म्हाडा लॉटरी २०२२: ऑनलाइन अर्ज, नोंदणीची तारीख आणि बातम्या


म्हाडाच्या लॉटरी योजनेबद्दल आणि त्याच्या विविध बोर्डांखालील घरांसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Table of Contents

आगामी म्हाडा लॉटरी २०२२ मुंबईच्या तारखा

तीन वर्षांच्या कालावधीनंतर, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई मंडळाने म्हाडा लॉटरी २०२२ जाहीर केली आहे ज्यामध्ये म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत ३,०१५ घरे दिली जातील. गोरेगावच्या डोंगराळ भागातील या घरांची लॉटरी २०२३ च्या सुरुवातीला काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या २०२२ च्या लॉटरीची मुंबईतील ३,०१५ घरांसाठीची जाहिरात ऑगस्ट २०२२ मध्ये म्हाडाकडून जाहीर केली जाण्याची अपेक्षा आहे.

गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मते एकूण ३,०१५ घरांच्या म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत, १,९४७ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) वर्गासाठी राखीव असतील. उर्वरित १,०६८ घरे कमी उत्पन्न गट (एलआयजी) – ७३६ घरे, मध्यम-उत्पन्न गट (एमआयजी) – २२७ घरे आणि उच्च-उत्पन्न गट (एचआयजी) – १०५ घरांमध्ये विभागली जातील. मुंबई मंडळाच्या म्हाडा लॉटरी २०२२ मध्ये, सुमारे ३०० चौरस फुटांच्या वन-रूम-किचन सेटअपची किंमत सुमारे २५ लाख रुपये असेल.

अपुऱ्या घरांच्या साठ्यामुळे म्हाडाची २०२०-२१ मुंबईची लॉटरी जाहीर होऊ शकली नाही.

हेही पहा: गोरेगाव-पश्चिम येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली

 

म्हाडाची लॉटरी वेबसाइट काय आहे?

Lottery.mhada.gov.in ही म्हाडाची वेबसाईट आहे जी म्हाडा गृहनिर्माण लॉटरीसाठी समर्पित आहे, जी या बोर्डाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते.

 

म्हाडा लॉटरी २०२१

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे प्रादेशिक विभाग असलेल्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (केएचएडीबी) म्हाडाची लॉटरी जाहीर केली. या म्हाडाच्या लॉटरीत, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ८,९८४ कमी किमतीच्या घरांची mhada.gov.in 2021 या वेबसाइटवर घोषणा करण्यात आली होती.

 

म्हाडा लॉटरी २०२१ कोकणचा निकाल

म्हाडा लॉटरी २०२१ कोकण ड्रॉ इव्हेंटचे निकाल जे थेट वेबकास्ट म्हणून दाखवले गेले होते, ते म्हाडा लॉटरी २०२१ वेबसाइटवर पाहता येतील. ठाणे म्हाडा लॉटरी २०२१ चा लकी ड्रॉ १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा हिरानंदानी मेडोजजवळ, ठाणे (पश्चिम) येथे काढण्यात आला.

म्हाडा लॉटरी २०२१ वेबसाइटच्या होम पेजवर ‘लॉटरी निकाल’ टॅबवर क्लिक करून तुम्ही विजेत्यांची यादी आणि प्रतीक्षा यादी https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Konkan/  येथे तपासू शकता.

लक्षात घ्या की इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही म्हाडाच्या लॉटरीची सर्व माहिती मराठीतही मिळवू शकता.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

तुम्हाला खाली दाखवलेल्या पेजवर नेले जाईल. निकाल पाहण्यासाठी ‘पहा’ बटणावर क्लिक करा.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

तुम्हाला त्या पेजवर नेले जाईल ज्यात विजेत्यांची यादी आणि म्हाडा लॉटरी 2021 ची प्रतीक्षा यादी असेल. म्हाडा लॉटरी ड्रॉ विजेते पाहण्यासाठी, ‘विजेत्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा’ वर क्लिक करा.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

स्कीम कोडनुसार व्ह्यू टॅबवर क्लिक करा आणि तुम्ही खाली दाखवल्याप्रमाणे निकाल पाहू शकता.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

प्रतीक्षा यादी तपासण्यासाठी, ‘प्रतीक्षा यादीसाठी येथे क्लिक करा’ वर क्लिक करा किंवा निकाल पाहण्यासाठी पृष्ठ खाली स्क्रोल करा.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई क्षेत्र यादी

खाली नमूद केलेली म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई क्षेत्र यादी आहे जी तुम्हाला क्षेत्राचे नाव, योजनेचा कोड आणि योजनेच्या नावासह तपशील प्रदान करते.

 

म्हाडा लॉटरी २०२१ ठाणे निकाल

विभाग स्कीम कोड स्कीमचे नाव
ठाणे २८० भंडारली
ठाणे २८१ गोठेघर
ठाणे २८३ कासारवडवली
ठाणे २८४ वडवली
ठाणे २८५ वडवली
ठाणे २८६ वडवली
ठाणे २८७ वडवली
ठाणे २८८ मोघरपाडा
ठाणे २८९ मोघरपाडा
ठाणे २९० पारसिक नगर
ठाणे २९१ पारसिक नगर
ठाणे २९२ डवले
ठाणे २९३ कावेसर
ठाणे २९४ कावेसर
ठाणे २९५ कावेसर
ठाणे २९६ कावेसर
ठाणे २९७ बाळकुम
ठाणे २९८ भाईंदर पाडा
ठाणे २९९ आगासन
ठाणे ३२० भंडारली

 

म्हाडाची सोडत २०२१ ठाणे निकाल योजना कोड २८०, २८१, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९ आणि ३२० अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ विजेत्यांची यादी प्रुष्ठावर तपासली जाऊ शकते. उदाहरणार्थ २८० योजनेसाठी म्हाडा लॉटरी २०२१ ठाणे निकाल तपासण्यासाठी, एससी श्रेणी अंतर्गत, प्रथम https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/K21.html येथे जा आणि नंतर एससी (SC) श्रेणी अंतर्गत ‘स्कीम कोड’ विभागात २८० वर क्लिक करा. तुम्ही https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/4_1_winner.pdf येथे पोहोचाल, ज्याचा स्क्रीनशॉट खाली दर्शविला आहे.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

म्हाडा लॉटरी २०२१ ठाणे निकालांतर्गत इतर योजना कोडचे निकाल तपासण्यासाठी अशीच पद्धत अवलंबावी लागेल. तसेच, ज्या सहभागींनी विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवले नाही, ते त्याच योजनेच्या कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ ठाणे निकाल प्रतीक्षा यादी पृष्ठावर त्यांची नावे तपासू शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ घणसोली निकाल

विभाग स्कीम कोड स्कीमचे नाव
घणसोली ३०६ प्लॉट क्रमांक ७, सेक्टर ११,
घणसोली ३०७ प्लॉट क्रमांक २४, सेक्टर ११,
घणसोली ३०८ प्लॉट क्रमांक २४, सेक्टर ८,
घणसोली ३०९ प्लॉट क्रमांक २४, सेक्टर ८,
घणसोली ३१० प्लॉट क्रमांक २६, सेक्टर ८,
घणसोली ३११ प्लॉट क्रमांक २६, सेक्टर ८,
घणसोली ३१२ प्लॉट क्रमांक २६, सेक्टर ८,
घणसोली ३१३ प्लॉट क्रमांक २६, सेक्टर ८,

 

म्हाडा लॉटरी २०२१ नवी मुंबईच्या घणसोली क्षेत्राचे निकाल म्हाडा लॉटरी २०२१ कोकण विजेत्यांच्या यादीच्या पानावर स्कीम कोड ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२ आणि ३१३ अंतर्गत तपासले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, अनुसूचित जाती श्रेणी अंतर्गत योजना ३०६ साठी म्हाडा लॉटरी २०२१ घणसोली निकाल तपासण्यासाठी, प्रथम https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/K21.html येथे जा आणि नंतर एससी (SC) श्रेणीतील ‘स्कीम कोड’ विभागांतर्गत ३०६ वर क्लिक करा. तुम्ही https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/30_1_winner.pdf येथे पोहोचाल, ज्याचा स्क्रीनशॉट खाली दर्शविला आहे.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

म्हाडा लॉटरी २०२१ घणसोली निकालांतर्गत इतर योजना कोडसाठी निकाल तपासण्यासाठी अशीच पद्धत अवलंबावी लागेल. तसेच, ज्या सहभागींनी विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवले नाही, ते त्याच योजनेच्या कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ घणसोली निकाल प्रतीक्षा यादी पृष्ठावर त्यांची नावे तपासू शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ मीरा रोडचे निकाल

विभाग स्कीम कोड स्कीमचे नाव
मीरा रोड ११७ सी मीरा रोड
मीरा रोड ११८ सी मीरा रोड
मीरा रोड ३२१ मीरा रोड फेज इमारत ए
मीरा रोड ३२२ मीरा रोड फेज इमारत बी
मीरा रोड ३२३ मीरा रोड फेज इमारत ए

 

म्हाडा लॉटरी २०२१ मीरा रोडचे निकाल म्हाडा लॉटरी २०२१ च्या विजेत्यांच्या यादीच्या पानावर स्कीम कोड ११७ सी, ११८ सी, ३२१, ३२२ आणि ३२३ अंतर्गत तपासले जाऊ शकतात.

उदाहरणार्थ, डीएफ (DF) श्रेणी अंतर्गत योजना ३२१ साठी म्हाडा लॉटरी २०२१ मीरा रोड निकाल तपासण्यासाठी, प्रथम https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/K21.html येथे जा

आणि नंतर ३२१ वर क्लिक करा, डीएफ श्रेणी अंतर्गत उपस्थित असलेल्या ‘स्कीम कोड’ विभागात. तुम्ही https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/55_8_winner.pdf येथे पोहोचाल, ज्याचा स्क्रीनशॉट खाली दर्शविला आहे.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

म्हाडा लॉटरी २०२१ मीरा रोडच्या निकालांतर्गत इतर योजना कोडचे परिणाम तपासण्यासाठी अशीच पद्धत अवलंबावी लागेल. तसेच, ज्या सहभागींनी विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवले नाही, ते म्हाडा लॉटरी २०२१ मीरा रोड निकालाच्या प्रतिक्षा सूची पृष्ठावर त्याच योजनेच्या कोड अंतर्गत त्यांची नावे तपासू शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ टिटवाळा, म्हाडा लॉटरी २०२१ कल्याण निकाल

विभाग स्कीम कोड स्कीमचे नाव
कल्याण २७० ए शिरधोन
कल्याण २७१ ए खोनी
कल्याण २७९ खोनी
कल्याण ३०० टिटवाळा
कल्याण ३०१ टिटवाळा
कल्याण ३०२ टिटवाळा
कल्याण ३०३ टिटवाळा
कल्याण ३०४ टिटवाळा
कल्याण ३०५ टिटवाळा

 

म्हाडा लॉटरी २०२१ टिटवाळा आणि म्हाडा लॉटरी २०२१ कल्याण निकाल २७० ए, २७१ ए, २७९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४ आणि ३०५ या योजनेच्या कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ च्या विजेते पानांच्या यादीमध्ये तपासले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, पीएच (PH) श्रेणीतील योजने २७० ए साठी म्हाडा लॉटरी २०२१ कल्याण निकाल तपासण्यासाठी, प्रथम https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/K21.html येथे जा आणि नंतर पीएच (PH) श्रेणीतील ‘स्कीम कोड’ विभागांतर्गत २७० ए वर क्लिक करा. तुम्ही https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/1_7_winner.pdf येथे पोहोचाल, ज्याचा स्क्रीनशॉट खाली दर्शविला आहे.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

म्हाडा लॉटरी २०२१ कल्याण निकाल आणि म्हाडा लॉटरी २०२१ टिटवाळा निकालांतर्गत इतर योजना कोडसाठी निकाल तपासण्यासाठी अशीच पद्धत अवलंबावी लागेल. तसेच, जे सहभागी विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत, ते म्हाडा लॉटरी २०२१ टिटवाळा आणि म्हाडा लॉटरी २०२१ कल्याण निकालांच्या प्रतीक्षा सूची पृष्ठावर त्यांची नावे त्याच योजनेच्या कोड अंतर्गत तपासू शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ विरारचे निकाल

विभाग स्कीम कोड स्कीमचे नाव
विरार २५६ बी बोलिंज
विरार २६३ बी बोलिंज
विरार २६४ बी बोलिंज
विरार २७४ ए बोलिंज
विरार २७८ ए बोलिंज

म्हाडा लॉटरी २०२१ विरारचे निकाल २५६ बी, २६४ बी, २६३ बी, २७४ ए आणि २७८ ए या योजना कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ विजेत्यांच्या यादीच्या २६३ बी पृष्ठावर तपासले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, डीएफ (DF) श्रेणी अंतर्गत योजना २५६ बी साठी म्हाडा लॉटरी २०२१ विरार निकाल तपासण्यासाठी, प्रथम https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/K21.html येथे जा आणि नंतर २५६ बी वर क्लिक करा, डीएफ (DF)  श्रेणी अंतर्गत उपस्थित असलेल्या ‘स्कीम कोड’ विभागाखाली. तुम्ही https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/46_8_winner.pdf येथे पोहोचाल, ज्याचा स्क्रीनशॉट खाली दर्शविला आहे.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

म्हाडा लॉटरी २०२१ विरारच्या निकालांतर्गत इतर योजना कोडचे परिणाम तपासण्यासाठी अशीच पद्धत अवलंबावी लागेल. तसेच, ज्या सहभागींनी विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवले नाही, ते त्याच योजनेच्या कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ विरार निकाल प्रतीक्षा सूची पृष्ठावर त्यांची नावे तपासू शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ वसईचे निकाल

विभाग स्कीम कोड स्कीमचे नाव
वसई २८२ चंदनसार
वसई ३१४ वालीव
वसई ३१५ वालीव
वसई ३१६ वालीव
वसई ३१७ वालीव
वसई ३१८ कोपरी
वसई ३१९ कोपरी

म्हाडा लॉटरी 2021 वसईचे निकाल २८२, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८ आणि ३१९ या योजनेच्या कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ च्या विजेत्यांच्या यादीच्या पृष्ठावर तपासले जाऊ शकतात.

उदाहरणार्थ, जीपी (GP) श्रेणी अंतर्गत योजना ३१६ साठी म्हाडा लॉटरी २०२१ वसई निकाल तपासण्यासाठी, प्रथम https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/K21.html येथे जा आणि नंतर जीपी श्रेणी अंतर्गत उपस्थित असलेल्या ‘स्कीम कोड’ विभागाच्या अंतर्गत, ३१६ वर क्लिक करा.

तुम्ही https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/40_15_winner.pdf  येथे पोहोचाल, ज्याचा स्क्रीनशॉट खाली दर्शविला आहे.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

म्हाडा लॉटरी २०२१ वसई निकालांतर्गत इतर योजना कोडचे निकाल तपासण्यासाठी अशीच पद्धत अवलंबावी लागेल. तसेच, जे सहभागी विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत, ते त्याच योजनेच्या कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ वसई निकाल प्रतीक्षा सूची पृष्ठावर त्यांची नावे तपासू शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ सिंधुदुर्ग निकाल

विभाग स्कीम कोड स्कीमचे नाव
सिंधुदुर्ग २६७ ए वेंगुर्ला
सिंधुदुर्ग २६८ ए वेंगुर्ला
सिंधुदुर्ग २६९ ए वेंगुर्ला

 

म्हाडा लॉटरी २०२१ सिंधुदुर्गचे निकाल म्हाडा लॉटरी २०२१ च्या विजेत्यांच्या यादीच्या पानावर स्कीम कोड २६७ ए, २६८ ए आणि २६९ ए अंतर्गत तपासले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, एसटी श्रेणी अंतर्गत योजना २६९ ए साठी म्हाडा लॉटरी २०२१ सिंधुदुर्ग निकाल तपासण्यासाठी, प्रथम https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/K21.html येथे जा

आणि नंतर २६९ ए वर क्लिक करा,  ‘योजना कोड’ विभागात जो एसटी (ST) श्रेणी अंतर्गत आहे. तुम्ही https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/draw/51_2_winner.pdf  येथे पोहोचाल, ज्याचा स्क्रीनशॉट खाली दर्शविला आहे.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out_12

 

म्हाडा लॉटरी २०२१ सिंधुदुर्ग निकालांतर्गत इतर योजना कोडचे निकाल तपासण्यासाठी अशीच पद्धत अवलंबावी लागेल. तसेच, जे सहभागी विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत, ते त्याच योजनेच्या कोड अंतर्गत म्हाडा लॉटरी २०२१ सिंधुदुर्ग निकाल प्रतीक्षा सूची पृष्ठावर त्यांची नावे तपासू शकतात.

 

म्हाडा लॉटरी २०२१ मुंबईच्या तारखा

लॉटरी २०२१चा तपशील महत्वाच्या तारखा
ऑनलाईन नोंदणी (सुरू होते) २४ ऑगस्ट २०२१, दुपारी १२ पासून
ऑनलाईन नोंदणी (रोजी समाप्त) २९ सप्टेंबर २०२१, रात्री २३.५९ वा.
ऑनलाईन अर्ज (सुरू होतो) २४ ऑगस्ट २०२१, १५.०० वा.
ऑनलाईन अर्ज (रोजी समाप्त) ३० सप्टेंबर २०२१, २३.५९ वा.
ईएमडीचे ऑनलाइन पेमेंट (सुरू होते) २४ ऑगस्ट २०२१, १५.०० वा.
ईएमडीचे ऑनलाइन पेमेंट (समाप्तीची तारीख) १ ऑक्टोबर २०२१, २३.५९ वा.
स्वीकारलेल्या अर्जांची मसुदा यादी ६ ऑक्टोबर २०२१, १८.०० वा.
स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर २०२१, १८.०० वा.
म्हाडा लॉटरी २०२१ लकी ड्रॉ १४ ऑक्टोबर २०२१, सकाळी १० वा.
विजेत्यांची यादी प्रकाशित केली जाईल १४ ऑक्टोबर २०२१, १८.०० वा.
परतावा २१ ऑक्टोबर २०२१, २३.५९ वा.

म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई अर्जाची ऑनलाइन तारीख २४ ऑगस्ट २०२१ सुरू झाली आणि शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ होती.

 

म्हाडा कोकण लॉटरी २०२१: दिले जाणार म्हाडा युनिट

म्हाडा लॉटरी २०२१ नवी मुंबई मध्ये, ठाणे जिल्ह्यातील घणसोली, मीरा रोड, भंडारली, खोणी, शिरधोण, आणि गोठेघर, पालघरमधील विरार बोलिंग आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथे घरांचे वाटप केले जाईल. म्हाडा लॉटरी २०२१ कोकण ही २०२० मध्ये घरांचा साठा उपलब्ध नसल्यामुळे आणि देशव्यापी कोविड -१९ लॉकडाऊन यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर या परवडणाऱ्या घरांच्या लकी ड्रॉ योजनेसह आली आहे.

म्हाडा लॉटरी २०२१ कोकणातील ही केएचएडीबी (KHADB) लॉटरी योजना घरे किंवा युनिट्स आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न (MIG) गटासाठी असतील.

 

                                   म्हाडा लॉटरी २०२१ नोंदणी शुल्क
श्रेणी नोंदणी शुल्क *
इडब्ल्यूएस – कौटुंबिक उत्पन्न < २५,००० प्रति महिना रु ५,०००  + रु ५६० (अर्ज फॉर्म फी)
एलआयजी – कुटुंबाचे उत्पन्न २५,००० ते ५०,००० रुपये प्रति महिना  रु १०,००० + रु ५६०
एम् आयजी – कौटुंबिक उत्पन्न रुपये ५०,००० ते ७५,००० रुपये  रु १५,००० + रु ५६०
एचआय जी  – कौटुंबिक उत्पन्न ७५,००० रुपयांच्या वर  रु २०,००० + रु ५६०

 

म्हाडा लॉटरी २०२१ मुंबईच्या या आवृत्तीत, केएचएडीबी मधील या ८,९८४ घरांपैकी २,००० घरे कोकण मंडळाची असतील. उर्वरित प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजनेअंतर्गत आणि म्हाडा मंडळाच्या इतर प्रकल्पांमधून असतील.

 

स्थान सदनिकेची संख्या
वडवल्ली २०
वर्तक नगर ६७ दुकाने
वर्तक नगर ६७
मीरा रोड १९६
कासारवडावली ३५०
विरार १,३००

 

म्हाडा लॉटरी २०२१ ठाणे भाग म्हणून एलआयजी विभागासाठी वडवली आणि कासारवडवली येथील मालमत्तांची किंमत सुमारे १६ लाख रुपये असेल. म्हाडाच्या २०२१ च्या लॉटरीमध्ये ठाण्यातील वर्तक नगरमधील मालमत्तांचा समावेश आहे ज्याची किंमत सुमारे ३८-४० लाख रुपये असेल. म्हाडा लॉटरी २०२१ विरारमधील १,३०० युनिट्सपैकी १,००० युनिट्स एलआयजीसाठी आहेत आणि उर्वरित ३०० युनिट्स एमआयजी विभागासाठी आहेत. म्हाडा लॉटरी २०२१ मीरा रोडमध्ये एमआयजीसाठी मीरा रोडमध्ये 2 बिएचके घरे असतील ज्याची किंमत सुमारे ३८-४० लाख रुपये असेल.

हे देखील पहा: म्हाडा पुणे गृहनिर्माण योजना लॉटरी २०२१

 

म्हाडा लॉटरी २०२१ कोकणचा प्रतिसाद

केएचएडीबी (KHADB)  ने सादर केलेल्या म्हाडा लॉटरी २०२१  मध्ये योजनेसाठी आगाऊ रक्कम (EMD) सह २,४६,६५० हून अधिक अर्ज प्राप्त झाले, ज्याची अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर २०२१ होती. १९,००० हून अधिक घर खरेदीदारांनी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी स्वारस्य दाखवले, म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई हि घर सोडतीसाठी सर्वात मोठी लॉटरी म्हणून ओळखले जाते. या लॉटरी घरांसाठी अर्ज करण्यासाठी, म्हाडाच्या लॉटरी २०२१ मुंबई वेबसाइटवर म्हाडाच्या लॉटरी नोंदणी करणे आवश्यक होते आणि लोकांना म्हाडा ऑनलाइन फॉर्म २०२१ भरावा लागला.

म्हाडाच्या लॉटरीची माहिती https //lottery.mhada.gov.in या वेबसाइटवर मराठीतही मिळू शकते याची नोंद घ्या. लक्षात घ्या की म्हाडा लॉटरी शोधताना बहुतेक लोकांकडून ‘महाडा’ वापरणे ही एक सामान्य चूक आहे जी तुम्हाला एखाद्या चुकीच्या वेबसाइटवर घेऊन जाऊ शकते.

 

कोकण म्हाडा लॉटरी २०२१ साठी  स्वीकारलेले अर्ज

म्हाडा लॉटरी २०२१ कोकण वेबसाइटनुसार, म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई क्षेत्र यादीतील स्वीकृत अर्जदार ८ ऑक्टोबर २०२१ पासून वेबसाइटवर दिसत होते. तुम्ही ‘स्वीकारलेले अर्ज’ टॅबवर क्लिक करून म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई क्षेत्राची यादी म्हाडा लॉटरी २०२१ कोकण वेबसाइटच्या होम पेजवर ‘स्वीकारलेले अर्ज’ टॅबवर क्लिक करून तुम्ही मसुदा यादी तपासू शकता. तुम्हाला खाली दिसणाऱ्या पेजवर नेले जाईल. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पृष्ठावरील व्ह्यु बटणावर क्लिक करा.

 

Mhada Lottery 2021 lucky draw results out

 

तुम्हाला https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/K21/scrutiny/K21.html येथे नेले जाईल. स्वीकृत यादी पाहण्यासाठी स्कीम कोड आणि श्रेणीनुसार व्ह्यु बटणावर क्लिक करा

 

MHADA Lottery 2021 final applicant list to be published on October 8, 2021 (3)

 

कोकण म्हाडा लॉटरी २०२१ चे फेटाळलेले अर्ज

म्हाडा लॉटरी २०२१ कोकणच्या मुख्यपृष्ठाच्या मध्यभागी असलेल्या ‘कोकण लॉटरी २०२१ अंतिम नाकारलेल्या यादी’ टॅबवर क्लिक करून म्हाडा लॉटरी २०२१ कोकणातील नाकारलेल्या सहभागींची अंतिम यादी देखील तपासता येईल.

 

MHADA Lottery 2021 final applicant list to be published on October

 

यादी डाउनलोड होईल आणि तुम्ही म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई क्षेत्राची यादी पाहू शकता जी तुम्हाला अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव, योजनेचा कोड, अर्ज श्रेणी, उत्पन्न गट आणि खाली दर्शविल्याप्रमाणे नाकारण्याचे कारण सांगते.

 

MHADA Lottery 2021 lucky draw on October 14, 2021

 

अर्जदारांना म्हाडा लॉटरी २०२१ कोकण कार्यालयात काही आक्षेप असल्यास नोडल ऑफिसरला भेटून म्हाडा लॉटरी २०२१ कोकण मंडळाशी संपर्क साधण्याचा पर्याय होता. तसेच, ते kblottery@mhada.gov.in वर ईमेल पाठवू शकतात. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नमूद केलेल्या वेळेनंतरच्या कोणत्याही आक्षेपांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तुम्ही ही म्हाडा लॉटरीची माहिती मराठीत देखील तपासू शकतात.

 

म्हाडाच्या लॉटरी २०२१ चे परतावा धोरण काय आहे?

ज्या अर्जदारांचे नाव सोडतीच्या यादीत आलेले नाही त्यांच्या ईएमडीचा परतावा २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होतो. लॉटरी सोडतीत अर्जदार यशस्वी होत नसेल तर अर्जदाराने खर्च केलेली रक्कम म्हाडा, कामकाजाच्या सात दिवसात परत करेल. आपण म्हाडाच्या वेबसाइटवर आपल्या प्रोफाइलमध्ये लॉग इन करून आपल्या परताव्याची स्थिती तपासू शकतो.

 

जर तुम्हाला तुमच्या म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई अर्जाचे पैसे परत मिळाले नाहीत तर?

कधीकधी, लोकांना म्हाडाद्वारे नमूद केलेल्या वेळेत त्यांच्या म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई अर्जाचे पैसे परत मिळत नाहीत. कृपया म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा- +९१-९८६९९८८०००/०२२-६६४०५०००. म्हाडाचे अधिकारी तुम्हाला तुमच्या खात्यात सात ते १० कामकाजाच्या दिवसात परतावा मिळवण्यास मदत करतील.

 

म्हाडा ही सरकारी संस्था आहे की खाजगी संस्था?

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक वैधानिक गृहनिर्माण प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकारची प्रभाग (नोडल) संस्था आहे. राज्यातील विविध उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यामध्ये याचा समावेश आहे. गेल्या सात दशकांत म्हाडाने राज्यभरातील जवळपास ७.५० लाख कुटुंबांना परवडणारी घरे दिली आहेत, त्यापैकी २.५ लाख मुंबईतील आहेत. म्हाडाचे महाराष्ट्र राज्यात सात बोर्ड आहेत आणि मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (MSIB) आणि मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ (MBRRB) आहेत.

 

आम्ही म्हाडाचा फ्लॅट भाड्याने देऊ शकतो का?

म्हाडाचा फ्लॅट मालक खरेदीच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत आपले फ्लॅट विकू शकत नाही या नियमावर महाराष्ट्र सरकार ठाम आहे, परंतु भाड्याने देण्याच्या बाबतीतही ही कठोरता नाही. म्हाडाने २०१३ मध्ये पाच वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने न देण्याच्या आपल्या नियमाला शिथिल केलेहोते. हे पाऊल म्हणजे गृहनिर्माण संस्थेचा राज्यातील लोकांना मदत करण्याचा एक मार्ग आहे. तुमचा म्हाडाचा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी, सदनिका मालकांना कोणत्या श्रेणीतील आहे यावर अवलंबून २,००० ते ५,००० रुपयांपर्यंतच्या एनओसीसाठी पैसे द्यावे लागतील. तसेच मालमत्ता भाड्याने देणाऱ्या मालकांनाही भाडे करार म्हाडाकडे सादर करावा लागतो.

 

म्हाडाचे फ्लॅट विकता येतील का?

म्हाडा फ्लॅटचे मालक असलेले अर्जदार म्हाडा युनिट खरेदीच्या तारखेपासून पाच वर्षांनंतरच त्यांचे फ्लॅट विकू शकतात. तथापि, खरेदीदारांनी म्हाडा पुनर्विक्री फ्लॅट खरेदी करण्यापासून सावध असणे आवश्यक आहे, कारण अनेक वेळा अर्जदार पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीपूर्वी ते विकतात. हे खरेदीदाराला पॉवर ऑफ अॅटर्नी दस्तऐवज प्रदान करून केले जाते, म्हाडाच्या फ्लॅटचे नोंदणीकृत डीड नाही. म्हाडाने अचानक तपासणी केली तर खरेदीदाराला घरातून बाहेर काढले जाऊ शकते, कारण पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे विक्री बेकायदेशीर आहे आणि कायद्याने मान्यताप्राप्त नाही. जेव्हा तुम्ही पुनर्विक्री म्हाडाचा फ्लॅट खरेदी करता, तेव्हा मालक सोसायटीकडून थकबाकीचे प्रमाणपत्र देतो, तसेच म्हाडाकडून मूळ वाटप पत्र, सोसायटीने मालकाला दिलेले शेअर प्रमाणपत्र आणि नमूद केलेले शेअर प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याबद्दल पत्र दिले आहे याची खात्री करा. सोसायटी सदस्यत्व शुल्क खरेदीदार आणि विक्रेता दोघेही सामायिक करतील. शेवटी, विक्रेत्याने वीज बिलासारख्या फ्लॅटशी संबंधित शुल्क भरल्याचे निश्चित झाल्यानंतरच व्यवहाराला सुरुवात केली पाहिजे. एकदा व्यवहार पूर्ण झाल्यावर, खरेदीदाराला म्हाडाच्या फ्लॅटसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. नवीन खरेदीदाराच्या नावाखाली घर नोंदणी झाल्यावर युनिटवर हस्तांतरण प्रमाणपत्र देण्यासाठी म्हाडाशी संपर्क साधावा लागतो. यासाठी, आपल्याला नोंदणीकृत कागदपत्रे आणि हस्तांतरण शुल्कासह कागदपत्रे सादर करावी लागतील. संपूर्ण प्रक्रियेस जवळपजवळ सहा महिने लागू शकतात.

 

म्हाडाच्या सोडती मंडळाची यादी

म्हाडा राज्यभरात परवडणारी घरे उपलब्ध करत आहेत. महाराष्ट्राच्या विविध शहरांमधील काही प्रमुख गृहनिर्माण मंडळे येथे देत आहेत.

 1. म्हाडा मुंबई बोर्ड लॉटरी २०२१
 2. म्हाडा पुणे बोर्ड लॉटरी योजना २०२१
 3. म्हाडा कोकण बोर्ड गृहनिर्माण योजना
 4. अमरावती बोर्ड म्हाडा गृहनिर्माण योजना
 5. नाशिक बोर्ड म्हाडा गृहनिर्माण योजना
 6. नागपूर बोर्ड म्हाडा गृहनिर्माण योजना
 7. म्हाडा औरंगाबाद बोर्ड गृहनिर्माण योजना

म्हाडाचे प्रत्येक मंडळ लकी ड्रॉच्या स्वरूपात परवडणारी घरे उपलब्ध करून देते. म्हाडा मुंबई बोर्ड एमएमआर आणि नवी मुंबईमध्ये परवडणाऱ्या घरांचे पर्याय देते. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०१९ मध्ये काढलेली शेवटची लॉटरी होती. म्हाडा कोकण मंडळ कोकण क्षेत्राव्यतिरिक्त एमएमआर आणि नवी मुंबईसह ठाणे, मीरा रोड, वसई, घणसोली इ. मध्ये परवडणाऱ्या घरांचे पर्याय १४ ओक्टोबर २०२१ रोजी दसऱ्याच्या निमित्ताने ऑफर करते. म्हाडा पुणे मंडळ पुण्यात महाळुंगे (चाकण), मोरगाव पिंपरी, लोहगाव, बाणेर, पिंपळे निलख या ठिकाणी परवडणारी घरे देते. पुनावळे आदींचा समावेश आहे. म्हाडा पुणे लॉटरी योजना २०२१ चा लकी ड्रॉ २ जुलै २०२१ रोजी झाला. सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्याची आपली वचनबद्धता पुढे नेत म्हाडा औरंगाबाद मंडळाने १० जून, २०२१ रोजी लकी ड्रॉ काढला आणि सातारा, हिंगोली इत्यादी भागांसह इतर भागांमध्ये परवडणारी घरे देऊ केली.

याशिवाय, घरांच्या वाढत्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी, म्हाडाची अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि पुणे येथे पुढील दोन वर्षांत ७,००० ते १०,००० घरे बांधण्याची योजना आहे.

अधिक जाणून घ्या: म्हाडा पुणे बोर्ड लॉटरी योजना २०२१

 

म्हाडा ऑनलाइन फॉर्म: म्हाडा लॉटरी २०२१-२२ साठी तुमची पात्रता जाणून घ्या

 • अर्जदार किमान १८ वर्षे वयाचा असावा.
 • अर्जदाराकडे तो महाराष्ट्रात सतत १५ वर्षे राहिलेला आहे हे सिद्ध करणारे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • वार्षिक आर्थिक उत्पन्नाचा पुरावा (वाहतूक, वैद्यकीय, धुलाई भत्ता इत्यादी भत्ते वगळता सरासरी मासिक उत्पन्न): आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (ईडब्ल्यूएस) – २५,००० पर्यंत; मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) – ५०,००१ ते ७५,००० रुपये; निम्न  उत्पन्न गट (एलआयजी) – २५,००१ ते ५०,००० रुपये; उच्च उत्पन्न गट (एचआयजी) – ७५००१ आणि त्याहून अधिक रुपये.
 • अर्जदाराकडे पॅनकार्ड असले पाहिजे.

 

म्हाडा लॉटरी २०२१ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

जर आपण म्हाडाच्या सोडतीद्वारे होणाऱ्या घरासाठी अर्ज करण्याचा विचार करीत असाल तर ही कागदपत्रे तयार ठेवा:

 1. पॅन कार्ड
 2. आधार कार्ड
 3. कॅन्सल चेक
 4. अधिवास प्रमाणपत्र
 5. वाहन चालविण्याचा परवाना
 6. पासपोर्ट फोटो
 7. जन्म प्रमाणपत्र
 8. अर्जदाराच्या संपर्काचे तपशील

हे देखील पहा: सिडको गृहनिर्माण योजना लॉटरी

 

म्हाडा लॉटरी २०२१: म्हाडा लॉटरी नोंदणी

इच्छुक अर्जदार म्हाडा लॉटरी नोंदणी प्रक्रियेबद्दल जाण्यासाठी या पायऱ्यांचे अनुसरण करू शकतात.

१ ली पायरी

म्हाडा लॉटरी संकेतस्थळावर लॉग इन करा.

2 री पायरी

म्हाडा लॉटरी नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे वापरकर्ता नाव तयार करावे लागेल आणि म्हाडा ऑनलाइन फॉर्मवर मूलभूत माहिती भरावी लागेल.

 

How to apply for MHADA Lottery Scheme

 

How to apply for MHADA Lottery Scheme

हे देखील पहा: केवळ प्रीमियम आकारून म्हाडाच्या जागांचा पुनर्विकास केला जाईल

३ री पायरी

एकदा यूजरनेम तयार झाले की आपण ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुन्हा लॉग इन करू शकतो. लॉग इन केल्यानंतर आपल्याला सध्या उपलब्ध असलेल्या योजना पाहता येतील. आपण दिलेल्या पर्यायातून म्हाडा लॉटरी निवडू शकता आणि वैयक्तिक तपशील जसे उत्पन्न गट, आरक्षण श्रेणी आणि अर्जदाराचा प्रकार  अशी माहिती भरू शकता. आपल्याला उपलब्ध ऑनलाइन माहितीमधील किंवा माहितीपत्रकातील स्कीम कोड देखील प्रविष्ट करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही निवडलेल्या जागांचा सन्दर्भ म्हणून हा स्कीम कोड असतो. आपल्या बँक खात्याचा तपशील भरा आणि आपल्याकडे किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे शहरातील कोणतीही इतर मालमत्ता नसल्याचे मान्य करा. तसेच, संवादासाठी सध्याच्या निवासी पत्त्याचा उल्लेख करा. आपण उपरोक्त नमूद केलेल्या सर्व तपशीलांची पुष्टी करा.

How to apply for MHADA Lottery Scheme

४ थी पायरी

एकदा तुम्ही म्हाडा ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज केल्यानंतर, तुम्हाला अर्ज शुल्क भरावे लागेल. तुम्ही डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा एनईएफटी / आरटीजीएस (NEFT/RTGS) द्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता.

 

How to apply for MHADA Lottery Scheme

 

डिमांड ड्राफ्टद्वारे आपण पैसे देत असल्यास अर्ज फॉर्म प्रिंट करा आणि नियुक्त बँकेत डीडी सोबत भरणा करा. आपण ऑनलाइन पैसे देत असल्यास कॅन्सल केलेला चेक अपलोड करा आणि म्हाडाच्या बँक खात्यात पैसे भरा. आपण पेमेंट पोर्टलवर भरणा पावती तयार शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवू शकता.

 

म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई गोरेगाव

म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई गोरेगाव आणि वाटप न केलेले क्षेत्र लवकरच जाहीर केले जाऊ शकते.

म्हाडा लॉटरी २०२१ मुंबई अर्जाची ऑनलाइन तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. म्हाडा लॉटरी २०२१ गोरेगाव मुंबईचे ‘पहाडी गोरेगाव’ येथे गृहनिर्माण प्रकल्प असतील जे ए (A) आणि बी (B) या दोन भूखंडांमध्ये विभागले गेले आहेत. एफपीजी (FPJ) नुसार, या प्रकल्पात इडब्ल्यूएस (EWS) विभागासाठी जवळपास १९०० घरे आरक्षित आहेत. भूखंड ए वर एलआयजी (LIG) आणि इडब्ल्यूएस  (EWS) योजनेसाठी घरे पुरवली जातील, तर बी भूखंड एलआयजी, एमआयजी आणि एचआयजी साठी प्रकल्प ऑफर करेल. प्रकल्पाचे बांधकाम टप्प्याटप्प्याने केले जाईल आणि कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या दुसर्‍या लाटेमुळे त्याच्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

 

म्हाडा पुणे लॉटरी २०२१: आगामी तारखा

म्हाडा पुणे लॉटरी २०२१ ची ऑनलाइन नोंदणी १६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होईल जिथे म्हाडा पुणे लॉटरीचा भाग म्हणून ४,२२२ घरे दिली जातील. ही घरे म्हाडाच्या पुणे योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ आणि २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील आहेत. म्हाडा लॉटरी २०२१ पुणे अर्ज ऑनलाइन १६ नोव्हेंबर २०२१ ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंत चालू होता.

 

म्हाडा लॉटरी २०२१-२२ मुंबई संपर्क माहिती

म्हाडा लॉटरी २०२०-२१ मुंबई आणि म्हाडा लॉटरी २०२१-२२ मुंबई बद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही संपर्क करू शकता

म्हाडा

गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई ४०००५१.

फोन: ९८६९९८८०००

०२२-६६४०५०००

राज्य सरकारच्या विभागांशी संबंधित कोणत्याही माहिती/सेवा/योजनेसाठी, तुम्ही मुख्यमंत्री हेल्पलाइनवर टोल-फ्री (२४ × ७ ) वर १८०० १२० ८०४० वर कॉल करू शकता.

 

सामान्य प्रश्न (FAQs)

म्हाडा लॉटरी 2022 मुंबईच्या तारखा काय आहेत?

म्हाडाच्या लॉटरी 2022 च्या मुंबईच्या तारखा ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 पर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

म्हाडाच्या सोडतीसाठी कोण पात्र आहे?

म्हाडाच्या सोडतीसाठी १८ वर्षे किंवा त्यावरील वयाच्या व्यक्ती पात्र आहेत. त्याच्या / तिच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र देखील असले पाहिजे.

मी म्हाडाची सदनिका विकू शकतो?

होय, लॉक-इन कालावधी जो साधारणत: पाच वर्षे असतो, संपल्यानंतर आपण म्हाडाची सदनिका विकू शकता.

 

Was this article useful?
 • 😃 (13)
 • 😐 (3)
 • 😔 (1)

Comments

comments