घरातील देव्हारा आणि त्याच्याशी संबंधित वास्तुशास्त्राच्या ‘टिप्स’


घरात देव्हारा किंवा प्रार्थनेची जागा कोठे आणि कशी असावी याबद्दल वास्तुशास्त्रात अनेक मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. या तत्वांचा अवलंब केल्यास घरात राहणा-या व्यक्तींना अतिशय चांगले फायदे होतात. या संदर्भात काही पथ्यांचा येथे विचार करू

घरातील देव्हारा ही देवाच्या प्रार्थनेची पवित्र जागा असते. म्हणूनच तिथे सकारात्मक वातावरण आणि शांतता असणे गरजेचे असते.देव्हा-याची जागा वास्तुशास्त्राला अनुसरून ठरवली तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. घरात स्वतंत्र पूजेची खोली असणे अगदी चांगले असले तरी मोठ्या शहरांमध्ये जागेच्या उपलब्धते अभावी ते नेहमीच शक्य होत नाही.  

“देव्हा-याची जागा हा घराचा अत्यंत शांत भाग असला तर तेथे दैवी शक्ती भरून राहते,” असे मुंबईच्या वास्तू प्लस चे नितीन परमार म्हणतात. “ही अशी जागा आहे जेथे आपण परमेश्वराशी लीन होतो आणि त्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. देव्हारा ठेवायला स्वतंत्र खोली शक्य नसेल तर पूर्वेकडच्या भिंतीलगत ईशान्य दिशेला एक चौथरा तयार करावा. घराच्या दक्षिणेला, आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला देव्हारा ठेवणे टाळावे,” असेही श्री. परमार म्हणतात.  

 

वास्तू नुसार देव्हारा ठेवण्याची योग्य दिशा

गुरु (ज्युपिटर) हा   ईशान्येचा – ज्याला ‘ईशान कोन’ असेही म्हणतात – स्वामी आहे, असे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष यातील तज्ज्ञ जयश्री धमानी म्हणतात. “ईशान म्हणजे ईश्वर किंवा देव. म्हणूनच ती दिशा देवाची म्हणजे गुरु ची मानली जाते. यासाठी देव्हारा त्या दिशेला असणे चांगले. शिवाय पृथ्वी चा झोक याच दिशेला असतो आणि तिच्या प्रदक्षिणेचे सुरुवात तेथे होते. त्यामुळे ईशान्य कोपरा हा रेल्वे इंजिनासारखा सर्व घर आपल्या ताकदीने पुढे नेतो,” असेही धमानी सांगतात. देव्हारा घराच्या मध्यभागी ठेवणे (या जागेला ब्रम्हस्थान म्हणतात )  पवित्र असते आणि त्यामुळे घरातल्या माणसांसाठी ऐश्वर्य आणि आरोग्य यांचा लाभ होतो, असे धमानी पुढे म्हणतात.

 

घरातील देव्हारा वास्तुशास्त्रानुसार  कसा बांधव याबद्दलच्या सूचना

घरात देव्हारा करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे देव्हारा थेट जमिनीवर ठेवू नका. त्याऐवजी तो थोड्या उंच चौथा-यावर किंवा चौरंगावर ठेवा, असा सल्ला परमार देतात. “देव्हारा संगमरवरी किंवा लाकडी असावा, अक्रिलिक किंवा काचेचा देव्हारा टाळावा. देव्हा-यात मूर्तींची गर्दी करू नये – एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवू नयेत.  देव्हरा-यात ठेवलेले फोटो अथवा मूर्ती चिरा गेलेल्या किंवा इतर नुकसान झालेल्या नसाव्यात कारण ते अमंगल समजले जाते,” असेही परमार सुचवतात.

देव्हारा जिथे असेल तिथे बसून पूजा करता आली पाहिजे. काही विशेष पूजांच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमून प्रार्थना करतात. देव्हा-याच्या  सतत सकारात्मक ऊर्जा खेळती राहावी यासाठी ती जागा स्वच्छ आणि मोकळी ठेवावी. तिथे धूळ, कोळिष्टके जमू देऊ नये तसेच उपकरणांची गर्दीही करू नये. मुख्य म्हणजे देव्हारा आणि परिसर ही मनाला शांती देणारी जागा असते याची जाणीव ठेवावी.  

 

घरच्या देव्हा-याची आणि आसपासची सजावट कशी करावी याबद्दल सूचना

 • दिव्याची जागा पूजा करणा-या व्यक्तीच्या उजव्या बाजूला असावी.
 • देव्हा-याची सजावट करण्यासाठी ताजी फुले वापरावी. वातावरण पवित्र व्हावे यासाठी काही सुवासिक मेणबत्त्या, धूप किंवा उदबत्त्या लावाव्या.  
 • निधन झालेल्या व्यक्तींचे किंवा पूर्वजांचे फोटो देव्हा-यात ठेवू नये.
 • सुगंधी द्रव्ये, पूजा साहित्य आणि पोथ्या ठेवण्यासाठी देव्हा-याजवळ  
 • सणासुदीच्या काळात विजेच्या दिव्यांची सजावट करता यावी या दृष्टीने देव्हा-यांच्या जवळ इलेक्ट्रिकल पॉईंट बसवून घ्यावेत.  
 • देव्हा-यांच्या जवळ अनावश्यक वस्तू किंवा कच-याची टोपली ठेवू नये.  
 • काही घरात देव्हारा स्वयंपाक घरात किंवा बेडरूम मध्ये ठेवतात. असे करायचे असेल तर पूजा झाल्यांनतर देव्हारा  पडदा लावून झाकून ठेवावा
 • ज्या भिंतीच्या मागे टॉयलेट असेल त्या भिंतीवर देव्हारा लावू नये तसेच वरच्या मजल्यावर जेथे टॉयलेट असेल त्याच्या खालच्या जागी देव्हारा लावू नये.  
 • देव्हारा ठेवण्याच्या खोलीत पांढरा , बेज, कोनफळी किंवा फिका पिवळा असे रंग वापरावेत.  

 

Was this article useful?
 • 😃 (6)
 • 😐 (1)
 • 😔 (0)

Comments

comments