घरभाड्यावरील कर आणि कपाती: काय येईल घरमालकाच्या हाती


इन्कम टॅक्स कायद्यानुसार जी व्यक्ती प्रॉपर्टी भाड्याने देऊन उत्पन्न कमावते त्या व्यक्तीला मिळणाऱ्या भाड्यावर काही विशिष्ट टॅक्स भरावा लागतो. ह्या टॅक्सच्या रक्कमेत काही कपातींचा ती व्यक्ती लाभ घेऊ शकते यासंदर्भात कायदेशीर तरतुदींचे एक परीक्षण

प्राप्त भाड्यावर टॅक्सची आकारणी

भारतीय इन्कम टॅक्स अधिनियमात प्रॉपर्टी मालकाला प्राप्त होणारे भाडे, ‘घर मिळकतीतून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली नमूद केले आहे.

त्यामुळे, प्रॉपर्टी भाड्याने देऊन प्राप्त केले जाणारे भाडे करपात्र आहे. रहिवासी घर, तसेच व्यावसायिक मालमत्ता संदर्भात भाडे, या शीर्षकाखाली करपात्र असतात. आपली कारखान्यची इमारत किंवा इमारतीशी निगडित भाड्याने दिलेली जागा हे सुद्धा याच शीर्षकाखाली करपात्र आहेत.

प्रॉपर्टी त्याच्या वार्षिक मूल्याच्या आधारावर करपात्र आहे. प्रॉपर्टीचे वार्षिक मूल्य,  प्रॉपर्टीद्वारे प्राप्त केले जाणारे भाडे किंवा प्रॉपर्टी किती रक्कमेने साधारणपणे भाड्याने दिली जाऊ शकते यापैकी जे जास्त असेल त्या आधारावर निर्धारित केले जाते.म्हणून, जर आपण नाममात्र एखादी प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल तर ते भाडे करपात्र नसून, अशा प्रॉपर्टीच्या कर आकारणीबद्दल विचारात घेण्यात येणारी रक्कम, बाजार भावाप्रमाणे जे भाडे असेल ते भाडे होईल. त्याचप्रमाणे, जर आपल्या प्रॉपर्टीचे वास्तविक भाडे तुम्हाला बाजारातील भाडेपेक्षा जास्त मिळत असेल तर, तुम्ही प्राप्त करत असलेले भाडे करपात्र होईल. कृपया नोंद घ्या की आपल्या हातात येणारी भाड्याची रक्कम करपात्र असते, पावतीवरील भाड्याची रक्कम नव्हे.

मिळालेल्या भाड्यासाठी फक्त मालक करपात्र असतो.  म्हणूनच,आपण जर एखादी प्रॉपर्टी उपभाड्याने देऊन भाडे वसूल करत असाल, तर प्राप्त झालेली रक्कम ‘इतर स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली करपात्र होईल. एखाद्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीला मिळणारे भाडेही या शीर्षका अंतर्गत करपात्र होईल. या उद्देशासाठी मालकी सामान्यपणे परिभाषित केली गेली आहे आणि अशा प्रकरणांमध्येही आपण एखाद्या अग्रीमेंटचा भाग म्हणून एखाद्या संपत्तीचा ताबा घेतला असेल आणि जिथे मालकाचे कायदेशीर शीर्षक आपल्या नावावर हस्तांतरित केले गेले नसेल त्यांचाही समावेश होतो. जर एखाद्या व्यक्तीने प्रॉपर्टी बायको किंवा नवऱ्याला भेट म्हणून दिली असेल तर भेट देणारी व्यक्तीच प्रॉपर्टीची मालक मानली जाईल आणि जरी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भाडे मिळत नसेल तरी ती करपात्र होईल. त्याचप्रमाणे, जर अल्पवयीन व्यक्तीला मालमत्ता भेट दिली जात असेल, तर दाता पालकांकडून अशा प्रॉपर्टीसाठी कर आकारला जातो.

 

भाडेप्राप्तीला मिळणारी वजावट

मिळविलेले एकूण सर्व भाडे करपात्र होते असे नाही.

प्रॉपर्टीच्या मिळणाऱ्या /मिळालेल्या भाड्यात, आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेने आकारलेला प्रॉपर्टी टॅक्स कापण्याची परवानगी आहे. भाडे हे वाढीवर करपात्र असल्याने, कायद्याच्या  विशिष्ट अटी पूर्ण केल्यावर आपण संपूर्ण भाडे करपात्र नसल्याचे लक्षात आणून देऊ शकता. उपरोक्त दोन गोष्टी वजा केल्यानंतर मिळणारे वार्षिक मूल्यामधून  दुरुस्तीसाठी खर्च भागवण्यासाठी त्याच्या 30% मानक कपात केल्या जातो.

कृपया लक्षात घ्या की 30% कपात ही एक मानक कपात आहे, मग आपण मालमत्तेच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी चालू वर्षात कोणता खर्च केला असेल किंवा नसेल.

जर आपण मालमत्तेच्या खरेदी, बांधकाम, दुरुस्ती / नूतनीकरणासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल, व्यक्तीकडून किंवा गृहकर्ज, तर तुम्हाला कर्जावरील व्याज कपातीचा दावा करण्याची परवानगी आहे.कर्जावरील व्याज दरांवर कोणतेही बंधन नाही आणि आपण भाडे उत्पन्नात त्याचा दावा करू शकता.

तथापि, 2017-18 च्या अर्थसंकल्पामध्ये ‘इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी’ या शीर्षकाखाली नुकसानीसाठी 2 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्याची आपले इतर उत्पन्न जसे  वेतन, व्यावसायिक उत्पन्न किंवा भांडवली लाभ यांनी भरपाई केली जाऊ शकते. 2 लाख रुपयांपेक्षाही जास्त नुकसान झाल्यास पुढील आठ वर्षांच्या काळात ते विभागून दाखवता येऊ शकते. जे व्यक्तीं प्रॉपर्टी  विकत घेण्यासाठी पैसे कर्जाने घेतात त्यांना हे त्रासदायक ठरू शकते, कारण भाडे साधारणपणे  प्रॉपर्टीचा मूलभूत किमतीच्या 3% -4% असते, तर कर्जावरील व्याज दर सुमारे 9% असतो. मुख्यत्वेकरून गृहकर्ज सहसा दीर्घ कालावधीसाठी घेतले जातात त्यामुळे नुकसानीची परिस्थिती सामान्यत: दीर्घ कालावधीसाठी चालू राहते आणि 2 लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज प्रभावीरित्या कायमचे नुकसान असते.

जर तुम्ही राहत असलेल्या घरांपेक्षा अधिक घरे तुम्ही कर्ज काढून घेतलेली असतील तर तुम्हाला ते त्रासदायक ठरू शकते कारण पुढील वर्षापासून तुमचे कर जास्तीत जास्त वाढविले जाण्याची शक्यता आहे.

(लेखक कर आणि गृह वित्त तज्ज्ञ आहे व 35 वर्षांचा अनुभव आहे.)

 

Was this article useful?
  • 😃 (0)
  • 😐 (0)
  • 😔 (0)

Comments

comments