्याची एकही चमक असणार नाही. वास्तू नुसार, निसर्गाचा आभास जोडण्यासाठी हिरव्या रंगाची सजावट निवडा – उदाहरणार्थ, हिरवे नॅपकिन्स, टॉवेल, चटई, पडदे इ.
वास्तूनुसार पायऱ्यांखाली स्नानगृह बांधता येईल का?
नेहमी लक्षात ठेवा की वास्तूनुसार, पायऱ्यांखालील भागाचा वापर केवळ स्टोरेजसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे बांधकाम करताना हे लक्षात घ्या की, पायऱ्यांखाली स्नानगृह कधीही बांधू नये. घरमालकांनी बाथरूमच्या या काही अत्यावश्यक वास्तु टिपा लक्षात ठेवल्या पाहिजेत.
सामान्य प्रश्न (FAQs)
वास्तुनुसार स्नानगृह कोठे असावे?
घरामधील स्नानगृह उत्तर किंवा वायव्य (उत्तर-पश्चिम) भागात असणे आवश्यक आहे.
वास्तुनुसार स्नानगृहाचा रंग कोणता असावा?
स्नानगृहात गडद रंग टाळा. वास्तुशास्त्रानुसार हलका खाकी (बेज) आणि राखाडी (क्रीम) सारखे हलके रंग स्नानगृहासाठी योग्य आहेत.
वास्तुनुसार बाथरूममध्ये बादलीचा रंग काय असावा?
बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवा कारण ती वास्तूनुसार शुभेच्छा आणते. तसेच, बादली पाण्याने भरलेली ठेवा.
(स्नेहा शेरॉन मॅमेन आणि पौर्णिमा गोस्वामी शर्मा यांच्या माहितीसह)