घरासाठी वास्तुशास्त्रानुसार योग्य रंग कसे निवडाल?


एखाद्या घराच्या रंगाचा घरातील व्यक्तींवर मोठा प्रभाव पडतो. यासाठी, घरातल्या कोणत्या खोलीसाठी कोणता रंग निवडायचा याबद्दलचा तज्ज्ञांचा सल्ला आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत

मानवी मनावर रंगांचा महत्त्वाचा प्रभाव असतो हे आता पुरेसे सिद्ध झाले आहे. माणसाच्या आयुष्याचा बहुतांश भाग त्याच्या घरात व्यतीत होतो. विशिष्ट रंग घरातील माणसांच्या मनस्थितीवर स्पष्ट प्रभाव टाकत असल्यामुळे मन प्रसन्न राहावे आणि आरोग्य चांगले रहावे यासाठी घरामधील रंगसंगतीचा योग्य समतोल राखणे महत्त्वाचे आहे.

 

घरासाठीच्या रंगांची दिशेनुसार निवड

ए टू झेड वस्तू डॉट कॉम चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विकाश सेठी म्हणतात की रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाची जन्मतारीख या दोन निकषांवर आधारित असावी लागते. “प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो, परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणूनच घरमालकांनी वास्तुशास्त्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच रंगांची निवड करावी. यात पुढील मुद्दे महत्त्वाचे असतात:

ईशान्य : फिका निळा

पूर्व :  पांढरा किंवा फिका निळा

आग्नेय – या दिशेचा अग्नीशी संबंध असतो, त्यामुळे भगवा, गुलाबी किंवा चंदेरी रंग वापरून येथे ऊर्जा वाढवता येते

उत्तर : हिरवा किंवा पिस्ता

वायव्य – या दिशेने वारे येतात. म्हणूनच या दिशेच्या खोल्यांचे रंग राखाडी आणि क्रीम असलेले चांगले.

पश्चिम – ही वरुणाची म्हणजेच पाण्याची दिशा. त्यामुळे या दिशेला सर्वात चांगले रंग म्हणजे निळा आणि पांढरा

नैऋत्य – पीच, मातकट , बिस्कीट किंवा हलका तपकिरी

दक्षिण – लाल आणि पिवळा

काळा , लाल किंवा गुलाबी रंग निवडताना घरमालकांनी काळजी घेतली पाहिजे कारण हे रंग प्रत्येक व्यक्तीला पोषक नसतात.  

 

घरातल्या ठिकाणानुसार रंगांची निवड करण्यासाठीच्या सूचना

तज्ज्ञ म्हणतात की घरात प्रत्येक खोलीमधे आवश्यक असलेली उर्जा, त्या खोलीची दिशा आणि आकार यांनुसार रंग ठरतो.  प्रत्येक खोलीच्या वापरानुसार त्या खोलीला कोणता रंग द्यायचा ते ठरवावे लागते. ज्योतिषी आणि न्यूमरोलॉजिस्ट असलेले श्री गौरव मित्तल म्हणतात, “घरातल्या विविध खोल्यांना देण्याचे रंग ठरवताना पुढील मुद्दे विचारात यावे लागतात:

मास्टर बेडरूम : मास्टर बेडरूम साठी नैऋत्य ही आदर्श दिशा असते. आणि म्हणूनच या खोलीला निळा रंग द्यावा.

ड्रॉईंग रूम / गेस्ट रूम : वायव्य दिशा ही ड्रॉईंग रूम / गेस्ट रूम साठी सर्वात चांगली. त्यामुळे या खोलीला पांढरा रंग दिला पाहिजे.

मुलांची खोली:  शाळेत / कॉलेजात  जाणा-या मोठ्या मुलांच्या खोलीसाठी वायव्य ही आदर्श दिशा असते. वायव्य दिशेचा चंद्र हा स्वामी असतो त्यामुळे या खोलीला पांढरा रंग दिला पाहिजे.

स्वयंपाकघर : वायव्य दिशा ही स्वयंपाकघर करण्यासाठी आदर्श असते त्यामुळे स्वयंपाकघराला नारंगी किंवा लाल रंग द्यावा.

बाथरूम :  बाथरूम वायव्य दिशेला असणे सगळ्यात चांगले. बाथरूम ला म्हणूनच पांढरा रंग दिला पाहिजे.

हॉल : हॉल ची आदर्श दिशा वायव्य किंवा ईशान्य असते. हॉल साठी पिवळा किंवा पांढरा रंग वापरावा.  

घराचा बाहेरचा रंग : घरमालकाच्या स्वभावानुसार घराच्या बाहेरच्या रंगाची निवड करावी. पिवळसर पांढरा किंवा ऑफ व्हाइट किंवा फिका कोनफळी वा नारंगी  हे रंग सर्व राशींच्या लोकांना पोषक असतात.

 

घरात कोणते रंग टाळाल ?

तज्ज्ञ असे सुचवतात की  नेहमीच छान असतात. लाल, तपकिरी, राखाडी किंवा काळा हे गडद रंग सर्वाना फायदेशीर ठरतील असे नाही कारण  ते रंग राहू, शनी, मंगल रवी अशा कडक ग्रहांचे प्रतिनिधी आहेत. “लाल, गडद पिवळाणी काळा हे रंग वापरू नयेत, कारण या रंगांची तीव्रता जास्त असते आणि त्यामुळे तुमच्या आगारातील ऊर्जा प्रवाहात अडथळे येऊ शकतात,” असा इशारा सेठी देतात.  

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (2)

Comments

comments