प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म २०२२ जे केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आहे. असे लोक गृहनिर्माण युनिटसाठी प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन नोंदणी २०२१-२०२२ याची निवड करून, प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म भरून अर्ज करू शकतात.
यापूर्वी, पीएमएवाय (PMAY) योजनेसाठी अर्ज करण्याची आणि गृहकर्जावरील अनुदानाचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ होती. तथापि, केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएमएवाय (PMAY)-शहरी आणि पीएमएवाय (PMAY)-ग्रामीणसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवल्यामुळे, अर्जदारांना या योजनेअंतर्गत घरांसाठी वाढवलेल्या कालावधीपर्यंत अर्ज करता येईल.
प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म २०२२ द्वारे pmaymis.gov.in वर अर्ज करण्यासाठी
प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म २०२२, एखाद्याला अधिकृत पीएमएवाय (PMAY) pmay mis.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल, आणि प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. तथापि, हे लक्षात घ्या की ज्यांना पीएमएवाय (PMAY) साठी pmaymis.gov.in यावर ऑनलाइन अर्ज करण्याची इच्छा नाही, ते देखील प्रधानमंत्री आवास योजना अर्ज फॉर्म २०२२ ऑफलाइन, सरकारी कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) किंवा पीएमएवाय (PMAY) अंतर्गत सूचीबद्ध बँकांमध्ये भरू शकतात.
हे देखील पहा: प्रधानमंत्री आवास योजना (PMAY): जे तुम्हाला सर्व जाणून घ्यायचे आहे
पीएमएवाय (PMAY) फॉर्म ऑनलाइन अर्ज कसा भरावा?
पायरी १: पीएमएवाय (PMAY) च्या https://pmaymis.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
पायरी २: मुख्य पृष्ठावर, वर ‘नागरिकांचे मूल्यांकन (सिटीझन असेसमेंट)‘ वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘अप्लाय ऑनलाईन’ पर्याय निवडा. तुम्हाला चार पर्याय दिसतील. तुम्हाला जे लागू होत असेल ते निवडा.
पायरी ३: पीएमएवाय (PMAY) २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ‘इन सीटू स्लम रिडेव्हलपमेंट (ISSR)’ पर्याय निवडा. पुढील पेज तुमचा आधार क्रमांक आणि नाव विचारेल. हा सर्व तपशील भरा आणि तुमचा आधार तपशील पडताळण्यासाठी ‘तपासा (चेक)‘ वर क्लिक करा.
पायरी ४: वरून तपशीलवार – फोरमॅट ए– दिसून येईल. या फॉर्मसाठी तुमचे सर्व तपशील आवश्यक आहेत. प्रत्येक स्तंभ काळजीपूर्वक भरा.
पायरी ५: पीएमएवाय (PMAY) २०२१ साठी सर्व तपशील भरल्यानंतर, कॅप्चा प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा, तुमचा पीएमएवाय (PMAY) २०२१ ऑनलाइन अर्ज अशा तर्हेने पूर्ण झाला आहे.
हे देखील पहा: पीएमएवाय (PMAY) अनुदानाची स्थिती? याचा मागोवा कसा घ्यावा
पीएमएवाय (PMAY) ऑनलाइन फॉर्म कसा डाउनलोड करायचा?
पायरी १: अधिकृत पीएमएवाय (PMAY) वेबसाइट, pmaymis.gov.in ला भेट द्या.
पायरी २: तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव आणि मोबाइल नंबर देऊन किंवा मूल्यांकन आयडी देऊन तुमच्या पीएमएवाय (PMAY) ऑनलाइन फॉर्ममध्ये प्रवेश करण्याचा पर्याय मिळेल. तुमचा पर्याय निवडा आणि संबंधित तपशील भरा.
पायरी ३: तुम्ही आता तुमचा पीएमएवाय (PMAY) ऑनलाइन फॉर्म पाहू आणि डाउनलोड करू शकाल.
पीएमएवाय (PMAY) नोंदणी साठी कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा उत्पन्नाचा पुरावा
- अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचा निवासी पत्ता
- अर्जदाराचे छायाचित्र
- ज्या बँक खात्यात पीएमएवाय (PMAY) सबसिडी जमा केली जाईल त्याचा तपशील
हे देखील पहा: पीएम उदय योजना
पीएमएवाय (PMAY) अर्ज फॉर्म २०२२ (ऑफलाइन)
अर्जदार पीएमएवाय (PMAY) ऑनलाइन फॉर्म ऑफलाइन भरण्यासाठी तुम्ही पीएमएवाय (PMAY) कार्यक्रमासाठी सरकारसोबत भागीदारी केलेल्या जवळच्या सीएससी (CSC) किंवा संलग्न बँकेला भेट देऊ शकता. पीएमएवाय (PMAY) २०२१ नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला २५ रुपये नाममात्र शुल्क भरावे लागेल.
ऑफलाइन पीएमएवाय (PMAY) अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
जमा करते वेळी तुम्हाला तुमच्या पीएमएवाय (PMAY) २०२१ अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे खाली सूचीबद्ध आहेत:
- ओळखपत्राची प्रत
- पत्त्याच्या पुराव्याची प्रत
- आधार कार्डची प्रत
- उत्पन्नाच्या पुराव्याची प्रत
- मालमत्तेचे मूल्यांकन प्रमाणपत्र
- सक्षम अधिकाऱ्याकडून एनओसी
- तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाचे भारतात कोणतेही घर नाही असे प्रतिज्ञापत्र.
हे देखील पहा: अर्ज स्थितीचा मागोवा घेण्यासाठी पीएमएवाय सीएलएसएस (PMAY CLSS) ट्रॅकर पोर्टल कसे वापरावे
संपर्क माहिती
पुढील कोणत्याही मदतीसाठी, तुम्ही नवी दिल्लीतील गृहनिर्माण मंत्रालयाच्या कार्यालयांशी देखील संपर्क साधू शकता.
राजकुमार गौतम
संचालक (HFA – 5)
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA)
खोली क्रमांक ११८, जी विंग
एनबीओ इमारत
निर्माण भवन
नवी दिल्ली – ११००११
तुम्ही खालील नंबर आणि मेल आयडीवर कॉल आणि ईमेल देखील करू शकता.
फोन: ०११-२३०६०४८४/ ०११-२३०६३२८५
ई-मेल: public.grievance2022@gmail.com/ pmaymis-mhupa@gov.in
पीएमएवाय (PMAY) नोंदणी २०२२ पात्रतातुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. तुमच्याकडे भारतात कुठेही घर नसावे. तुम्हाला यापूर्वी घर खरेदी करण्यासाठी कोणतेही सरकारी अनुदान मिळालेले नसावे. तुम्ही खाली नमूद केलेल्या तीन गटांपैकी कोणतेही असले पाहिजे:
लक्षात घ्या की हे वर्गीकरण अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित आहे. |
हे देखील पहा: पीएमएवाय ईडब्ल्यूएस (PMAY EWS) पात्रतेबद्दल सर्व काही
पीएमएवाय (PMAY) २०२२ अंतर्गत घरांसाठी कोण पात्र नाही?
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न १८ लाखांपेक्षा जास्त आहे.
- ज्यांच्याकडे देशात कुठेही पक्के घर आहे.
- ज्यांनी यापूर्वी घर खरेदीसाठी कोणतेही सरकारी अनुदान घेतले आहे.
पीएमएवाय (PMAY) २०२२ ऑनलाइन अर्जाचे घटक
तुम्ही पीएमएवाय (PMAY) २०२१ साठी दोन मोठ्या श्रेणींमध्ये अर्ज करू शकता:
झोपडपट्टीत राहणारे: झोपडपट्टीतील रहिवासी म्हणजे शहरांमधील अनौपचारिक वस्त्यांमध्ये गरीब राहणीमानात राहणारे लोक.
इतर: या श्रेणी अंतर्गत, पीएमएवाय (PMAY) अर्जदार चार उप श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत:
लाभार्थी | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न |
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) | 3 लाखांपर्यंत |
निम्न उत्पन्न गट (LIG) | 3-6 लाख रुपये |
मध्यम उत्पन्न गट-१ (MIG-1) | 6 – 12 लाख रुपये |
मध्यम उत्पन्न गट-२ (MIG-2) | 12 – 18 लाख रुपये |
स्रोत: गृहनिर्माण मंत्रालय
पीएमएवाय (PMAY) अर्जाची स्थिती कशी तपासायची?
तुम्ही तुमचा मूल्यांकन आयडी किंवा आधार क्रमांक किंवा इतर वैयक्तिक तपशील वापरून तुमच्या पीएमएवाय (PMAY) अर्जाची स्थिती तपासू शकता. या विषयावर अधिक वाचण्यासाठी आमच्या मार्गदर्शकावर पीएमएवाय (PMAY) स्थिती येथे तपासा.
पीएमएवाय (PMAY): तक्रार करण्यासाठी संपर्क करा
तुम्हाला पीएमएवाय (PMAY) मध्ये समस्या असल्यास तुम्ही कॉल करू शकता, ईमेल करू शकता किंवा गृहनिर्माण मंत्रालयाच्या कार्यालयांना वैयक्तिकरित्या भेट देऊ शकता.
फोन नंबर: 011-23060484
०११-२३०६३२८५
ईमेल आयडी: public.grievance2022@gmail.com/pmaymis-mhupa@gov.in
पत्ता: एमओएचयुए (MOHUA), रूम नंबर ११८, जी विंग
एनबीओ इमारत
निर्माण भवन
नवी दिल्ली – ११००११
ठळक बातम्या
पीएमएवाय-यु कव्हर अंतिम मुदत वाढवा: पॅनेलचे सरकारला सांगणे
२० मार्च २०२३: अर्बन अफेअर आणि गृहनिर्माण विषयक संसदीय स्थायी समितीने गृहनिर्माण मंत्रालयाला केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजना-शहरी विस्तारासाठी मूल्यांकन करण्यास सांगितले आहे
पॅनेलने मंत्रालयाकडे सादर केलेल्या अहवालानुसार काही लोकांना पात्रता निकष किंवा इतर कारणांमुळे पीएमएवाय-यु चे फायदे यांचा लाभ घेता आला नाही. २० मार्च २०२३ रोजी हा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला, पॅनेलने पीएमएवाय-यु योजना आवश्यक असल्यास, सर्व पात्र लोकांना कव्हर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्याची शिफारसही केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन फॉर्म २०२२ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
पीएमएवाय (PMAY) २०२१-२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे.
पीएमएवाय (PMAY) २०२२ साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अधिकृत - https://pmaymis.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या आणि तुमची प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन नोंदणी २०२२ भरण्यासाठी ‘नागरिक मूल्यांकन (सिटीझन असेसमेंट)’ टॅबवर क्लिक करा.
मी पीएमएवाय (PMAY) अर्ज कसा डाउनलोड करू शकतो?
तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर, https://pmaymis.gov.in/ वर जा, ‘नागरिक मूल्यांकन (सिटीझन असेसमेंट)’ पर्याय निवडा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘प्रिंट असेसमेंट’ निवडा. तुम्ही खालीलपैकी एक पर्याय निवडून अर्ज तपासू शकता: नाव, वडिलांचे नाव आणि फोन नंबर किंवा मूल्यांकन आयडीद्वारे. तुमचा पर्याय निवडा आणि पीएमएवाय (PMAY) अर्ज डाउनलोड करण्यासाठी ‘प्रिंट’ बटणावर क्लिक करा.