मुंबईत मालमत्ता कर कसा भरायचा याचा मार्गदर्शक


मालमत्ता कर हा मुंबईतील निवासी जागांच्या मालकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेला दरवर्षी द्यावा लागणारा कर आहे. मात्र या कराची रक्कम शहरातील विविध ठिकाणी वेगवेगळी असते. मुंबईत मालमत्ता कर कसा भरायचा याबद्दलचे हे मार्गदर्शन

मालमत्ता कर  हा मुंबईतील निवासी जागांच्या मालकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेला दरवर्षी द्यावा लागणारा कर आहे. गेल्या वर्षी ७ जुलै ला (७ जुलै २०१७) बृहन्मुंबई महानगरपालिकेने ५०० चौ. फूट किंवा त्याहून कमी क्षेत्रफळाच्या घराना घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पालिकेने ५०० चौ. फू. ते  ७०० चौ फू. क्षेत्रफळाच्या घरांना घरपट्टीत ६० टक्के सूट देण्याचाही प्रस्तावही मंजूर केला. या दोन्ही प्रस्तावना जर महापालिका आयुक्तांनी आणि राज्य सरकारने मंजुरी दिली तर सम्बंधित घरमालकांना २०१५ ते २०२० या कालावधीसाठी मालमत्ता करातील ही सूट मिळेल.    

 

मुंबईतील निवासी घरांवरील मालमत्ता करची आकारणी कशी मोजायची ?

मालमत्ता कर आकारणी करताना बृहन्मुंबई महापालिका भांडवली मूल्य पद्धती चा अवलंब करते. हे भांडवली मूल्य मालमत्तेच्या बाजारमूल्याशी भावाशी निगडित असते.

भांडवली मूल्याची मोजणी अशी होते:

मालमत्तेचे  बाजारमूल्य X एकूण कार्पेट क्षेत्रफळ X बांधकामाच्या प्रकारानुसार गुणांक X इमारतीच्या वयानुसार गुणांक मालमत्तेचे बाजारमूल्य रेडी रेकनर चा सन्दर्भ घेऊन ठरविता येते. हा रेडी रेकनर राज्य सरकारने  ठरवलेला असतो आणि तो विविध मालमत्तांच्या रास्त किमतींचा तक्ता असतो. आपली मालमत्ता कोणत्या वॉर्ड किंवा झोन मध्ये आहे त्यानुसार आपल्या मालमत्तेचे रेडी रेकनर नुसार असलेले बाजारमूल्य तपासून पाहता येते.

बांधकामाच्या प्रकारानुसार गुणांक :

 • बंगला  – १
 • बिगर आर सी सी  (सेमी परमनंट / चाळ) – ०.६०
 • बांधकाम चालू असलेली मालमत्ता  / मोकळी जागा – ०. ५०

इमारतीच्या वयानुसार ठरणारा गुणांक :  

 • १९४५ पूर्वी बांधलेल्या इमारती – ०. ८०  
 • १९४५-१९८५ या काळात बांधलेल्या इमारती ०. ९०
 • १९८५ नंतर बांधलेल्या इमारती – १

 

मालमत्तेचे भांडवली मूल्य जाणून घेतल्यावर पुढील पद्धतीने मालमत्ता कराची आकारणी जाणून घेता येते  

मालमत्तेचे भांडवली मूल्य X सध्याचा मालमत्ता कराचा दर (टक्के ) X वापराच्या उद्देशानुसार गुणांक  

वापराच्या उद्देशानुसार गुणांक पुढीलप्रमाणे आहेत :

 • हॉटेल्स आणि तत्सम व्यवसाय – ४
 • व्यापारी मालमत्ता (दुकाने / कचे-या ) – ३
 • औद्योगिक वापर / कारखाने  – २
 • निवासी मालमत्ता आणि सेवाभावी संस्थांच्या मालमत्ता – १

 

मालमत्ता कर कसा भरायचा

बृहन्मुंबई महापालिकेच्या हेल्प सेंटर मध्ये / सहाय्यक महसूल अधिकारी कार्यालय / सर्व वॉर्ड ऑफिस मध्ये असलेल्या नागरिक सुविधा केंद्रात मालमत्ता कर भरता येतो

पुढीलपैकी कोणत्याही वेबसाइट वर सुद्धा व लाइन पद्धतीने कर भरता येतो

बृहन्मुंबई महानगरपालिका  – https://prcvs.mcgm.gov.in/

नवी मुंबई महानगरपालिका – https://www.nmmc.gov.in/property-tax2

वेबसाइट वर लॉग इन केल्यावर आपला खाते क्रमांक नमूद करावा. मालमत्ता कर भरण्यासाठी सहामाही किंवा वार्षिक – दोन्ही पर्याय आहेत. सध्या या वेबसाइट फक्त नेट बँकिंग मार्फत पैसे स्वीकारतात (क्रेडिट कार्ड नाही ). पैसे जमा केल्यावर मालमत्ता कराच्या पावतीची मुद्रित प्रत जपून ठेवावी.  पावती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व कर भरल्याचा पुरावा म्हणून आहे तसेच मालमत्तेच्या मालकीचा पुरावा म्हणूनही आहे. कर भरल्यावर त्याची नोंद तुमच्या खात्यात झाली आहे आणि तेथे कोणतीही थकबाकी दिसत नाही हे तपासून पहावे. या बाबतीत कोणतीही तफावत अथवा चूक असल्यास ती ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी.  

 

Was this article useful?
 • 😃 (0)
 • 😐 (0)
 • 😔 (0)

Comments

comments