म्हाडा अभिन्यासातील आरक्षित रस्त्यांचे पालिकेला हस्तांतरण : म्हाडाचा महत्वाचा निर्णय

म्हाडाचे मुंबईत एकूण ११४ अभिन्यास आहेत. या अभिन्यासातील काही भूभागांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये सार्वजनिक रस्त्यांची आरक्षणे आहेत.

मुंबई, 10 जानेवारी , २०२५: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबईतील अभिन्यासातील भूभागांवर बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित असलेल्या सार्वजनिक रस्त्यांचे हस्तांतरण पालिकेला तात्काळ करण्याचा महत्वाचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांनी आज म्हाडा मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये जाहीर केला.

म्हाडाचे मुंबईत एकूण ११४ अभिन्यास आहेत. या  अभिन्यासातील काही भूभागांवर  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये सार्वजनिक रस्त्यांची आरक्षणे आहेत. विकास आराखड्यातील आरक्षित रस्ते हे सार्वजनिक हितार्थ असल्यामुळे म्हाडाच्या अभिन्यासामधील जे भूभाग सार्वजनिक रस्त्यासाठी विकास आरखडयामध्ये आरक्षित आहेत असे सर्व भूभाग ‘आहे त्या स्थितीमध्ये’ अतिक्रमण विरहित अथवा अतिक्रमांसाहित एकतर्फी तात्काळ पालीकेच्या संबधित विभागास हस्तांतरित करावे, असे श्री जयस्वाल यांनी  संबंधित कार्यकारी अभियंता व मिळकत व्यवस्थापक यांना आज आदेशीत केले.

या निर्णयामुळे वसाहतींतील रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल. तसेच, शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत अशी रस्त्यांची उभारणी आणि सुधारणा करण्यात पालिकेला मदत होईल. म्हाडाचा हा निर्णय वसाहतींतील रहिवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण त्यामुळे रस्ते विकासाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या पुनर्विकास आणि विविध विकास प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. मात्र, शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या वसाहतींमधील रस्त्यांचे स्थलांतरण प्रलंबित राहिल्याने अनेक विकास कामे रखडल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • 2025 मध्ये दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांचे मालमत्ता हक्क2025 मध्ये दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांचे मालमत्ता हक्क
  • सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील बिगर भोगवटा शुल्क बद्दलसहकारी गृहनिर्माण संस्थांमधील बिगर भोगवटा शुल्क बद्दल
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: उद्घाटन तारीख, स्थिती, खर्चनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: उद्घाटन तारीख, स्थिती, खर्च
  • संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना बायोमेट्रिक सर्वेक्षणाकरिता शेवटची संधीसंक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना बायोमेट्रिक सर्वेक्षणाकरिता शेवटची संधी
  • कोकण मंडळाच्या शिरढोण, खोणी येथील गृहप्रकल्पातील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपातकोकण मंडळाच्या शिरढोण, खोणी येथील गृहप्रकल्पातील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात
  • महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी परतावा कसा मिळवायचा?महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी परतावा कसा मिळवायचा?