वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशा

रात्रीची गुणवत्तापूर्ण झोप सुनिश्चित करण्यासाठी आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी आम्ही वास्तुशास्त्राने शिफारस केलेल्या झोपेच्या सर्वोत्तम दिशा पाहतो. आम्ही उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वास्तुनुसार झोपण्याची योग्य दिशा स्पष्ट करतो.

एका नविन दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक होण्यासाठी तुमची रात्रीची पुरेशी झोप होणे शरीरासाठी आवश्यक आहे.

Table of Contents

रात्रीच्या शांत झोपेची खात्री करण्यासाठी, तुमची शयनकक्ष कशी संरचित (डिझाइन) केली आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे, तर, तुम्ही झोपण्यासाठी कुठली दिशा, म्हणजे तुमचा चेहरा कुठल्या दिशेला असणार हे तपासणे देखील आवश्यक आहे. वास्तुशास्त्राची प्राचीन प्रणाली झोपेच्या सर्वोत्तम दिशेसाठी ज्याचा एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो अशा काही नियमांची शिफारस करते.

 

झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशानिर्देश: मुख्य तथ्ये

वास्तुनुसार झोपण्याची उत्तम दिशा दक्षिण
वैज्ञानिकदृष्ट्या झोपण्याची सर्वोत्तम दिशा दक्षिण
झोपण्याची दिशा जी टाळली पाहिजे उत्तर
विवाहित जोडप्यांसाठी झोपेची सर्वोत्तम दिशा दक्षिण किंवा नैऋत्य
विद्यार्थ्यांसाठी झोपेची सर्वोत्तम दिशा पूर्व
झोपताना दक्षिणेकडे तोंड करण्याचे विविध फायदे रक्तदाब कमी करते, चिंता कमी करते, शांत झोपेला प्रोत्साहन देते, संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते
मास्टर बेडरूमसाठी सर्वोत्तम दिशा नैऋत्य
जागे होण्याची सर्वोत्तम वेळ ब्रह्म मुहूर्तामध्ये जो सूर्योदयापूर्वीचा शुभ काळ असतो

 

झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशा

Best direction to sleep as per Vastu Shastra and scientifically

 

झोपण्याची सर्वोत्तम दिशा: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा जाणून घ्या

वास्तूनुसार सर्वोत्तम झोपेची स्थिती निश्चित केल्याने व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील वाढेल. तथापि, वेगवेगळ्या गोलार्धांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी नियम वेगळे असू शकतात. तर, आदर्श वास्तू झोपण्याच्या स्थितीचा पृथ्वीच्या चुंबकीय आकर्षणाशी थेट संबंध असू शकतो.

हे देखील पहा: वास्तूनुसार भिंतीवरच्या घड्याळाची दिशा

 

उत्तर गोलार्धात दिशा झोपण्याची उत्तम दिशा

सर्वप्रथम, आपल्या आरोग्यावर चुंबकीय क्षेत्र आणि विद्युत चुंबकीय ऊर्जा यांचा प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे. पृथ्वी आणि मानवी शरीर दोघांनाही चुंबकीय ध्रुव आहेत. आपल्या ग्रहावर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे चुंबकीय ध्रुव आहेत, ज्यात उत्तरेकाधील धन ध्रुव आणि दक्षिणेला ऋन ध्रुव आहे. पृथ्वीच्या चुंबकीय आकर्षणामुळे, उत्तरेसारख्या दिशेने झोपल्याने दोन सकारात्मक ध्रुव एकमेकांना मागे ढकलत असतात.

वास्तू तत्त्वांनुसार, झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व आणि दक्षिण दिशा आहे जेणेकरून डोके पूर्व किंवा दक्षिणेकडे असेल तर पाय पश्चिम किंवा उत्तरेकडे निर्देशित करा. झोपण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे.

जर तुम्ही उत्तर गोलार्धात असाल तर झोपण्यासाठी या आदर्श दिशा आहेत. अशाप्रकारे, चांगल्या उर्जा प्रवाहाला प्रोत्साहन देणारे आणि दर्जेदार झोपेची खात्री देणारे पलंग अशा प्रकारे संरेखित करणे आवश्यक आहे.

हे देखील पहा: चांगल्या झोपेसाठी तुमच्या बेडरूममध्ये हे पाच बदल करा

 

दक्षिण गोलार्धात झोपण्याची सर्वोत्तम दिशा

वास्तुशास्त्रानुसार झोपेची सर्वोत्तम दिशा, तुम्ही कोणत्या गोलार्धात राहता यावर अवलंबून असेल. जर तुम्ही दक्षिण गोलार्धात रहात असाल तर चुंबकीय क्षेत्राचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. तर, वास्तूनुसार, या गोलार्धात असल्यास कोणत्या दिशेला झोपावे? दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला डोके ठेवून झोपता येते.

अशा प्रकारे, वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण गोलार्धासाठी झोपण्याची उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेची शिफारस केली जाते.

 

फेंगशुईनुसार झोपण्याची दिशा आणि पलंगाची जागा

वास्तुशास्त्र आणि फेंगशुई नुसार, पलंग कोणत्याही डोक्यावातील तुळईखाली किंवा खिडक्यांसह इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तूंच्या खाली ठेवू नये, ज्यामुळे ऊर्जा प्रवाहात अडथळा येतो. पलंग थेट भिंतीसमोर ठेवावा जेणेकरून दरवाजा दिसत असेल परंतु सरळ रेषेत नसेल. हे तुम्हाला फेंगशुईनुसार कमांड पोझिशनमध्ये ठेवते आणि तुम्हाला झोपेची सर्वोत्तम दिशा देते. पाय दाराकडे नसावेत.

पौर्वात्य औषधांवर आधारित झोपेची दिशा: फेंग शुई टिपा

पौर्वात्य वैद्यक तत्त्वानुसार, शांत झोपेला चालना देण्यासाठी योग्य झोपेची शिफारस केली जाते. वास्तुशास्त्राप्रमाणेच, फेंग शुईने ची म्हणून ओळखल्या जाणार्‍या सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाला तुमची सहमती होण्यासाठी जागा आणि वस्तूंची मांडणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

शयनकक्षाचे डिझाइन

शयनकक्षात झोपण्याच्या योग्य दिशेला तोंड असावे हे सुनिश्चित करताना, खोलीच्या डिझाइनकडे लक्ष द्या. बेडरूममध्ये सकारात्मक ऊर्जेच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी, खोली पसाऱ्यापासून मुक्त ठेवा.

फेंगशुईनुसार, कलाकृती, वनस्पती आणि पडदे यासारख्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा शा ची कॅप्चर करण्याची आणि त्यांचे सकारात्मक ऊर्जा किंवा ची मध्ये रूपांतर करण्याची क्षमता असते. झाडे बेडरूममध्ये शांत ऊर्जा आणतात आणि तणाव दूर करण्यात मदत करतात.

वास्तुशास्त्रानुसार, रंगसंगती अशा प्रकारे निवडली पाहिजे की ती तीन प्रकारच्या दोषांना संबोधित करते – वात, पित्त आणि कफ, जे विविध नैसर्गिक घटकांचे प्रतिनिधित्व करतात.

  • वात दोष असलेल्यांसाठी हिरवा आणि पिवळा रंग आदर्श आहे.
  • पित्त दोष (अग्नी आणि पाणी) साठी निळ्या आणि हिरव्या रंगाचे संयोजन योग्य आहे.
  • लाल आणि जांभळ्या रंगाची थीम कफ दोष (पृथ्वी आणि पाणी) साठी योग्य आहे.

त्यामुळे, वास्तूनुसार झोपण्याच्या योग्य स्थितीची खात्री करण्याबरोबरच, सकारात्मक स्पंदनांना चालना देण्यासाठी तुम्ही खोलीच्या रंगसंगतीमध्ये योग्य बदल करू शकता.

बेडरूममध्ये रंगाचा एक ताजा थर द्या

वास्तुशास्त्र आणि फेंगशुईच्या मते, काही रंग योजना बेडरूमच्या विशिष्ट दिशांमध्ये विशिष्ट ऊर्जा सुलभ करण्यासाठी चांगले कार्य करतात.

फेंग शुई शयनकक्षामधील दिशेच्या आधारावर खालील रंगांची शिफारस करते: 

दिशा घटक रंगसंगती महत्त्व
पूर्व लाकूड हिरवा कुटुंब, आरोग्य आणि वाढ
पश्चिम धातू सफेद किंवा राखाडी सर्जनशीलता आणि मुले
उत्तर पाणी काळा किंवा निळा करिअर आणि जीवन मार्ग
दक्षिण आग लाल शक्ती, कीर्ती आणि प्रतिष्ठा

 

हे रंग सामावून घेण्यासाठी आणि त्यांचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही शयनकक्षात अॅसेंट वॉल (दर्शनी भिंत) डिझाइन करणे निवडू शकता.

पलंगाची जागा

फेंगशुईच्या तत्त्वांनुसार, पलंग थेट भिंतीला लागून ठेवावा. खिडकीखाली बेड ठेवू नका.

फेंगशुईनुसार, पलंग ठेवण्याची आदर्श जागा हि शयनकक्षाच्या दरवाजाच्या विरुद्ध दिशेच्या असलेल्या  भिंतीला लागून आहे, ज्यामुळे तेथून दरवाजा थेट दिसत असेल आणि परंतु त्याच्या सरळ रेषेत नसेल. याचा अर्थ पलंग आदर्श स्थितीत ठेवला जातो ज्यामुळे तो कुणालाही सशक्त बनवतो आणि ज्यामुळे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते. जर पलंग विरुद्ध दिशेच्या भिंतीजवळ ठेवता येत नसेल, तर एक आरसा वापरा ज्याच्यामुळे तुम्हाला दरवाजा त्यातून दिसू शकेल.

 

झोपण्याची सर्वोत्तम दिशा: शास्त्रीयदृष्ट्या कोणत्या दिशेला झोपावे?

काही वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे, असे आढळून आले आहे की मानव पृथ्वीवरील विद्युत चुंबकीय उर्जेबद्दल संवेदनशील असू शकतो. दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपताना, असे आढळून आले आहे की रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो आणि झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होते.

दुसरीकडे, उत्तर दिशेला डोके ठेवून झोपल्याने चुंबकीय पुलामुळे मेंदूवर दबाव पडून शरीरावर परिणाम होतो. डोके उत्तर ध्रुवाप्रमाणे कार्य करते, त्यामुळे झोपताना उत्तरेकडे तोंड करण्याची शिफारस केलेली नाही. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, सहभागींच्या जेव्हा कृत्रिमरीत्या तयार केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आले होते, तेव्हा त्यांच्या मेंदूच्या लहरींमध्ये बदल दिसून आले होते. जे दर्शविते की मानव पृथ्वीच्या चुंबकीय उर्जेबद्दल संवेदनशील असू शकतो.

अशा प्रकारे, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेता, झोपण्यासाठी दक्षिण दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे.

पुढे, झोपेची चांगली गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी, वैज्ञानिकदृष्ट्या कोणती दिशा झोपेसाठी चांगली आहे हे जाणून घेतले पाहिजे. तज्ञांचे म्हणणे आहे की विशिष्ट चिंता असलेल्या लोकांसाठी काही झोपण्याच्या स्थितीची शिफारस केली जाते. उदाहरणार्थ, ज्यांना पाठदुखी किंवा मानदुखी आहे त्यांच्यासाठी एका अंगावर (बाजूच्या स्थितीत) झोपणे योग्य आहे.

आयुर्वेदात देखील, डाव्या बाजूला झोपण्याची शिफारस केली जाते कारण यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि शरीराचे कार्य सुधारते. वास्तूनुसार कोणत्या बाजूला झोपायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. येथे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तुम्ही झोपण्यासाठी आरामदायक स्थिती सुनिश्चित करता, तुम्ही झोपण्यासाठी वास्तूने शिफारस केलेली दिशा लक्षात ठेवा.

मग, भारतात शास्त्रीयदृष्ट्या कोणत्या दिशेला झोपायचे? उत्तर गोलार्धात झोपण्याच्या योग्य दिशेचा विचार केला पाहिजे, जी पूर्व किंवा दक्षिण दिशा आहे.

हे सिद्धांत वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत. इतर दिशांच्या तुलनेत दक्षिण दिशेला झोपल्याने अनेक फायदे होतात. एखाद्याचे डोके उत्तर ध्रुवासारखे काम करत असल्याने, उत्तरेकडे तोंड करून झोपल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शिवाय, योग्य स्थितीत झोपल्याने डोळ्यांच्या जलद हालचालीच्या झोपेच्या टप्प्यावर लवकर पोहोचण्यात मदत होते, जे सुधारित संज्ञानात्मक कार्यांसाठी महत्त्वाचे आहे.

तसेच, झोपेची सर्वोत्तम दिशा ही भूचुंबकीय हस्तक्षेपास प्रतिबंध करते. वास्तुशास्त्रानुसार, निसर्गातील पाच घटक, भिन्न दिशा आणि उर्जा क्षेत्रे यांचा वापर करून अनुकूल सेटिंग साध्य करणे, ज्यामुळे आरोग्य, आर्थिक आणि एकूणच स्वास्थ्य आणि प्रसन्नता सुधारणे यावर लक्ष केंद्रित केले जाते.

 

वास्तूमध्ये झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व का आहे?

पूर्व ही उगवत्या सूर्याची दिशा आहे आणि ती ध्यान आणि इतर आध्यात्मिक कार्यांसाठी चांगली आहे असे मानले जाते. आपले डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिमेकडे ठेवून झोपल्याने चांगली झोप येते. झोपण्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे कारण ती स्मरणशक्ती आणि एकाग्रतेची पातळी सुधारते. यामुळे विद्यार्थ्यांसाठी देखील याची शिफारस केली जाते. मुलांच्या खोलीतील बेड पूर्व दिशेकडे तोंड करून त्यांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देणे देखील महत्त्वाचे आहे.

आपला ग्रह हा  पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. या दिशेने वाहणाऱ्या लहरी सकारात्मक असतात आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. हे आयुर्वेदात सांगितलेल्या तीन दोषांना, वात, पित्त आणि कफ, संतुलित करते. त्यामुळे पूर्व दिशेला झोपण्याची दिशा हि उत्तम दिशा मानली जाते.

हे देखील पहा: मुलांच्या शिक्षणासाठी आणि वाढीसाठी वास्तु टिप्स

 

झोपण्याची सर्वोत्तम दिशा दक्षिण का आहे?

वास्तूमध्ये आपले डोके दक्षिण दिशेकडे आणि पाय उत्तरेकडे ठेवून झोपण्याची शिफारस केली जाते. दक्षिण दिशेला तोंड करून झोपण्याचे काही फायदे येथे आहेत.

  • हे शांत झोपेला प्रोत्साहन देते आणि भरपूर आरोग्य लाभ देते. चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांतानुसार, या दिशेने झोपल्याने झोपेत शांतता वाढेल.
  • दक्षिण दिशा मृत्यूची देवता यमाची दिशा आहे. वास्तूनुसार, या दिशेने झोपणे गाढ झोपेला प्रोत्साहन देते ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, ज्यामध्ये रक्तदाब कमी करणे आणि झोपेची कमतरता आणि चिंताग्रस्त समस्या दूर करणे समाविष्ट आहे.
  • संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी झोपण्याची ही सर्वोत्तम दिशा आहे.
  • दक्षिण दिशेला झोपल्याने चेतापेशी संवाद साधू शकतात आणि टवटवीत होतात. म्हणून, यामुळे मेंदूचे कार्य सुनिश्चित निरोगी राहते. तसेच यामुळे नैराश्यातही मदत होते.

हे देखील पहा: दक्षिणाभिमुख घरासाठी वास्तू बद्दल सर्वकाही

 

झोपण्यासाठी टाळण्यायोग्य दिशा

पश्चिमेकडे डोके ठेवून झोपण्याचे परिणाम

वास्तूनुसार पश्चिम ही झोपण्यासाठी शिफारस केलेली वास्तु दिशा नाही. पश्चिम दिशेकडे डोके ठेवून झोपल्याने अस्वस्थता वाढते आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काहीवेळा, अतिथींच्या शयनकक्षांची रचना पश्चिमेकडे तोंड करून केली जाते.

तर, पश्चिम दिशा झोपण्यासाठी चांगली आहे का? सामान्यपणे उत्तर नाही.

या दिशेला झोपणे प्रत्येकासाठी फायदेशीर असू शकत नाही. तथापि, ते एखाद्या व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. त्यामुळे, वास्तूनुसार, तुम्ही यशाच्या शोधात असाल तर या दिशेला झोपल्याने कोणतेही नकारात्मक परिणाम होणार नाहीत. यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

उत्तरेकडे डोके ठेवून झोपण्याचे परिणाम

वास्तूनुसार झोपण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम नाही. त्यामुळे उत्तर दिशेला डोके ठेवून झोपणे टाळावे. पृथ्वीच्या चुंबकीय ऊर्जेचा प्रभाव पाहता, या दिशेला झोपल्याने रक्तदाबात फरक पडू शकतो आणि हृदयाला रक्त पंप करणे कठीण होऊ शकते. खाली वाहणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या तुलनेत मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्यांची केसांसारखी सुरेख व्यवस्था असते. असे मानले जाते की काही प्रकरणांमध्ये, रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. तसेच, रक्तामध्ये लोह असते आणि उत्तरेकडे झोपताना या लोहला चुंबकीय आकर्षण मिळते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. उत्तर दिशेकडे झोपल्याने रक्त परिसंचरण विस्कळीत होऊ शकते आणि डोकेदुखीसह आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

संशोधनानुसार, काही लोक जे उत्तर-दक्षिण स्थितीत झोपतात त्यांना प्रत्येक डोळ्याच्या जलद हालचाली (REM) मध्ये जास्त वेळ लागू शकतो, हा असा झोपेचा टप्पा आहे जो संज्ञानात्मक कार्य, भावनिक कल्याण आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. दुसरीकडे, जे पूर्व-पश्चिम स्थितीत झोपलेले असतात ते आरईएम टप्प्यात लवकर प्रवेश करतात.

 

जोडप्यांसाठी झोपेची सर्वोत्तम दिशा

जोडप्यांसाठी बेडरूमची रचना करताना काही वास्तू नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पलंगाची स्थिती दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम भागात ठेवण्याची शिफारस केली जाते. पुढे, वास्तूनुसार, सुखी वैवाहिक संबंध वाढवण्यासाठी पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे. जोडप्यांसाठी झोपण्याची सर्वोत्तम दिशा म्हणजे त्यांचे डोके दक्षिण, दक्षिण-पूर्व किंवा नैऋत्य दिशेला असते. झोपताना दरवाजाकडे तोंड करू नये किंवा कोणत्याही डोक्यावरील तुळईखाली झोपू नये.

तसेच, ऊर्जा प्रवाहात अडथळा आणणारी आणि नातेसंबंधाशी संबंधित नसलेली कोणतीही वस्तू काढून टाका. उदाहरणार्थ, बेडरूममध्ये संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची शिफारस केलेली नाही. त्याऐवजी एखादी व्यक्ती हत्तीच्या पुतळ्यांसारख्या नातेसंबंधांना चालना देणाऱ्या वस्तू ठेवू शकते. जोडप्यांना झोपण्याची सर्वोत्तम दिशा ठरवताना वरील काही मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत.

गर्भवती महिलांसाठी झोपेची आदर्श स्थिती म्हणजे डाव्या बाजूवर झोपणे कारण यामुळे हृदय, गर्भ, गर्भाशय आणि मूत्रपिंड यांच्यातील रक्तप्रवाह सुधारतो. डाव्या बाजूला झोपण्याच्या स्थितीमुळे यकृतावरील दबाव देखील कमी होतो.

 

मास्टर बेडरूममध्ये झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशा

वास्तुशास्त्रात शिफारस केल्यानुसार, झोपेची सर्वोत्तम दिशा पूर्व किंवा दक्षिण दिशा आहे, कारण ती शांत आणि शांत झोपेला प्रोत्साहन देते.

त्यानुसार मास्टर बेडरूम वास्तू शास्त्र नियमानुसार घराच्या नैऋत्य भागात मास्टर बेडरूम बनवावी. मास्टर बेडरूमची रचना करताना वास्तुमध्ये सांगितल्याप्रमाणे झोपण्याच्या योग्य दिशेचे भान ठेवायला हवे. पलंगाचा डोक्याकडचा भाग दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असल्याची खात्री करा, जेणेकरून तुम्ही झोपत असताना तुमचे पाय उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असतील. पलंगाच्या डोक्याकडच्या भागात कुठलीही डोक्यावरील तुळई किंवा खिडकी नसावी, कारण यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

हे देखील पहा: जिना वास्तू बद्दल सर्व माहिती

 

आयुर्वेदानुसार झोपेची दिशा आणि त्याचे परिणाम

वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद ही एक प्राचीन आणि वैद्यकशास्त्राची पर्यायी प्रणाली आहे, तसेच आरोग्याच्या फायद्यांना चालना देण्यासाठी झोपेची सर्वोत्तम दिशा सुनिश्चित करण्याला महत्त्व देते.

आयुर्वेदानुसार, चांगले आरोग्य आणि संपूर्ण स्वास्थ्य सुनिश्चित करण्यासाठी डाव्या बाजूला झोपणे आवश्यक आहे. सहज श्वासोच्छवासाला चालना देण्यासाठी, रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि हृदयावरील दबाव कमी करण्यासाठी या दिशेने झोपावे. एका बाजूला झोपणे ही झोपेची आदर्श दिशा आहे कारण यामुळे शरीरातील प्राण किंवा प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो. पोटावर झोपणे टाळा.

आयुर्वेदानुसार, बाजूला झोपल्याने उजव्या नाकपुडी किंवा सूर्य नाडी आणि डाव्या नाकपुडी किंवा चंद्रनाडी सक्रिय होते. त्यामुळे हे सुनिश्चित करते की शरीराच्या पेशी जागृत अवस्थेत राहतात आणि शरीर आणि मनाला संरक्षण प्रदान करताना दैवी चेतनेशी संरेखित होतात. पोटावर झोपणे टाळा.

काही लोकांसाठी, पश्चिम ही साधारणपणे झोपण्याची दिशा असू शकते. तथापि, वास्तूनुसार, ते तीन गुण, दोष किंवा गुणधर्म (सत्त्व, रजस आणि तम) मधील रजस गुण देखील वाढवू शकते. ज्यांना वातदोष आहे, त्यांना चिंता आणि थंड हात यांसारख्या समस्या आहेत त्यांनी झोपताना डोके दक्षिण किंवा आग्नेय दिशेला ठेवावे. हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

 

झोपण्याची दिशा आणि अनुसरण करण्यासाठी उपयुक्त टिपा

वास्तुशास्त्र शांत झोप सुनिश्चित करण्यासाठी आदर्श झोपेची दिशा निश्चित करण्यावर भर देते. त्याचप्रमाणे, फेंग शुई, प्राचीन चिनी प्रथा, देखील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाह सुधारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे मांडतात. जी ची म्हणूनही ओळखळी जाते ती सकारात्मक ऊर्जा, बेडरूम आणि त्यातील विविध घटकांच्या योग्य व्यवस्थेद्वारे वाढवता येते. झोपण्याची योग्य स्थिती आणि दिशा सुनिश्चित करताना येथे काही उपयुक्त टिपा देत आहोत.

  1. फेंगशुईनुसार, पलंग भिंतीला लाव्बून किंवा खिडकीच्या खाली येईल असा ठेवू नये.
  2. पलंग शयनकक्षाच्या दरवाजाच्या विरुद्ध भिंतीजवळ ठेवलेला आहे परंतु त्याच्याशी संरेखित नाही याची खात्री करा. हि स्थिती कमांड पोझिशन म्हणून ओळखली जाते.
  3. वास्तू आणि फेंगशुईनुसार झोपण्याची योग्य स्थिती अशी असावी की तुमचे पाय दाराकडे केले जाणार नाहीत.
  4. ऊर्जा प्रवाह सुधारण्यासाठी आणि हानिकारक ऊर्जा किंवा शा ची, काढून टाकण्यासाठी वनस्पती आणि शुभ चित्रांसह बेडरूमची रचना करा.
  5. संगणक आणि इतर गॅझेट्ससारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह खोली कोणत्याही गोंधळापासून मुक्त ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुधारेल.

चांगली झोप आणि लवकर जागे होण्यासाठी अधिक टिपा

तुम्ही नियमित झोपण्याच्या पद्धतीचे पालन करण्यासाठी आणि सकाळी चांगले उठण्यासाठी स्वत:ला प्रशिक्षित करू शकता.

झोपेचे वेळापत्रक पाळा

प्रत्येक दिवशी झोपेच्या वेळापत्रकाचे पालन करणे महत्वाचे आहे. दररोज सात ते नऊ तासांची झोप घ्या. लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करा. शेवटी हे तुमच्या शरीराला नित्यक्रमाशी जुळवून घेण्यास मदत करेल आणि तुम्ही नैसर्गिकरित्या जागे व्हाल.

उजव्या बाजूला रोल करा

पचनाची क्रिया कमी प्रमाणात झाल्याने अंथरुणातून बाहेर पडताना उजवीकडे लोळून उठावे, कारण शरीर विश्रांतीच्या स्थितीत असते. हृदयाच्या प्रणालीवर कोणताही ताण पडू नये म्हणून उठताना डावीकडे लोळणे चांगले.

आपले तळवे एकत्र घासून घ्या

उठण्यापूर्वी, आपले तळवे एकत्र घासून घ्या आणि ते आपल्या डोळ्यांवर ठेवा, यामुळे प्रत्येक मज्जातंतूचे टोक सक्रिय होण्यास मदत मिळते. अशा प्रकारे, या क्रियेमुळे आपल्या शरीर प्रणालीला झोपेच्या स्थितीतून बाहेर पडण्यास आणि जागृत होण्यास चालना मिळते. प्रचलित मान्यतेनुसार तळवे चोळल्याने आणि डोळ्यांवर ठेवल्याने देवाचे दर्शन होते.

 

डाव्या बाजूला झोपणे हृदयासाठी वाईट आहे का?

आरोग्य तज्ञांच्या मते, डाव्या बाजूला झोपणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते जसे की गर्भवती महिला किंवा अॅसिड रिफ्लक्सची समस्या असलेल्या लोकांना. शिवाय, उजव्या बाजूला झोपणे हे आदर्श मानले जाते आणि हृदयविकार असलेल्यांसाठी ते अधिक अनुकूल आहे. अभ्यासानुसार, झोपेच्या वेळी डाव्या बाजूला झोपल्यावर गुरुत्वाकर्षणामुळे हृदयाची स्थिती बदलते. यामुळे हृदयाची विद्युत क्रिया बदलू शकते जी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) मध्ये प्रतिबिंबित होऊ शकते. दुसरीकडे, उजव्या बाजूला झोपल्याने फुफ्फुसांमधील ऊती आणि संरचना हृदयाला त्याच्या जागेवर ठेवतात, ज्यामुळे ईसीजी परिणाम सामान्य होतात.

 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

आपण कोणत्या दिशेला झोपू नये?

जर तुम्ही उत्तर गोलार्धात राहत असाल तर तुम्ही उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपणे टाळावे. दक्षिण गोलार्धात दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपू नये हे समजून घेणे देखील आवश्यक आहे. वास्तूनुसार दक्षिण गोलार्धात दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपू नये.

आपण पश्चिम दिशेला तोंड करून झोपू शकतो का?

वास्तूनुसार पश्चिम ही झोपण्याची आदर्श दिशा नाही. तथापि, काही लोकांसाठी ते फायदेशीर असू शकते. या दिशेने झोपल्याने व्यक्ती यशस्वी होऊ शकते आणि त्याचे कोणतेही नकारात्मक परिणाम होणार नाहीत.

नैऋत्य दिशा झोपण्यासाठी चांगली आहे का?

बेडरुममध्ये बेड ठेवण्यासाठी दक्षिण-पश्चिम ही वास्तु दिशा आदर्श आहे. वास्तूनुसार जोडप्यांना झोपेची सर्वोत्तम दिशा म्हणून शिफारस केली जाते. दक्षिण, दक्षिण-पूर्व किंवा नैऋत्य दिशेला डोके ठेवून झोपण्याची शिफारस केली जाते.

जागे होण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

प्राचीन परंपरा आणि आयुर्वेदानुसार सूर्योदयाबरोबर सकाळी लवकर उठले पाहिजे. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी उठणे, जो सूर्योदयापूर्वीचा एक शुभ काळ आहे, संपूर्ण आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

वेदानुसार झोप म्हणजे काय?

झोप ही मनाची अवस्था आहे असे उपनिषदांमध्ये नमूद केले आहे. पुढे, वेदांनुसार, शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणून, झोप ही एक नैसर्गिक स्थिती आहे जेव्हा शरीर विश्रांती घेते.

Was this article useful?
  • 😃 (1)
  • 😐 (1)
  • 😔 (1)

Recent Podcasts

  • वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशावास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशा
  • रुस्तमजी ग्रुपने मुंबईतील वांद्रे येथे आलिशान निवासी प्रकल्प सुरू केला
  • नरेडको 15, 16 आणि 17 मे रोजी "RERA आणि रिअल इस्टेट एसेंशियल" आयोजित करणार आहे
  • पेनिन्सुला लँड अल्फा अल्टरनेटिव्ह्ज, डेल्टा कॉर्प्ससह रियल्टी प्लॅटफॉर्म सेट करते
  • JSW पेंट्सने आयुष्मान खुरानासोबत iBlok वॉटरस्टॉप रेंजसाठी मोहीम सुरू केली
  • आर्थिक वर्ष 24 मध्ये सूरज इस्टेट डेव्हलपर्सच्या एकूण उत्पन्नात 35% वाढ झाली आहे