आता 7/12 उताऱ्याची प्रमाणित प्रत मिळवा ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारची नवीन सेवा

महाराष्ट्रात जमीन नोंदणीचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी सरकारने 7/12 उताऱ्याची प्रमाणित प्रत ऑनलाईन देण्यासाठी सेवा लाँच केली आहे

1 मे 2018 रोजी महाराष्ट्र सरकारने लॉंच केलेल्या ह्या सेवेमुळे आंतर-विभागीय कागदपत्रांची हाताळणी त्वरित होण्यास प्रोत्साहन मिळेल. उदघाटन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जमिनीचा अधिकृत उतारा  प्राप्त करणारे पहिले उपभोक्ता ठरले.  जमीन मालकीचा हक्क सिद्ध करण्यासाठी 7/12 चा उतारा  दस्तऐवजांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे, पीक सर्वेक्षण आणि सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी हा उतारा उपयुक्त ठरतो.

शेतकर्‍यांना,शासकिय कार्यालयात किंवा बॅंकेत जमा करण्यासाठी, ह्या उतार्‍याची प्रचंड गरज भासते.

ह्यामुळे कागदपत्रांच्या प्रक्रिये विलंब व्हायचा. या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन  झाल्याने आता शेतकर्‍यांना महसूल अधिकाऱ्यांकडे किंवा सरकारच्या महा ई-सेवा केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही,” असे फडणवीस यावेळी म्हणाले. ही नवीन प्रक्रीया समजवितांना ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना फक्त आपला ‘गट ‘ क्रमांक संबंधित अधिकाऱ्यांना सांगावा लागेल आणि 7/12 उतारा ऑनलाइन मिळवून प्रक्रिया करण्यासाठी कागदपत्रांना जोडणे  ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी राहील.

मुख्यमंत्री म्हणाले की, या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमधील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि शेतकऱ्यांना या कागपत्रांसाठी धावपळ सुद्धा करावी लागणार नाही . त्यांनी सांगितले की, 1990 मध्ये विदर्भातील वर्धा येथे प्रायोगिक प्रकल्प म्हणून महसूलाच्या नोंदीचे डिजिटायझेशन सुरू झाले होते. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने सुमारे 90 कोटी रुपये खर्च केले होते. “आम्ही अधिक निधी मंजूर करू,”  असेही ते पुढे म्हणाले

महसूल विभागाचे प्रधानसचिव मनुुकुमार श्रीवास्तव म्हणाले,” राज्यात 2.49 कोटी 7/12 उतारे आहेत, ज्यामध्ये 2.07 लाख उतारे डिजिटल स्वाक्षरीसह प्रमाणित केले गेले आहेत. आणि उर्वरीत सर्व उतारे या वर्षी ऑगस्टपर्यंत डिजिटल प्रमाणित झाले असतील. महाराष्ट्रातील 357 तालुक्यांतील 7/12 उताऱ्यांची निर्मिती  करण्यात आली आहे. डिजिटायझेशन प्रक्रिया जोरात सुरु आहे,” 7/12 उताऱ्याची प्रत सामान्य माणसाला जमाबंदी आयुक्तांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे, त्यात 40,000 गावांच्या सर्व जमिनींची नोंद आहे.

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • बागांसाठी 15+ भव्य तलाव लँडस्केपिंग कल्पना
  • घरी आपली कार पार्किंगची जागा कशी वाढवायची?
  • दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे विभागाचा पहिला टप्पा जून २०२४ पर्यंत तयार होईल
  • FY24 मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजचा निव्वळ नफा 27% वाढून 725 कोटी झाला
  • चित्तूरमध्ये मालमत्ता कर कसा भरायचा?
  • भारतात सप्टेंबरमध्ये भेट देण्यासाठी 25 सर्वोत्तम ठिकाणे