घरात योग्य रंग निवडताना प्रत्येक खोलीसाठी विशिष्ट रंग ठरवणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, हॉलसाठी हलके, आमंत्रण देणारे रंग असावेत, जे उबदारपणा आणि संवाद साधण्याची भावना वाढवतात, तर शयनकक्षासाठी शांत रंग, जसे की हलका निळा किंवा हिरवा रंग निवडावा, जो शांती देतो. स्वयंपाकघरात लाल किंवा पिवळा रंग उत्साह वाढवण्यासाठी योग्य आहे. वास्तूच्या तत्त्वानुसार, दिशांनुसार रंग निवडले जातात. जसे की, पूर्व दिशेला हलके रंग, दक्षिण दिशेला उबदार रंग, पश्चिम दिशेला गडद रंग आणि उत्तर दिशेला हलके हिरवे रंग फायदेशीर ठरतात. हे रंग घरात सकारात्मक ऊर्जा आणि समतोल साधण्यास मदत करतात.
घरातील रंगांचा लोकांवर मानसिक प्रभाव पडतो कारण विविध रंग वेगवेगळ्या भावना निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार, रंगांचा वापर संबंधित घटकांच्या आधारे केला जातो. घरात या रंगांचे संतुलन राखल्याने ते सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात, संपत्ती आकर्षित करतात आणि निरोगी व सकारात्मक जीवन जगण्यासाठी मदत करतात.
हे देखील पहा: तुमच्या मालमत्तेसाठी घराचे रंग निवडण्याची कल्पना
घरासाठी वास्तू रंग: सर्वोत्तम रंग कोणता?
घरासाठी सर्वोत्कृष्ट रंग ऊर्जा, जागा, खोली, दिशा आणि परावर्तित होणारा मूड यावर अवलंबून असतो.
घरासाठी रंग निवडण्यात पाच घटकांची भूमिका
घरासाठी रंग निवडताना, ते पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि अवकाश या पाच घटकांशी संतुलन साधतील याची काळजी घ्या. योग्य रंग निवडल्याने या नैसर्गिक घटकांशी सुसंगती साधली जाते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
घरात पृथ्वीशी संतुलन साधण्यासाठी तपकिरी, हिरवा, पांढरा, बेज असे नैसर्गिक रंग निवडा. सजावटीत ताग, बांबू, ऊस, लाकूड, आणि कापूस यासारखी नैसर्गिक साहित्य वापरल्यास शांत आणि साधेपणाचे वातावरण तयार होते.
वास्तूनुसार बेडरूमचा रंग: प्रत्येक रंग काय दर्शवतो?
- वास्तुनुसार बेडरूमचा रंग निळा म्हणजे सौंदर्य, सत्य, समर्पण
- वास्तूनुसार बेडरूमचा हिरवा रंग म्हणजे सकारात्मक वातावरण होय
- वास्तूनुसार बेडरूमचा गुलाबी रंग म्हणूजे एक प्रकारचे विधान आहे.
- वास्तूनुसार पिवळा रंग शयनकक्षाचे वातावरण प्रसन्न बनवतो.
- वास्तूनुसार बेडरुमचा नारंगी रंग सशक्त वातावरण बनवतो.
- वास्तूनुसार बेडरूमचा राखाडी रंग अतिशय क्लासी आहे
- वास्तूनुसार शयनकक्षाचा रंग पांढरा असल्याने शांत वातावरण निर्माण होते
- वास्तूनुसार शयनकक्षाचा लॅव्हेंडर रंग, शांत आणि सुखदायक वातावरण बनवते.
हे देखील पहा: पूजा कक्ष, लिव्हिंग रूम आणि इतर खोल्यांसह पश्चिमाभिमुख घर वास्तु योजना
जोडप्यांसाठी वास्तूनुसार बेडरूमचा रंग
निळा आणि हिरवा हे जोडप्यांसाठी बेडरूमचे वास्तू रंग आहेत.
बेडरूमच्या वास्तूनुसार, मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला असावी आणि म्हणून वास्तूनुसार मास्टर बेडरूम निळ्या रंगाने रंगवावा. बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे आणि वास्तूनुसार मास्टर बेडरूमचा रंग सुखदायक आणि सकारात्मक आभा असणारा असावा. वास्तूनुसार शयनकक्षाचा वास्तू रंग डोळ्यांसाठी सुखदायक असलेल्या रंगांच्या हलक्या छटेसह थंड ठेवणे चांगले. वास्तूनुसार मास्टर बेडरूमचा रंग निळ्या रंगातील दरवाजे आणि फर्निचरसह असणारा पांढरा रंगातील प्रकारात असू शकतो. याशिवाय कोणतीही हलकी किंवा पेस्टल शेड बेडरूमसाठी वास्तु रंगांप्रमाणे चांगली काम करू शकते. बेडरूमसाठी वास्तू रंगांनुसार जड आणि गडद रंग टाळा कारण ते या जागेत उदासपणाची भावना वाढवू शकतात. अशा प्रकारे, काळे इत्यादी रंग टाळावेत कारण ते मास्टर बेडरूमसाठी वास्तू रंग म्हणून खरे नसतात.
वास्तूनुसार जोडप्यांसाठी बेडरूमचे रंग विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी पिवळ्या किंवा गुलाबी रंगात असावेत, कारण हे बॉन्डिंग होण्यास मदत करते आणि वास्तूनुसार बेडरूमच्या भिंतींसाठी सर्वोत्तम रंग आहेत. ज्या जोडप्यांचे लग्न नुकतेच झालेले आहे, त्यांच्यासाठी वास्तूनुसार शयनकक्षाचे रंग हे हिरव्या आणि निळ्या रंगाच्या हलक्या छटा आहेत.
हे देखील पहा: बेडरूमच्या भिंतीसाठी शीर्ष १० रंग संयोजन
वास्तुनुसार बेडरुमचा रंग म्हणून जांभळ्या आणि लाल रंगाच्या गडद छटा टाळा. जर तुम्हाला चिंताग्रस्त समस्या किंवा उच्च रक्तदाब असेल तर, बेडरूमसाठी वास्तु रंग म्हणून राखाडी आणि काळ्या रंगाच्या गडद छटा टाळा.
घरासाठी वास्तू रंग: खोल्यांनुसार भिंतींचे रंग

वास्तूनुसार भिंतींचे रंग
खोली | वास्तू नुसार सुचवलेले रंग | वास्तू नुसार टाळण्यायोग्य रंग |
मुख्य शयनकक्ष | निळा | लाल रंगाच्या गडद छटा |
पाहुण्यांसाठी खोली | पांढरा | लाल रंगाच्या गडद छटा |
ड्रोइंगरूम /दिवाणखाना | पांढरा | गडद रंग |
जेवणाची खोली | हिरवा, निळा किंवा पिवळा | राखाडी |
सीलिंग | पांढरा किंवा ऑफ-व्हाइट | काळा आणि राखाडी |
लहान मुलांची खोली | पांढरा | गडद निळा किंवा लाल |
स्वयंपाकघर | नारंगी किंवा लाल | गडद राखाडी, निळा, तपकिरी आणि काळा |
स्नानगृह | पांढरा | कोणत्याही रंगाच्या गडद छटा |
हॉल | पिवळा किंवा पांढरा | गडद रंगातील कोणताही रंग |
पुजेची खोली | पिवळा | लाल |
घराचे बाह्यरूप | पिवळसर पांढरा, ऑफ व्हाईट, हलका जांभळा | काळा |
मुख्य दरवाजा/प्रवेशद्वार | पांढरा, चंदेरी किंवा लाकडी छटाचे रंग | लाल, गडद पिवळा |
अभासिका | हलका हिरवा, निळा, क्रीम किंवा पांढरा | तपकिरी, राखाडी |
बाल्कनी/व्हरांडा | निळा, क्रीम, गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या हलक्या छटा | राखाडी, काळा |
गॅरेज | पांढरा, पिवळा, निळा | काळा, तपकिरी |
जिना | पांढरा, बेज, तपकिरी, हलका राखाडी, फिकट निळा | लाल आणि काळा |
हे देखील पहा: वास्तूनुसार मुख्य गेट रंग संयोजन
वास्तुदिशेनुसार भिंतींचे रंग
दिशा | योग्य रंग |
ईशान्य | फिक्का निळा |
पूर्व | पांढरा, हलका निळा |
आग्नेय | नारंगी, गुलाबी, चंदेरी |
उत्तर | हिरवा, पिस्ता हिरवा |
वायव्य | वास्तुनुसार हलका राखाडी, पांढरा, क्रीम |
पश्चिम | पश्चिमेकडील भिंतीचा रंग वास्तुनुसार निळा, पांढरा आहे |
नैऋत्य | पीच, चिखलासारखा रंग किंवा हलका तपकिरी |
दक्षिण | लाल आणि पिवळा |
एटूझेडवास्तू डॉट कॉम (A2ZVastu.com) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक विकास सेठी म्हणतात, वास्तुनुसार प्रत्येक खोलीसाठी रंग निवडतांना घराची दिशा आणि घरमालकाची जन्मतारखेच्या आधारावर निर्णय घ्यावा लागेल. तर, वास्तूनुसार दक्षिण भिंतीचा रंग उत्तर भिंतीच्या रंगापेक्षा किंवा पश्चिम भिंतीच्या रंगापेक्षा वेगळा असेल.
“प्रत्येक दिशेला विशिष्ट वास्तुनुसार रंग असला तरी, काही वेळा तो घरमालकाला साजेसा नसतो, म्हणून, घर मालकांनी वास्तुशास्त्रानुसार रंगांसाठी वर नमूद केलेल्या (टेबुलर) सामान्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
काळा, लाल आणि गुलाबी रंग निवडताना घरमालकांनी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण हे रंग घरासाठी वास्तू रंगांनुसार प्रत्येक व्यक्तीला शोभत नाहीत,” असे सेठी स्पष्ट करतात.
वास्तूनुसार भिंतींचे रंग: अनुसरण करण्याच्या टिप्स
- तुमच्या अनुकूल ग्रह किंवा भाग्यशाली अंकाशी संबंधित वास्तूनुसार भिंतीचे रंग निवडा. वास्तुनुसार आपल्या शयनकक्षासाठी रंग निवडताना अंकशास्त्रज्ञांचा सल्ला घ्या.
- वास्तूनुसार दक्षिण भिंतीचा रंग एकतर केशरी किंवा लाल असावा कारण दक्षिण दिशेला मंगळ ग्रहाद्वारे नियंत्रित केले जाते.
- वास्तूनुसार हिरवा रंग उत्तरेकडील भिंतीचा रंग पसंत केला जातो, कारण तो बुध ग्रहाद्वारे नियंत्रित केला जातो. ईशान्य दिशेला बृहस्पति ग्रहाद्वारे नियंत्रित केले जाते आणि त्यामुळे या दिशेतील भिंतींसाठी पिवळ्या रंगांना प्राधान्य दिले पाहिजे.
- वास्तूनुसार पूर्व भिंतीचा रंग केशरी आहे कारण पूर्व दिशेला सूर्य नियंत्रित करतो. त्याचप्रमाणे आग्नेय दिशेसाठी लाल रंग निवडा.
- वास्तूनुसार पश्चिम भिंतीचा रंग शनी किंवा शनिद्वारे नियंत्रित केला जातो आणि वास्तूनुसार राखाडी रंग हा या कोपऱ्यासाठी आदर्श रंग आहे.
वास्तु नुसार भिंतींचे रंग: मार्गदर्शक तत्त्वे
स्थान / दिशा | रंग |
पश्चिम | वास्तुनुसार पश्चिम भिंतीचा रंग निळा आणि पांढरा आहे |
दक्षिण आणि दक्षिण-पूर्व | चांदेरी, पांढरा, नारिंगी आणि गुलाबी |
दक्षिण-पश्चिम | वास्तुनुसार दक्षिण-पश्चिम बेडरूमचा रंग पिवळा आणि हिरवा आहे |
उत्तर | वास्तूनुसार उत्तर भिंतीचा रंग हिरवा आहे |
उत्तर -पूर्व | क्रीम आणि पिवळा |
उत्तर-पश्चिम | वास्तूनुसार पांढरा, राखाडी आणि क्रीम |
पूर्व | वास्तूनुसार ईस्ट भिंतीचा रंग पांढरा, लाकडासारखे रंग किंवा हलका निळा आहे |
हे देखील पहा: घर खरेदी करताना आपण दुर्लक्ष करू नये असे वास्तु दोष
मुख्य दरवाजा/प्रवेशद्वार: मुख्य दरवाजासाठी शुभ रंग, त्याच्या दिशेच्या आधारावर वरील तक्त्यामध्ये नमूद केले आहे. समोरच्या दरवाजासाठी हलके रंग निवडा, जसे की पांढरे, चंदेरी किंवा लाकडासारखे रंग जे हॉलच्या रंगाच्या संयोजनाशी समक्रमित आहेत.
मुलांची खोली: जी मुले मोठी झाली आहेत आणि अभ्यासासाठी बाहेर गेली आहेत त्यांच्या खोल्यांसाठी वायव्य ही सर्वोत्तम जागा आहे. वायव्य दिशा चंद्राद्वारे नियंत्रित असल्याने, घरासाठी वास्तु रंगानुसार या दिशेने मुलांच्या खोल्या पांढऱ्या रंगाने रंगवल्या पाहिजेत.
स्नानगृह: स्नानगृहासाठी वायव्य हे सर्वोत्तम ठिकाण आहे आणि म्हणूनच स्नानगृह पांढऱ्या रंगाने रंगवले पाहिजे.
हे देखील पहा: बाथरूम वास्तू: वास्तूनुसार बाथरूम आणि शौचालयाची दिशा डिझाइन करण्यासाठी उपयुक्त टिप्स
पांढरा, क्रीम, सोनेरी तपकिरी किंवा पेस्टल शेड्स सारखे हलके रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. घरासाठी वास्तू रंगांनुसार, गडद रंगामुळे जागा केवळ लहान दिसत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतात.
वास्तूनुसार हॉलचा रंग: प्रत्येक घरातील दिवाणखाना हा ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो. आदर्शपणे, हॉल उत्तर-पूर्व किंवा वायव्य दिशेला असावा.
हॉलसाठी कोणता रंग सर्वोत्तम आहे?
वास्तूनुसार हॉलचा रंग पिवळा किंवा पांढरा असावा.
ती एक आरामदायक आणि शांत जागा असावी. पांढरा, पिवळा, शांत करणारा हिरवा किंवा निळा अशा छटा येथे सर्वोत्तम अनुकूल रंग आहेत. वास्तूनुसार हॉलचा रंग चमकदार किंवा त्रासदायक नसावेत.
जेवणाचे क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जेथे कुटुंब जेवणासाठी भेटतात. पीच, पिवळे, हलक्या नारंगी आणि अगदी निळ्या रंगासारखे उबदार रंग या क्षेत्रासाठी आदर्श आहेत. वास्तूनुसार या भागात कृष्णधवल रंग वापरणे टाळावेत.
घराचा बाह्य रंग: घराचा बाह्य रंग, त्याच्या मालकांवर आधारित असावेत. वास्तूनुसार बाहेरील भिंतीचा रंग हा पिवळसर-पांढरा किंवा ऑफ-व्हाइट किंवा हलका माव किंवा केशरी यांसारखा रंग असावा, जो सर्व राशीच्या लोकांना शोभेल.
पूजा खोली: वास्तू मार्गदर्शक तत्वानुसार पूजा खोलीत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येण्यासाठी ही खोली ईशान्य दिशेला असावी. आपल्या घराच्या या भागासाठी पिवळा सर्वात योग्य रंग आहे, कारण यामुळे ही प्रक्रिया सुलभ होईल. या जागेला तुमच्या घरातील शांत भाग बनवण्यासाठी तुम्ही या भागामध्ये गडद रंग टाळावेत. तुम्ही पांढरे आणि क्रीम किंवा केशरी रंग देखील वापरू शकतात, कारण ते ऊर्जा बाहेर टाकतात. वास्तूनुसार भिंतीचे रंग निवडताना, एक भिंत, शक्यतो वेदीची पार्श्वभूमी, हलक्या निळ्या किंवा हिरव्या रंगात असणे ही चांगली कल्पना आहे.
प्रवेशद्वार भागासाठी हिरवा हा अतिशय शुभ रंग आहे. यामुळे उपचार किंवा विश्रांती आणि वाढ किंवा पुनर्निर्मिती यामध्ये फायदा होतो. हिरवा रंग जास्त मूड स्विंग आणि स्वभावाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
अभ्यासिका: तुमच्याकडे घर-ऑफिस असल्यास, अभ्यासाच्या खोलीसाठी घरासाठी वास्तू रंगांनुसार हलका हिरवा, निळा, क्रीम आणि पांढरा रंग निवडा. हलक्या रंगांमुळे खोली मोठी दिसते. गडद रंग टाळा कारण ते जागेत अंधार आणेल. तुमच्या घरातील ऑफिससाठी सोनेरी, पिवळा, तपकिरी आणि हलक्या रंगाचा हिरवा रंग, कार्यातील स्थैर्य असणारे वातावरण तयार करते आणि उत्पादकता वाढवते.
बाल्कनी/व्हरांडा: वास्तुनुसार बाल्कनी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. बाल्कनीसाठी निळा, क्रीम आणि गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या हलक्या छटासारखे शांत रंग वापरण्यास प्राधान्य द्या. ही अशी जागा आहे जिथे रहिवासी बाह्य जगाशी जोडतात. म्हणून, येथे सर्व गडद रंग टाळले पाहिजेत.
गॅरेज: वास्तुनुसार, गॅरेजसाठी आदर्श स्थान वायव्य बाजूला आहे. पांढरे, पिवळे, निळे किंवा इतर कोणतेही हलक्या छटा असलेले रंग आदर्श रंग आहेत.
भिंतीचे रंग जे सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात
जर तुम्ही घरामध्ये सकारात्मकता आणणारे भिंतीचे रंग शोधत असाल तर तुम्ही खालील रंग पॅलेट निवडू शकता:
पिवळा
घरासाठी वास्तू रंग म्हणून पिवळ्या छटा संवाद, स्वाभिमान आणि शक्तीशी संबंधित आहेत.
जांभळा
जांभळा रंग शांततेसाठी एक परिपूर्ण वातावरण तयार करतो. आरामदायक आणि शांत झोपेसाठी आपण लॅव्हेंडर सारखी हलकी छटा निवडू शकता.
शांत झोपेसाठी शास्त्रोक्त पद्धतीने कोणत्या दिशेला झोपावे हे सर्व वाचा
हिरवा
हिरवा रंग ताण शांत करतो. घरासाठी वास्तू रंग म्हणून हिरव्या छटा देखील घटकाशी देखील संबंधित आहे आणि त्यात तणाव आणि नैराश्य बरे करण्याचे गुण आहेत.
वास्तूनुसार भिंतीचे रंग जे तुम्ही तुमच्या घरात टाळावेत
तज्ञ सुचवतात की घरासाठी वास्तू रंग म्हणून हलक्या शेड्स नेहमीच चांगली असतात. वास्तूनुसार लाल, तपकिरी, राखाडी आणि काळ्या सारख्या गडद छटा प्रत्येकाला शोभणार नाहीत, कारण ते राहू, शनि, मंगळ आणि सूर्य यासारख्या काही ज्वलंत ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. “लाल, गडद पिवळा आणि काळा रंग टाळावा. साधारणपणे, या रंगांची तीव्रता जास्त असते आणि त्यामुळे तुमच्या घराच्या उर्जा पॅटर्नला त्रास होऊ शकतो,” सेठी सावध करतात. तथापि, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात उत्कटता आणि उबदारपणा नाही, तर तुम्ही तुमच्या घराच्या काही कोपऱ्यात लाल रंग निवडू शकता.
- वास्तूनुसार बेडरुमसाठी, लाल रंगाचा जास्त वापर टाळा कारण ते अग्नि उर्जा दर्शवते आणि स्वभावाच्या समस्या निर्माण करू शकते.
- घरासाठी वास्तू रंगानुसार, घरमालकांनी जास्त प्रमाणात पांढरा रंग टाळावा कारण यामुळे अहंकार वाढतो.
- घरमालकांनी गॅरेज आणि कार पार्किंगच्या ठिकाणी घरासाठी वास्तु रंग म्हणून कोणतेही गडद रंग टाळावेत.
घरासाठी वास्तू रंग: पडदे रंग मार्गदर्शक तत्त्वे
घरासाठी वास्तूनुसार हे केवळ भिंतींचे रंग नसून एकंदर आपल्यावर प्रभाव टाकणारे असे खोलीत उपस्थित असलेले वास्तू रंग आहेत. म्हणूनच पडद्यासाठी योग्य वास्तू रंग, आपल्या घराला आरामदायक बनवू शकतात. पांढरे, ऑफ व्हाईट, रोजी रेड, गुलाबी, इत्यादी हलके रंगाचे पडदे निवडा. हे वास्तूनुसार रंग शांतता आणि विश्रांतीशी संबंधित आहेत, जे बेडरूमसाठी आदर्श आहे. काळ्या रंगाचे आणि काळ्या रंगातील छटेचे पडदे टाळा कारण वास्तूनुसार जोडप्यांसाठी बेडरूमला हा रंग शोभत नाही.
तसेच घरासाठी वास्तू रंगांनुसार, लिव्हिंग रूमच्या पडद्यासाठी योग्य रंग पिवळे, हिरवे आणि निळे आहेत, तर जेवणाच्या खोलीच्या पडद्यासाठी हिरवा, गुलाबी आणि निळा रंग वापरण्याची शिफारस केली जाते. हिरवा हे आशेचे प्रतीक आहे आणि ते उपचार आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. निळा रंग नवीन सुरुवात दर्शवतो आणि गुलाबी रंग प्रेम दर्शवतो. बाथरुममधील पडद्यांचा वास्तूनुसार रंग राखाडी, गुलाबी, पांढरा आणि काळा यांच्या संयोजनात असावा.
- उत्तरमुखी खोल्यांमधील पडदे हलके हिरव्या रंगाचे असावेत.
- वास्तुनुसार, उत्तर-पश्चिम दिशेला असलेल्या खोल्यांना पांढरे रंगाचे पडदे असावेत.
- वास्तुनुसार पश्चिम दिशेच्या खोल्यांना राखाडी रंगाचे पडदे असावेत.
- आग्नेय दिशेला असलेल्या खोल्यांना लाल किंवा गुलाबी रंगाचे पडदे असावेत.
- ईशान्य दिशेला असलेल्या खोल्यांना पिवळ्या रंगाचे पडदे असावेत.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या टाइल्स किंवा मार्बलचा रंग कसा असावा?
वास्तुशास्त्रानुसार घरातील टाइल्सचा रंग सारखाच असावा आणि तोही हलक्या रंगाचा. गडद रंगाच्या टाइल्स बसवणे टाळावे. हलका रंग शुभतेचे प्रतीक आहे आणि आर्थिक संकटापासून संरक्षण करतो. याशिवाय घराच्या दक्षिण दिशेला फरशीवर लाल रंगाचा संगमरवरी किंवा डिझाइन करणे फायदेशीर ठरते.
वास्तुनुसार रंगांचे महत्त्व
रंग | प्रतिनिधित्व करते |
लाल | उत्कटता, शक्ती, भावना, कळकळ |
नीळा | सौंदर्य, समाधान, भक्ती, सत्य |
हिरवा | वाढ, उपचार, प्रजनन, समृद्धी |
पांढरा | शुद्धता, मोकळेपणा, निरागसता, लक्झरी |
पिवळा | आशावाद, मोकळेपणा, अभ्यास, बुद्धिमत्ता |
नारंगी | निश्चय, ध्येय, चांगले आरोग्य, आराम |
तपकिरी | स्थिरता, समाधान, आराम |
जांभळा | श्रीमंती, विलासिता, कृपा, अभिमान |
हे देखील पहा: अपूर्ण वास्तूमुळे तुम्ही चांगल्या मालमत्तेचा त्याग केला पाहिजे का?
घरासाठी वास्तू रंग: स्वयंपाकघरातील रंग
वास्तूनुसार स्वयंपाकघरासाठी रंग कोणते?
वास्तु रंगांनुसार स्वयंपाकघरासाठी सर्वोत्कृष्ट रंग नारिंगी आणि लाल आहेत कारण स्वयंपाकघर अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील वास्तू रंगातही चमकदार छटा असतात आणि त्यामुळे वास्तूनुसार स्वयंपाकघराचा रंगही पिवळा असू शकतो. गुलाबीसारख्या उबदार छटा, प्रेम आणि कळकळ दर्शवतात, तर तपकिरी वास्तू रंग देखील स्वयंपाकघरात चालू शकतो कारण तो समाधान दर्शवतो. दक्षिण-पूर्व भाग स्वयंपाकघरांसाठी आदर्श आहे. स्वयंपाकघरात फडताळ असल्यास, लिंबाचा पिवळा, नारिंगी किंवा अगदी हिरव्या रंगाच्या छटा वास्तू रंग म्हणून चांगल्या प्रकारे चालू शकतात, कारण त्या ताजेपणा, आरोग्य आणि सकारात्मकता दर्शवतात. फ्लोअरिंगसाठी, मोज़ेक, संगमरवरी किंवा सिरॅमिक टाइल्स निवडा. हलक्या शेड्स – बेज, पांढरा किंवा हलका तपकिरी हे वास्तूनुसार स्वयंपाकघरातील जमिनीसाठी चांगले रंग आहेत. वास्तूच्या शिफारसींनुसार किचन ओटा नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ज्यात ग्रॅनाइट किंवा क्वार्ट्जचा समावेश आहे, अशा दगडांमध्ये असणे सर्वोत्तम आहेत. स्वयंपाकघरातील वास्तू रंगांनुसार, नारंगी, पिवळे आणि हिरवे रंग स्वयंपाकघरातील काउंटरटॉपसाठी चांगले काम करतात. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील रंग जास्त गडद नसावा. वास्तू प्रमाणे गडद राखाडी, तपकिरी आणि काळा रंग टाळा. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील रंग म्हणून निळा टाळावा, कारण निळा रंग पाण्याची देवता वरुण दर्शवतो आणि स्वयंपाकघर हे एक क्षेत्र आहे जिथे अग्नी राज्य करते.
वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजा आणि खिडक्यांचा रंग कसा असावा?
घराच्या मुख्य दरवाजासाठी योग्य रंग निवडणे हे वास्तूनुसार योग्य दिशा निवडण्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे, दारांसाठी योग्य रंग कसा निवडायचा आणि कोणते रंग योग्य आहेत हे जाणून घेऊया.
वास्तूनुसार मुख्य दरवाजासाठी पांढरा रंग. जर तुम्ही फ्लॅट किंवा लहान घरात राहत असाल तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पांढराच लावावा. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे, जो तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख-शांती टिकवून ठेवतो.
वास्तूनुसार मुख्य दरवाजासाठी लाकडी तपकिरी रंग
वास्तूनुसार, जर तुमचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला उघडत असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लाकडी तपकिरी रंग लावू शकता. हे केवळ तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासाठीच सुंदर दिसत नाही तर ते तुमच्या घराचे सुंदर आणि संतुलित स्वरूप राखण्यातही मदत करते.
घरासाठी वास्तू रंग: चित्रे आणि चित्रांच्या रंगांसाठी वास्तू टिपा
घरासाठी वास्तू रंगानुसार खोलीच्या ईशान्य दिशेला कलाकृती ठेवा. त्यात काळा आणि लाल रंग टाळा.
भिंतीच्या रंगांव्यतिरिक्त, भिंतीवरील चित्रे आणि फोटोदेखील वास्तूनुसार प्रभावित करतात. घराचा उत्तर विभाग करिअरशी जोडलेला आहे. पाण्याशी संबंधित (समुद्र, नदी, प्रवाह किंवा कारंजे) निळ्या रंगाची चित्रे संपत्ती आणि नशीब बदलवू शकतात. बेडरूममध्ये पाण्याशी संबंधित चित्रे टाळा. उत्तर भिंतीवर एखाद्या रस्त्याचे किंवा पायवाटेचे चित्र एखाद्याच्या कारकीर्दीत अधिक संधी आणतात.
निसर्गरम्य किंवा निसर्गाचित्रासारखी चित्रे किंवा प्रतिमा वापरणे चांगले आहे, कारण या सुखदायक स्थळांकडे पाहणे हे उपचारात्मक आहे.
वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशा सूर्याचे प्रतीक आहे आणि दक्षिण अग्नीचे प्रतीक आहे. तर, उगवत्या सूर्याची (पिवळी आणि केशरी) चित्रे किंवा हिरवेगार चित्रे पूर्व आणि दक्षिण-पूर्व भागात ठेवता येतात. दक्षिण म्हणजे पृथ्वी, माती आणि म्हणजेछ स्थिरता. दक्षिण भागातील उर्जा वाढवण्यासाठी, भिंतीला तपकिरी रंगाच्या चौकटीत पर्वत आणि पूर्ण वाढलेली झाडे चित्रे किंवा पेंटिंगसह सजवा.
Housing.com POV
रंग आपल्या भावनांवर आणि आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतात. वास्तुशास्त्रानुसार, आपले घर सकारात्मक वातावरण निर्माण करणारे रंग वापरून डिझाइन करणे महत्त्वाचे आहे. रंग निवडताना, आपल्या आवडीनुसार तसेच घराच्या सजावटीला आनंददायी बनवण्यासाठी रंगांचा वापर करा, पण वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचे पालन करत संतुलन राखणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्र निसर्गाशी संबंधित गोष्टींचा वापर करण्यास प्राधान्य देते, त्यामुळे कृत्रिम रंगांपेक्षा नैसर्गिक रंगांना पसंती देणे चांगले असते, कारण त्याच्यापासून सकारात्मक ऊर्जा प्रभावीपणे पसरते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
वास्तूनुसार पश्चिम भिंतीचा रंग कोणता?
वास्तूनुसार पश्चिम भिंतीचा रंग निळा किंवा पांढरा असावा.
वास्तूनुसार दक्षिण भिंतीचा रंग कोणता?
वास्तूनुसार दक्षिण भिंतीचा रंग नारंगी किंवा लाल असावा.
बेडरूमसाठी वास्तूचे रंग काय असावेत?
बेडरूमसाठी वास्तू रंग निळा किंवा हिरवा असावा.
वास्तूनुसार हॉलचा रंग काय असावा?
वास्तूनुसार हॉलचा रंग पिवळा किंवा पांढरा असावा.
(पूर्णिमा गोस्वामी शर्मा आणि अरुणा राठोड यांच्या इनपुटसह)