महा डीबीटी शिष्यवृत्ती 2022: ही माहिती असलीच पाहिजे

या लेखात, आपण महाराष्ट्र थेट लाभ हस्तांतरण (महा डीबीटी) शिष्यवृत्ती 2022-23 कार्यक्रमाशी निगडीत माहिती जसे की, महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी, नोंदणीसाठी आवश्यक दस्तावेज आणि शिष्यवृत्ती अर्ज अंतीम तारखेची माहिती पाहणार आहोत

महाराष्ट्र थेट लाभ हस्तांतरण (महा डीबीटी- डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) शिष्यवृत्ती हा राज्य सरकारचा एक उपयुक्त कार्यक्रम आहे.  ज्यांना शैक्षणिक शुल्क देणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे https://mahaDBTmahait.gov.in/login/login या महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून  शिष्यवृत्ती देण्यात येते.  विद्यार्थ्यांच्या प्रकार आणि श्रेणीनुसार विविध प्रकारच्या महा डीबीटी शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी जे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हे पोर्टल म्हणजे एका छताखाली सर्व उत्तरे मिळण्याचे ठिकाण आहे.  या पोर्टलमुळे, महाराष्ट्र सरकारच्या संबंधित कार्यालयात न जाताच विद्यार्थ्यांना सहजपणे शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.  महा डीबीटी पोर्टल इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे.

Table of Contents

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

हे देखील पहा: Bonafide certificate meaning (बोनाफाईड सर्टीफिकेटचा अर्थ) 

महा डीबीटी शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट 

शिक्षणासाठी पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत देऊ करणे हे महा डीबीटी शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आहे.  या माध्यमातून शिक्षणात पडणारा खंड (शालाबाह्य मुलांची समस्या) कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.    

महा डीबीटी शिष्यवृत्ती: शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती योजना 

विभाग महा डीबीटी शिष्यवृत्ती
सामाजिक न्याय आणि विशेष

सहाय्य विभाग

  • भारत सरकार शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती  
  • शालांत परिक्षोत्तर शिकवणी आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप) 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमात (कोर्स) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता 
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
  • अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती 
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती  
आदिवासी विकास विभाग 
  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना (भारत सरकार) 
  • आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप
  • व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती 
  • व्यावसायिक प्रशिक्षण देखभाल भत्ता
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती 
उच्च शिक्षण संचालनालय  
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सहाय्यासाठी शिष्यवृत्ती- कनिष्ठ पातळी 
  • माजी सैनिकांच्या मुलांना शिक्षणात सवलत 
  • एकलव्य शिष्यवृत्ती
  • राज्य सरकार खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
  • गणित/ भौतिकशास्त्र विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती 
  • शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती 
  • राज्य सरकार दक्षिणा अधिछात्र शिष्यवृत्ती
  • शासकीय संशोधन अधिछात्र
  • स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलत 
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
  • गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती – वरिष्ठ पातळी 
  • डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (डीएचई))
तंत्रशिक्षण संचालनालय
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) 
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (डीटीई)· 
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग 
  • कनिष्ठ महाविद्यालयातील खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती 
  • आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती 
ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी कल्याण विभाग 
  • व्हीजेएनटी (विमुक्त जाती आणि भटक्या जमाती) विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
  • व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्क
  • व्यावसायिक अभ्यासक्रमातील आणि व्यावसायिक महाविद्यालाशी संलग्न वसतीगृहात राहणाऱ्या व्हीजेएनटी आणि एसबीसी (विशेष मागास प्रवर्ग) विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता 
  • व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील 11 वी आणि 12 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती 
  • ओबीसी (इतर मागास वर्ग) विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
  • एसबीसी विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
  • ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्क
  • एसबीसी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्क 
  • ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी कल्याण विभागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती 
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय 
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल भत्ता
  • वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील एसईबीसी (सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग) आणि ईडब्ल्यूएस (अर्थिक दुर्बल गट) आरक्षणामुळे प्रभावित झालेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती  
अल्पसंख्यांक विकास विभाग 
  • राज्य अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती भाग 2 (डीएचई)
  • उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (डीटीई)  
  • उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती  (डीएमईआर) 
कला संचालनालय 
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) 
  • डॉ. पंजाबराव देशमुख  वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (डीओए) 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी)  
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (एजीआर)  
एमएएफएसयु (महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ) नागपूर
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती (ईबीसी)
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (एमएएफएसयु) 
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग 
  • सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती 

स्रोत: MahaDBT

उपलब्ध असलेल्या विविध शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी  https://mahaDBTmahait.gov.in/login/login या संकेतस्थळावर जाऊन ‘शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती’ टॅब वर क्लिक करा.  तुमच्या गरजांना अनुरूप अशा योजनेवर क्लिक केल्यावर तुम्हाला महा डीबीटी संबंधित महा डीबीटी शिष्यवृत्ती 2020-21, अंतिम तारीख इ. सर्व तपशील मिळू शकतील.  

हे ही बघा: Swami Vivekananda Scholarship (स्वामी विवेकानंद शिष्यवृत्तीसंबंधी) संपूर्ण माहिती 

उदाहरणार्थ, जर तुम्ही ‘सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग’ या शिर्षकाखाली सूचीबद्ध असलेल्या ‘भारत सरकार शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती’ वर क्लिक केल्यास पुढचे पान उघडेल आणि तुम्हाला महा डीबीटी शिष्यवृत्ती एकंदर माहिती, फायदे, पात्रता आणि नूतनीकरण धोरण, आवश्यक कागदपत्रे इ. बाबतची तपशीलवार माहिती मिळेल.  

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

तुम्हाला ‘अर्ज करण्यासाठी लॉगिन’ (लॉगिन टू अप्लाय) बटणही दिसेल.  तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही या बटणावर क्लिक करू शकता.  याचप्रकारे, या पानावर सूचीबद्ध केलेल्या एमएसबीटीई शिष्यवृत्तीसारख्या कोणत्याही शिष्यवृतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता.   

महा डीबीटी शिष्यवृत्ती: विविध विभागाअंतर्गत येणाऱ्या शिष्यवृतींसाठी पात्रता निकष 

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता 

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
भारत सरकार शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती
  • वार्षिक उत्पन्न रु. 2,50,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  •  विद्यार्थी अनुसूचित जाती (एससी) किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.  
  • विद्यार्थी एसएससी किंवा समतुल्य शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • केवळ दोनच व्यावसायिक अभ्यासक्रम (कोर्सेस) करण्याची परवानगी मिळेल
  • विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षेत नापास झाल्यास त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल.  दुसऱ्यांदा नापास झालेल्या विद्यार्थ्याला भत्ता मिळणार नाही. 
  • महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थी शिक्षण घेत असला तरीही त्याला भारत सरकारच्या नियमानुसार तेच नियम लागू होतील. 
शालांत परिक्षोत्तर शिकवणी आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप) 
  • वार्षिक उत्पन्न रु. 2,50,000 पेक्षा जास्त असावे. 
  • विद्यार्थी एससी किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.  
  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
  • विद्यार्थी एसएससी किंवा समतुल्य शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. 
  • संस्था महाराष्ट्रात असावी आणि ती सरकारमान्य असावी. 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ सीएपी फेरीतूनच प्रवेश मिळेल. 
  • संपूर्ण अभ्यासक्रमात केवळ एकदाच अनुत्तीर्ण होण्याची परवानगी मिळेल.
व्यावसायिक अभ्यासक्रमात सहभागी विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता   
  • विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला असला पाहिजे. 
  • विद्यार्थी हा भारत सरकारअंतर्गत शिष्यवृत्तीधारक असला पाहिजे.   
  • वार्षिक उत्पन्न हे रु. 2.5 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे.  उत्पन्नाची मर्यादा ही भारत सरकारच्या  शिष्यवृत्ती योजनेनुसार म्हणजे असेल म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे रु. 2.5 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे.   
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसूचित जातीचा असला (एससी) पाहिजे.
  • या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नाही. 
  • विद्यार्थी 11 वी किंवा 12 वी इयत्तेमध्ये असणे गरजेचे आहे. 
  • विद्यार्थ्यांना 10 वी इयत्तेत 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असले पाहिजेत. 
अपंग व्यक्तींसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती 
  • विद्यार्थी अपंग (40 टक्के किंवा जास्त) आणि महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. 
  • महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील मान्यताप्राप्त संस्थेत शिक्षण घेणारा असला पाहिजे. 
  • अभ्यासक्रम अर्धवट सोडलेल्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू होणार नाही. 
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक (एचएससी)/शालांत (एसएससी)/ पदवी या निकषांवर अर्ज केला असल्यास दोन वेळा शिष्यवृत्ती लागू होणार नाही, म्हणजे अभ्यासक्रमासाठी केवळ एकदाच परवानगी आहे. 
  • जर विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर असेल आणि जर त्याला संस्थेबाहेर काम करण्याची परवानगी नसेल तरच तो पात्र असेल.  
  • ज्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम अर्धवट सोडून दिला असेल आणि व्यासायिक अभ्यासक्रम, तांत्रिक शिक्षण प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवीसाठी अर्ज केला असेल, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती लागू आहे. ‘ए’ गट वगळता, जर उमेदवार शिष्यवृत्तीत अनुत्तीर्ण झाला तर त्याला शिष्यवृत्ती लागू होणार नाही. 
  • या योजनेनुसार उमेदवार केवळ शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात  आणि त्यांना इतर योजनेसाठी अर्ज करण्याची परवानगी नाही.    
  • पूर्ण वेळ नोकरी करणारा उमेदवार पात्र असणार नाही.  
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती 
  • उमेदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.  
  • शासकीय कौशल्य विकास संस्थेतील किंवा खासगी संस्थेत्तील पीपीपी योजनेअंतर्गत नोंदणी आणि केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार प्रवेश घेतलेला असावा.
  • डीजीटी, नवी दिल्ली किंवा एमएससीव्हीटी मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. 
  • व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
  • विद्यार्थी अनुसूचित जा त (एससी) प्रवर्गातील असला पाहिजे आणि त्याचे जात प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे. 
  • एकूण कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लाख. 
  • अनाथ उमेदवारांनी शिफारस पत्र देणे गरजेचे आहे.  
  • ही शिष्यवृत्ती घ्यायची असल्यास, सरकारी किंवा खासगी आयटीआयमधून करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा.    
  • राज्य/ केंद्र सरकार/ विभाग/स्थानिक संस्था /कंपनी किंवा कॉर्पोरेशनने प्रायोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवाराने कोणतेही लाभ घेतलेले असता कामा नये. 
  • शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने, उपस्थितीमध्ये अनियमित असल्याने शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसल्यास उमेदवाराला शिष्यवृत्ती नाकारण्यात येईल. 

स्रोत : MahaDBT

आदिवासी विकास विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता निकष  

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती  योजना (भारत सरकार)
  • केवळ अनुसूचित जमातींनाच (एसटी) लागू.
  • कौटुंबिक उत्पन्न रु. 2.5 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे.  
  • किमान शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण. 
  • लागोपाठ दोन वर्षांचा खंड पडल्यास महा डीबीटी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची परवानगी मिळणार नाही. 
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप)  
  • केवळ अनुसूचित जमातींनाच (एसटी) लागू. 
  • कौटुंबिक उत्पन्न रु. 2.5 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे.  
  • विद्यार्थी मागील वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असले पाहिजेत. 
  • विद्यार्थी कोणत्याही वर्षी अनुत्तीर्ण झाल्यास त्या वर्षासाठीची  शिष्यवृत्ती देण्यात येणार नाही. 
व्यावसायिक शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती 
  • केवळ अनुसूचित जमातींनाच (एसटी) लागू. 
  • कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु. 2.5 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे. 
व्यावसायिक शिक्षण देखभाल भत्ता 
  • केवळ अनुसूचित जमातींनाच (एसटी)लागू 
  • वार्षिक रु. 2,50,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळेल.  कौटुंबिक उत्पन्न रु. 2,50,000 पेक्षा जास्त असेल आणि विद्यार्थी मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तरच त्याला फ्रीशिप नूतनीकरण पॉलिसीचा मिळेल  
  • विद्यार्थी कोणत्याही वर्षी अनुत्तीर्ण झाल्यास त्या वर्षासाठीची  शिष्यवृत्ती देण्यात येणार नाही
अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती
  • विद्यार्थी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असला पाहि. जे. 
  • महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • शालांत परीक्षा उत्तीर्ण (एसएससी) आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. 
  • शासकीय कौशल्य विकास संस्थेतील किंवा खासगी संस्थेत्तील पीपीपी  योजनेअंतर्गत नोंदणी आणि केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार प्रवेश घेतलेला असावा. 
  • व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्यांना शुल्काची प्रतिपूर्ती केली जाणार नाही. 
  • संपूर्ण कुटुंबाचे एकूण उत्पन्न गृहीत धरण्यात येईल. 
  • विद्यार्थ्याने यापूर्वी सरकारी किंवा खासगी आयटीआयमधून करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणताही लाभ घेतलेला नसावा. 
  • शिष्यवृत्तीचा लाभ केवळ दोन मुलांनाच लागू आहे. 
  • शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण होणे, अपुरी अनुपस्थिती निकष इ. चा परिणाम म्हणून शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसल्यास विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती मिळणार नाही.   

स्रोत:  MahaDBT

हे देखील पहा: सीएससी Mahaonline (महाऑनलाईन) विषयक सर्व तपशील  

उच्च शिक्षण संचालनालयासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती निकष 

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना  
  • उमेदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.  अर्जदार महाराष्ट्र किंवा कर्नाटक राज्यांच्या सीमाभागातील रहिवासी असू शकतो.  
  • कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लाखांपर्यंत.
  • पहिली दोन अपत्ये महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.  
  • सामान्य आणि एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील उमेदवार पात्र असतील. 
  • उमेदवारांनी कोणतीही शिष्यवृत्ती किंवा स्टायपेन्ड (विद्यावेतन) स्वीकारू नये
  • अर्ध-वेळ, आभासी (व्हर्च्युअल) शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. 
  • मान्यता प्राप्त (सरकारी/ विद्यापीठ/ एआयसीटीई, पीसीआय/ सीओए/एमसीआय/एनसीटीई इ. तर्फे) अभ्यासक्रमच महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. 
  • महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असल्यास, उमेदवाराच्या शिक्षणात दोन वर्षांपेक्षा जास्त खंड असता कामा नये आणि उमेदवाराने अभ्यासक्रमादरम्यानच्या प्रत्येक सत्र परीक्षा आणि वार्षिक परीक्षा देणे गरजेचे आहे.   
एएमएस (गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य) शिष्यवृत्ती
  1. एएमएस (गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य) शिष्यवृत्ती (कनिष्ठ पातळी)
  • 11 वी आणि 12 वी इयत्तेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र 
  • नूतनीकरणासाठी: कनिष्ट पातळीतील विद्यार्थ्यांना 55% गुण मिळणे आणि पुढील वर्गात प्रवेश मिळणे आवश्यक  
  • डीएचई मंजुरी पत्र 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी अर्ज करू शकतात. .

2) एएमएस (गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य) शिष्यवृत्ती (वरिष्ठ पातळी)

   12 वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत अव्वल गुण मिळवलेले विद्यार्थी पात्र 

  • नूतनीकरणासाठी: वरिष्ठ पातळीतील मुलांना 65% गुण आणि पुढील वर्गात प्रवेश मिळणे आवश्यक 
  • डीएचई मंजुरी पत्र 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी अर्ज करू शकतात.  
माजी सैनिकांच्या मुलांना शिक्षणात सवलत 

  • माजी सैनिकाचा मुलगा/ मुलगी/पत्नी/विधवा अर्ज करू शकतात. 
  • महा डीबीटी शिष्यवृत्तीची अनुमती ही केवळ सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांसाठीच आहे. 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.  
एकलव्य शिष्यवृत्ती
  • अर्जदार हा कायदा, वाणिज्य आणि कला शाखेतून 60% गुणांनी आणि विज्ञान पदवीधर हा 70% गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.    
  • अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रु. 75,000 इतके किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.  
  • अर्जदाराने हा कोठेही अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ नोकरी करू नये.  
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत. 
राज्य सरकार खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदाराने 12 वी च्या परीक्षेत किमान 60% गुण मिळवलेले असले पाहिजेत. 
  • केवळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि कायदा शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच लागू 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहींत. 
गणित/भौतिकशास्त्र विषयांचा अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती 
  • अर्जदाराने 12 वी इयत्तेत विज्ञान शाखेत 60 टक्के आणि गणित तसेच भौतिकशास्त्रात 60% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.  
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती
  • अर्जदाराला 10 वी इयत्तेत 60% गुण असणे गरजेचे
  • अर्जदार हा केवळ राज्य सरकारी विद्यानिकेतनमधूनच 10 वी इयत्ता उत्तीर्ण असला पाहिजे. 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
राज्य सरकारी दक्षिणा अधिछात्र  शिष्यवृत्ती
  • अर्जदार हा पदवीधर असणे गरजेचे आहे (अकृषी विद्यापीठे) 
  • केवळ सरकारी महाविद्यालये (अ) एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई (आ) विज्ञान संस्था, मुंबई (इ) इस्माईल युसुफ कॉलेज, जोगेश्वरी (ई) सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स (उ) शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई (ऊ) राजाराम कॉलेज, कोल्हापूर (ए) कॉलेज ऑफ सायन्स, नागपूर (ऐ) नागपूर महाविद्यालय, नागपूर (ओ) विदर्भ महाविद्यालय, अमरावती (औ) सरकारी कला आणि विज्ञान कॉलेज, औरंगाबाद आणि मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, कोल्हापूर आणि एसएनडीटी 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही.  
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.  
शासकीय संशोधन अधिछात्र 
  • उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.  
  • अर्जदाराला पदव्युत्तर परीक्षेत 60% गुण असणे गरजेचे आहे.  बी. ए./बी. एससी/ बी. एड. आणि एम ए/ एम. एस एससी/ एम. एड  आणि इतर कोणत्याही पदवीसाठी 60%पेक्षा कमी गुण लागू असतील. 
  • केवळ शासकीय विज्ञान संस्था (मुंबई, नागपूर, औरंगाबाद) आणि शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (अमरावती), वसंतराव नाईक महाविद्यालय कॉलेज (नागपूर), विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये   
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. 
स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शिक्षणात सवलत 
  • विद्यार्थी स्वातंत्र्या सैनिकाचा मुलगा/मुलगी/पत्नी किंवा विधवा असणे गरजेचे आहे. 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.  
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) 

  • जेएनयुमध्ये शिक्षण घेतलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी पात्र.  जेएनयुने ठरवलेल्या फक्त एका विद्यार्थ्यासाठी कोटा उपलब्ध.  
  • पदवीपूर्व आणि पदव्युत्तर (युजी आणि पीजी जेएनयु विद्यार्थी) या योजनेसाठी पात्र असतील. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 

एएमएस (गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य) शिष्यवृत्ती – वरिष्ठ पातळी 
  1. एएमएस (गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य)  शिष्यवृत्तीसाठी  (कनिष्ठ पातळी)
  • 11 वी आणि 12 वी इयत्तेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील. 
  • नूतनीकरणासाठी: कनिष्ट पातळीतील विद्यार्थ्यांना 55% गुण आणि त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणे आवश्यक आहे.   
  • डीएचई मंजुरी पत्र 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
  1.  एएमएस (गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य) शिष्यवृत्ती (वरिष्ठ पातळी) 
  • 11 वी आणि 12 वी इयत्तेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.  
  • नूतनीकरणासाठी: वरिष्ठ पातळीतील विद्यार्थ्यांना 65% गुण आणि त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणे आवश्यक आहे. 
  • डीएचई मंजुरी पत्र  
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (डीएचई)
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, अर्जदार हे नोंदणीकृत कामगाराचे अपत्य, अल्पभूधाराकाचे अपत्य किंवा दोन्ही असणे गरजेचे.  कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. 
  • गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापर्यंत असावे. 
  • अर्जदाराने कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 
  • शासन निर्णयानुसार, महा डीबीटी शिष्यवृत्ती योजना ही केवळ पहिल्या दोन अपत्यांसाठीच लागू असेल. 
  • सामान्य वर्गातील आणि एसईबीसी (सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात. 
  • अर्जदार हा वसतिगृहात (शासकीय/ खासगी वसतिगृह/पेइंग गेस्ट/ भाडेकरू) वास्तव्यास असणे गरजेचे आहे.    
  • अर्जदाराने इतर कोणत्याही निर्वाह भत्त्याचे लाभ घेऊ नयेत. 
  • सरकार/एआयसीटीई, पीसीआय/सीओए/एमसीआय/एनसीटीई/ विद्यापीठातर्फे मंजूर करणायत आलेले अभ्यासक्रमच पात्र असतील. 
  • अभ्यासक्रमादरम्यान, अर्जदाराने दोन वर्षांचा खंड पडू देऊ नये.
  • अर्जदाराने प्रत्येक सत्र परीक्षा देणे गरजेचे. 

स्रोत: MahaDBT

तांत्रिक शिक्षण संचालनालयासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता 

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना  
  • सामान्य वर्गातील आणि एसईबीसी (सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार हा मान्यताप्राप्त संस्थेचा बोनाफाईड विद्यार्थी असणे आणि त्याने व्यावसायिक तसेच तांत्रिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असणे गरजेचे आहे.  
  • डीम्ड विद्यापीठातील आणि खासगी विद्यापीठातील विद्यार्थी पात्र असणार नाहीत.
  • केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या (सीएपी) माध्यमातून अर्ज केला जाणे गरजेचे आहे. 
  • अर्जदाराला इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.   
  • महा डीबीटी शिष्यवृत्ती योजना 2021-22 चा लाभ हा कुटुंबातील केवळ दोनच अपत्यांना मिळू शकतो.  
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. 
  • मागील वर्षाच्या सत्रात अर्जदाराची किमान 50% उपस्थिती आवश्यक आहे. 
  • महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असल्यास उमेदवाराच्या अभ्यासक्रमात दोन वर्षांचा किंवा त्यापेक्षा जास्त खंड असता कामा नये. 
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना   
  • सामान्य वर्गातील आणि एसईबीसी (सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू. 
  • अर्जदार भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.  
  • अर्जदार हा मान्यताप्राप्त संस्थेचा बोनाफाईड विद्यार्थी असणे आणि त्याने व्यावसायिक तसेच तांत्रिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असणे गरजेचे आहे.  
  • डीम्ड विद्यापीठातील आणि खासगी विद्यापीठातील विद्यार्थी पात्र असणार नाहीत.
  • केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या (सीएपी) माध्यमातून अर्ज केला जाणे गरजेचे आहे. 
  • अर्जदाराला इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.   
  • महा डीबीटी शिष्यवृत्ती योजना 2021-22 चा लाभ हा कुटुंबातील केवळ दोनच अपत्यांनाच मिळू शकतो.  
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • मागील वर्षाच्या सत्रात अर्जदाराची किमान 50% उपस्थिती आवश्यक आहे.
  • महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असल्यास उमेदवाराच्या अभ्यासक्रमात दोन वर्षांचा किंवा त्यापेक्षा जास्त खंड असता कामा नये.

स्रोत:  MahaDBT

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
कनिष्ट महाविद्यालयातील खुली गुणवत्ता  शिष्यवृत्ती
  • उमेदवार हा 11 वी किंवा 12 वी इयत्तेमध्ये असणे गरजेचे
  • उमेदवाराला शालांत परीक्षेत (एसएससी) पहिल्या प्रयत्नात किमान 60% गुण प्राप्त असणे गरजेचे.  
  • कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील प्रगतीवर आणि त्यात किमान 50% गुण प्राप्त केले असतील तरच महा डीबीटी शिष्यवृत्ती सुरू राहील. 
  • सर्व श्रेणीतील लाभार्थी उमेदवार अर्ज करू शकतात.  
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता  शिष्यवृत्तीs 
  • उमेदवारांनी शालांत (एसएससी) परीक्षेत किमान 50% गुण प्राप्त केले असणे गरजेचे 
  • जे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात परीक्षा उतीर्ण झाले आहेत, त्यांना महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.  

स्रोत:  MahaDBT

ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी कल्याण विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता 

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
व्हीजेएनटी (विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती 
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रु. 1.5 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे. 
  • व्हीजेएनटी (विमुक्त जाती आणि भटक्या जमाती) प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
  • 10 वी नंतर (पोस्ट मॅट्रिक) सरकारतर्फे मंजूर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात अर्जदारांनी सहभागी होणे आवश्यक  
  • अर्जदार उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास त्यांना देखभाल भत्ता आणि परीक्षा शुल्क देण्यात येते.  अर्जदार जर एखाद्या वर्षी अनुत्तीर्ण झाले तर त्या विशिष्ट वर्षासाठी त्यांना शिकवणी शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता देण्यात येईल; परंतु, ते उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात जाईपर्यंत त्यांना इतर कोणतेही लाभ मिळू शकणार नाहीत.  
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्जदारांची सीएपी फेरीतून निवड होणे गरजेचे आहे. 
  • मुलींचा अपवाद वगळता (कितीही महिला अर्जदार करू शकतात)  महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ केवळ दोन मुलांनाच (मुलगे) घेता येऊ शकतो. 
  • ज्या तारखेपासून उमेदवार इतर कोणतीही शिष्यवृत्ती/ स्टायपेन्ड (विद्यावेतन) स्वीकारतील, तेव्हापासून त्यांना या योजनेअंतर्गत  शिष्यवृत्ती मिळणार नाही.  
  • चालू वर्षासाठी 75% उपस्थिती बंधनकारक आहे. 
  • अर्जदारांनी गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून त्या ऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास ते शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्र असतील; परंतु, जर त्यांनी विरुद्ध निर्णय घेतला तर त्यांची पात्रता संपुष्टात येईल.  
  • अर्जदारांचा एक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती/फ्रीशिप सुरू राहील.  उदाहरणार्थ, 11 वी, 12 वी, बी. ए. एम. ए. एम. फील. पीएच. डी.  

जर उमेदवारांनी बी. ए. आणि बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नंतर एम. ए. साठी प्रवेश घेतला तर त्यांना  शिष्यवृत्ती/फ्रीशिपची परवानगी मिळणार नाही.  पण व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्याने जर त्यांनी बी. एड. नंतर एम. बी. ए. मध्ये प्रवेश घेतला तर ते शिष्यवृत्ती/फ्रीशिपसाठी पात्र असतील.  

  • एखाद्या विशिष्ट व्यावसायिक/गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात जर एखादा अर्जदार शिकत असेल आणि या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रीशिपचा लाभ घेत असेल आणि शैक्षणिक वर्षाच्या मध्यात सुरू असणारा अभ्यासक्रम बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना लाभ घेता येणार नाही.   
व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्क 
  • अर्जदाराने शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेतले असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार हा व्हीजेएनटी प्रवार्गातेला असणे गरजेचे आहे.
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने सरकारी अनुदानित/खासगी विना-अनुदानित/खासगी कायमस्वरूपी विना-अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन शालांत परिक्षोत्तर  अभ्यासक्रमासाठी सरकारने मंजूर केलेला शैक्षणिक अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे.
  • आरोग्य विज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रम: जर अर्जदारांनी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेच्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून किंवा सरकारी सामान्य प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून प्रवेश घेतला असेल तर ते फ्रीशिप साठी पात्र असतील.  
  • उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागाच्या बाबतीत, तंत्रज्ञान शिक्षण/ तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) असलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांना /सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांना तसेच सरकारी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना फ्रीशिप लागू असेल.
  • कृषी, पशु संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विभाग:  खासगी विनाअनुदानित/कायस्वरूपी विनाअनुदानित संस्थेमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या अर्जदारांना शिष्यवृत्ती शुल्क लागू असेल.  
  • बी. एड. आणि डी. एड. अभ्यासक्रम:  डी. एड. आणि बी. एड. अभ्यासक्रमांसाठी 100% लाभ (शिकवणी आणि परीक्षा शुल्क) मिळतील.  डी. एड., बी. एड. अभ्यासक्रमांसाठी अनुदानित, विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  याच अभ्यासक्रमासाठी सरकारी दरानुसार शुल्क रचना लागू होईल.    
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, अर्जदाराने सीएपीच्या माध्यमातून प्रवेश घेणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदार एखाद्या वर्षात अनुत्तीर्ण झाले, तर त्यांना त्या विशिष्ट वर्षासाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्क मिळू शकेल, पण ते उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात जाईपर्यंत त्यांना इतर लाभ मिळणार नाहीत.  
  • जर अर्जदारांनी गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील; मात्र त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते पात्र असणार नाहीत. 
  • खासगी विनाअनुदानित/कायमस्वरूपी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमात 2015-16 सालानंतर शिक्षण घेणारे अर्जदार जर शैक्षणिक वर्षात दोन किंवा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाले तर ते फ्रीशिपसाठी पात्र असणार नाहीत.   
  • अर्जदारांनी अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत महा डीबीटी शिष्यवृत्ती/फ्रीशिप सुरू राहील.  
  • व्यावसायिक/गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले जे अर्जदार त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रीशिपचा लाभ घेत आहेत, त्यांनी सुरू असलेला शैक्षणिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच बदलला तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही.   
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या वसतिगृहात रहात आहेत अशा व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता 
  • अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार हा व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.  
  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्जदार पात्र असले पाहिजेत. 
  • अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रु. 1 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदाराने शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज सादर करणे गरजेचे आहे. 
  • अर्जदारांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेल्यास ते देखभाल भत्ता मिळवण्यासाठी पात्र असणार नाहीत. 
  • अर्जदारांनी व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या वसतिगृहात रहाणे किंवा खोल्या शिल्लक नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.   
  • शासकीय आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी आपण अर्ज सादर केल्याचे आणि पात्र असूनही तेथे प्रवेश न मिळाल्याचे प्रमाणपत्र वसतीगृहाबाहेर रहाणाऱ्या अर्जदारांनी सादर करणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास, त्यांना त्या वर्षाचा देखभाल भत्ता मिळेल. त्यांनतर मात्र ते उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात जात नाहीत तोपर्यंत त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.  
  • अर्जदारांनी गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील मात्र त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते पात्र असणार नाहीत  
  • अर्जदारांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांची शिष्यवृत्ती/ फ्रीशिप सुरू राहील. 
व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील 11 वी आणि 12 वी इयत्तेमधील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता  शिष्यवृत्ती 
  • अर्जदार हे विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार हे कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी आणि 12 वीत असणे गरजेचे आहे.
  • महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट नाही. .
  • अर्जदारांनी 10 वी इयत्तेमध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले असले पाहिजेत.
  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्तीबरोबरच शिष्यवृत्ती लाभ घेता येऊ शकतो.
  • या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्षात खंड पडू देण्याची परवानगी नाही. 
  • अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती 
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रु. 1.5 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.  
  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदारांनी 10 वी नंतर (पोस्ट मॅट्रिक) सरकारमान्य अभ्यासक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.  
  • अर्जदार शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्या वर्षासाठी शिकवणी, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल; परंतु ते उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जाईपर्यंत त्यांना लाभ मिळणार नाही.    
  • अर्जदारांनी केवळ सीएपी फेरीच्या माध्यमातूनच व्यावसायिक अभ्यासक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. 
  • महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी कितीही मुलींना अर्ज करण्याची परवानगी आहे; परंतु एका पालकाची केवळ दोनचे मुले (मुलगे) या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. 
  • ज्या तारखेपासून उमेदवार इतर कोणतीही शिष्यवृत्ती/ स्टायपेन्ड (विद्यावेतन) स्वीकारतील, तेव्हापासून त्यांना या योजनेअंतर्गत  शिष्यवृत्ती मिळणार नाही.  
  • चालू वर्षासाठी 75% उपस्थिती बंधनकारक आहे. 
  • अर्जदारांनी गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील मात्र त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते पात्र असणार नाहीत. 
  • अर्जदार अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत त्यांची शिष्यवृत्ती/फ्रीशिप सुरू राहील.
  • व्यावसायिक/गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले जे अर्जदार त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रीशिपचा लाभ घेत आहेत, त्यांनी सुरू असलेला शैक्षणिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच बदलला तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही.    
एसबीसी विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती 
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रु. 1.5 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.   
  • अर्जदार हे एसबीसी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • शालांत परीक्षेनंतर (पोस्ट मॅट्रिक) सरकारतर्फे मंजूर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात अर्जदारांनी सहभागी होणे आवश्यक आहे. 
  • अर्जदार शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास, त्यांना त्या वर्षाचा देखभाल भत्ता मिळेल. त्यांनतर मात्र ते उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात जात नाहीत तोपर्यंत त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. 
  • अर्जदारांनी केवळ सीएपी फेरीच्या माध्यमातूनच व्यावसायिक अभ्यासक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. 
  • महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी कितीही मुलींना अर्ज करण्याची परवानगी आहे; परंतु एका पालकाची केवळ दोनचे मुले (मुलगे) या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. 
  • ज्या तारखेपासून उमेदवार इतर कोणतीही शिष्यवृत्ती/ स्टायपेन्ड (विद्यावेतन) स्वीकारतील, तेव्हापासून त्यांना या योजनेअंतर्गत  शिष्यवृत्ती मिळणार नाही.  
  • चालू वर्षासाठी 75% उपस्थिती बंधनकारक आहे. 
  • अर्जदारांनी गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून त्या ऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास ते शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्र असतील; परंतु, जर त्यांनी विरुद्ध निर्णय घेतला तर त्यांची पात्रता संपुष्टात येईल.  
  • अर्जदार अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत त्यांची शिष्यवृत्ती/फ्रीशिप सुरू राहील.
  • व्यावसायिक/गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले जे अर्जदार त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रीशिपचा लाभ घेत आहेत, त्यांनी सुरू असलेला शैक्षणिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच बदलला तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही.    
ओबीसी विद्यार्थ्यांना शिकवणी आणि परीक्षा शुल्क 
  • अर्जदाराने 10 वी पर्यंतचे (शालांत परीक्षा) शिक्षण घेतलेले असले पाहिजे.
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदारांनी 10 वी नंतर (पोस्ट मॅट्रिक) सरकारमान्य अभ्यासक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.  
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदारांनी सरकारी-अनुदानित/खासगी विनाअनुदानित/खासगी कायमस्वरूपी विनाअनुदानित अभ्यासक्रमात प्रवेश घेणे गरजेचे आहे. 
  • आरोग्य विज्ञान (वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, फिजीओथेरपी, व्यवसाय सहाय्य, नर्सिंग) अभ्यासक्रमातील पदवी: जर अर्जदारांनी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेच्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून किंवा सरकारी सामान्य प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून प्रवेश घेतला असेल तर ते फ्रीशिप साठी पात्र असतील.
  • उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभाग: तंत्रज्ञान शिक्षण/ तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) असलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांना /सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांना तसेच सरकारी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना फ्रीशिप लागू असेल.  या योजनेसाठी पात्र असणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- 
  • डिप्लोमा- अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी (हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान) 
  • पदवी- अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी (हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान)
  • पदव्युत्तर- एमबीए/एमएमएस, एमसीए
  • कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विभाग- खासगी विनाअनुदानित/कायस्वरूपी विनाअनुदानित संस्थेमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या अर्जदारांना महा डीबीटी शिष्यवृत्ती शुल्क लागू असेल.  
  • कृषी महाविद्यालये (डिप्लोमा)
  • दुग्ध व्यवसाय विभाग (डिप्लोमा) 
  • कृषी महाविद्यालये आणि संबंधित विषय (पदवी आणि पदव्युत्तर) 
  • कृषी आणि जैवतंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर) 
  • कृषी आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर) 
  • बी. एड. आणि डी. एड. अभ्यासक्रम: डी. एड. आणि बी. एड. अभ्यासक्रमांसाठी 100% लाभ (शिकवणी आणि परीक्षा शुल्क) मिळतील.  डी. एड., बी. एड. अभ्यासक्रमांसाठी अनुदानित, विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  याच अभ्यासक्रमासाठी सरकारी दरानुसार शुल्क रचना लागू होईल. 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, अर्जदारांनी सीएपी फेरीतून प्रवेश घेणे गरजेचे आहे.    
  • अर्जदार शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्या वर्षासाठी शिकवणी, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल; परंतु ते उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जाईपर्यंत त्यांना लाभ मिळणार नाही.
  • जर अर्जदारांनी गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील; मात्र त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते पात्र असणार नाहीत. 
  • खासगी विनाअनुदानित/कायमस्वरूपी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमात 2015-16 सालानंतर शिक्षण घेणारे अर्जदार जर शैक्षणिक वर्षात दोन किंवा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाले तर तो/ती अर्जदार फ्रीशिपसाठी पात्र असणार नाहीत.   
  • व्यावसायिक/गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले जे अर्जदार त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रीशिपचा लाभ घेत आहेत, त्यांनी सुरू असलेला शैक्षणिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच बदलला तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही.  
  • अर्जदारांनी अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत महा डीबीटी शिष्यवृत्ती/फ्रीशिप सुरू राहील.   
एसबीसी विद्यार्थ्यांन शिकवणी आणि परीक्षा शुल्क 
  • अर्जदारांनी शालांत परिक्षोत्तर अभ्यासक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.  
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार एसबीसी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.  
  • अर्जदारांनी 10 वी नंतर (पोस्ट मॅट्रिक) सरकारमान्य अभ्यासक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.  
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदारांनी सरकारी-अनुदानित/खासगी विनाअनुदानित/खासगी कायमस्वरूपी विनाअनुदानित अभ्यासक्रमात प्रवेश घेणे गरजेचे आहे. 
  • आरोग्य विज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रम: जर अर्जदारांनी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेच्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून किंवा सरकारी सामान्य प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून प्रवेश घेतला असेल तर ते फ्रीशिप साठी पात्र असतील.
  • उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभाग: तंत्रज्ञान शिक्षण/ तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) असलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांना /सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांना तसेच सरकारी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना फ्रीशिप लागू असेल. या योजनेसाठी पात्र असणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- 
  • डिप्लोमा- अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी (हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान) 
  • पदवी- अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी (हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान)
  • पदव्युत्तर- एमबीए/एमएमएस, एमसीए
  • कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विभाग- खासगी विनाअनुदानित/कायस्वरूपी विनाअनुदानित संस्थेमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या अर्जदारांना महा डीबीटी शिष्यवृत्ती शुल्क लागू असेल.  
  • कृषी महाविद्यालये (डिप्लोमा)
  • दुग्ध व्यवसाय विभाग (डिप्लोमा) 
  • कृषी महाविद्यालये आणि संबंधित विषय (पदवी आणि पदव्युत्तर) 
  • कृषी आणि जैवतंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर) 
  • कृषी आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर) 
  • बी. एड. आणि डी. एड. अभ्यासक्रम: डी. एड. आणि बी. एड. अभ्यासक्रमांसाठी 100% लाभ (शिकवणी आणि परीक्षा शुल्क) मिळतील.  डी. एड., बी. एड. अभ्यासक्रमांसाठी अनुदानित, विनाअनुदानित संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  याच अभ्यासक्रमासाठी सरकारी दरानुसार शुल्क रचना लागू होईल. 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, अर्जदारांनी सीएपी फेरीतून प्रवेश घेणे गरजेचे आहे.    
  • अर्जदार शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्या वर्षासाठी शिकवणी, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल; परंतु ते उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जाईपर्यंत त्यांना लाभ मिळणार नाही.
  • जर अर्जदारांनी गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील; मात्र त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास ते पात्र असणार नाहीत. 
  • खासगी विनाअनुदानित/कायमस्वरूपी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमात 2015-16 सालानंतर शिक्षण घेणारे अर्जदार जर शैक्षणिक वर्षात दोन किंवा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाले तर तो/ती अर्जदार फ्रीशिपसाठी पात्र असणार नाहीत.   
  • व्यावसायिक/गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले जे अर्जदार त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रीशिपचा लाभ घेत आहेत, त्यांनी सुरू असलेला शैक्षणिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच बदलला तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही.  
  • अर्जदारांनी अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत महा डीबीटी शिष्यवृत्ती/फ्रीशिप सुरू राहील.
ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी कल्याण विभागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती
  • शासकीय कौशल्य विकास संस्थेतील किंवा खासगी संस्थेत्तील पीपीपी योजनेअंतर्गत नोंदणी आणि केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार प्रवेश घेतलेला असावा. 
  • व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्यांना शुल्काची प्रतिपूर्ती केली जाणार नाही.
  • विद्यार्थी ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील असणे आणि त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. 
  • एकूण कौटुंबिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपर्यंत मर्यादित असणे गरजेचे आहे. 
  • अनाथ उमेदवारांनी शिफारस पत्र आणणे गरजेचे आहे. 
  • ही शिष्यवृत्ती घ्यायची असल्यास, उमेदवाराने सरकारी किंवा खासगी आयटीआयमधून केलेल्या अभ्यासक्रमासाठी किंवा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा.   
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • नवी दिल्लीतील डीजीटी किंवा एमएससीव्हीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश आवश्यक.
  • महा डीबीटी शिष्यवृत्ती ही केवळ दोनच अपत्यांसाठी लागू आहे.  
  • उपस्थिती निकष बंधनकारक आहेत. 
  • उमेदवारांनी सर्व सत्र परीक्षा देणे गरजेचे आहे. 
  • अनुत्तीर्ण होणे, अपुरी उपस्थिती इ. मुळे शैक्षणिक प्रगती असमाधानकारक असल्यास प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.   

स्रोत: MahaDBT

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय विभागासाठी महा डिबीटी शिष्यवृत्ती पात्रता 

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना 
  • एमबीबीएस/बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. 
  •  सामान्य श्रेणीतील आणि एसईबीसी उमेदवार प्रवेशासाठी पात्र आहेत. 
डॉ,. पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल भत्ता 
  • सरकारी अनुदानित/कॉर्पोरेशन/खासगी विनाअनुदानित महाविद्यालयातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बी. एससी. नर्सिंग, बीयुएमएस, बीपी आणि ओ, बीएएसएलपी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे.  
  • ज्यांचे पालक अल्पभूधारक/शेतकरी/नोंदणीकृत कामगार आहेत, असे अर्जदार पात्र. 
  • रु. 1,00,000 किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलांना वसतिगृह देखभाल भत्ता:  मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसाठी रु. 3,000 प्रती वर्ष आणि इतर ठिकाणांसाठी रु. 2000 प्रती वर्ष (शैक्षणिक वर्षात 10 महिन्यांसाठी)  
  • ज्यांचे पालक अल्पभूधारक, शेतकरी/ नोंदणीकृत कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह देखभाल भत्ता: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसाठी रु. 30,000 प्रती वर्ष आणि इतर ठिकाणांसाठी रु. 20,000 प्रती वर्ष. (एका शैक्षणिक वर्षात 10 महिन्यांसाठी) 
  • व्यवस्थापन कोट्यातून/संस्थेच्या पातळीवर प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना महा एमबीटी शिष्यवृत्ती  लागू होणार नाही. 
  • मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणी येथील वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू.  
  • सामान्य श्रेणीतील आणि एसईबीसी श्रेणीतील उमेदवार पात्र. 
वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे प्रभावित झालेल्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती 
  • अर्जदार हा खुल्या वर्गातील असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने सीएपीच्या माध्यमातून प्रवेश घेणे गरजेचे आहे. 
  • व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्यांना महा डीबीटी  शिष्यवृत्ती लागू होणार नाही.
  • या महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पनाची कोणतीही मर्यादा नाही. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे .
  • डीम्ड विद्यापीठातील विद्यार्थी या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत. 
  • अभ्यासक्रमादरम्यान अर्जदाराने दोन वर्षांपेक्षा जास्त खंड पडू देऊ नये.
  • अनुत्तीर्ण होणे, गैरवर्तन किंवा अनियमित उपस्थितीमुळे अपात्र ठरविण्यात येऊ शकते.  असे उमेदवार पात्र असणार नाहीत.  

स्रोत: MahaDBT

अल्पसंख्यांक विकास विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
राज्य अल्पसंख्याक शिष्यवृत्ती भाग 2  (डीएचई)
  • पदवी आणि पदव्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतात. 

(कला/वाणिज्य/विज्ञान/कायदा/शिक्षण) 

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • उत्पन्न मर्यादा रु. 8 लाख. 
  • केवळ 2,000 अर्जदारांसाठी (नव्या) कोटा प्रदान करण्यात येईल.  
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे महाराष्ट्रीयन विद्यार्थी या महा डीबीटी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.  
उच्च व्यावसायिक शिक्षण/12 वी (एच. एस. सी.) नंतरचे सर्व अभ्यासक्रम (भाग 1 {(तांत्रिक अभ्यासक्रम (डीटीई)} घेणाऱ्या राज्य अल्पसंख्यांक समुदायासाठी शिष्यवृत्ती योजना 
  • अर्जदार भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदाराने महाराष्ट्रातून शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. 
  • जीआरमध्ये नमूद केल्यानुसार, अर्जदार हा संस्थेचा बोनाफाईड विद्यार्थी असला पाहिजे आणि व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमात प्रवेश (डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर) 
  • सीएपी/संस्थेच्या पातळीवर उमेदवारांना प्रवेश दिला गेला पाहिजे. 
  • अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/ स्टायपेन्डचा (विद्यावेतन) लाभ घेता कामा नये. 
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. 
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात सहभागी असलेल्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (डीएमईआर) 
  • एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी आणि ओ, बी. एससी., नर्सिंग, ए. एससी. नर्सिंग, बीपीएमटी, ऑप्थॅलमिक असिस्टंट, ऑप्टोमेट्री, पीबी बी. एससी. नर्सिंग आणि नाशिक येथील आरोग्य विज्ञान, महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी
  • वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे.  
  • सीईटी/स्पर्धात्मक परीक्षा/एचएससीपरीक्षेतील गुणांच्या आधारावर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.  · 
  • 30% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणारे उमेदवार पात्र असतील मात्र अर्जदार 15 वर्षे महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • विशिष्ट अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या शिष्यवृत्तीची लक्ष्यित रक्कम प्राप्त न झाल्यास, इतर अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा त्यात समावेश करता येऊ शकतो.  
  • जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असेल तर त्याने पुढील कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे- 
  • संस्था मान्यताप्राप्त असल्याचे प्राधिकरणाचे पत्र 
  • एफआरएची प्रत 
  • चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनाफाईड  

स्रोत: MahaDBT

कला विभाग संचालनालयासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता  

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमा भागात रहाणारे उमेदवार महा डीबीट शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. 
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लाखापर्यंत
  • सरकारच्या ठरावानुसार, केवळ पहिली दोनच अपत्ये या योजनेसाठी पात्र आहेत.  
  • सामान्य श्रेणीतून प्रवेश घेतलेले उमेदवार पात्र आहेत. 
  • अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा किंवा स्टायपेन्डचा (विद्यावेतन) लाभ घेऊ नये. 
  • अर्जदारांनी दूरस्थ शिक्षण, आभासी शिक्षण आणि अर्ध-वेळ अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असेल तर ते पात्र असणार नाहीत. 
  • अभ्यासक्रमादरम्यान, उमेदवाराने दोन वर्षांचा खंड पडू देऊ नये. 
  • अर्जदाराने प्रत्येक सत्र परीक्षा देणे गरजेचे आहे. 
डॉ. पंजाबराव देशमुख  वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (डीओए) 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे .
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, अर्जदार हे नोंदणीकृत कामगाराचे अपत्य, अल्पभूधाराकाचे अपत्य किंवा दोन्ही असणे गरजेचे.  कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • अर्जदाराने कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. 
  • केवळ पहिली दोन अपत्येच महा डीबीटी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. 
  • सामान्य श्रेणीअंतर्गत प्रवेश घेतलेले उमेदवारच पात्र असतील.
  • अर्जदार हा वसतिगृहात रहाणारा असला पाहिजे.  (शासकीय/खासगी वसतिगृह/पेइंग गेस्ट/भाडेकरू) 
  • अर्जदाराने इतर कोणत्याही निर्वाह भत्ता लाभ घेऊ नये.
  • अभ्यासक्रमादरम्यान, उमेदवाराने दोन वर्षांचा खंड पडू देऊ नये. 
  • अर्जदाराने प्रत्येक सत्र परीक्षा देणे गरजेचे आहे.

स्रोत:  MahaDBT

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी)  

  • अर्जदार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. 
  • तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • सामान्य आणि एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. 
  • 14 जानेवारी 2010 च्या जीआरनुसार उमेदवार हा संस्थेचा बोनाफाईड विद्यार्थी असणे आणि त्याने व्यावसायिक, गैर-व्यावसायिक आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमात (डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे. 
  • डीम्ड आणि खासगी विद्यापीठातील उमेदवार पात्र असणार नाहीत. 
  • सीएपीच्या माध्यमातून अर्जदाराने प्रवेश घेणे गरजेचे आहे. 
  • अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा/स्टायपेन्डचा (विद्यावेतन) लाभ घेता कामा नये. 
  • कुटुंबातील केवळ दोनच मुलांना हे लाभ घेण्याची परवानगी आहे. 
  • एकूण कौटुंबिक उत्पन्न हे रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • मागच्या सत्रात उमेदवाराची उपस्थिती किमान 50% असणे गरजेचे आहे.  (महाविद्यालयातील नवे प्रवेश वगळता) 
  • अभ्यासक्रमदरम्यान, उमेदवाराकडून दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्षांचा खंड पडता कामा नये.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना  
  • उमेदार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • सामान्य आणि एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. 
  • जीआरमध्ये नमूद केल्यानुसार, उमेदवार संस्थेचा बोनाफाईड विद्यार्थी असणे आणि त्याने व्यावसायिक आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमात (डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेणे गरजेचे आहे. 
  • डीम्ड आणि खासगी विद्यापीठातील विद्यार्थी महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाहीत.  
  • केंद्रीकृत प्रवेश प्रक्रीयेच्या (सीएपी) माध्यमातून उमेदवाराने प्रवेश घेतला असणे गरजेचे आहे.  
  • उमेदवाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/स्टायपेन्डचा (विद्यावेतन) लाभ घेता कामा नये.
  • एकाच कुटुंबातील केवळ दोनच अपत्यांना हे लाभ घेण्याची परवानगी आहे. 
  • एकूण कौटुंबिक उत्पन्न हे रु. 8 लाखापेक्षा जास्त असता कामा नये. 
  • मागील सत्रात उमेदवाराची किमान 50% उपस्थिती असणे गरजेचे आहे.  (महाविद्यालयातील नवे प्रवेश वगळता)
  • अभ्यासक्रमादरम्यान, उमेदवाराच्या शिक्षणात दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्षांचा खंड पडता कामा नये. 

स्रोत: MahaDBT

एमएएफएसयु नागपूर विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती पात्रता 

शिष्यवृत्तीचे नाव पात्रता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 
  • उमेदवार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. 
  • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • सामान्य श्रेणीअंतर्गत प्रवेश घेतलेले उमेदवार या महा डीबीटीसाठी पात्र आहेत.  
  • जीआरमध्ये नमूद केल्यानुसार, उमेदवार संस्थेचा बोनाफाईड विद्यार्थी असणे आणि व्यावसायिक आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी (पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे. 
  • डीम्ड आणि खासगी विद्यापीठांसाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती लागू असणार नाही.    
  • केंद्रीकृत प्रवेश प्रक्रीयेच्या (सीएपी) माध्यमातून उमेदवाराने प्रवेश घेणे गरजेचे आहे. 
  • उमेदवाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा/ स्टायपेन्डचा (विद्यावेतन) लाभ घेता कामा नये. 
  • कुटुंबातील केवळ दोनच अपत्यांना महा डीबीटी योजनेचा लाभ घेण्याची परवानगी आहे. 
  • कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे रु. 8 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. 
  • मागील सत्रात किमान 50% उपस्थिती असणे महत्त्वाचे आहे.  (महाविद्यालयातील नवे प्रवेश वगळता)
  • अभ्यासक्रमादरम्यान, उमेदवाराने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ खंड पडू देऊ नये. 
  • उमेदवाराने प्रत्येक सत्राची परीक्षा देणे गरजेचे आहे. 
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना  
  • अर्जदार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • सामान्य श्रेणीअंतर्गत प्रवेश घेतलेले उमेदवार या महा डीबीटी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील
  • जीआरमध्ये नमूद केल्यानुसार, उमेदवार संस्थेचा बोनाफाईड विद्यार्थी असणे आणि व्यावसायिक आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी (पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे. 
  • डीम्ड आणि खासगी विद्यापीठांसाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती लागू असणार नाही.    
  • केंद्रीकृत प्रवेश प्रक्रीयेच्या (सीएपी) माध्यमातून उमेदवाराने प्रवेश घेणे गरजेचे आहे. 
  • उमेदवाराने इतर कोणत्याही देखभाल भत्त्याचा लाभ घेता कामा नये. 
  • कुटुंबातील केवळ दोनच अपत्यांना महा डीबीटी योजनेचा लाभ घेण्याची परवानगी आहे. 
  • कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे रु. 6 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. 
  • उमेदवार हे नोंदणीकृत कामगाराचे किंवा अल्पभूधारक किंवा दोन्हीचे अपत्य असणे गरजेचे आहे.  
  • मागील सत्रात किमान 50% उपस्थिती असणे महत्त्वाचे आहे.  (महाविद्यालयातील नवे प्रवेश वगळता)
  • अभ्यासक्रमादरम्यान, उमेदवाराने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ खंड पडू देऊ नये. 
  • उमेदवाराने वसतिगृहात रहाणे गरजेचे आहे. 
  • उमेदवाराने इतर कोणत्याही योजनेतून देखभाल भत्त्याचा लाभ घेऊ नये.  
  • उमेदवाराने प्रत्येक सत्राची परीक्षा देणे गरजेचे आहे. 

स्रोत:  MahaDBT

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती 

शिष्यवृत्तीचे नाव  पात्रता 
 
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आणि खुल्या गटातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती  

  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पीपीपी योजनेअंतर्गत आणि केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेच्या माध्यमातून प्रवेश पार पडले पाहिजेत.  
  • व्यवस्थापन कोट्यातून झालेल्या प्रवेशासाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती मिळू शकणार नाही.  
  • खुल्या आणि ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) वर्गातील अर्जदार सहभागी होऊ शकतात.
  • कुटुंबाचे एकूण उत्पन्न लक्षात घेतले जाईल. 
  • अनाथ विद्यार्थ्यांनी शिफारस पत्र सादर करणे गरजेचे आहे.
  • अभ्यासक्रमासाठी किंवा इतर कोणत्याही प्रायोजित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्जदाराने कोणतेही लाभ घेता कामा नये. 
  • महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे.
  • नवी दिल्लीतील डीजीटी किंवा एमएससीव्हीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र. 
  • केवळ दोनच मुलांसाठी महा डीबीटी शिष्यवृत्ती लागू असेल. 
  • उपस्थिती निकष बंधनकारक आहे.  
  • उमेदवाराने प्रत्येक सत्र परीक्षा देणे गरजेचे आहे. 
  • शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण होणे, अनियमित उपस्थिती इ. कारणांमुळे उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येईल.  

स्रोत:  MahaDBT

महा डीबीटी शिष्यवृत्ती: आवश्यक कागदपत्रे 

महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.   शिष्यवृत्तीच्या निकषांनुसार कागदपत्रे सादर करावीत. 

  • अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र 
  • डोमिसाईल प्रमाणपत्र 
  • जात प्रमाणपत्र 
  • जात वैधता प्रमाणपत्र 
  • सर्वात नव्या परीक्षेची गुणपत्रिका 
  • एसएससी/ एचएससी गुणपत्रिका 
  • महाविद्यालयातील प्रवेशाची पावती 
  • वसतिगृह प्रमाणपत्र 
  • सीएपी फेरी वाटप प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • अपंगत्व प्रमाणपत्र 
  • बँक खात्याचा तपशील
  • रहिवासी पुरावा आणि मोबाईल क्रमांक 
  • जन्माचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटोग्राफ

महा डीबीटी शिष्यवृत्ती: ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, महा डीबीटी शिष्यवृत्तीच्या https://mahaDBTmahait.gov.in/Home/Index या   संकेतस्थळाला भेट देऊन पानाच्या वरच्या उजव्या भागातील ‘नवीन अर्जदार नोंदणीकरण’ वर क्लिक करावे. 

अर्जदाराचे नाव, वापरकर्त्याचे नाव (युजरनेम), पासवर्ड, पासवर्डची पुष्टी (कन्फर्म पासवर्ड), ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक इ. तपशील भरून नोंदणी करा. पडताळणीसाठी तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.  पडताळणी करण्यासाठी ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अशा दोन्ही ठिकाणी पाठवण्यात ओटीपी पाठवण्यात येईल.  पडताळणी झाल्यावर, महा डीबीटीच्या संकेतस्थळावर तुम्ही यशस्वीरीत्या नोंदणी पूर्ण होईल. 

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

या नंतरचा टप्पा म्हणजे, वापरकर्त्याचे नाव (युजर आयडी), पासवर्ड आणि कॅपचा वापरून लॉगिन करणे.  नव्या नोंदणीकरणाचे पान उघडल्यावर तुम्हाला आधार कार्डची माहिती विचारण्यात येईल.  महा डीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाची गरज असते, हे लक्षात घ्या.  म्हणून, महा डीबीटी पोर्टलवरील तुमच्या युजर आयडीसोबत तुमचे आधार कार्ड प्राधान्याने जोडणे गरजेचे आहे.  

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know 

युजर आयडी आणि आधार कार्ड लिंक झाल्यावर योजना निवडा.  महा डीबीटीसाठी अर्ज भरा, आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि महा डीबीटी शिष्यवृत्ती अर्ज सादर करा.  भविष्यातील संदर्भासाठी याची प्रिंट आऊट काढून ठेवा.  

महा डीबीटी शिष्यवृत्ती: उमेदवाराचे लॉगिन 

महा डीबीटी संकेतस्थळावरील अर्जदार लॉगिनसाठी ‘पोस्ट मॅट्रिकशिष्यवृत्ती’ (शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती) लिंकवर क्लिक करा.

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

अर्जदाराने लॉगिनवर क्लिक केल्यावर खाली दाखवण्यात आलेले पान उघडेल.  तुमचे युजरनेम आणि पासवर्ड घाला.  या नंतर तुम्ही महा डीबीटी संकेतस्थळ बघू शकता. 

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

महा डीबीटी शिष्यवृत्ती: संस्था/विभाग/डीडीओ लॉगिन

 https://mahadbtmahait.gov.in/Home/Index  या संकेतस्थळावर जाऊन ‘संस्था/विभाग/डीडीओ’ लॉगीनवर क्लिक करा.  तुम्हाला पुढचे पान उघडलेले दिसेल.

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

महा डीबीटी शिष्यवृत्ती: तक्रार निवारण 

महा डीबीटीशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या संकेतस्थळावर जाऊन तक्रार/सूचना या ठिकाणी क्लिक करा.  खाली दाखवल्यानुसार एक पान उघडेल.  या पानावर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल-आयडी, जिल्हा, तालुका, विभाग, योजनेचे नाव, श्रेणी, तक्रार/सूचना प्रकार, शैक्षणिक वर्ष आणि तुमची टिप्पणी इ. तपशील  भरावा लागेल.  तुमच्या तक्रारीची पुष्टी करणारे स्क्रीनशॉट्स अपलोड करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे.  कॅप्चा एन्टर करून सबमिट बटण दाबा.  

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know 

महा डीबीटी डाऊनलोड मार्गदर्शकतत्त्वे आणि नियम 

https://mahadbtmahait.gov.in/Home/Index  या संकेतस्थळावर जाऊन पानावर खालच्या डाव्या बाजूला असलेल्या ‘मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम’ वर क्लिक करा.  हे पान पीडीएफ स्वरूपात उघडेल.  त्यात एमएसबीटीई शिष्यवृत्ती नियम नमूद आहेत आणि ते डाऊनलोड करता येतात  आणि वाचता येतात.  मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नव्याने पुन्हा एकदा डीबीटी शिष्यवृत्ती 2020-21 साठी अर्ज करण्याचा पर्याय आहे.   

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

महा डीबीटी शिष्यवृत्ती: महाविद्यालयांची यादी डाऊनलोड करा 

https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या संकेतस्थळावर जाऊन ‘मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम’च्या खाली पानाच्या डाव्या बाजूला असलेल्या ‘कॉलेजची यादी डाऊनलोड करा’ वर क्लिक करा.  तुम्हाला एक्सेल स्वरूपात सर्व कॉलेजेसची यादी दिसेल.  ती तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल आणि तुम्हाला वाचता येईल.

MahaDBT Scholarship 2022: Everything you should know

महा डीबीटी संपर्क माहिती 

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता- 

महा डीबीटी हेल्पलाईन क्रमांक – 022-49150800 किंवा चीफ मिनिस्टर हेल्पलाईन (24×7) टोल फ्री क्रमांक – 1800 120 8040

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशावास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशा
  • आपण सावलीची पाल कशी स्थापित कराल?
  • लोणावळ्यात भेट देण्यासाठी 17 सर्वोत्तम पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या इतर गोष्टीलोणावळ्यात भेट देण्यासाठी 17 सर्वोत्तम पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या इतर गोष्टी
  • घरासाठी मुख्य प्रवेशद्वार वास्तु टिपाघरासाठी मुख्य प्रवेशद्वार वास्तु टिपा
  • मिगसन ग्रुप यमुना एक्स्प्रेस वेवर 4 व्यावसायिक प्रकल्प विकसित करणार आहे
  • रिअल इस्टेट करंट सेंटिमेंट इंडेक्स स्कोअर Q1 2024 मध्ये 72 वर गेला: अहवाल