स्थावर मालमत्तेचे मूलभूत सिद्धांत भाग 2 – ओएसआर, एफएसआय, लोडिंग आणि बांधकामाचे टप्पे


जेव्हा आपण एखाद्या रिअल इस्टेट एजंटशी बोलत असतो तेव्हा आपण गूगल वर संज्ञांचे अर्थ शोधत असता का? चिंता करू नका, असे अनेक लोकं आहेत! एक अंडर-कंस्ट्रक्शन बिल्डिंगशी निगडीत व्यवसाय करताना बांधकामाचा टप्पा आणि अन्य प्रक्रियांशी संबंधित रिअल इस्टेट संज्ञांचे ज्ञान असणे फायदेशीर ठरते. लोडिंग फॅक्टर, एफएसआय आणि ओएसआर म्हणजे आपल्याकडून क्षेत्रासंबंधीत आकारलेल्या शुल्कासाठी वापरल्या जाणार्‍या संज्ञा आहेत. .बेस कॉस्ट कमी असला तरी पण सामान्य भागांचे शुल्क ,देखरेख शुल्क इत्यादी शुल्क जोडून एकूण खर्च आपल्या बजेट बाहेर जाऊ शकतो

कार्पेट एरिया, बिल्ट-अप एरिया आणि सुपर बिल्ट-अप एरिया बद्दल वाचू इच्छिता? आमच्या स्थावर मालमत्तेचे मूलभूत सिद्धांत पोस्ट श्रृंखलातील भाग 1 मध्ये या अटींचा वापर करताना डेव्हलपर्सला नेमके म्हणायचे असते हे जाणून घ्या: http://bit.ly/1QmOjyJ

Real Estate Basics Part 2 – OSR, FSI, Loading & Construction Stages

या पोस्टमध्ये आपण बांधकाम शब्दकोशातील लोडिंग फॅक्टर, ओएसआर आणि एफएसआयसारख्या शब्दांचे अर्थ जाणून घेऊ म्हणजे आपल्याला फसवणे कठिण होईल

 

लोडिंग फॅक्टर

लोडिंग फॅक्टर म्हणजे असे क्षेत्र ज्यामध्ये एका फ्लॅटच्या कॉमन एरियाच्या अनुरुपोत्तर समभागांचा समावेश असतो जो कार्पेट एरियामध्ये एक गुणक अर्जित करून निर्धारित केला जातो.  सर्वसाधारणपणे बांधकाम व्यावसायिक लोडिंग फॅक्टरची मोजणी करताना पायर्‍या आणि एलिव्हेटरच्या आसपासचा एरिया कॉमन एरिया मध्ये गणतात.. अशाप्रकारे कार्पेट क्षेत्राशी एकत्रित केल्यावर लोडिंग फॅक्टर, फ्लॅटचा सुपर बिल्ट-अप एरिया बनतो.

उदाहरणार्थ, जर बिल्डर 1.25 ला लोडिंग फॅक्टर म्हणून धरतो, तर याचा अर्थ असा की 25% जागा फ्लॅटच्या कार्पेट एरियामध्ये जोडली गेली आहे. फ्लॅटचे चटई क्षेत्र 500 चौरस फूट असल्यास फ्लॅटच्या सुपर बिल्ट-अप एरियाची गणना पुढीलप्रमाणे करता येईल:

500 चौरस फूट + 500 x 25% = 625 चौरस फूट

Real Estate Basics Part 2 – OSR, FSI, Loading & Construction Stages

 

ओएसआर (ओपन स्पेस रेशिओ )

ओपन स्पेस रेशिओ (ओएसआर) एक संज्ञा आहे जी सामान्यतः निवासी जागांच्या बांधकामात वापरली जाते. संपूर्ण ओपन स्पेसला (जी जमिनीच्या मालकीच्या भागातील विकासासाठी प्रस्तावित असते) एकूण जमीन तुकड्याच्या क्षेत्राने विभागून ओ एस आर कॅलक्युलेट केल्या जातो. बांधकाम करता येण्याजोग्या आणि खासगी मालकी असलेल्या खुल्या जागेवर 320 स्क्वेअर फूट पेक्षा कमी असलेल्या खुल्या जागेला ओपन एरिया म्हणून मोजले जात नाही. पण पार्किंग आणि मनोरंजन क्षेत्रातील गोष्टी खुल्या जागेमध्ये समाविष्ट आहेत.

उदाहरणार्थ, 4 एकर सामान्य खुल्या जागेच्या विकासासाठी 8 एकर जमीन प्रस्तावित  असल्यास, ओपन स्पेस रेशिओ 50% आहे.

Real Estate Basics Part 2 – OSR, FSI, Loading & Construction Stages

 

एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स)

एफ.एस.आय. म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, ज्याला फ्लोअर एरिया रेशिओ (एफएआर) म्हणूनही ओळखले जाते) हे प्लॉटच्या एकूण क्षेत्राचे आणि एकूण बिल्ट-अप क्षेत्राचे गुणोत्तर आहे. एका विशिष्ट क्षेत्राची नगरपालिका परिषद, त्या क्षेत्रातील इमारतींचे आकार यांचे नियमन करण्यासाठी विशिष्ट श्रेणीतील एफएसआय मर्यादा स्थापन करण्यासाठी जबाबदार असते. एफएसआय एक मोजमाप असून तो एका इमारतीच्या उंची आणि पावलाचा ठसा जोडतो, त्याचे नियमन केल्यामुळे इमारतच्या बांधणीत लवचिकता मिळते.

उदाहरणार्थ, 10,000 चौरस मीटर क्षेत्राचा एखाद्या प्लॉटला, जर 1 चा एफएसआय दिला जातो, तर प्रकल्पासाठी 10 हजार चौरस मीटरच्या बांधकामाची परवानगी दिली जाईल.

Real Estate Basics Part 2 – OSR, FSI, Loading & Construction Stages

 

बांधकामाचे टप्पे

आपण बांधकामच्या विविध स्तरांबद्दल चिंतित होण्याची गरज नसल्याचे  गृहीत धरण्याचे निवडू शकता, पण जर आपण बांधकाम चालू असलेल्या फ्लॅटचा व्यवहार करत असाल तर ह्या टप्प्यांचे ज्ञान नक्कीच आपल्याला मदत करेल.

Real Estate Basics Part 2 – OSR, FSI, Loading & Construction Stages

इमारत बांधकाम प्रक्रियेतील सर्व टप्प्यांतल्या रिअल इस्टेट संज्ञांची माहिती तुम्हाला संकटांपासून वाचवेल

1) मोबिलायझेशन

बांधकामासाठी प्लॉट तयार करण्याच्या प्रक्रियेला मोबिलायझेशन म्हणतात.. या प्रक्रियेमध्ये प्लॉटभोवती कुंपण बांधणे, आवश्यक सेवा उपलब्ध करणे, बांधकामाचे साधन वाहून नेणे आणि मजूरांसाठी शेड बांधणे यांचा समावेश होतो.

2) ग्राउंड वर्क

प्लॉटचे भूखंड समतल करण्याची प्रक्रिया, बेंचमार्किंग आणि प्लॉट साफ करणे जमिनीच्या कामाच्या टप्प्यात येते.

3) सब स्ट्रक्चर वर्क

सब स्ट्रक्चर वर्कमध्ये फाउंडेशन, नेक कॉलम्स, ग्रेड बीम, तळमजला इ. चे बांधकाम यांचा समावेश आहे

4) सुपर स्ट्रक्चर वर्क

सुपर स्ट्रक्चर वर्कमध्ये जमिनीच्या वर करायच्या बांधकामाचा समावेश आहे जसे स्तंभ, स्लॅब, बीम, पायर्‍या इत्यादी

5) दगडी बांधकाम

दगडी बांधकाम एक टप्पा आहे ज्यात प्रत्येक गोष्ट आकारात येते. यात प्लास्टरचे काम आणि भिंती आणि छत समतल करणे समाविष्ट आहे. हा टप्पा म्हणजे सेवा कार्यासाठी प्रकल्प तयार करणे.

6) सेवा कार्य

सेवांच्या कामामध्ये इलेक्ट्रिकल काम, स्वच्छताविषयक काम, नळकाम इत्यादींचा समावेश आहे. लाईट आणि पंखे लावणे, बाथरूमची फिटिंग्ज, शौचालयाची साधने आणि बिल्डरकडून पुरवलेली कोणतीही गोष्ट स्थापित करणे यांचा समावेश आहे.

7) फिनिशिंग वर्क

या टप्प्यात, जागेला अंतिम रूप दिल्या जाते. त्यात पेंटिंग आणि सुतारकाम दरवाजे, दरवाजाचे फ्रेम्स, आणि काही बाबतीत खोटी लाकडी छत यासारख्या कामांचा समावेश आहे.

8) कम्प्लिशन

इमारत बांधणी प्रक्रियेचे पूर्णत्व झाल्यावर घराची स्वच्छता, अंतिम तपासणी आणि खरेदीदाराला मालमत्तेचे हस्तांतरण ही कामे केली जातात.

आम्हाला आशा आहे की बांधकामाच्या बाबतीत रियाल्टार जार्गन्सशी संबंधित आपल्यासर्व गोंधळाचे निराकरण होईल. आपल्याला अधिक प्रश्न असल्यास, आम्हाला विचारा!

कार्पेट एरिया, बिल्ट-अप एरिया आणि सुपर बिल्ट-अप एरिया बद्दल वाचू इच्छिता? आमच्या स्थावर मालमत्तेचे मूलभूत सिद्धांत पोस्ट श्रृंखलातील भाग 1 मध्ये या अटींचा वापर करताना डेव्हलपर्सला नेमके म्हणायचे असते हे जाणून घ्या: http://bit.ly/1QmOjyJ

 

Was this article useful?
  • 😃 (3)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments