कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ((Employees’ Provident Fund Organisation) म्हणजेच ईपीएफओ (EPFO)कडून चालविण्यात येणाऱ्या शासनाद्वारे व्यवस्थापित निवृत्ती बचत योजनेत तुमचे योगदान जमा होत असल्यास पीएफ काढणे (PF withdrawal) आणि ईपीएफ काढणे (EPF withdrawal) शक्य होते. ही मार्गदर्शिका तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन पीएफ काढणे, ईपीएफ काढण्याची प्रक्रिया जाणून घ्यायला मदत करेल. त्याचप्रमाणे पीएफ काढण्यासाठी ईपीएफओ सबस्क्रायबरला पीएफ काढण्याविषयीच्या नियम आणि अटी समजावून सांगेल.
हे देखील वाचा: युएएन क्रमांकासह पीएफ शिल्लक तपासा विषयी सर्वकाही. या मार्गदर्शिकेत ईपीएफ पासबुक विषयी सर्व काही जाणून घ्या.
पीएफ (भविष्य निर्वाह निधी) ऑनलाईन पैसे काढणे
ईपीएफओच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमच्या मालकाच्या कोणत्याही मंजुरीशिवाय ईपीएफ पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकता. संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या पीएफ दाव्याची स्थिती तपासून बघणे शक्य आहे. जर तुमचा युएएन आणि आधार जोडलेले असतील आणि तुमचा युएएन सक्रीय असेल तरच हे शक्य होईल.
तुमचा युएएन कशाप्रकारे सक्रीय करायचा ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी युएएन लॉगइन मार्गदर्शिका बघा.
पीएफ ऑनलाईन पैसे काढणे: क्रमवार प्रक्रिया
क्रम १: EPFO मेंबर पोर्टल या अधिकृत संकेतस्थळावर जा.
क्रम २: वरच्या डाव्या बाजूला असलेल्या ‘Services’ (सर्व्हिसेस) या पर्यायाची निवड करून त्यातील ड्रॉप-डाऊन मेन्यूतील ‘For employees’ (फॉर एम्प्लॉईज) चा पर्याय निवडा.
क्रम ३: ‘Member UAN/Online Services (OCS/OTCP) (मेंबर युएएन/ऑनलाईन सर्व्हिसेस (ओसीएस/ओटीसीपी)) पर्यायाची निवड करा.
क्रम ४: एक नवीन पान उघडेल. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा युएएन, पासवर्ड आणि कॅप्चा विवरण देण्यास सांगितले जाईल.
क्रम ५: तुमच्या होम अकाउंमध्ये, वरच्या भागातील डाव्या बाजूला ‘Manage’ (मॅनेज) वर जाऊन ड्रॉप-डाउन मेन्यूतून KYC पर्याय निवडा.
क्रम ६: एक नवीन पान उघडेल. ईपीएफओमार्फत याच अकाउंटमध्ये पीएफ मधून काढलेले पैसे थेट क्रेडीट होणार असल्याने तुम्ही पुरवलेला केव्हायसी तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्या.
क्रम ७: केव्हायसीचे तपशील योग्य असल्याची खात्री करून घेतल्यावर, ‘ऑनलाईन सर्व्हिसेस टॅब’ वर जा. ड्रॉप-डाउन मेन्यूतील ‘क्लेम’ (फॉर्म ३१, १९ आणि १० सी) वर क्लिक करा.
क्रम ८: एका नवीन पानावर तुमचा संपूर्ण तपशील दिसेल आणि तुमच्या बँक खाते क्रमांकाची पुष्टी करण्यास सांगण्यात येईल. याच खात्यावर ईपीएफमधील पैसे ऑनलाईन क्रेडीट करण्यात येतील.
क्रम ९: बँक खात्याची पुष्टी केल्यावर ‘Certificate of Undertaking’ (सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग) तयार होईल. पुढे जाण्यासाठी सर्टिफिकेटवरील ‘YES’ वर क्लिक करा.
क्रम १०: ‘Proceed for Online Claim’ (प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम) वर क्लिक करा.
क्रम ११: दाव्याच्या अर्जावर, ‘I Want To Apply For’ (आय वॉन्ट टू अप्लाय फॉर) पर्यायाखाली असलेला तुम्हाला हवा तो दावा निवडा- complete EPF settlements (संपूर्ण ईपीएफ सेटलमेंट), EPF part withdrawal (loan/advance) (ईपीएफ पार्ट काढणे) (कर्ज/आगाऊ) किंवा pension withdrawal (पेन्शन काढणे). तुम्ही या कोणत्याही सेवेसाठी पात्र नसल्यास, ड्रॉप-डाउन मेन्यूमध्ये हे पर्याय दाखवण्यात येणार नाहीत.
क्रम १२: तुमचा पीएफ काढण्यासाठी ‘PF Advance (Form 31)’ (पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म ३१) निवडा. या आगाऊ निधीचा उद्देश, हवी असणारी रक्कम आणि तुमचा पत्ता इ. माहिती भरा. स्व-घोषणा (self-declaration) साठी असलेल्या चौकोनात खूण करा.
क्रम १३: तुमचा पीएफ काढण्याचा अर्ज सादर झाला आहे. पुढील प्रक्रियेसाठी तुमचा ईपीएफ काढणे अर्ज हा मालकाकडून मंजूर होणे गरजेचे आहे.
ईपीएफ काढणे: नियम २०२२
पीएफ काढणे कालावधी
तुमचे पीएफ खाते हे सामान्य बचत खात्यासारखे नसते. यात साठवलेले पैसे हे निवृत्तीनंतरच्या काळात वापरण्यासाठी असतात. म्हणूनच, तुम्ही सेवेत असताना पीएफमधून पैसे काढता येत नाहीत. निवृत्तीनंतरच तुम्ही तुमची पीएफ रक्कम काढू शकता.
संपूर्ण पीएफ काढणे
जेव्हा तुम्ही वयाची ५८ वर्षे पूर्ण करता तेव्हाच तुम्ही तुमची संपूर्ण पीएफ रक्कम काढून घेऊ शकता. तुम्ही वेळेआधीच निवृत्ती घेतलीत तरीही वयाची किमान ५५ वर्षे पूर्ण झाल्यावरच तुम्हाला संपूर्ण पीएफ काढता येतो. जर दोन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुम्ही बेरोजगार असल्यास संपूर्ण पीएफ काढून घेणे शक्य असते. या दुसऱ्या परिस्थतीमध्ये, तुम्हाला तुमच्या मालकाने त्याच्या पीएफ काढण्याच्या विनंती अर्जावर तुम्हाला ‘बेरोजगार’ जाहीर करणे गरजेचे असते.
निकडीच्या वेळी आंशिक पीएफ काढणे
निकडीच्या वेळी तुम्ही आंशिक पीएफ रक्कम काढून घेऊ शकता. आंशिक रक्कम मर्यादा ही पैसे काढण्याच्या कारणावर अवलंबून असते. सदस्याने किमान सेवा मर्यादा पूर्ण केली असली तरच तो आंशिक रक्कम काढण्यासाठी पात्र असतो.
पीएफ काढणे: तुम्ही सेवेत असताना ईपीएफ काढणे प्रमाणित करण्यासाठीची कारणे
- उच्च शिक्षण घेण्यासाठी
- वैद्यकीय उपचार
- लग्न
- घर बांधणे किंवा विकत घेणे
- घर दुरुस्ती
- गृहकर्ज फेड
- ६० दिवसांपेक्षा जास्त किंवा दोन महिने बेरोजगारी
- परदेशी स्थलांतर
- गरोदरपणामुळे अथवा प्रसूतीपश्चात नोकरी सोडणे
आगाऊ पीएफ काढण्यासाठीच्या अटी
पुढील अटींमध्ये बसणाऱ्या व्यक्ती निवृत्तीपूर्वीच त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात:
- लग्न खर्चासाठी म्हणून तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. तुमच्या नोकरीच्या काळात तुम्ही तीन वेळा रक्कम काढू शकता.
- दहावीनंतरच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तुमची तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. या परिस्थितीमध्येही तुम्ही तीन वेळा पैसे काढू शकता.
- जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी तुम्ही एकदाच पैसे काढू शकता.
- गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तुम्ही पीएफमधून आगाऊ रक्कम काढू शकता. यासाठी कितीही वेळा पैसे काढता येतात.
नोकरी गमावल्यानंतर पीएफ काढणे
ज्या व्यक्ती स्वत:ची नोकरी गमवतात, त्या त्यांच्या नोकरीच्या समाप्तीनंतर एका महिन्याने त्यांच्या पीएफ खात्यातून त्यांच्या जमा रकमेच्या ७५% रक्कम काढू शकतात. जर ती व्यक्ती दोन महिने बेरोजगार राहिली, तर तिला उर्वरित २५% रक्कमही काढून घेता येऊ शकते. न्ह्या
पीएफ काढणे मर्यादा
पीएफ खातेधारक त्यांच्या मूळ वेतनानुसार महागाई भत्त्यासह तीन महिन्यांच्या वेतनाइतकी रक्कम किंवा त्यांच्या पीएफ खात्यातील निव्वळ शिलकीच्या ७५% रक्कम, यातील जी कमी असेल ती रक्कम काढू शकतात. समजा तुमचे तीन महिन्याचे वेतन आणि महागाई भत्ता मिळून होणारी रक्कम ही रु. २ लाख आहे आणि तुमच्या पीएफ खात्यातील निव्वळ शिल्लक ही रु. ३ लाख आहे. रु. ३ लाखांच्या ७५% टक्के म्हणजे रु. २.२५ लाख होत असल्याने, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून केवळ रु. २ लाख रुपये काढू शकता.
आंशिक पीएफ काढणे मर्यादा तक्ता
ईपीएफ काढणे कारण | सेवा कालावधी | ईपीएफ काढणे मर्यादा | लाभार्थी |
घर खरेदी/जमीन खरेदी/ घर बांधणी | ५ वर्षे | *जमिनीचा तुकडा खरेदी करायचा असल्यास, कर्मचाऱ्याचे २४ महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा जमिनीची वास्तविक किंमत, यातील जी रक्कम कमी असेल ती.
**घर बांधायचे असल्यास, ३६ महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा जमिनीची वास्तविक किंमत किंवा बांधणी खर्च, यातील कमी असणारी रक्कम. ***दोन्ही परिस्थितींमध्ये, पीएफ काढणे मर्यादा ही पीएफ शिलकीच्या (बॅलन्स) ९०% पेक्षा जास्त असणार नाही. |
पीएफ खातेधारक आणि त्यांचा जोडीदार किंवा संयुक्त खातेदार |
गृह कर्ज परतफेड | ३ वर्षे | पीएफ शिलकीच्या ९०%. | पीएफ खातेधारक आणि त्यांचा जोडीदार किंवा संयुक्त खातेदार |
घर नूतनीकरण आणि दुरुस्ती | १० वर्षे | १२ महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता. | पीएफ खातेधारक आणि त्यांचा जोडीदार किंवा संयुक्त खातेदार |
लग्न | ७ वर्षे | कर्मचाऱ्याच्या योगदानाच्या ५०% आणि त्यावरील व्याज. | पीएफ खातेधारक, त्यांची मुले आणि भावंडे |
वैद्यकीय उपचार | लागू नाही | कर्मचाऱ्याचे व्याजासह योगदान किंवा मासिक वेतनाच्या सहा पट, यातील जे कमी असेल ते. | पीएफ खातेधारक, त्यांचा जोडीदार, त्यांचे पालक आणि त्यांची मुले. |
हे देखील पहा: ईपीएफ पासबुक : युएएन सदस्य पासबुक कशाप्रकारे तपासता आणि डाउनलोड करता येते?
पीएफ काढण्यावरील कर
पाच वर्षांची नोकरी पूर्ण झाल्यावर जर तुम्ही ईपीएफ काढणे करत असलात तर पीएफ काढणेवर कोणत्याही प्रकारे कर वजावट लागू होत नाही. नोकरीमध्ये पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच पीएफ काढणे करायचे झाल्यास, तुमच्या पीएफ शिलकीतून १०% टीडीएस (उत्पन्न स्रोतावरील कर कपात) कापण्यात येतो. या ही परिस्थितीमध्ये, ईपीएफ काढणे हे रु. ५०,००० पर्यंत असल्यास त्यावर कर लागू होत नाही. तरीही, पीएफ काढणे करताना तुम्ही पॅन तपशील न दिल्यास, ३०% इतक्या जास्त दराने टीडीएस लागू होतो.
लक्षात घ्या की, नोकरी गमावल्यामुळे किंवा आजारपणामुळे बेरोजगार राहावे लागत असल्यामुळे जर ईपीएफ काढणे केले गेले असेल तर ते कर-मुक्त असते. अशाचप्रकारे, तुमची ईपीएफ काढणे रक्कम ही राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस) वळवली गेल्यास, पीएफ काढणेवर कर लागू होणार नाही.
ईपीएफ काढणेसह तुमचे संपूर्ण उत्पन्न हे करपात्र नसल्यास, फॉर्म जी/फॉर्म १५ एच५ भरून तुम्हाला स्वत:ला ते स्व-घोषणेमध्ये (सेल्फ-डिक्लरेशन) नमूद करावे लागेल.
ईएपीएफ काढणे: तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास किती वेळ लागतो?
तुमच्या पीएफ काढणे विनंतीवर प्रक्रिया होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच तुमची पीएफ रक्कम ही सुमारे २०-३० दिवसांनी तुमच्या खात्यात जमा होईल.
ईपीएफ काढणे: ऑफलाईन प्रक्रिया
ऑफलाईन ईपीएफ काढणे करण्यासाठी नवा कम्पोझीट क्लेम फॉर्म- आधार किंवा कम्पोझीट क्लेम फॉर्म फॉर नॉन-आधार डाउनलोड करा.
कम्पोझीट क्लेम फॉर्म–आधारसह ईपीएफ काढणे
तुमच्या सक्रीय युएएनसह जर तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक असेल तर कम्पोझीट क्लेम फॉर्म- आधारचा वापर करा. हा अर्ज भरून तुम्ही तो संबंधित अधिकारक्षेत्रातील ईपीएफओ कार्यालायात सादर करू शकता. यासाठी मालकाच्या साक्षांकनाची (अटेस्टेशन) गरज नसते.
कम्पोझीट क्लेम फॉर्म नॉन–आधार ईएपीएफ काढणे
जर तुमचा आधार क्रमांक युएएन पोर्टलवर लिंक केला नसल्यास, कम्पोझीट क्लेम फॉर्म नॉन-आधारचा वापर करा. हा अर्ज भरून मालकाच्या साक्षांकनासह तो संबंधित अधिकार क्षेत्रातील ईपीएफओ कार्यालयात सादर करा.
लक्षात ठेवा की, ज्या कर्मचाऱ्यांनी युएएनसह त्यांचे आधार जोडले नसेल त्यांना पीएफ काढणेसाठी त्यांच्या मालकाच्या साक्षांकनासह कम्पोझीट क्लेम फॉर्म सादर करावा लागेल.
आंशिक ईपीएफ काढणे करायचे असल्यास, प्रमाणपत्रे सादर करावी लागत नाहीत. तुम्ही स्व-घोषणेचा (सेल्फ-डिक्लरेशन) पर्याय निवडू शकता.
युएएन नसताना पीएफ काढणे
तुमचे युएएन सक्रीय नसेल तर, स्थानिक प्रॉव्हिडंट फंड कार्यालयात प्रत्यक्ष हजर होऊन तुम्हाला लागू असणारा पीएफ काढणे अर्ज भरून सादर करावा लागेल. पीएफ काढणे अर्जासोबत तुम्हाला बँक व्यवस्थापकाने किंवा राजपत्रित अधिकाऱ्याने (गॅझेट ऑफिसर) साक्षांकन केलेले ओळखपत्रही तुम्हाला सादर करावे लागेल.
ईपीएफ काढणेचे प्रकार
पीएफ काढणेचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत:
- पीएफ अंतिम फेड (सेटलमेंट)
- पीएफ आंशिक काढणे
- निवृत्तीवेतन (पेन्शन) काढणे भत्ता
ईपीएफ अर्ज
वेगवेगळ्या ईपीएफ विड्रॉवल्ससाठी, वेगवेगळ्या पीएफ काढणे अर्जांचा वापर करावा लागतो. यामध्ये पुढील अर्जांचा समावेश आहे:
ईपीएफ अर्ज १९: संपूर्ण पीएफ काढणेसाठी किंवा ईपीएफ खात्यातून आगाऊ रकमेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफ अर्ज १९ चा वापर करावा लागतो.
ईपीएफ अर्ज ३१: आंशिक पीएफ काढणे किंवा ईपीएफ खात्यातून आगाऊ रकमेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफ अर्ज ३१ चा वापर करावा लागतो. .
ईपीएफ अर्ज: १०सी: काढणे किंवा तुमची कर्मचारी पेन्शन योजना शिल्लक हस्तांतरित करण्यासाठी ईपीएफ अर्ज १०सीचा वापर करावा लागतो.
या वेगवेगळ्या अर्जांच्या ऐवजी आता कम्पोझीट फॉर्म्सचा उपयोग केला जातो.
पीएफ काढणेसाठी आवश्यक कागदपत्रे/ तपशील
पीएफ काढणे प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढील तपशिलांची गरज असते:
- युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा युएएन
- पीएफ धारकाच्या बँक खात्याचा तपशील. (पीएफ धारकाच्या मृत्यूपर्यंत पीएफ रक्कम ही तिसऱ्या पक्षाकडे हस्तांतरित केली जात नाही).
- कर्मचाऱ्याने कंपनी सोडली असल्याबाबतचे मालकाचे निवेदन
पीएफ काढणे संबंधित तक्रारी
ईपीएफ काढणे संबंधात तुमच्या काही तक्रारी असल्यास, तुम्ही ऑनलाईन ईपीएफ तक्रार व्यवस्थापन प्रणालीला भेट देऊन तिथे तक्रार नोंदवू शकता. या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकता, स्मरणपत्र पाठवू शकता आणि तुमच्या तक्रारीची स्थितीही तपासून बघू शकता.
तक्रार कशी करायची हे जाणून घेण्यासाठी EPFiGMS वर ईपीएफ तक्रारीसंबंधातील आमचे मार्गदर्शक वाचा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
युएएन म्हणजे काय?
युएएन किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा एक वैशिष्ट्यपूर्ण १२ अंकी खाते क्रमांक असून जी व्यक्ती त्यांच्या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ) खात्यात योगदान करते, त्या प्रत्येक व्यक्तीला हा क्रमांक देण्यात येतो.
पीएफ म्हणजे काय?
पीएफ हे प्रॉव्हिडंट फंड (भविष्य निर्वाह निधी)चे संक्षिप्त रूप आहे.
ईपीएफ हे कशाचे संक्षिप्त नाव आहे?
ईपीएफ हे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडचे संक्षिप्त रूप आहे.
भारतात पीएफचे व्यवस्थापन कोण करते?
भारतात एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) तर्फे पीएफचे नियमन आणि व्यवस्थापन केले जाते.
सेवेत असताना मी माझ्या ईपीएफ बॅलन्समध्ये रक्कम का काढू शकत नाही?
निवृत्तीनंतरच्या गरजा भागविणे हे पीएचे उद्दिष्ट असल्याने, ईपीएफ सदस्य सेवेत असताना त्यांना त्यांची पीएफ रक्कम काढून घेण्याची परवानगी नसते.
कितव्या वर्षी मी माझा संपूर्ण पीएफ बॅलन्स काढू शकते/शकतो?
वयाच्या ५८ व्या वर्षी तुम्ही तुमचा संपूर्ण पीएफ बॅलन्स काढू शकता.
पीएफ काढणेच्या वेळी पॅन तपशील देणे गरजेचे आहे का?
हो, पीएफ काढणेच्या वेळी पॅन तपशील देणे अत्यावश्यक आहे. हा तपशील न दिल्यास, ३०% किंवा जास्तीचा टीडीएस तुमच्या पीएफ रकमेतून वजा केला जाऊ शकतो. पॅन तपशील दिले असता, १०% टीडीएस लागू होतो.
मी माझ्या पीएफ खात्यातून काढलेली रक्कम पुन्हा भरू शकते/शकतो का?
नाही, पीएफमधून काढलेली रक्कम पुन्हा परत करता येत नाही.
ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन न करता मी ईपीएफ काढणे करू शकते/शकतो का?
ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन न करताही तुम्ही तुमच्या ईपीएफ शिलकीचा (बॅलन्स) दावा करू शकता. यासाठी, कम्पोझीट क्लेम फॉर्म डाऊनलोड करून तो भरा आणि स्थानिक ईपीएफओ कार्यालयात जमा करा.
पीएफमधील योगदान हे कर कपातीसाठी पात्र आहे का?
आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत पीएफ योगदानावर कर कपात लागू होते.