बिघा: भू-क्षेत्र मापनाबद्दल सर्व माहिती


साधारणपणे वापरल्या जाणार्‍या भू-क्षेत्र मापनामध्ये, बिघा हे संपूर्ण उत्तर भारतात एकक म्हणून वापरले जाते. भारतीय राज्ये बीघाला कसे समजतात, क्षेत्राच्या इतर एककांमध्ये त्याचे रूपांतरण आणि बिघाबद्दल सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न, याबद्दल आम्ही येथे स्पष्टीकरण देत आहोत.

सामान्यतः स्वीकारले जाणारे क्षेत्र मोजण्याचे एकक वगळता, अनेक स्थानिक जमीन मोजण्याचे एकक भारतात वापरले जातात. उत्तर भारतात, बिघा हे सर्वात सामान्य जमीन मोजण्याचे एकक आहे.

 

बिघा म्हणजे काय?

बिघा हे जमीन मोजण्याचे पारंपारिक एकक आहे.  हे सामान्यत: भारताच्या उत्तर भागातील प्रदेशात, बांगलादेश आणि नेपाळ आणि जेथे भारतातून स्थलांतरित झालेले लोक आहेत जसे फिजी अशा भागात वापरले जाते. भारतात आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे मोजमापासाठी म्हणून बिघाचा वापर करतात. तथापि, हे लक्षात घेण्याजोगे आहे की या सर्व ठिकाणी या शब्दाबद्दल एकसारखी मानक माहिती नाही.

जरी मापनाच्या युनिट म्हणून बीघाचा वापर बराच काळापूर्वी झाला असला तरी, देशभरात हे एकक अद्याप क्षेत्रीय भिन्नतेसह वापरले जाते.

हे देखील पहा: बिघा ते एकर कॅल्क्युलेटर

 

एक बिघा किती मोठा आहे?

बिघाने व्यापलेले क्षेत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भिन्न असते.

 

भारतीय राज्यांमध्ये १ बिघा किती आहे?

राज्ये बिघा आकलन
आसाम१४,४०० चौरस फूट
बिहार२७,२२० चौरस फूट
गुजरात१४,४२७ चौरस फूट
हरयाणा२७,२२५ चौरस फूट
हिमाचल प्रदेश८,७१२  चौरस फूट
झारखंड२७,२११ चौरस फूट
पंजाब९,०७० चौरस फूट
राजस्थान१ पक्का बिघा = २७,२२५  चौरस फूट

१ कच्चा बिघा = १७,४२४  चौरस फूट

मध्य प्रदेश१२,०००  चौरस फूट
उत्तराखंड६,८०४   चौरस फूट
उत्तर प्रदेश२७,०००  चौरस फूट
पश्चिम बंगाल१४,३४८.२९   चौरस फूट

* आपण हाऊसिंग डॉट कॉमच्या लँड युनिट कनव्हर्टरचा वापर करूनही ही गणना करू शकता.

 

पक्का आणि कच्चा बिघा यामधील फरक

वर दिलेल्या सारणीत, तुम्हाला कदाचित हे लक्षात आले असेल की राजस्थानमध्ये पक्का आणि कच्चा बिघा हे दोन्ही अस्तित्त्वात आहेत. या दोन्ही संज्ञेचा वापर उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातही केला जातो. पक्की किंवा पक्का बिघाचा तुलनेने जास्त वापर होत असतांना, कच्चा बिघा सहसा जमीनदारांनी भाडेकरूंबरोबर व्यवहार करताना सहसा वापरतात. दोन्ही मोजमाप सुरुवातीच्या जमीनदारांनी ‘प्रमाणित’ केले होते आणि वेगवेगळ्या जागेप्रमाणे बदलणारे होते.

 

इतर एकाकामध्ये रूपांतरित झाल्यावर सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न

क्र.प्रश्न (FAQ)बिघा रूपांतरण
एका एकरामध्ये किती बिघा आहे?एक एकर म्हणजे १.६२ बिघा आहे.
एका हेक्टरमध्ये किती बिघा आहे?एक हेक्टर ४ बिघा आहे आणि परिणामी, दोन हेक्टर ८ बिघा आणि पाच हेक्टर २० बीघा आहे.

(तपासा: बिघा ते हेक्टर रूपांतरण)

एका बिघामध्ये किती चौरस फूट आहेत?एक बिघा म्हणजे २६,९१०.६६ चौरस फूट.

आमचे बिघा ते चौरस फूट कॅल्क्युलेटर वापरा

एका बिघामध्ये किती चौरस यार्ड आहेत?एक बिघा म्हणजे २,९९० चौरस यार्ड.

बिघा ते चौरस यार्ड रूपांतरित करा

एका बिघामध्ये किती चौरस मीटर आहेत?एका बिघामध्ये म्हणजे २,५०० चौरस मीटर.

हे देखील पहा: बिघा ते चौरस मीटर

एका बिघामध्ये किती मार्ला आहेत?एक बिघा म्हणजे ०.४६ मार्ला आहे.
एका बिघामध्ये किती कनल  आहेत?एक बिघा म्हणजे ४.९४ कनल आहे.

बिघा ते कनल रूपांतरित करा

एका बिघामध्ये किती बिश्व आहेत?एक बिघा म्हणजे ०.०१ बिश्व आहे.

बिघा ते बिश्व कॅल्क्युलेटर

एका बिघामध्ये किती ग्राउंड आहेत?एक बिघा म्हणजे १.०४ ग्राउंड आहे.
१०एका बिघामध्ये किती आंकदम आहेत?एक बिघा म्हणजे ३४.७३ आंकदम आहे.
११एका बिघामध्ये किती रूड आहेत?एक बिघा म्हणजे ०.२३ रूड आहे.
१२एका बिघामध्ये किती चातक आहेत?एक बिघा म्हणजे ५.५६ चातक आहे.
१३एका बिघामध्ये किती कोत्तः आहेत?एक बिघा म्हणजे ३७.३८ कोत्तः आहे.
१४एका बिघामध्ये किती सेंट कोत्तः आहेत?एक बिघा म्हणजे ६१.७८ सेंट आहे.
१५एका बिघामध्ये किती पर्च आहेत?एक बिघा म्हणजे ९.१८ पर्च आहे.
१६एका बिघामध्ये किती गुंठा आहेत?एक बिघा म्हणजे २.३० गुंठा आहे.
१७एका बिघामध्ये किती अरे  आहेत?एक बिघा म्हणजे २.३२ अरे आहे.

* टीप: बिघाच्या स्थानिक समजेनुसार काही संख्या बदलू शकतात.

 

बिघा वेगवेगळ्या राज्यात का बदलत आहे?

१७७८ मध्ये फ्रेंचांनी प्रमाणित जमीन मोजमापांची एकके तयार केली. त्यापूर्वी, स्थानिक पद्धतीची जमीन मोजमाप लोकप्रिय होते. मूळ रहिवासी लोक अद्याप जुनी आणि परिचित ‘बिघा; हि संकल्पना समजण्यासाठी वापरणे पसंत करतात. हे स्थानिक पातळीवर मोजमापासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व घटकांसाठी देखील खरे आहे.

 

बिघाविषयी क्षेत्रनिहाय समज

क्षेत्र मापन राज्य
पूर्व भारत१ बिघा = १,६०० चौरस यार्डआसाम आणि बंगाल
पश्चिम भारत१ बिघा = १,९३६ चौरस यार्डगुजरात आणि राजस्थानचे भाग
मध्य भारत१ बिघा = १,३३३.३३ चौरस यार्डमध्य प्रदेश
उत्तर भारत१ बिघा = ९०० ते ३,०२५ चौरस यार्डसंपूर्ण उत्तर भारत

टीपः दक्षिण भारत जमीन मोजमाप एकक म्हणून बिघा वापरत नाही.

 

इतर सर्वसामान्य क्षेत्रफळ रूपांतरीत घटक

एकक रापांतरित घटक
१ चौरस फुट१४४ चौरस इंच
१ चौरस यार्ड९ चौअरास फुट
१ एकर४,८४० चौरस यार्ड
१ हेक्टर१०,००० चौरस मीटर (किंवा 2.४७ एकर)
१ बिघा९६८ चौरस यार्ड
१ बिघा – पक्का३,०२५ चौरस यार्ड
१ बिस्व४८.४ चौरस यार्ड
१ किल्ला४,८४० चौरस यार्ड
१ आंकदम७२ चौरस फुट
१ सेंट४३५.६ चौरस फुट
१ ग्राउंड२,४०० चौरस फुट
१ कनल५,४४५ चौरस फुट (८ कनल = १ एकर)
१ कंचम४८४ चौरस यार्ड
१ चातक१८० चौरस फुट
१ गुंठा१,०८९ चौरस फुट

 

बिघाला इतर एकाकामध्ये सहज रूपांतरीत कसे करावे?

जेव्हा क्षेत्रफळाचे रूपांतर करणे येते तेव्हा आपल्यापैकी काहीजण ते करणे कदाचित चांगले जाणतात. तथापि, तरीही, स्थानिक क्षेत्रफळ मापन भिन्न असू शकते. हाउसिंग डॉट कॉम आपल्याला एक रूपांतरण करण्याचे साधन विनामूल्य प्रदान करते.

बिघाचे इतर एकाकामध्ये रुपांतर करण्यासाठी फक्त येथे क्लिक करा.

 

दक्षिण भारतात बिघाचा उपयोग भूमापन करण्यासाठी केला जातो का?

आपल्याला आधीच समजले असेल की दक्षिण भारतात बिघा वापरला जात नाही. देशाच्या या भागात, कुंचम, गुंठा, ग्राउंड, सेंट आणि अंकनम अधिक लोकप्रियपणे वापरले जातात.

 

बिघा ते एकर रूपांतरण

एकर बिघा
१.६
३.२
४.८
६.४
९.६
११.2
१२.८
१४.४
१०१६

 

हेक्टर ते बिघा रूपांतरण

हेक्टर बिघा
३.९५
७.९०
११.८६
१५.८१
१९.७६
२३.७२
२७.६७
३१.६२
३५.५८
१०३९.५३

 

बांगलादेशात बिघाचा वापर

बांगलादेशात जमिनीच्या मोजमापासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय एककांमध्ये कथा आणि बिघा आहेत. मेट्रिक पद्धतीपासून, एकरचा वापर देखील लोकप्रिय आहे. बांगलादेशात एक एकर जमीन तीन बिघा जमिनीच्या बरोबरीची आहे.

जमीन मोजण्याचे एकक म्हणून बिघा फिजीमध्ये देखील वापरला जातो, जिथे एक बिघा एक एकर जमिनीच्या बरोबरीचा असतो.

 

सामान्य प्रश्न (FAQs)

बिघा म्हणजे काय?

बिघा हे एक जमीन मोजण्याचे एकक आहे जे सामान्यतः उत्तर भारतामध्ये वापरले जाते.

एका एकरामध्ये किती बिघा येईल?

एक एकरात १.६२ बिघाचा समावेश आहे.

एका हेक्टरमध्ये किती बिघा येईल?

एक हेक्टर ४ बिघाच्या बरोबरीचे आहे.

 

Was this article useful?
  • 😃 (1)
  • 😐 (1)
  • 😔 (0)

Comments

comments

Comments 0