पॅन कार्ड डाऊनलोड (PAN card download): ई पॅन कार्ड (e PAN card) डाऊनलोड प्रक्रियेवर झटपट मार्गदर्शन

परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) हा संख्या-अक्षरांची सरमिसळ असलेला दहा आकडी क्रमांक आयकर (आयटी) विभागाच्या नजरेत कर दात्याची ओळख म्हणून काम करतो.

तुमचा परमनंट अकाऊंट नंबर (PAN) हा आयकर विभागासोबत बऱ्याचदा संपर्क साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याने त्याची नक्कलप्रत बाळगणे कायमच अत्यावश्यक असते. पॅन कार्ड डाऊनलोड (PAN card download) प्रक्रियेमुळे या दस्तावेजाची नक्कलप्रत स्वत:सोबत ठेवणे शक्य होते. ई पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचे विविध प्रकार समजून घेण्यासाठी हे मार्गदर्शन तुमच्यादृष्टीने मदतीचे ठरणार आहे.     

Table of Contents

 

ई-पॅन (ePAN) म्हणजे काय?

ई-पॅन हे डिजीटली स्वाक्षरी केलेले पॅन कार्ड आहे, जे आधारच्या ई-केव्हायसी माहिती आधारित इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये जारी करण्यात येते. 

 

पॅन कार्ड डाऊनलोड (PAN card download) 

ई-पॅन कार्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला एनएसडीएल किंवा युटीआयआयटीएसएल पोर्टलवर अर्ज करता येईल. तुम्ही आधार कार्डचा वापर करून झटपट पॅन कार्ड डाऊनलोड पर्यायाची निवडही करू शकता.

हे देखील पहा: मालमत्ता नोंदणीकरणाकरिता पॅन कार्ड अनिवार्य आहे का? 

 

ई-फायलिंग वेबसाइटवर ई-पॅन कार्ड डाऊनलोड 

क्रम १ : अधिकृत e-filing website वर जा आणि ‘क्वीक लिंक्स’ टॅब अंतर्गत असलेले ‘इन्स्टंट ई-पॅन निवडा.  

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम २: ‘गेट न्यू ई-पॅन’वर क्लिक करा.

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम ३: तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ‘कन्फर्म’वर क्लिक करा. 

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

लक्षात असू द्या: तुमचे आधार अगोदरच पॅनला लिंक असल्यास, खालील संदेश प्रदर्शित होईल – पॅनसोबत अगोदरच जोडलेला आधार क्रमांक प्रविष्ट करा. 

तुमचा मोबाईल क्रमांक आधार समवेत जोडलेला नसल्यास, खालील संदेश प्रदर्शित होईल – प्रविष्ट करण्यात आलेला आधार क्रमांक कोणत्याही सक्रिय मोबाईल क्रमांकाशी जोडलेला नाही. 

हे देखील पहा: आधार कार्डविषयी सर्वकाही. 

क्रम ४: ओटीपी वैधता पानावर, ‘आय हॅव रीड द कन्सेंट टर्म्स अँड अॅग्री टू प्रोसीड फर्दर’ पर्याय तपासा आणि ‘कंटीन्यू’वर क्लिक करा. 

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम 5: पुढील पानावर, आधारसोबत जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ६-आकडी ओटीपी प्रविष्ट करा, युआयडीएआय समवेत आधार माहितीची पुष्टी करण्यासाठी चेकबॉक्स निवडा. आणि ‘कंटीन्यू’वर क्लिक करा.   

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम 6: पुढच्या पानावर तुमची वैयक्तिक माहिती प्रदर्शित होईल, जिथे तुम्ही ‘आय एक्सेप्ट चेकबॉक्स’ ची निवड करून ‘कंटीन्यू’वर क्लिक करा.  

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम 7: तुम्हाला भविष्यातील संदर्भासाठी वापरता येईल असा पावती क्रमांक संदेशाच्या माध्यमातून स्क्रीनवर प्रदर्शित होईल. त्याशिवाय, तुमच्या मोबाईलवर पुष्टी झाल्याचा संदेश पाठविण्यात येईल. 

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम 8: एकदा का ई-पॅन कार्ड तुमच्याकरिता मंजूर झाले की ई-फायलिंग पोर्टलवर पॅन कार्ड डाऊनलोड करणे शक्य होईल.. हा पर्याय ‘चेक स्टेट्स/डाऊनलोड पॅन’ पर्यायावर उपलब्ध आहे.  

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम 9: विनंती करण्यात आलेल्या जागेत तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘कंटीन्यू’वर क्लिक करा. 

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम 10: ओटीपी वैधता पानावर, तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेला सहा-आकडी ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘कंटीन्यू’वर क्लिक करा.

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम 11: पुढच्या पानावर तुमच्या नवीन ई-पॅन विनंतीची चालू स्थिति प्रदर्शित होईल. नवीन ई-पॅन उत्पन्न आणि मंजूर झाल्यास, ‘व्हयू ई-पॅन’वर क्लिक करून ते पहा, किंवा ‘डाऊनलोड ई-पॅन टू डाऊनलोड अ कॉपी’वर क्लिक करा. 

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

हे देखील पहा: उद्यम आधारविषयी  सर्वकाही

 

एनएसडीएल पॅन कार्ड डाऊनलोड (NSDL PAN card download)

तुम्ही एनएसडीएल पोर्टलच्या माध्यमातून पॅन कार्डकरिता अर्ज केल्यास, या वेबसाइटवर ई पॅन कार्ड डाऊनलोडकरिता पात्र असाल.  

क्रम १: अधिकृत वेबसाइट  TIN-NSDLला भेट द्या. ‘Quick Links’ (क्वीक लिंक्स) टॅब अंतर्गत असलेल्या ‘PAN-New facilities’ (‘पॅन-न्यू फॅसिलीटीज’)ची निवड करा.   

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम २: ड्रॉप-डाऊन मेन्यूमधून कोणत्याही दोन पर्यायांची निवड करा:

‘Download e-PAN/e-PAN XML (PANs allotted in last 30 days)’ 

‘Download e-PAN/e-PAN XML (PANs allotted prior to 30 days)’

तुम्ही थेट नवीन पानावर पोहोचाल. 

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम ३: जे पान उघडेल त्यावर तुमचा पॅन नंबर/किंवा पावती क्रमांक, आधार क्रमांक, जन्मदिनांक/ स्थापना आणि जीएसटीएन (वैकल्पिक) भरा. पुढे, नियम आणि अटी वाचा आणि तपासा, कॅप्चा कोड टाका आणि ‘सबमीट’वर क्लिक करा.   

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम ४: तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ईमेल आयडीवर ओटीपी येईल. दोनपैकी एकाची निवड करा आणि ‘जनरेट ओटीपी’वर क्लिक करा.  

क्रम ५: ओटीपी टाका आणि ‘वॅलिडेट’वर क्लिक करा. आता तुम्ही ‘डाऊनलोड पीडीएफ’वर क्लिक करू शकता. 

हे देखील पहा: कसे मिळवाल पीव्हीसी आधार कार्ड

 

युटीआय पॅन डाऊनलोड (UTI PAN download) 

तुम्ही युटीआयआयटीएसएल पोर्टलमार्फत तुमच्या पोर्टलला अर्ज केल्यास, ई-पॅन डाऊनलोड करण्यासाठी त्यांच्या अधिकृत साइटवर  official site  जा. 

क्रम : होम पेजवर ‘PAN Card Services’ अंतर्गत टॅब करा, ‘Apply PAN Card’ पर्यायाची निवड करा.  

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम २: तुम्ही नवीन पानावर याल. ‘Download e-PAN’ वर क्लिक करा आणि त्यानंतर ‘Click to Download’ पर्यायावर. 

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम ३: युटीआय पॅन कार्ड डाऊनलोड करण्याकरिता, कॅप्चा कोड भरण्यापूर्वी तुमचे पॅन, जन्मतारीख, जीएसटीआयएन क्रमांक टाका. एकदा झाले की ‘Submit’ वर क्लिक करा.

 

PAN card download: A quick guide on e PAN card download process

 

क्रम ४: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर लिंक पाठवली जाईल. या लिंकवर क्लिक करून, तुम्हाला ई पॅन कार्ड डाऊनलोड करून घेता येईल.  

हे देखील पहा: युएएन म्हणजे काय आणि UAN loginविषयी सर्व काही.

 

ई पॅन कार्ड डाऊनलोड: प्रमुख वास्तव 

ई-पॅन कार्डमधील सविस्तर माहिती 

  • परमनंट अकाऊंट नंबर 
  • नाव
  • लिंग
  • जन्मदिनांक
  • वडिलांचे नाव
  • छायाचित्र 
  • सही
  • क्युआर कोड

 

ई-पॅन कार्डकरिता कोणाला अर्ज करता येईल?

ई-पॅन कार्डकरिता अर्ज करण्यासाठी खालील अटी पाळण्याची आवश्यकता आहे:

  • तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असावे. 
  • तुम्ही वैयक्तिक करदाते असणे आवश्यक ठरते. 
  • तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डला जोडलेला असावा.

 

माझ्याकडे पॅन आहे मात्र ते गहाळ झाले आहे. मला आधारमार्फत नवीन ई-पॅन मिळेल का?

नाही. जर तुमच्याकडे पॅन क्रमांक नसेल तरच या सेवेचा वापर करता येईल. मात्र तुमच्याकडे वैध आधार आणि केव्हायसी माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.  

 

नवीन ई-पॅन मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज लागेल?

तुम्हाला अद्ययावत केव्हासी माहितीसह आधार क्रमांकाची आवश्यकता असेल आणि वैध मोबाईल क्रमांक तुमच्या आधारसोबत लिंक असावा. 

 

आधारमार्फत झटपट ई-पॅनकरिता अर्ज कोण करू शकेल?

पॅन कार्ड अर्जदार, ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे आणि ज्याचे मोबाईल क्रमांक आधारसोबत जोडलेले आहेत, ते झटपट ई-पॅनकरिता अर्ज करू शकतात. 

 

ई-केव्हायसी दरम्यान माझे आधार प्रमाणन नाकारले गेल्यास मला काय करता येईल? 

चुकीचा ओटीपी दाखल केल्यास आधार प्रमाणन नाकारले जाऊ शकते. योग्य ओटीपी टाकून ही समस्या सोडवता येईल. तरीही नाकारले जात असल्यास, युआयडीएआयला संपर्क करा.  

 

ई-पॅनकरिता व्यक्तिश: हजर राहून पडताळणी करण्याची गरज आहे का?

नाही, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. तुम्हाला केंद्रावर जाण्याची गरज नाही. 

 

पॅन कार्ड कस्टमर केअर क्रमांक 

तुम्हाला स्वत:चे पॅन कार्ड किंवा ई पॅन कार्ड डाऊनलोडविषयी कोणतेही साह्य पाहिजे असल्यास अथवा इतर कोणतीही शंका वाटल्यास, तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क करू शकता: 

आयकर विभाग:  ०१२४-२४३८०००, १८००१८०१९६१ 

आयकर विभाग टोल-फ्रि क्रमांक: १८००१८०१९६१

युटीआयआयटीएसएल: ०२२-६७९३१३००, +९१(३३) ४०८०२९९९, मुंबई फॅक्स: (०२२) ६७९३१३९९

एनएसडीएल: ०२०-२७२१८०८०, (०२२) २४९९ ४२००

प्रोटीन ईजीओव्ही टेक्नोलॉजीस टोल फ्रि क्रमांक: १८०० २२२ ९९० 

ईमेल आयडी

tininfo@nsdl.co.in/ info@nsdl.co.in

utiitsl.gsd@utiitsl.com

 

पॅन कार्ड डाऊनलोड वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)

पॅन म्हणजे काय?

परमनंट अकाऊंट नंबर (PAN) हा १० आकडी अक्षर-अंक यांची सरमिसळ असलेला क्रमांक, त्याकरिता अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तिला आयकर विभाग जारी करतो. अर्ज न करता देखील आयकर विभाग क्रमांकाचे वाटप करू शकतो. पॅनधारकासाठी, त्याचे कार्ड ही आयकर विभागासाठीची ओळख ठरते. पॅनमुळे पॅनधारकासंबंधी कर भरणा, टीडीएस/ टीसीएस जमा, आयकर परतावा, विशिष्ट व्यवहार, पत्रव्यवहार इत्यादी सर्व व्यवहार आयकर विभागासोबत जोडणे शक्य होते.

पॅन असणे आवश्यक आहे का?

आयकर परतावा भरण्यासाठी तसेच कोणत्याही आयकर प्राधिकरणासह पत्रव्यवहार साधण्यासाठी पॅन दाखल करणे अनिवार्य आहे. १ जानेवारी २००५ पासून आयकर विभागाला देय असलेला कोणताही भरणा करण्यासाठी चलानवर पॅन टाकणे अनिवार्य आहे.

ई-पॅन कार्ड म्हणजे काय?

ई-पॅन कार्ड म्हणजे करदात्याच्या पॅन कार्डची ऑनलाइन नक्कलप्रत आहे. जिचा वापर ई-पडताळणीसाठी करता येईल, तुमचे ई-पॅन मोबाईल क्रमांक आणि संगणकावर साठवता (सेव्ह) येते.

वास्तविक हाताळता येणाऱ्या पॅन कार्डप्रमाणे ई-पॅनची वैधता एकसारखी असते का?

वास्तविक हाताळता येणाऱ्या पॅन कार्डप्रमाणे ई-पॅनची वैधता एकसारखी असते.

माझे आधार कार्ड सक्रिय नसल्यास पॅनकरिता अर्ज करणे शक्य आहे का?

पॅन कार्डला अर्ज करण्यासाठी तुमचे आधार कार्ड सक्रिय असावे.

ऑनलाइन पॅन कार्डकरिता अर्ज करण्यासाठी किती शुल्क आहे?

ऑनलाइन पॅन कार्डकरिता अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

आधार पॅनसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख काय?

आधार पॅन कार्डसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Recent Podcasts

  • २०२4 मध्ये गृहप्रवेश मुहूर्त: सर्वोत्तम नक्षत्र, महिन्यानुसार तारखा२०२4 मध्ये गृहप्रवेश मुहूर्त: सर्वोत्तम नक्षत्र, महिन्यानुसार तारखा
  • 2024 मध्ये भिंतींमध्ये नवीनतम मंदिर डिझाइन
  • श्रीराम प्रॉपर्टीजने बेंगळुरूमध्ये 4 एकर जमिनीच्या पार्सलसाठी जेडीएवर स्वाक्षरी केली
  • ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ३५० लोकांना नोटीस पाठवली आहे
  • तुमच्या घरासाठी 25 अद्वितीय विभाजन डिझाइन
  • वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशावास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य किंवा सर्वोत्तम दिशा